मराठी गझल

तुझे मजवरी भाळणे ते अवेळी

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
27 Aug 2015 - 10:50 am

या आधीच्या कवितेच्या वेळी पैसाताईने तक्रार केली की विशालकडून अशा कवितेची सवय नाही. ;) त्यामुळे ही भुजंगप्रयात वृत्तातली गझल :)

तुझे लाघवी बोलणे ते अवेळी
तुझे विभ्रमी हासणे ते अवेळी

जसे पावसाचे अकाली बरसणे
तुझे आर्जवी वागणे ते अवेळी

लपे चंद्र मेघांमध्ये मत्सराने
तुझे मुक्त तेजाळणे ते अवेळी

सखे आप्त एकांत हा फक्त माझा
तुझे मजवरी भाळणे ते अवेळी

नको मोक्ष, स्वर्गात जागा नको ती
तुझे स्पर्शही भासणे ते अवेळी

मिटे आसही या क्षणी ऐहिकाची
तुझे मंद घोटाळणे ते अवेळी

मराठी गझलगझल

तो क्या करे... अख्तर शिरानी यांची ग़ज़ल

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
26 Aug 2015 - 3:36 pm

नमस्कार,

उर्दू काव्यजगतातल्या आणखी एका शायरची आणखी एक ग़ज़ल आणि मला उमगलेला तिचा अर्थ इथे लिहीत आहे.

हा शायर म्हणजे अख्तर शिरानी. यांचं मूळ नाव मुहम्मद दावूद खान. लाहोर ला वाढलेल्या या शायरचं काव्य हे विलक्षण तरूण आहे. त्यांची ही ग़ज़ल विरहानंतरच्या, ताटातुटीनंतरच्या हतबलतेचं अत्यंत ह्र्द्य वर्णन करते.

मराठी गझलगझल

नुसतेच शब्द ओठी

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
29 Jul 2015 - 3:02 pm

ब्लॉग दुवा हा.

नुसतेच शब्द ओठी

रस्ता चुकून आले नुकतेच शब्द ओठी
मी थोपवून धरले भलतेच शब्द ओठी

मी आवरू न शकलो आवेग भावनेचा
अन योग्य ते न सुचले, चुकलेच शब्द ओठी

शून्यात पाहताना असतो मनात वणवा
ठिणगीसमान विझती हलकेच शब्द ओठी

एका दिशेस वळती माझे विचार सारे
एकसारखेच होती सगळेच शब्द ओठी

होते कधीतरी जे हरवून ऐकलेले
नकळत तुझ्याही येती माझेच शब्द ओठी

कानी पडू न शकले झुरलेच शब्द ओठी
विरले तसेच तिकडे नुरलेच शब्द ओठी

मराठी गझलकवितागझल

वर्तमानाचे कसे गावे इथे मी गोडवे ?

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
2 Jul 2015 - 12:52 pm

फसवले काळासही मधुमास होते भोगले
जीवनाशी झुंजलो मरणास होते भोगले

राम होता सोबती, जगण्यात नाही राहिला
जानकीने का इथे वनवास होते भोगले ?

दु:ख येथे लाजले, कोमेजलेली वेदना
सोसलेले विरह, अन सहवास होते भोगले

पोर झालो, चोर झालो, वागलो स्वच्छंद मी
प्राक्तनाचे पाशवी उपहास होते भोगले

रोज खोटी हूल, खोट्या पावसाच्या चाहुली
यार, फसलेले किती अदमास होते भोगले

वर्तमानाचे कसे गावे इथे मी गोडवे ?
स्मरण कटु ना साहवे, इतिहास होते भोगले

मराठी गझलगझल

सखी तुझ्या अंतरात होतो

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
22 Jun 2015 - 10:31 am

कुठे कुणाच्या घरात होतो
सखी तुझ्या अंतरात होतो

दहाजणींतून देखणी तू
तसाच मी शंभरात होतो

जिथे तिथे गाय लंगडी अन
सदैव मी वासरात होतो

अता जमीनीवरी परंतु
कधीतरी अंबरात होतो

उन्हात मी जन्म काढला पण
तुझ्यासवे एक रात होतो

डॉ.सुनील अहिरराव

----------------
धागा संपादित केला आहे

मराठी गझलहे ठिकाण

का पाहूनही टाळत राहतेस...

