✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पुस्तक परिचय- नर्मदे हरं हरं (जगन्नाथ कुंटे)

च
चाणक्य यांनी
Sun, 03/08/2009 - 11:31  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6391 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

नर्मदे हर ...!!!

छोटा डॉन
Sun, 03/08/2009 - 12:17 नवीन
अत्यंत नितांत सुंदर असेहे पुस्तक आहे. संपुर्ण प्रवासवर्णन आनि लेखकाचे वैयक्तीक अनुभव असुनसुद्धा पुस्तक जरासुद्धा कंटाळवाणे होते नाही ... कुंट्याबरोबर यात्रा करणारे सर्वजण पन्नाशीच्या पुढचे असुन त्यांनी ज्या उत्साहाने व आंतरीक जोशाने यात्रा केली ते वाचुन खरोखर माणसाचे इच्छाशक्तीच्या सामर्थ्याचे महत्व पटते. सर्वांनी जरुर "वाचावेच" असे हे पुस्तक आहे. चाणक्यांनी ह्या जबरदस्त ताकदीच्या पुस्तकांचे तेवढ्याच ताकदीने सार सांगितले आहे. खुपच सुंदर ... " नर्मदे हर ऽऽऽऽ ...!!!" ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments

सहमत

अवलिया
Sun, 03/08/2009 - 12:26 नवीन
अतिशय सुंदर पुस्तक आहे. एकदा जरुर वाचण्यालायक. अनेक जणांनी यात्रा केल्यावर केलेले वर्णन, ही यात्रा नक्की करायचीच अशा इच्छेला खतपाणी देते. नर्मदा मातेची इच्छा असेल तर जरुर होईल... नाहीतर पुढले जन्म आहेतच.. पापाच्या राशी इतक्या आहेत की मोक्ष या जन्मी मिळणारच नाही हे नक्की आहे. " नर्मदे हर ऽऽऽऽ ...!!!" --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

प्रतिसाद

मुक्तसुनीत
Sun, 03/08/2009 - 12:34 नवीन
चांगला परिचय. पुस्तक अतिशय रंजक आहे यात शंका नाही. थोडे अधिक विस्ताराने नंतर लिहितो. एक (काहीशी अपरिचित ) बाब : जगन्नाथ कुंटे म्हणजे पुण्यातले युवा संवादिनी-वादक चैतन्य कुंटे आणि प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ आणि या विषयावरील मराठी पुस्तकांचे लेखक कृष्णमेघ कुंटे यांचे वडील होत.
  • Log in or register to post comments

हे पुस्तक

विंजिनेर
Sun, 03/08/2009 - 13:25 नवीन
हे पुस्तक मी सलग वाचून काढलेलं आठवतंय. त्या पुस्तकातला स्वतःला झोकून देणारा टोकाचा भक्तिभाव, त्यासाठी सोसायला लागलेले पराकोटीचे शारिरीक हाल हे थक्क करतं. ह्या आधी गोनीदांच "भ्रमणगाथा" वाचलं होतं त्यामुळे नर्मदा-परिक्रमा आणि तिचा मार्ग हा थोडासा परिचित होता. पण कादंबरीच्या अंगाने जाणार्‍या भ्रमणगाथेची तुलना ह्याच्याशी करण गैर आहे. मला कुंट्यांचे अनुभव आणि विचार वाचून भारावुन जायला झालं. पण ते विचार पटले मात्र नाहित. शास्त्रीय कसोट्यांवर घासून न घेता येणारे आकलनापलिकडचे अनुभव खटकतात. असो. मी केवळ एक अति-सामान्य पांढरपेशा माणुस. कुंटे आणि त्यांचे अनुभव हे माझ्या आकलनापलिकडचं सुद्धा असु शकेल. तेव्हा त्यावर भाष्य मी कोण करणार.. पण त्यापेक्षाही मला जो सात्विक संताप आला तो त्यांचा संसार संभाळणार्‍या बायकोच्या होणारी फरफट पाहून(त्यांच्याच पुस्तकातल्या वर्णनाच्या आधाराने). माझ्या मते ज्या माणसाला असे अनुभव घ्यायचे आहेत आणि परमार्थी मार्गाने जायचे आहे त्याने गृहस्थाश्रमाची जबाबदारी स्विकारावी कशाला? केवळ विषयसुख म्हणून का आणखी काही? जो माणुस अश्वथाम्याच्या दर्शनासाठी तळमळतो त्याला त्या माउलीची जिला अर्थाजन न करणारा, फकिरी वृत्तीचा नवरा आहे तिची रोजच्या जबाबदार्‍यांचा सामना करणं किती कठीण होतं हा थोडा सुद्धा विचार करता येत नाही? बरं, पत्नी एकटी नाही. पदरात मुलं. त्यांची शिक्षणं, आजारपणं हे केवळ दुसर्‍याच्या "भिकेवर" निभावून नेणं हे काही सोपे नाही आणि कुंट्यानी जसं बेफिकीरपणे हसण्यावारी नेलं आहे तसं तर नक्कीच नाही.
  • Log in or register to post comments

विंजिनेर यांच्याशी अगदी सहमत!!

