मौजमजा

खासियत खेळियाची - पुल इट लाईक पंटर !

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
15 May 2020 - 7:34 pm

पुल हा खरंतर क्रिकेटमधला सर्वात उर्मट फटका. खेळाची कुठलीही स्टेज असो, बोलर कोणीही असो, पिच कसंही असो - बॅट्समननी जर कडकडीत पुलचा चौकार किंवा षटकार मारला तर बोलर खांदे पाडून मास्तरांनी मुस्कटात मारलेल्या विद्यार्थ्यासारखा आपल्या जागी परत जातो. कारण पुलच्या अदाकारीतच एक उद्दामपणा आहे. तो उर्मटपणा नसानसात भिनलेला आपला खेळिया म्हणजे आपलं "punter" (जुगारी) हे नामाभिधान सार्थ ठरवणारा रिकी पाँटिंग!

मौजमजाप्रकटनआस्वादलेख

कवितेच्या विषाणूने

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
9 May 2020 - 3:27 pm

कवितेच्या विषाणूने तुला दंश केला
(एक चांगला इसम कामातून गेला)
जे न पाहू शके रवि ते तुला दिसते
चांदण्यांची धूळ तुझ्या पायाशी लोळते
विसरशी व्यवहार, शब्द हेची धन
ऐन कोलाहलातही करीसी चिंतन
न बोलले, अव्यक्तसे तुला ऐकू येते
जाणिवेच्या पल्याडचे तुला खुणाविते
कळेना रचसी अशी कोणती कविता

मिपा काव्यस्पर्धेमध्ये टाक..
..आज
..आत्ता!

दुसरी बाजूप्रेरणात्मकमौजमजा

नवंविवाहित आणि जुनंविवाहित! (गप्पा)

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
15 Apr 2020 - 3:37 pm

एक नवविवाहित एका जुनंविवाहिताशी गप्पा मारतोय.

समाजऔषधी पाककृतीमौजमजाविरंगुळा

हैदोस [18+]

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
11 Apr 2020 - 1:12 pm

बी.डी. चाळीच्या कोपऱ्यावरची शेवटची खोली आहे तिथे वारा खूप थंडगार सुटतो. म्हणूनच मालकाने आम्हांस तीच खोली देऊ केली. आणि विशेष म्हणजे भाडेही कमी घेतले. त्यांचे आभारच मानायला हवेत. तसंही त्या बाजूला जरा अंधारच असायचा. सार्वजनिक नळावरून भल्या सकाळी घमेली आणि भगुनी पाण्याने भरून ठेवणे हाच आमचा रोज सकाळचा दिनक्रम असायचा. कारकून असलो तरी सरकारी नोकरीत असल्याने 'आराम' सदासर्वकाळ ठरलेला असायचा. मोजून दोन अडीच तास कचेरीत जाऊन खुर्ची गरम करण्याखेरीज अन्य काम नसल्याने मन विटाळून गेले होते. तसे दिवसभर चौपाटीवर भटकण्यातही मजा राहिली नव्हती.

कथामांसाहारीक्रीडामौजमजाप्रतिभा

(वळण)

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
29 Mar 2020 - 6:37 pm

(विडंबनच आहे, ह. घ्या. हे.वे.सा.न.ल.)
.
.
.
.
महापुरुष आणि तीर्थस्थाने
बाप आणि आई
डोळ्या समोर आली नसतील तर नसू देत

gholmiss you!अदभूतअनर्थशास्त्रअभंगआगोबाआता मला वाटते भितीआरोग्यदायी पाककृतीकखगकधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीकविता माझीकाणकोणकालगंगाकाहीच्या काही कविताकैच्याकैकविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगुलमोहर मोहरतो तेव्हाजिलबीतहाननागपुरी तडकाप्रेम कविताप्रेरणात्मकफ्री स्टाइलभावकविताभिजून भिजून गात्रीभूछत्रीमनमेघमाझ्यासवेमुक्त कवितारतीबाच्या कवितारोमांचकारी.विठोबाविडम्बनविराणीशेंगोळेसांत्वनासोन्या म्हणेहझलहिरवाईहास्यअद्भुतरसप्रेमकाव्यमुक्तकविडंबनविनोदइंदुरीपुडिंगमटणाच्या पाककृतीमेक्सिकनरस्सारायतेलाडूवडेवन डिश मीलव्यक्तिचित्रक्रीडामौजमजा

ईमायनं आल्याती का..?

