तुम्ही काहीही म्हणा, कोणत्याहि काळातील उदाहरण घ्या दोन रंगांनी मानवी समाजजीवनात एक विषेश स्थान पटकावले आहे. मानवी भावविश्व, अर्थविश्व, राजकारण, समाजकारण, काव्य, प्रतिभा अश्या नानाविध ठिकाणी या रंगानी आपला ठसा मानवाच्या आयुष्यात उमटवला आहे. तुम्ही ओळखलंच असेल हे रंग म्हणजे काळा आणि पांढरा
अश्मयुगातही प्रमुखाच्या गुहेला सफेद चुन्याची चित्रे काढल्याचे दिसुन येते......
देवाला सगळ्या रंगांची फुले वाहता येतात पण काळी फुले तुम्ही देवाला वाहाल का? ........
"स्वच्छता" म्हटली की डोळ्यांसमोर येते ती "शुभ्रता", आणि "काळा" रंग हा घाण/कचरा दाखवायलाच वापरतात.
माणसाचा चेहेरा आनंदाने "उजळतो", तर तो दु:खाने "काळवंडतो"... एखाद्याला हाकलतानाही "तोंड काळं कर" म्हणलं जातं....."काळा हिरा"ही म्हणायपुरताच
सफेद, पांढरा हा नेहेमीच स्वातंत्र्य, पावित्र्य, बंधुता दाखवत आला आहे तर काळा रंग दानवी कृत्य, वाईटपणा, तुच्छता झेलत आला आहे
थोडक्यात माणसाने अनादी काळापासूनच पांढर्या रंगाला काळ्यापेक्षा श्रेष्ठ वागणूक दिली
पुढे माणसाने हा रंग वर्णात-त्वचेत शोधायला सुरवात केली. गोर्या त्वचेच्या माणसांनी पृथ्वी व्यापली आणि जेत्या गोर्या त्वचेला भाव आला, नैतिकता आली आणि काळा हा काळाच राहिला.
२०व्या शतकात काहि माणसांची मानसिकता बदलली. आता उघड उघड तरी वर्णभेद दाखवला जात नाहि. बर्याच नेत्यांनी जगाला गोर्यांच्या काळ्या मानसिकतेतुन सोडवायचा प्रामाणिक प्रयत्न केला. ("इथे ही "काळा" रंग मात्र कमी दर्जाचे मन याच अर्थी वापरला गेला). त्वचेचा रंग काळा असला तरी मनाने गोरे आहोत असे म्हणून काळ्या रंगाला अजूनच तुच्छ लेखले गेले
अजुनही ही मानसिकता दिसते. भारतीय लावणी नर्तकीला केवळ एका व्हिजासाठी नृत्य करायला लावले जाते.... "काळ्या-तपकीरी" कातडीच्या खेळाडूंवर शेरेबाजी होते... अजुनहि युरोपातहि वांशिक चकमकी होतात.. तशी हि यादि न संपणारी आहे.. पण हल्लीचं उदा. द्यायचच "ब्लॅक" नाव असलेल्या चित्रपटाला साधं ऑस्कर नॉमिनेशनसाठी नाकारलं जातं हे काय कमी आहे? ;)
श्रेयअव्हेर (डिस्क्लेमर):
वरील लिखाण हे केवळ एक "उबळ" या स्वरुपाचे असे स्वैर लिखाण असून ते लिहिताना कोणत्याहि सत्यासत्यतेची पडताळणी केलेली नाहि तरी अश्या लिखाणास फार सिरियसली(मराठी?) न घेता ह घ्या हेवेसांनल
उबळीची प्रेरणा: ही चर्चा
मिसळपाव
प्रतिक्रिया
गांभिर्याने
फार सिरियसली(मराठी?) न घेता ह घ्या हेवेसांनल
सिरिअसली = गांभिर्याने?
स्वैर लेखन आवडले.
(वाचक)बेसनलाडू
+१
In reply to गांभिर्याने by बेसनलाडू
स्फुट लेखन आवडले.
आणि थोडेसे गांभीर्याने घेतल्यासही हरकत नाही.
वर्णभेद...
वर्णभेद करण्यात भारतीय माणसे कमी नाहीत... कुलाबा किंवा काळा
घोड्याला येऊन पहा.. रस्त्यातून चालणार्या युरोपी किंवा अमेरिकी
दिसणार्या पर्यटकांसमोर नाचणारी आणि भिकारी वृत्तीचे प्रदर्शन करणारी
आपली भारतीय मंडळी आफ्रिकी, पूर्व आशियायी लोकांकडे दुर्लक्ष
करतात..
गोरे हे श्रीमंत व काळे हे
In reply to वर्णभेद... by सृष्टीलावण्या
गोरे हे श्रीमंत व काळे हे अविकसित असा प्रवाद जनसामान्य आहे त्यामुळे आर्थिकदृष्ट्या ग्राहक म्हणून त्यांच्याकडे भ्कार्यी ते दुकानदार पाठी लागतात पण अरबी पेहेराव असलेल्या माणसाच्या पाठी सुद्धा लोक लागतात.
परदेशात महागड्या ब्रंड च्या दुकानात शेखांचे स्वागत होते ,
ये सब इमेज का चक्कर आहे
"ब्लॅक" चित्रपट
>>> पण हल्लीचं उदा. द्यायचच "ब्लॅक" नाव असलेल्या चित्रपटाला >>साधं ऑस्कर नॉमिनेशनसाठी नाकारलं जातं हे काय कमी आहे? ;)
"ब्लॅक" हा एक अगदी टेरिबल् चित्रपट होता. फारच संवेदनाविरहित , आणि व्यंगाचे अत्यंत बटबटीत चित्रण करणारा. मार्मिकता, सूचकता या सर्वांच्या नावाने अंघोळ करून काढलेला.
हे म्हणजे
हे म्हणजे उगाच पांढर्यावर काळे करण्याचा द्राविडी प्राणायाम आहे.
बर्याच बाबतीत काळे गोरे असा भेद अजिबात नसतो
उदा: काही हिरवट माणसे काळे गोरे असा भेद अजिबात करत नाहित
ती रागाने लालेलाल होतात्...लाजुन गुलाबी होतात्......
पण मजा तेंवा येते जेंव्हा काळी माणसे तोंडाला पावडर फासतात्......ती चक्क खारे दाण्या सारखी दिसतात
:
ह्म्म्म्म्.....
"काळा" रंग हा घाण/कचरा दाखवायलाच वापरतात.
एखाद्याला हाकलतानाही "तोंड काळं कर" म्हणलं जातं
काळा रंग दानवी कृत्य, वाईटपणा, तुच्छता झेलत आला आहे
काळा हा काळाच राहिला.
ह्म्म्म्म करा.....आमची थट्टा करा......
आपला,
धनंजय काळा :((
अरे..
In reply to ह्म्म्म्म्..... by ब्रिटिश टिंग्या
धनंजय तुझे आडनावच काळे आहे.. त्याला तू तरी काय करणार? आणि कवितेत.. मी सहजच म्हणाले रे "धनंजय काळा".. राग आला असेल तर सॉरी...
- (सर्वव्यापी)प्राजु
;)
In reply to अरे.. by प्राजु
अहो मी लिहीलेलं इतक सिरियली घेउ नका......आम्हाला राग वगैरे येत नसतो :))
-धनंजय काळा :)
खरे आहे छोटी टिंगी
In reply to ;) by ब्रिटिश टिंग्या
धनंजय नावाच्या लोकाना खरेच कशाचाच राग येत नाही. :) मला पण कशाचाच राग येत नाही मनापासून........ :)कायम मी निर्लज्जासारखा हसत असतो... :)
पुण्याचे पेशवे
आपल्याकडेही
आपल्या संस्कृतीतही पांढरा रंग हा मांगल्याचे प्रतिक तर काळा रंग हा दुर्गुणाचे प्रतिक मानले जाते.