शब्दबम्बाळ's picture
शब्दबम्बाळ in जे न देखे रवी...
21 Jun 2015 - 2:24 pm

का पाहूनही टाळत राहतेस,
काळीज माझे पिळत राहतेस…

असताना सोबतीस आठवणींचे मोती,
का आसवे शिंपल्यात गाळत राहतेस…

तोडून सारे बंध मनाचे,
का दुःख धाग्यातून माळत राहतेस…

पसरून भूतकाळाच्या तप्त निखार्यांना,
का स्वतःला जाळत राहतेस…

झाले गेले विसरून जावे,
का त्या क्षणांना उगाळत राहतेस…

करून मला दूर स्वतःपासून,
का स्वप्नातून माझ्या जवळ राहतेस…

आशिष

मराठी गझलगझल

शस्त्र ओले परजतो पाऊस आहे...

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
19 Jun 2015 - 9:42 am

धुंद होवुन गरजतो पाऊस आहे
हाय ओला बरसतो पाऊस आहे...

माय काळी आज पान्हावे नव्याने
स्पर्शण्या तिज तरसतो पाऊस आहे...

रान हिरवे नाचले बेभान आता
मोर होउन लहरतो पाऊस आहे

वीज कोसळते, सरी होती कट्यारी
शस्त्र ओले परजतो पाऊस आहे...

बघ धरा ओलावली आता कशाने?
भेटताना हरखतो पाऊस आहे...

का चकोरा येतसे ग्लानी सुखाने?
की तयाला भरवतो पाऊस आहे...?

चल 'विशाला' जावुया रंगून आता
अंगणी या बहरतो पाऊस आहे...

विशाल

मराठी गझलगझल

डायरीचे पान

महासंग्राम's picture
महासंग्राम in जे न देखे रवी...
17 Jun 2015 - 12:03 pm

मज व्यथेची हाव कुठे,
कुंपणाची धाव कुठे

दुःख ही जरासे पचले नाही,
वेदनेला वाव कुठे

जिंकला समर जरी तो,
तरी सुखाची हाव कुठे

झाली माणसे परागंदा,
राहिले मज गाव कुठे

रेखले होते तुझे नाव ज्याच्यात,
हरवले ते डायरीचे पान कुठे

#जिप्सी

gazalमराठी गझलहझलकवितामुक्तकगझल

समर

महासंग्राम's picture
महासंग्राम in जे न देखे रवी...
13 Jun 2015 - 10:43 am

अताशा जन्म झाला माझा
आता कुठे मी जगण्यास लायक होतो
त्यांनी केले मला पुढारी गुलामांचा
मला वाटले मी नायक होतो
प्रश्न जेव्हा जगण्याचा येतो
माझा लढ़ा निर्णायक होतो
एवढे समर जिंकुनही
कृष्ण तरी कुठे राधेचा होतो
-जिप्सी

मराठी गझलगझल

इतकाच अर्थ आता जगण्यास माणसाच्या

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
5 Jun 2015 - 1:00 am

आता नकोत गप्पा खोट्या पराक्रमाच्या
येथे कितीक गाथा माझ्या पराभवाच्या

खांद्यावरी रुढींच्या जो वाहतो पखाली
इतकाच अर्थ आता जगण्यास माणसाच्या

येती कितीक येथे मशहूर रोज होती
गझला अजून माझ्या आधीन काफियांच्या

लुचतात स्वार्थ होउन 'हव्यास' माणसाला
विरते सदैव निष्ठा गर्दीत गारद्यांच्या

झिम्माड पावसाचे दिसते न दु:ख कोणा
लपतो विरह नभाचा धारेत आसवांच्या

माथ्यावरी सुखांचे ओझे 'विशाल' झाले
आधार शोधतो मी समवेत वेदनांच्या

विशाल...

मराठी गझलगझल