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
24 Mar 2020 - 8:42 am

पुज्य सकाळी कामे आवरून नित्यनेमाने शिरस्ता बाहेर पडलो. आजकालच्या जमान्यात पत्रकारांना काडीची म्हणून किंमत राहिली नाही. पण जिवनावश्यक, अत्यावश्यक, चौथा स्तंभ वगैरे संबोधून नमोजींनी आम्हांला अशा स्मशानवैराग्याच्या दिवसांत पण बाहेर जाण्यास भाग पाडीले. मौजे बाभुळगाव येथील 'जनता कर्फ्यू' नामक ऐतिहासिक दिनाचे वार्तांकन करण्यासाठी आम्ही सायकलवर टांग टाकली.

मौजमजालेख

कोरोना गो, गो कोरोना; साहेब म्हटले कोरोनाला

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
11 Mar 2020 - 7:46 am

कोरोना गो, गो कोरोना
साहेब म्हटले कोरोनाला
असा तो व्हायरस पुचाट
गेला घाबरून साहेबांना ||ध्रू||

आले आले ते परदेशी
घेवून आले व्हायरसला
खोकून शिंकून झाले बेजार
त्यांनीच आजार पसरवला
खटाखट देवूनी मुस्कटात त्याच्या
एकदा व्हायरसचा आवळा गळा
कोरोना गो, गो कोरोना
साहेब म्हटले कोरोनाला ||१||

कसला हा विषाणू व्हायरस
कोरोना नावाचा चायनाचा
थुंकू नका, हात तोंड धुवा
मास्क बांधा तुमच्या तोंडाला
कोरोना गो, गो कोरोना
साहेब म्हटले कोरोनाला ||२||

काहीच्या काही कविताकैच्याकैकविताकविताविडंबनविनोदसमाजजीवनमानऔषधोपचारप्रवासमौजमजा

बुरा न मानो होली है! (एक Holy लेखण!)

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
9 Mar 2020 - 12:42 pm

ढिश-क्लेमर:- वाचकांना शीघ्र फलप्राप्ती व्हावी म्हणून (व आज होळी असल्यामुळेही..) सदर प्र-संग थोडा रंगवून टाकलेला आहे,मूळ रंगासह! ह्याची दखल घ्यावी.

संस्कृतीधर्मबालकथाओली चटणीऔषधी पाककृतीशाकाहारीमौजमजाविरंगुळा

ज्ञानोबांस नंब्र विनंती

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
2 Mar 2020 - 9:53 pm

कवी बिचारा
मेटाकुटीने
कविता पाडत असतो
शाई ओली
असताना हा
टपली मारून जातो

वसुदेवाच्या
मनी जशी
कंसाची दहशत होती
तसे मिपा-कवि
विडंबनाचा
कंस बघुनी हादरती

कवितारतिच्या
विनयाचा हा
भंग त्वरेने करतो
शीघ्रकवित्वा
याच्या बघुनी
मनोमनी मी जळतो

हात जोडुनी
हतप्रभ कवि हा
दारी तुझिया उभा
दयावंत हो
पैजारा तू
आवर निर्दय प्रतिभा

विडंबनाच्या
वावटळीतुनी
कविता माझी सुटावी
ज्ञानोबांनी
पैजाराला
सज्जड तंबी द्यावी

मार्गदर्शनव्यक्तिचित्रमौजमजा

भादरायला हवे वाढलेले, भादरायला गेलो

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
27 Feb 2020 - 3:03 pm

भादरायला हवे वाढलेले, भादरायला गेलो

न्हावी होता बिझी म्हणून पेपर वाचू लागलो

पेपर वाचता वाचता एक जाहिरात बघितली

होती तशी छोटी पण लक्षात बाकी राहिली

नंबर आला जवळ म्हणून पेपर घेतला छाटून

न्हावी होता मग्न कामात , दिला खिशात ढकलून

भादरवुन थेट घरी मी अंघोळीला गेलो

जाहिरात तशीच खिशात पडून , विजार मागे सोडून आलो

दुसर्या दिवशी आरोळीने जाग मला आली

मला वाटलं मनातल्या मनात, आमची हि खपली

उभा राहिलो बघण्यासाठी , बघतो तर हे काय

जाहिरातीचे पान हाती घेऊन डोके पिटत होती हि बाय

समाजजीवनमानआईस्क्रीमडावी बाजूराहणीव्यक्तिचित्रमौजमजा