मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मात्र रात्रीची गोष्ट भाग ३

दशानन · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मागील भाग - २ स्थळ - वेळ - पात्र - नेहेमीचेच. (पॅग मोजायचे सोडून दिले आहे... आता कितवा पॅग आहे ते वेटरालाच माहीत) मी - अरे तुला चढली आहे काय ? तो - नाही रे, अजून दोन चार चा कोटा आहे बाकी. मी - ठिक आहे.. बाकी ते कुंपण शेत रखवालदार . तो - अरे काय कुंपण शेत रखवालदार बडबडत आहेस. मी - काहि नाही रे जरा वैचारीक लेखन करावे म्हणत आहे नाही तर गेला बाझार प्रेम कथाच लिहू म्हणत आहे.. तो - अरे वेडा आहेस, जमाना बदल गया. आता लेका तु लेखाचं विडंबन पाडायला बघ. पक्का ५० + - ७०+ प्रतिसाद. मी - काय सांगतोस बे ? खरचं काय ? तो - अरे किती उदाहरणे सांगू... ती मान्याचे शेंगदाणे असलेली पुडी फाड रे चकणा संपला.. ! मी - अरे चकणा खुप आहे त्याची काळजी नाही, पण उडला तर ? तो - अबे सेटिंग करायचे रे.. बघ कुणाचे उडतात कुणाचे उडत नाही ते. मी - असं कसं ? सेटींग कुणा बरोबर.. आणी कसं ? तो - अरे सोप्पं आहे.. काही दिवस जबाबदारीने वागायचे थोडा विश्वास संपादन केला की झालं ! मी - नाही कळालं रे ? तो - तु जरा काजु-बदाम वाला शिरा खात जा रे, तुझं डोकं बसलेलं आहे वाटतं.. मी - ह्म्म, ते बघतो माझं मी तु बोल. तो - हे बघ ते अ, ब, क व ड आहे ना ब ला खरड टाकायची क बद्दल ड ला अ बद्दल व अ ला क बद्दल चांगले चांगले लिहायचे. मी - त्याने काय होईल बे ? तो- अबे, मियां है कोतवाल तो डर काहे का ..... मी - हा हा हा समजलं समजलं. तो - बाकी लेखन प्रकाशीत करायच्या आधी तुझ्या त्या वक्रपदी मित्राकडून कुंडली काढून .. मुहुर्त बघ. मी - नाही रे, नाडी शोधेन व बांधून ठेवेन ना. तो - हा हे पण ठिक. मी - बाकी एक सांग.. मी दहावी फेल. मला पण एक पदवी पाहिजे आहे काय करु ? तो - अरे तु काल नव्हतास का टेबल वर ? मी - नाही रे, बिझी होतो आपल्या आवडत्या स्त्री बरोबर पिच्चर बघायला गेलो होतो.. का काय झालं ? तो - अरे तो नाना व परा .. डॉक्टर व कंपाउंडर झाले. मी - एका दिवसात .. कसं रे कसं रे ? मला पण डॉक्टर नाही तर गेला बाझार पंडित ही पदवी तरी लावायची आहे रे नावा मागे.. त्यामुळे वट येतो असे वाटतं आहे. तो - अरे त्यात काय सोपं ... कान आण इकडे.. कानात सांगतो.. ह्या स्क्रिनला पण कान असतात.. मी- काय सांगतोस.. ############### हॅ हॅ हॅ ! नाही रे इकडे नाही आहे.. ती सुविधा. तो - अरे दुसरी बघ.. एकाद्या डॉक्टरला गटव.. चार दवादारुची नाव घे घोटून, कोणी काय बोललं की दे ठोकून ह्या गोळ्या घ्या ती दवा ह्या.. चार दिवस कर झाला तु डॉक्टर. मी- हॅ हॅ हॅ... भारी कल्पना. पण च्यामायला दारुची नावं सगळी माहीत आहेत पण दवाचे काय ? नावं लै अवघड असतात रे त्यांची. तो - नाडीस्पॅतीपळेशन ! हे नाव कधी वाचले / कानावर पडलं आहे का ? मी - नाही बे काय आहे हे ? तो - अबे दवा आहे, नाडीवाल्यांच्या धाग्यामुळे त्रस्त झालेल्यांना शुध्दीवर आणण्यासाठी वापरतात.. मीच तयार केले आहे. मी - अबे तु तर डॉक्टर झाला बे. तो - मग.. लै सोपं हाय बे.. आता मी पण उद्यापासून आपल्या नावापुढे डॉ. लावणार बॉ. मी - अबे, आज पासून का नाही रे ? तो - अबे नाडि वाल्याने सांगितले आहे की शनिवार घातवार आहे म्हणून रे.. मी - अबे अजून एक काम कर ना. तो - बोल. मी - अरे सेठ सोबत एकदा गाठ घालून दे ना यार.. तो - का रे ? मी - अरे, सारखं सारखं कोल्हापुरी गोंडेदार चपल्ला दाखवत असतो रे... त्याला सांगायचे होते की मी पण त्याच्याच कंपुतला आहे म्हणून.. तो - हॅ हॅ हॅ.. हलकट आपला लेख वाचवायला बघत आहेस... गुरुघंटाल आहेस लेका. मी - हा हा हा... आता तुझ्या पाऊलावर पाऊल टाकावेच लागेल नै ... अरे वेटर भाऊ.. पॅग आण रं ! तो - अरे परत रिपीट... मी - चालू दे रे.. रिपीट तर रिपीट चालू दे. (भाग ३ समाप्त)

वाचन 4993 प्रतिक्रिया 0