उजेडात होते पुण्य, अंधारात पाप !!
कुठल्याही भानगडीत काळेबेरे हे असायचेच.
बाकी मराठी आणि इंग्रजी मंडळीत एक साम्य आहे - आमच्याकडे "काळे" आणि "गोरे" अशी आडनावे असतात तशी त्यांच्यात Black आणि White ! आता श्रीयुत काळे हे गोरेपान आणि श्रीमती गोरे ह्या सावळ्या असू शकतात, हे वेगळे!
आलटून पालटून सुनील (काळे) / सुनील (गोरे)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
असच काही नाही...
स्वैर लेखन आवडले. म्हणण्यात तथ्य असले तरी,
जसा काळजीने चेहरा काळवंडतो तसाच भीतीने अथवा पित़ळ उघडे पडलेला चेहरापण गोरामोरा होतो.
रंग माझा वेगळा....
In reply to असच काही नाही... by विकास
पांढरा रंग हा काळ्यापुढे फिकाच असतो
पांढरा हा रंग नाही. ते आहे सर्व रंगांचे मिश्रण. म्हणजेच पांढर्या रंगात सर्व रंगांचे अस्तित्व आहे.
माणसाचे तरूण पण हे डोक्यावरचे केसकाळे असताना धरले जाते पांढरे झाल्यावर नाही.
पण अनुभव मात्र केसांच्या पांढर्या छटेवर मोजण्याची प्रथा आहे. 'केस उगाचच उन्हात नाही पांढरे केलेले.' असे म्हणण्याचा प्रघात आहे. आणि त्यात तथ्यांश आहे.
...तसाच भीतीने अथवा पित़ळ उघडे पडलेला चेहरापण गोरामोरा होतो.
चेहरा लाजून गोरामोरा होतो. पितळ उघडे पडल्याने अथवा भीतीने पांढराफटक पडतो.
..तमाम (हिंदू) भारतीय हे "संपूर्ण पुरूष" म्हणतात त्याचे नावच "श्रीकृष्ण" आहे.
पण म्हणून गोर्या पुरुषांना 'अपूर्ण पुरूष' म्हणतात असे कुठल्याही तर्कशास्त्रात म्हंटलेले नाही. तेही संपूर्ण पुरुष असू शकतात. (उदा. रेमन्ड सुटींग वापरणारे... A complete Man.)
जस्ट् अ टाईमपास. फार गांभिर्याने घेऊ नये, ही नम्र विनंती.
अवांतर
In reply to रंग माझा वेगळा.... by प्रभाकर पेठकर
..तमाम (हिंदू) भारतीय हे "संपूर्ण पुरूष" म्हणतात त्याचे नावच "श्रीकृष्ण" आहे.
पण म्हणून गोर्या पुरुषांना 'अपूर्ण पुरूष' म्हणतात असे कुठल्याही तर्कशास्त्रात म्हंटलेले नाही. तेही संपूर्ण पुरुष असू शकतात. (उदा. रेमन्ड सुटींग वापरणारे... A complete Man.)
गांभिर्याने घेत नाही पण मला काय म्हणायचे होते त्याचा खुलासा नक्कीच करतोय :-)
राम आणि कृष्ण हे हिंदूच्या श्रद्धास्थान असलेले मानवी अवतार आहेत. त्यातील राम खरे म्हणाल तर आदर्श बाय ऑल मिन्स. पण तरीही त्याला "मर्यादा पुरूषोत्तम" असे विशेषण पडले. याच्या उलट श्रीकृष्ण - हा आयुष्यात, स्वतःसाठी नाही पण गरज पडली तसे, खोटे बोलला, जनतेला वाचवायची वेळ आली तेंव्हा पळून गेला, प्रतिज्ञा केल्या आणि मोडल्याही, स्वतःसाठी नाही पण कूट निती "इक्वल अँड अपोझिट" वापरली, इत्यादी. एकीकडे देवाचा अवतार असलेल्या ह्या माण्साला शेवटी शापीत मरण आले तेही त्याने तसेच स्विकारले. तरीही त्याला जास्त मान देत "संपूर्ण पुरूष" म्हणले गेले. असे मला म्हणायचे होते...
