फुलांचा फोटो

(ताल = सरोवर)
प्रिय कमलताल,
मी आता फार फार दूर निघून आलेय. पण जेव्हा वारा स्तब्ध होतो, पानही हलत नाही तेव्हा, मन थेट तुझ्यापाशी जाऊन पोहचते.
कितीही चाललो तरी पाय न दुखण्याचा एक काळ असतो. पहाटे उठावे. पाठीवर सॕक टाकावी. मिळेल ते वाहन घ्यावे. फारसे गुगल न करता, उंच उंच हिमालयात गुडूप व्हावे. तो पर्वतराज संपन्न. त्याची अगणित शिखरे. हे पार करेपर्यंत ते, ते पार करे पर्यंत ते, आणखी पुढची, आणखी पुढची शिखरे. प्रत्येक शिखर कोरीव. आकाशाला कातणारे. या शिखरांच्या पायथ्याशी कुठे कुठे माणसांची वस्ती. फार विरळ.
मजूर
....
'संध्याकाळ झाली कि बरं वाटतं. दिवसभरातली अंगावरची वाळू सिमेंट झटकली जाते. चहापाणी होऊन, अंगावर असे बरे कपडे येतात. हातात आपला खटक्यांवर चालणारा मोबाईल येतो. स्क्रीनवाला नवा घेईन ..... पण बघू. घरी पैसे पाठवायचेत. घरी पैसे पाठवण्यासाठी तर इतक्या दूर आलो.
( आज सरिता दिन. त्या निमित्त.....)
तू मरून, मोजून १३ वर्षे, ५ दिवस आणि काही तास झालेत. काय काय घडत नाही इतक्या काळात? म्हटलं तर फार काही. म्हटलं तर काहीच नाही. मरणाच्या क्षणापाशी काल गोठून जातो.
पण, तू निघून गेल्यापासून back up ठेवल्यासारखा भेटतोयस.
आधी फार जड गेलं. मी अनंत काळ अशीच रडत राहणार असं वाटलं. पण तसे नाही घडले. तू परत भेटलास! माझ्या घरासमोर मंदिरापाशी, रात्रभर पावसात वाट पहात उभारलेला. का तर, मी एकदा तरी खिडकी उघडेन, किती पाउस पडतोय असं म्हणत बाहेर बघेन, आणि तुला दिसेन. पहाटे पाऊस टीपटीप करीत थांबला. पुजारी आला. एवढ्या पावसात चहाचा रिकामा कप कोण ठेवून गेलं, म्हणून इकडे तिकडे विचारीत राहिला.
प्रेरणा : इथे आणि इकडे तिकडे...
नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय?
नम्मूचे विमान किती भारी... भारी
फिरतंय तेही दुनिया सारी... सारी
दुनियेचा आकार कसा गोल गोल
नम्मू तू भारताशी गोड बोल!
नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय?
नम्मूनी बंद केल्या नोटा... नोटा
आरबीआयच्या हाती आला गोटा... गोटा
गोट्याचा आकार कसा गोल गोल
नम्मू तू भारताशी गोड बोल!
नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय?
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.
चर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.
वाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.
भारतात आणि मिपावरही नोटबंदीच्या निमित्ताने कॅशलेस होण्यावर बराच गदारोळ झाला आहे. हा धागा त्या गदारोळात भाग घेण्यासाठी नसून कॅशलेस पर्यायांपैकी एक पर्याय म्हणजे क्रेडिट कार्ड वापरणे खरंच फायद्याचे आहे का नाही हे स्वानुभवातून व उदाहरणासहित सांगण्याचा प्रयत्न आहे.
सगळ्यात आधी हे सांगणे महत्वाचे आहे की हे अनुभव अमेरिकेतील आहेत. येथे आता बहुतेक सर्व दुकानांमध्ये क्रेडिट कार्ड्स वापरली जातात. किंबहुना एखाद्या ठिकाणी रोख दिले तर "बऱ्याच दिवसात एवढी रोख रक्कम बघितली नाही" असे बिलिंग काउंटरवरील व्यक्ती गमतीने म्हणते.
नमस्कार मंडळी,
मित्रहो, कधी सुंदर, मनमोहक -- "मृदु मंजुळ कोमळ" तर कधी " भव्य अद्भुत विशाळ" अश्या, विविध रसांचा अविष्कार करणाऱ्या प्रतिमा बघण्यासाठी हा धागा आहे. . यात वाचण्यासारखे फारसे काही असेल- नसेल, पण बघण्यातून आनंद मिळेल, मनोरंजन होईल, थोडीशी माहितीत भर पडेल अशी आशा आहे. वाचकांनीही विषयानुरूप आपापली भर इथे टाकली, तर सोन्याहून पिवळे.
तर आगामी भागांतून इथे काय काय बघायला मिळेल, याची एक झलक या 'नांदी' मधून देतो आहे.
१. 'साडी'तील सौंदर्य (-वती)