गझल

व्यथा

अन्या बुद्धे's picture
अन्या बुद्धे in जे न देखे रवी...
17 Sep 2020 - 8:10 pm

'अंतरात खोल काही दाटले आहे'
'वाहवा! काय सुंदर मांडले आहे!'

वृक्ष काय वृद्ध रे होती कधीही?
म्हणती, हे झाड छान वाढले आहे

कसे आज अचानक सुटले कोडे?
जाणीवेने क्षणास या गाठले आहे

राहू दे ठिगळ, आणखी धागा-सुई
व्यर्थ धडपड आभाळ फाटले आहे

कितीक वर्षे, अजून ही जखम ओली
पाहीन वाट, अन्य उत्तर कोठले आहे?

आताशा उचकीही येत नाही मला
वाटते कुणी नवे तुला भेटले आहे

-अनुप

गझल

नको वाटतो ना? असा पावसाळा!

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
6 Sep 2020 - 2:33 pm

भिजा चिंब आधी,पुन्हा जीव जाळा
नको वाटतो ना? असा पावसाळा!

नभी दाटल्या आसवांचा उमाळा
सुन्या जीवनाचाच हा ठोकताळा!

असे वाटते पावसाचे बरसणे
जुन्या आठवांना नव्याने उगाळा!

कितीही दुरुस्त्या करा लाख वेळा
झिरपतो मनाच्या तळाचाच गाळा!

कधीही कुठेही कसाही बरसतो
रुजावा कसा अन् कुठे मग जिव्हाळा?

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलकवितागझल

घाव.....गजलेमधून

तिरकीट's picture
तिरकीट in जे न देखे रवी...
26 Jul 2020 - 12:04 am

मराठीतल्या काही नवकवींच्या गजल ऐकल्या कि असं वाटतं मराठीत गजलेला दुःख सोडून विषय आहेत का नाहीत. मध्ये एक अशीच गजल ऐकली आणि साधारण विशीतल्या त्या गजलकाराचा गळा एकाच गजलेत तीन वेळा कापला गेला. म्हटलं अरे देवा!!! गळा कापणे, पाठीवर घाव करणे, गेला बाजार पारिजातकाचा उल्लेख ह्याच्या पुढे गजल आहे का नाही.
खालच्या ओळी थोड्याश्या वैतागाने लिहिल्यात. वृत्तांच्या गणितात बसत असतील तर गजल म्हणू नाहीतर कविता, तेही नसेल तर मुक्तछंद आहेच.....

भिंतीवरती उगा टांगशी घाव कशाला?
दुःखांचे मोजसी सदा तू भाव कशाला?

gajhalgazalकवितामुक्तकविडंबनगझलभाषाशब्दक्रीडाशब्दार्थविनोद

येत नाही...

अजब's picture
अजब in जे न देखे रवी...
21 Jul 2020 - 12:40 pm

हारण्याची* वेळ जोवर येत नाही
शक्यता नाकारता तर येत नाही...

प्रश्न हा भंडावतो आहे मनाला
का कधी प्रश्नास उत्तर येत नाही...

हा उन्हाचा दोष की माझा म्हणू मी?
सावली माझ्याबरोबर येत नाही...

टेकल्यावर रोज डोके, समजलो मी
पत्थराला कधिच पाझर येत नाही...

चोरले अन तोडले आहे हृदय तू
आळ त्याचा पण तुझ्यावर येत नाही...

दूरवर आलो कुठे आहे 'अजब' मी?
एवढे चालूनही घर येत नाही...

(*'हारण्याची'ऐवजी 'जिंकण्याची' वाचायलाही हरकत नाही.)

गझल

त्या पोराने

मनोज's picture
मनोज in जे न देखे रवी...
12 Jul 2020 - 10:31 am

येता गिर्‍हाईक दारावर त्याने तिला बाई म्हणावे?
वेश्येच्या त्या पोराने कधी आईला आई म्हणावे ?

चुरगळलेल्या पाकळ्यांना जरी मोहक तो सुगंध येतो
हाती घेत अश्या फुलाला कधी कुणी मग जाई म्हणावे?

नाही केली फसवा फसवी सरळ जमला व्यवहार आहे
आरोप करत का लोकांनी केली दांडगाई म्हणावे?

भाऊबीजेचा सण आल्यावर उगी तिला वाटत होते
सरळ नजरेन पाहत कुणी आज मलाही ताई म्हणावे

जगणे बत्तर असे नशीबी बाप नाही माहीत ज्याला
या जगात त्या पोराने कुणा होऊ उतराई म्हणावे?

