अगदी भरपूर.
एक समजूत होती म्हणजे.. सिनेमात गाण्यावर नाचणारी/रा नट/ नटी हीच गात असते. मग एकदम तीला सगळं कसं अगदी नीट येतं असं वाटायचं.
दुसरी समजूत होती..अगदी लहान असताना जेव्हा जीवशास्त्र या विषयाबद्दल काहीही माहिती नव्हती तेव्हा..
कधी कधी आजी नकळतपणे बोलून जायची "तुझा भाऊ लाडका आहे.. बरोबर! तुला भाकरिच्या तुकड्यावरच (विकत)घेतली ना!!"
तेव्हा वाटायचं .... मला भाकरीच्या तुकड्यावर घेतली तर भावाला बहुतेक श्रीखंड आम्रखंडावर घेतलं असावं .. म्हणून आजीचा तो लाडका आहे.
आजी उपहासाने म्हणते आहे हे नंतर लक्षात आलं. आणि मुलं अशी कोणत्याही तुकड्यावर घेत नाहीत हे फारच नंतर लक्षात आलं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
लेख आवडला. थोडेसे स्मरणरंजन , थोडेसे चिंतन , थोडीशी मजा.
"लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा" म्हणजे काय ?
लहानपण दे गा देवा
मुंगी साखरेचा रवा
ऐरावत रत्न थोर
त्याच अंकुशाचा मार.
थोडक्यात थोर्थोर लोकांना अंकुश पडतो , लहान मुंगीस साखरेचा रवा मिळतो. तस्मात , देवा मला लहानच ठेव ! असा अर्थ.
बाकी लहानपणच्याच अनेक चुकीच्या संकल्पना , गैरसमज (इतरांप्रमाणे) माझ्याही होत्याच. तुमच्या लेखात लहानपणीच्या गमतीजमती सांगताना त्यामधे अचानक ठाकरे-पवार आले याची मला थोडी गंमत वाटली.
"महिना संपला की दिनदर्शिकेवरील महिन्याचे पान देव उलटून देतो का? " असे मी चार वर्षांचा असताना आईला विचारले होते....( घराघरांतील दिनदर्शिकेचे महिन्याचे पान बदलून देणे हे देवाचे महिनाअखेरीचे महत्त्वाचे काम आहे अशी माझी पक्की समजूत होती.)
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
वाह अशा बर्याच गोष्टी होत्या! आत्ता दुर्दैवाने काहीच आठवत नाही आहे..
पण मजा असायची लहानपणी.. काय एकेक समज गैरसमज.. ! आणि जे मनात येईल ते बोलायची निरागसता...
मी लक्षद्वीपला जायच्या आधी अगदी दारात आईला खूप निरागसपणे विचारले होते, आपले जहाज बुडले तर?? आई हताश.. आणि मी वर म्हणतीय, कित्ती मज्जा ना! डॉल्फीन्स बरोबर येऊ आपण घरी वगैरे ! :|
http://bhagyashreee.blogspot.com/
आई माझा अभ्यास घेत होती, तिने विचारले मेणबत्ती कधी विझते मी उत्तर दिले होते लाईट आल्यावर मेणबत्ती विझते. :(
आमच्या वाड्यात पाण्याचे ड्रम भरलेले असायचे कामवाल्याबाईसाठी त्याला बाथरूम कोणता तरी सौम्य करंट बसत होता, पाण्यात हात घातला की तो सौम्य करंट जाणवे, मी आमच्या आजुबाजुच्या मुला मुलींना आणी भावाला त्या पाण्यात हात घालायला सांगे आणी मग आपल्या ड्र्म मध्ये आकाशातील वीज पडली त्यामुळे ते आपल्याला ते तसे लागते असे अनुमान मी काढले होते. :(
अभिजितनी छानच विषय लावून दिला डोक्याला. मी ५-६ वर्षांचा असताना आजीला विचारलेला प्रश्न...
जेव्हा कोणालाही बाळ होते तेव्हा ते बाळ मुलगा की मुलगी हे कसे ओळखतात? :( (अर्थात उत्तर मिळायचा प्रश्नच नव्हता... "शहाणाच आहेस. हो तिकडे" असं काहीसं तिने म्हणलेलं आठवतंय.)
बिपिन कार्यकर्ते
मलाही हाच प्रश्न होता...तेव्हा आई म्हणाली...सोप्पे आहे..