त्यात कुणाचे मी पौरूषत्व काढत नव्हतो आणि त्याला अपूर्णही म्हणत नव्हतो! गैरसमज नसावा.
धन्यवाद
हा स्वैर लेख गोड मानून प्रतिक्रिया देणार्याचे अनेक आभार :)
आवडले..
ऋषिकेशा,
तुझे स्वैर लेखन आवडले रे.. चांगले लिहिले आहेस.
आपला,
(काळाकुट्ट) तात्या.
खरंय..
दाल मे जरूर कुछ काला है...या फिर पूरी दाल ही काली है.. असे हे नेहमीचेच संवाद...
बाकी हे लेखन मात्र आवडले.
- (सर्वव्यापी)प्राजु
ब्लॅक लाइक मी !!!
स्वैर लेखन आवडले
तरीहि काळ्याबद्दल .......
प्रच्छन्न न्यूनगंड जाणवला. हिणवाल तर काळ्या पाण्याची शिक्षा देईन.
कालू कलंदर
काळा आणि गोरा
आमच्या कॉलेज मध्ये सर होते ते दिसायला काळे होते. अगदी काळे कुळकुळीत.
वर्गातील मुले त्यांना ऐकु जाईल असे हमखास चिडवायची. पण ते हसून म्हणायचे,"आम्ही काळे आहोत म्हणून तुम्हाला लोक गोरे म्हणतात. आम्ही नसलो तर लोक तुमची कोणाशी तुलना करणार?,म्हणून आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात हे लक्षात ठेवा."
यावरून आठवलं आमच्या बरोबर एक
In reply to काळा आणि गोरा by स्वाती राजेश
यावरून आठवलं आमच्या बरोबर एक मुलगा होता, त्याचा किस्सा. तो भारतात असताना त्याला सगळे वर्गातले "इंग्रज" म्हणून चिडवायचे कारण गावातल्या शाळेत तो एकटाच वर्गात (आणि शाळेत पण बहुतेक) गोरा नि घार्या डोळ्याचा होता. तो वैतागायचा मग त्याचं तेच टोपण नाव झालं. पुढे तो इंग्रजांच्या देशात गेल्यावर त्याला कळालं की ते त्याच्यापेक्षा खूपच गोरे आहेत आणि त्याला ब्राऊन समजतात.. एकदा तर एक रेशिष्ट इंग्रज त्याला म्हणाला "where did u drop your skin, you paki ?", तो चिडायच्या ऐवजी हसायलाच लागला.
थोडक्यात रंग सापेक्ष असतात.
कृष्णवर्ण
When I born, I black .
When I grow up, I black .
When go in sun, I black .
When I scared, I black .
When I sick, I black .
& when I die, I still black.
And u white fella,
when you born you pink .
when you grow up u white .
when u go in sun you red.
when u cold u blue.
when u scared u yellow .
when u sick u green .
& when u die u gray .
And u calling me coloured ? ?
by an African child.
Nominated for a prize for the best poem of 2005 .
>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
chhan lekh aNi pratikriya.
chhan lekh aNi pratikriya.
काळा पैसा
मलाही हे समजत नव्हते कि ' काळा ' पैसा तर नेहमीसारखाच दिसतो , मग तो " काळा " असुन लोक त्याला का लपवितात ?
आणि अशा ' काळ्या ' पैशाला उजेडात आणण्यासाठी सरकार का धड्पडते?
इतर रंगही वाइट वृत्तीँसाठी
इतर रंगही वाइट वृत्तीँसाठी आहेत जसे black money ,magic .yellow journalism ,white elephant ,business in the red ,shades of grey ,green eye ,jaded actress ,pink lady