गझल

ती आली तर

मनोज's picture
मनोज in जे न देखे रवी...
27 Jun 2020 - 6:02 pm

रंग किती गगनात पसरले ती आली तर
मेघ कसे हलकेच बरसले ती आली तर

उभा असा मी बस थांब्यावर जाण्यासाठी
कुठे जायचे तेच विसरले ती आली तर

नजर अशी नजरेस मिळाली जादू झाली
भले भले ते ना सावरले ती आली तर

मंजुळ संगीत अवचित कसे ऐकू आले
पैंजण छनछन तिचे वाजले ती आली तर

मी रसिक फारसा नाही ती दाद द्यायला
वाह का आपसूक उमटले ती आली तर

मोहक मुखडे तिच्या सारखे किती पाहिले
का क्षणभर ते हृदय थांबले ती आली तर

गझल

वाटले की ती,अशी...जवळूृृृऽन गेली!

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
21 Jun 2020 - 11:16 pm

पावसाची सर जशी बरसून गेली
वाटले की ती,अशी...जवळूृृृऽन गेली!

गुणगुणत होतीस का तू गझल माझी?
एक कोकीळा इथे गावून गेली!

नभ-नभाला देत होते आज टाळी
वीज अवकाशातुनी चमकून गेली!

आज पदरावर तुझ्या सजवू म्हणालो,
रात सारे चांदणे उचलून गेली!

गारव्याने भाव रोमांचीत झाले,
आठवांची गोधडी उसवून गेली!

—सत्यजित

gajhalgazalपाऊसमराठी गझलशांतरसकवितागझल

असा भास होतो

मनोज's picture
मनोज in जे न देखे रवी...
20 Jun 2020 - 2:26 pm

आभास होतो कसा त्रास होतो
तू येत आहे असा भास होतो

स्मरतो गजरा केसात माळलेला
माझा कसा मोगरा श्वास होतो

डोळ्यात जादू तिच्या पेरलेली
जो पाहतो तो तिचा दास होतो

कळायचे मला ती न बोलताही
साथी कधी तोच मी खास होतो

असे कुणी का इतके आवडावे
जो जीवनाचा खरा ध्यास होतो

कवितागझल

तू गेल्यावर

मनोज's picture
मनोज in जे न देखे रवी...
16 Jun 2020 - 10:50 am

नाही वेलीवर फुल उमलले तू गेल्यावर
कुंडी मधले रोपही सुकले तू गेल्यावर

पाणी नाही रखरख आपले शिवार झाले
मेघ गरजले नाही बरसले तू गेल्यावर

तुळशी वाचून उदास नुसते अंगण दिसते
कुठे रांगोळी नाही सजले तू गेल्यावर

ओळख माझी तुझ्या मुळेच ही जगास झाली
माझे असणे मागे हरवले तू गेल्यावर

भात शिजून ना दरवळ आला संध्याकाळी
नाही चुलीला त्या पेटवले तू गेल्यावर

एकांती मी स्तब्धच बसतो नदी काठावर
नाही कुणी मग मला शोधले तू गेल्यावर

घरपण घराचे निघून गेले कळा लागली
माझ्या सवे छत रडू लागले तू गेल्यावर

कवितागझल

अहद-ए-वफ़ा… अहिस्ता...

सूक्ष्मजीव's picture
सूक्ष्मजीव in जनातलं, मनातलं
11 Jun 2020 - 8:36 pm

हरिहरन हे नाव गाण्याची थोडी देखील आवड असणाऱ्याला माहित नाही असे होऊ शकत नाही. पार्श्वगायन हा जरी त्यांचा प्रांत असला तरी त्याव्यतिरिक्त त्यांनी अनेक उत्तम गझल गायल्या आहेत. अर्थात हिंदी-उर्दू गझल चे नाव निघाले की ‘गुलाम अली, जगजीत सिंग किंवा नाही म्हणता पंकज उधास’ हेच ठळक गझल गायक म्हणून आपल्या समोर येतात. खऱ्या गझल प्रेमींमध्ये मग ‘अहमद आणि महमंद हुसेन’, सारखे किंवा ‘तलत अझीज भूपेंद्र सिंग, आणि चंदन दास’ सारखे गझल गायक आपले स्वतंत्र स्थान मिळवून आहेत. अगदीच कट्टर गझल पंथी ‘बेगम अख्तर, फरीदा खानुम, मेहदी हसन, आबिदा परवीन’ यांना हिमालया सारखे थोर समजतात.

संगीतगझलआस्वाद