मुलगी असली तर तिच्या डोक्यावर केस असतात आणि मुलगा असेल तर केस खूप कमी असतात... :)
आणि माझाही तोच (गैर) समज होता बरेच दिवस... ;)
---------------------------------
केदार जोशी
प्रत्येक व्यक्तीचे पूर्ण नाव समजलेच पाहिजे असा काही ग्रह मी करुन घेतला होता. आजोबांनी गोष्ट सांगताना विष्णूचा उल्लेख आला, मी विचारले "आजोबा, विष्णूचे पूर्ण नाव काय?"
क्षणभर आजोबा विचारात पडले मग म्हणाले "मला माहीत नाही. विष्णूचं पूर्ण नाव विचारणारा तू पहिलाच असशील!" मग बराच वेळ मी विचार करत राहिलो की आजोबांनाही माहीत नाही अशा काही गोष्टी असतात. त्याचा धक्का बसला होता मला!
चतुरंग
ते तर श्रीकृष्णाचे नाव झाले. विष्णूचे नाव. विष्णू वैकुंठकर किंवा विष्णू शेषशायी वगैरे काहीतरी असेल. :)
जसे लक्ष्मीचे 'सौ. लक्ष्मी विष्णू वैकुंठकर' असे होऊ शकते.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
माझी आजी मला तिच्या शाळेतल्या गमतीजमती सांगत होती. सांगता सांगता, म्हणाली "मॅट्रीक झाले आणि मग माझं लग्न झालं."
मी म्हणाले "म्हणजे तू मोठी होतीस का तेव्हा??".. आजी म्हणाली "हो ..१४-१५ वर्षांची होते." मग मी विचारलं मग तेव्हा "तुला किती मुलं होती??"
आजीने सणसणीत शिवी हासडली मला आणि "हो बाजूला तिकडं" असं म्हणाली. तेव्हा आपलं नेमकं काय चुकलं हेच समजलं नव्हतं :(
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
मला सुद्धा असे बरेच गैरसमज होते. त्यातला एक म्हणजे कि माझी आई दूरदर्शनवर बातम्या देते. म्हणुन रोज आजोबांसोबत बसुन टि.व्ही बघायचे!! नंतर बरेच वर्षानी कळलं कि ते तसं नाहिच!
प्र. माझ्या बहिणीने विचारला होता बाबांना, " बाबा, माकडं कपडे का नाही घालत? " तेव्हा ती ३-४ वर्शांची असेल..
इतक्यात आमच्या कुत्रिने (डायना) ७ पिलांना जन्म दिला. पहिलं पिल्लु झालं तेव्हा लगेच, "काकू, पिल्लं कुठुन येतात?"-इति माझा चुलत भाऊ. :)
मलाही या बेडकी प्रकाराने मुंज होईपर्यंत धडकी भरली होती.
मलाही जाम भीती वाटायची. मग मी एक आयडिया केली होती. हळुच ब्लेडने मांडीवर छेद दिला व नंतर ती जखम भरु दिली. त्याचा वण उमटु दिला. मुंजीत मांडीत बेडूक भरायची वेळ आली कि गुरुजींना सांगायच कि अगोदरच तो दुसर्या गुरुजींनी भरलेला आहे. आता आवश्यकता नाही.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
आम्हि गावाला गेलो होतो . बहिण होति चार वर्शाचि बोबडि.तिने महिस (माफि दोन मात्रा आल्या नहित) पहिल्यादाच पाहिलि तिने आइला विचारले होते "अग हे ताळ ताळ काय दिसतय ग ''
लहानपणी ढगान्च्या गडगडण्याचा आवाज ऐकून मला असे वाटायचे की स्वर्गमध्ये सर्व देव आपआपल्या रथातून जात असावेत. त्यामुळे इथे जसा ट्रक, बस वगैरेन्चा आवाज येतो तसा तिथला आवाज येत असावा.
अगदी ७/८ वी पर्यंत माझा पं नेहरू फार आदरणीय वाटायचे.
मी जर झोपा काढत असलो आणि कोणी हटकलेच तर चाचा नेहरूच "आराम हराम है" असे म्हणतात असे मीच सांगायचो. जसे आपणं पैसा वैसा, अलाणा फलाणा असे जोड शब्द म्हणतो तसे मला आराम-हराम हे जोडशब्द वाटायचे. तेव्हा झोपायला जाताना बर्याचदा म्हणायचो की चला आराम-हराम करूया. सुदैवाने लोकांना वाटायचे की मी जोकच करतोच. म्हणून ते हसायचे.
