बोतल बोले तो बरबादी.....
...."सोमरसे" घराण्यातले आम्ही सहा सहोदर पिऊन चारचाकी चालवताना एकसमयावच्छेदे खपलो.
यथावकाश चिकित्सक चार्वाकवाद्यांना चकवून चक्क भुतं झालो.
मग "भूतदयाभवन" या वडिलोपार्जित वाड्याला प्रवेशद्वारापासून पार परसबागेपावेतो पछाडून तिथेच तळ ठोकला.
परवा सर्वपित्रीच्या मध्यरात्री उपाशीपोटी लपाछपी खेळत तरंगत असताना वाड्याच्या दारावर थाप पडली.
मी भूतच ! न भिता दार उघडलं.
"तो" तडक आतच आला.
आम्ही भुकेनं भंजाळलो होतो.
मतकऱ्यांच्या "जेवणावळ" कथेतील ट्विस्ट आठवून आम्ही जिभल्या चाटू लागलो तोच "त्यानं" काहीतरी पुटपुटत भक्क उजेड केला. आम्ही भुतांनी दिपलेले डोळे मिटले.
डोळे उघडतो तो काय?
आम्ही एकसमयावच्छेदे त्याच्या हातातल्या बेढब, बळकट, बोरोसिलिकेट बाटलीत बूचबंद !
...... बोतल बहुतही बूरी बबुआ.
वाचने
570
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा भूत बंद चित्रपटाची…
हा हा हा भूत बंद चित्रपटाची कहाणी उघड केली.
मस्त, एकदम खुसखुशीत!- …
मस्त, एकदम खुसखुशीत!
- (भुत्या) सोकाजी
भाग 2
आम्ही सहा सहोदर! त्या काचघटात बद्ध झालो.तो आगंतुक उन्मत्तपणे हसला.
परंतु आम्ही 'सोमरसे' वंशाचे करारी भूत!चार्वाकवाद्यांना चकवणारी आमची तीक्ष्ण बुद्धी. लगेचच आमचे तार्किक आक्रमण सुरू झाले.
एकसमयावच्छेदे खर्जध्वनी घुमला."रे मूढ! चार्वाकाचा सिद्धांत आठव. 'ऋणं कृत्वा घृतं पिबेत्' हा नियम!
आम्ही तर सोमरस पिऊन आलेले भुतात्मे. आमची तृप्ती कुठे? क्षुधा शांतता कशी होणार?
"तो तांत्रिक चक्रावला. बाटलीला कान लावून ऐकू लागला."दुसरे असे, हा महागाईचा काळ. एकाच घटात सहा जणांची वस्ती?
हा विनाभाड्याचा गृहप्रवेश! आमच्या पोषणाचा भार तुझ्या शिरावर, तूला परवडेल का?"
अहोरात्र ते तत्त्वज्ञान वर्षत राहिले.
सतत ती कुत्सित शेरेबाजी.अविश्रांत बौद्धिक बडबड.'घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्' करून प्रसिद्धी मिळवू पाहणाऱ्या त्या तांत्रिकाचा अखेर मस्तकभंग झाला!
तो डोके धरून आक्रंदला, "थांबा! शांत व्हा!" शांततेच्या आशेने त्याचा हात थरथरला. त्याने सत्वर त्या बाटलीचे बूच ओढले.
'फस्स' असा आवाज झाला.
विमोचन झाले! सहाही सहोदर परसबागेत उन्मुक्त तरंगले.
खरेच, 'अस्माकं वाग्बाण बोरोसिलिकेट घट विदारक' बबुआ!
पैजारबुवा,
पैजारबुवा,
In reply to भाग 2 by ज्ञानोबाचे पैजार
पैला
पिच्चर
पडद्यावर
पोचता पोचताच
सिक्वेलची
स्टोरी
स्पॉयलर
सकट
सगळ्यांना
सांगितलीत?
निषेध
नोंदवतो :)
...........आणि अशा तर्ह्नेने…
In reply to भाग 2 by ज्ञानोबाचे पैजार
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आणि अशा तर्ह्नेने आमचा बापटीस्मा करण्याचा प्रयत्न आम्ही सहोदर मंडळींनी हाणुन पाडला!
हे हे हे 🤣 भाग २ पण भारीच 😂😂
हे हे हे 🤣 भाग २ पण भारीच 😂😂
हे हे हे !!!
दोन्ही भाग भारी आहेत!
- (रसिक साहित्य समिक्षक) कांदा लिंबू
अच्छा! दुसरा भाग आता वाचला…
अच्छा! दुसरा भाग आता वाचला.
छान आहे.