आता मला वाटते भिती

(पडुन आहे नोट अजुनी)

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in जे न देखे रवी...
14 Nov 2016 - 2:10 pm

पडुन आहे नोट अजुनी, राजसा थकलास का रे?
एवढ्यातच रांग सोडुन, तू असा बसलास का रे?

अजुनही सरल्या न गड्ड्या, त्या हजारापाचशेंच्या
अजुन बँका सरल्या कुठे रे, हाय तू हरलास का रे?

सांग, नोटा शोधणाऱ्या पंटरांना काय सांगू?
उगवले एजंट सारे, आणि तू निजलास का रे?

बघ तुला दिसतील नंतर मॉरिशसच्या चोरवाटा
गोरगरिबांच्या अकाउंटांस वापरलास का रे?

उसळती खोक्यांत साऱ्या पाचशेच्या बंद नोटा
आयटीच्या रेडला तू आज घाबरलास का रे?

- स्वामी संकेतानंद

आता मला वाटते भितीअर्थव्यवहार

"स्व"....

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...
22 Oct 2016 - 3:43 pm

कोणी शब्दबंबाळ...कोणी गोष्टीवेल्हाळ ....
कोणी अर्थजंजाळ...कोणी नुसतेच पाल्हाळ....

व्यक्ती असतील वेगवेगळ्या पण वागणूक तीच.....
जगात काय तो एकटा शहाणा मीच !

एक आपला "स्व" मोठा , बाकी कस्पटासमान.....
आपण त्यांच्याबरोबर नाही हे इतरांचेच नुकसान !?

आपण काय म्हटले .....त्याने हाती काय लागले ?
का म्हणून सगळेचजण आपल्याशी असे वागले ?

जमत असेल तर एकदा तटस्थपणे करावा विचार.....
स्वत:ला थोडे बाजूला ठेवून विचार करावा सारासार..!

सगळेच काहीतरी म्हणतात म्हणजे त्यात काही तथ्य आहे
माणूस आहोत,माणुसकीने वागू...बाकी सगळे मिथ्य आहे

अभय-लेखनआता मला वाटते भितीकरुणशांतरसवावरशिक्षण

(फेंदारलेल्या मिशा....)

नाखु's picture
नाखु in जे न देखे रवी...
12 Oct 2016 - 9:27 am

अत्यंत सुंदर अर्थवाही रचनेचे विंडंबन करणे जीवावर आले होते,पण नंतर लक्ष्यात आले ही कलाकृती विडंबन नसून चाल तिथून घेऊन केलेली स्वतंत्र वाट्चाल आहे.

दसरा मेळावा होऊन गेल्याने ही कवीता येणे आवश्यक होते.

मूळ कवींनी (राजेंद्र देवी) मोठ्या मनाने माफ करणे.

पाहून स्वप्ने सत्तेची
बोकाळली आहे संराशा
आता कोठे होऊ लागल्यात
पाठवणी जराश्या

का करीशी भणभण
या वखवखलेल्या सत्ताबाजारात
आता कोठे मिळविल्यात
खुर्द्यात चवल्या जराश्या

अविश्वसनीयआता मला वाटते भितीकाहीच्या काही कविताजिलबीफ्री स्टाइलरतीबाच्या कविताहास्यविनोदमौजमजा