तसेच मला लहानपणी गायी म्हशींची धार काढतात आणि दुध मिळते असे सांगितल्यावर पहिल्यांदा कळले नव्हते की शिंगाची धार काढल्यावर दुध कसे काय मिळते? (हाच गैरसमज आदरणीय पु.ल.नां सुद्धा होता. त्यांनी हसवणूक मध्ये माझे बालजीवन मध्ये सांगितले आहे. पण माझा गैरसमज तो लेख वाचायच्या आधीचा होता. ) पण बाबांनी एकदा मला कोल्हापुरला कट्ट्यावर नेले आणि धारोष्ण दुध पिऊ घातले. तेव्हाच हा समज दुर झाला.
खादाडमाऊ
माझे नाव प्राजक्ता आहे. आमच्या घरी प्राजक्ताचे झाड आहे. रोज त्याचा सडा पडतो. घरातले लोक प्राजक्ताच्या झाडाबद्दल बोलत असतात. माझी मुलगी २.५ वर्षाची होती तेंव्हा तिची काकी सकाळी प्राजक्ताची फुले गोळा करत होती. माझ्या मुलीने ते बघितले आणी तिला म्हणाली ती फुल नको घेऊ माझ्या आईची आहेत ती.
मी मागच्या वर्षी भारतात गेले होते तेव्हाचा हा किस्सा.
आईकडे कोल्हापूरला प्राजक्ताचं झाड आहे. माझं नावही प्राजक्ता आहे ना, तर माझा लेक मला विचारतो, "तू या झाडाच्या ट्रंकमधून (बुंध्यातून) बाहेर आलीस आणि मग आजीनं तुला पाहिलं आणि घरात आणलं का? "
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
सगळे बालपणाच्या बावळटपणाच्या आठवणींत न्हाताहेत नुसते!!
लेखात अन्य काही गमतीदार गैरसमज सांगायचेच राहिले.
1. पृथ्वी गोल असते, मग ती स्वतःभोवती फिरताना माणसे पडत कशी नाहीत, असा प्रश्न मला पडायचा. (भूगोल शिकल्यानंतरही त्याचे पूर्ण निरसन मला झाले आहे, असे वाटत नाही.)
2. पृथ्वीचं शेवटचं टोक कुठे असेल, असाही एक प्रश्न कायम सतावायचा. म्हणजे, कुठेतरी असं एखादं ठिकाण असेल, जिथे जमीन, पाणी संपतच! पुढे थेट दरी! म्हणजे विमानाच्या खिडकीतून खाली बघितल्यासारखं! त्याचंही समर्पक उत्तर देणारा कुणी "माई का लाल' लहानपणात तरी भेटला नाही!
3. "माकडाचं घर बांधून झालंच नाही,' असा धडा शाळेत होता. तेव्हा खरंच माकडाचं घर असतं कुठे, या कुतूहलानं पछाडलं होतं. अजूनही ते कुतूहल शमलेलं नाही. आता आमच्या इमारतीसमोरच खिडकीच्या तावदानाच्या जागेत कबूतरं उभ्या उभ्या रात्रभर राहताना, झोपा काढताना पाहूनही आश्चर्य वाटतं!!
बाकी, लैंगिकतेबद्दलचे (लहानपणचे) प्रश्न आणि शंका अनंत आणि अगाध आहेत. त्याविषयी अख्खा ग्रंथ लिहून होईल. त्यामुळे न बोललेलंच बरं!!
१.
>>पृथ्वीचं शेवटचं टोक कुठे असेल, असाही एक प्रश्न कायम सतावायचा. म्हणजे, कुठेतरी असं एखादं ठिकाण असेल, जिथे जमीन,
>>पाणी संपतच! पुढे थेट दरी! म्हणजे विमानाच्या खिडकीतून खाली बघितल्यासारखं!
असंच सेम-टू-सेम वाटायचे मला...
आणि आकाशात दिसणारे ग्रह-तारे खूप मोठे असतात आणि त्यांच्यावर माती (? :P ) असते हे मला पटायचेच नाही.
२. रेडिओ आणि टी.व्ही. च्या आत माणसे असतात असे मलाही वाटायचे... एकदा तर मी एका बातम्या देणार्या निवेदिकेला वाकुल्या दाखवून पळालो होतो... त्यानंतर काही दिवस ती माझ्यावर चिडली आहे मला वाटत असे.
३. बातम्या देणारे निवेदक अगदी तोंडपाठ असल्यासारख्या बातम्या देत असत.... तेव्हा मला प्रश्न पडे की रोज रोज हे लोक बातम्या कशा काय पाठ करत असतील..
४. इंग्रजी बातमी देणार्यांना एवढे भारी इंग्लिश कसे काय येते हा एक प्रश्न मला पडत असे.... त्याचे उत्तर मीच शोधून काढले होते... की बहुतेक त्यांना मराठीतूनच इंग्रजी बातम्यांचे उच्चार लिहून देत असावेत.
५. अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला म्हणजे नक्की कुठे आणि ते चक्रव्यूह कसे दिसते, कशाचे असते हाही प्रश्न मला पडला होता..
६. चित्रपटांतील गाण्यांमध्ये हिरो-हिरॉईन एवढ्या पटापट कपडे कसे काय बदलतात... तसेच.. हिरो हिरॉईनला अलगद उचलतो तसे आपले पप्पा आईला का उचलत नाहीत.. हा प्रश्न पडे... यावर आईने काय उत्तर दिले होते ते मला आठवत नाहीये :P
पैसे झाडावर लागतात असा समज असल्याने, मी, दादा आणि ताईने मिळून घरामागच्या आंगणात पैसे पुरले आणि त्याजागी दररोज पाणी घालत असू :) पण झाड काही उगवलेच नाही :( !
अनामिक
मी सात आठ वर्षांची असताना नातेवाईकांकडे मुंजीला गेले होते.
मलाही दादाच्या दंडात बेडूक भरणार की कायसे सांगूनच नेले होते.
घेरा ठेवायला नकार दिल्याने रडणार्या मुंजामुलाला दोघा तिघांनी धरून ठेवले होते.
रडणे चालूच होते. आता हे बघायला बायका मंडळींची गर्दी झाले होती. नक्की काय चालले आहे हे न समजल्याने
मला वाटले की दादाचा दंड कापून त्यात बेडूक भरतायत.
त्या गर्दीतूनही आवाज येत होते की अरे बाबा, हलू नकोस, वस्तरा लागेल, रक्त येइल, इ.
मला समजेना की इतक्या वाईट प्रसंगी सगळ्या बायका शालू नेसून का आल्यात?
रेवती
अगं मला माहितीये कुठला सल आहे मनात ते!
आता जावळासारख्या प्रसंगी कुणी नवी साडी घेतं का? बहुतेकवेळा नाही...
पण मुकुलच्या जावळाला मी पैठणी घेतली (बजेट चुकून दुप्पट झाले, माझ्याकडून;)).
अज्जून तेच आहे मनात, असं दिसतय तरी.
रेवती
मी तर आकाशात विमान दिसल की जोरात ओरडत असे.... चाचा नेहरु टाटा,,,इंदिरा गांधी टाटा (कारण हे दोन व्यक्तीच विमानाने प्रवास करतात ही माझी ठाम समजुत होती.)
मदनबाण.....
"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
रेडिओत लहान लहान माणसं बसुन गातात असं मलाही वाटायचं, किती वेळा मी रेडिओ चालु असतांना आत कुणी दिसतय का बघत बसायचो.
लहानपणी एक गावातल्या आजी भाजी विकायल्या यायच्या. आल्यावर नेहमी 'तुला ५ रुपयाला विकत घेतलय. तुझी आई वाट बघतेय, चल माझ्या बरोबर गावाला' म्हणायची. असला राग यायचा म्हातारीचा. पण ती येतांना दिसली रे दिसली की माझा भोंगा चालु व्हायचा. पण म्हातारी एवढी खमकी की पोरगं रडतय, कशाला त्रास द्या असंही तीला कधी वाटलं नाही. शेवटी शेवटी तर मला खरं वाटायला लागलं. मग जन्मदाखला, मी जिथे झालो तो दवाखाना आईनी दाखवला तेव्हा समाधान झालं!
प्रतिक्रिया
खूप आहेत.
मला
टि. व्हि. वरिल जहिराती
जहिराती,
वरील, बघू!!!
व्वा!
लेख आवडला !
"महिना
(घराघरांती
वाह अशा
:-)
आई माझा
लहानपणच्या महान शंका...
अच्छा!
मलाही हाच प्रश्न... ;)
४-५ वर्षाचा असेन
विष्णू
ते तर
अरे हो!!!
लग्न झाले
हो..
छान विषय!!
मलाही
बालपण
बस कन्डक्टर
लहानपणी
आकाशवाणी
माझाही मोठा गैरसमज
माझी मुलगी
माझ्याही मुलाने
आता राहवत नाही!
व्वा!
१. >>पृथ्वीच
पैसे
मस्त
मी सात आठ
मस्त --
धम्माल!!!!!! अ
शालू नेसायला
ढिश्क्यांव!!!!!!
हाहाहा!
रेवती..
अगं मला
पैठणीचा
दुप्पट!!!!! :(
युती.
टाटा...
अगायायाया
हा बाणा
रेडिओत