केदार_जपान
Mon, 03/09/2009 - 09:18 नवीन
माझ्या मते ज्या माणसाला असे अनुभव घ्यायचे आहेत आणि परमार्थी मार्गाने जायचे आहे त्याने गृहस्थाश्रमाची जबाबदारी स्विकारावी कशाला?>>> एकदम बरोबर बोल्लात आपण!!...खरे आहे..लोकांचा परमार्थ होतो..मात्र घरच्या लोकांची मात्र विनाकारण फरफट होते.. :( अशी अनेक उदाहरणे आपल्याला दिसतात... ------------- केदार जोशी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

पुस्तक सुंदरच

सागर
Sun, 03/08/2009 - 16:43 नवीन
ह्याच पुस्तकावर मागे एकदा चर्चा झाली होती... प्रसाद दाढेंनी सुरु केला होता हा धागा : http://www.misalpav.com/node/682 कदाचित यातून नव्याने वाचणार्‍यांना माहिती मिळू शकेन. बाकी पुस्तक सुंदरच... एकदम सहमत - सागर
  • Log in or register to post comments

कोठल्याहि

मुत्सद्दि
Sun, 03/08/2009 - 20:27 नवीन
कोठल्याहि नवीन वाचकाला "नर्मदा परिक्रमा" हा विषयच मुळी भुलवून टाकणारा आहे. नर्मदा परिक्रमेवर आधारीत माझ्या माहिती प्रमाणे ३ वेगवेगळी पुस्तके आहेत. फारपुर्वी गो.नी.दांडेकरांच्या "स्मरणगाथा" ह्या आत्मपरिचयपर कादंबरीत ह्या परिक्रमेचा उल्लेख आहे. अलिकडच्या काळात जगन्नाथ कुंटे ह्यांचे "नर्मदे हरं हरं " आणि सुहास लिमये ह्यांचे हर नर्मदे|नर्मदे हर नावाचे पुस्तक बाजारात उपलब्ध आहे. दोन्ही पुस्तके जरी एकाच धाटणीची असली तरि सुहास लिमये ह्यांचे पुस्तक जास्त उजवे व सरस आहे. कुंटे ह्यांच्या पुस्तकात फक्त "चहा व सिगरेट पिली "एवढेच सतत वाचावयास मिळते. मुत्सद्दि.
  • Log in or register to post comments

एक माहिती

विनायक पाचलग
Sun, 03/08/2009 - 22:27 नवीन
अवघ्या काही दीवसापुर्वी गोनीदांच्या कन्या वीणा देव यांचे व्याख्यान ऐकण्याचा योग आल्या त्यात त्यानी सर्वप्रथम गोनीदानी नर्मदा परिक्रमा लिहिल्याचे सांगीतले ते खरे आहे का खुपशा लेखकानी ते वाचुन पुन्हा परिक्रमा केली व पुस्तकातदेखील तसा उल्लेख केला हे योग्य आहे का क्रुपया माहिती द्यावी बाकी हे पुस्तक नक्की वाचीन सध्या खुप चर्चेत आहे बाकी परिक्ष्ण उत्तम छानसे वाचलेले विनायक पाचलग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुत्सद्दि

पुस्तक परिचय चांगला आहे.

प्राजु
Sun, 03/08/2009 - 22:34 नवीन
सहज जमलं आणि सहज मिळालं नक्की वाचेन. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

विंजीनेर---- +१

चाणक्य
Wed, 03/11/2009 - 09:26 नवीन
मला कुंट्यांचे अनुभव आणि विचार वाचून भारावुन जायला झालं. पण ते विचार पटले मात्र नाहित. शास्त्रीय कसोट्यांवर घासून न घेता येणारे आकलनापलिकडचे अनुभव खटकतात. असो. मी केवळ एक अति-सामान्य पांढरपेशा माणुस. कुंटे आणि त्यांचे अनुभव हे माझ्या आकलनापलिकडचं सुद्धा असु शकेल. तेव्हा त्यावर भाष्य मी कोण करणार.. पण त्यापेक्षाही मला जो सात्विक संताप आला तो त्यांचा संसार संभाळणार्‍या बायकोच्या होणारी फरफट पाहून(त्यांच्याच पुस्तकातल्या वर्णनाच्या आधाराने).
विंजीनेरसाहेब, माझही काहिसं असंच झालं पुस्तक वाचून. मला कुंट्यांचे साधने बद्दल चे काही विचार पटले पण एखादा माणूस लग्न वगैरे झाल्यावर ईतक्या बेफिकीरीने कसा काय जगू शकतो हेच मला समजेना. बराच विचार केला (उगीचंच). ईतर लोक लाख मदत करतील हो, पण आपण काहीही न करता, त्यांच्या जीवावर जगतोय ही जाणीव माणसाला स्वस्थ कशीकाय बसू देते? काहीकाही माणसं वेगळ्याच मुशीतून आलेली असतात वाटतं. माझ्यातरी बुद्धीपलीकडचे आहे हे.
  • Log in or register to post comments

बराच विचार

llपुण्याचे पेशवेll
Wed, 03/11/2009 - 11:36 नवीन
बराच विचार केला (उगीचंच). ईतर लोक लाख मदत करतील हो, पण आपण काहीही न करता, त्यांच्या जीवावर जगतोय ही जाणीव माणसाला स्वस्थ कशीकाय बसू देते? काहीकाही माणसं वेगळ्याच मुशीतून आलेली असतात वाटतं. माझ्यातरी बुद्धीपलीकडचे आहे हे. खरे आहे. बीडकर महाराजांचे चरित्र वाचले की माझे देखील असेच होते. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य

सुंदर

विसोबा खेचर
Fri, 03/13/2009 - 08:53 नवीन
सुंदर परिचय. हे पुस्तक आम्ही नक्की वाचणार! तात्या.
  • Log in or register to post comments

मी पण..

पद्मश्री चित्रे
Fri, 03/13/2009 - 09:46 नवीन
या पुस्तकाचाच परिचय लिहायला घेतला होता , मि पा वर देण्यासाठी. असो.. आता बेत बदलला.. बाकी पुस्तक खरच छान आहे.. त्यांची इतर पुस्तके- नित्य निरंजन वगैरे पण छान आहेत.. मला त्यांच्याइतकच त्यांच्या पत्नीच पण कौतुक वाटतं...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा