✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कुत्र आणि कानमंत्र

R
rahulkransubhe यांनी
Mon, 12/08/2008 - 21:53  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8000 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

र
रामदास Mon, 12/08/2008 - 23:55 नवीन

राहुल

आवडली गोष्ट.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 12/09/2008 - 00:20 नवीन

+१

गमतीदार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
भ
भडकमकर मास्तर Tue, 12/09/2008 - 01:25 नवीन

कुत्रा चावणे...

होय.... आम्हीही हा अनुभव घेतला आहे... कुत्र्याने चावायचे ठरवले असले की तो चावतो ( तुम्ही जागेवर उभे रहा किंवा पळा).... ... एकदा आठवीत पामेरियन चावलं... फॅमिली डॉक्टरने एक टिटॅनस इंजेक्शन लगावलं आणि महापालिकेच्या दवाखान्यात रेबीज लस घ्यायला पाठवलं... महापालिकेच्या दवाखान्यात जायचा माझा तो पहिलाच अनुभव, तिकडे प्रचंड रांग, डॉक्टरांनी जखम पाहून पोटात इंजेक्शन घ्यायला पाठवलं...चौदा इन्जेक्क्शनांच्या कल्पनेने मला ब्रह्मांड आठवलं... मग तिकडे एका नर्सने हातावर टेस्ट केलं इन्जेक्शन आणि थोड्या वेळाने पोटात .... मी भीतीने जोरात बोंब ठोकल्याचे स्मरते.... नंतर कळाले की दुखण्यापेक्षा जास्त आपण घाबरून रडत आहोत.... पुढची रोजची तीन की चार इन्जेक्शने तुलनेने सोपी गेली..... पोटावर छान नक्षी तयार झाली...चार इन्जेक्शनांमध्ये भागलं प्रकरण... शाळेला दोन दिवस दांडी मारली , इतकाच फायदा आठवतो आता... सध्या रेबीजच्या लशी दंडावरच्या स्नायूतच घेता येतात म्हणे... आमच्या काळातली मजा आता उरली नाही... .... त्या काळात काही मित्रांनी गंमत म्हणून त्याला रेबीजची लक्षणे दिसत आहेत, तो पाण्याला घाबरतो आणि भुंकत आहे अशी खबर पसरवली आणि अफवेचा आनंद लुटला... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 12/09/2008 - 01:31 नवीन

अबब ... आमचा

अबब ... आमचा कानमंत्र वेगळा आहे. कुत्रा धोकादायक वाटला की त्याच्या डोक्यात एक दगड टाकावा. हमखास कुत्रा पळून जातो. कामावरून घरी येताना गल्लीतली काहा कुत्री वाघ बनायची... आणि भुंकायची.. एकदा वैतागून दगड हाणला ते कुत्रं पडलं ते उठलंच नाही, म्हटलं मेलं.. नाय पण ते दुसर्‍या दिवशी दिसलं, पण मला पाहून ते लांबच पळायचं .. - टारझन
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Tue, 12/09/2008 - 01:48 नवीन

कुठेतरी

कुठेतरी खरंच वाचल्याचं आठवतंय की गांधीजींनीसुद्धा मुंबईतली भटकी मोकाट कुत्री पकडून त्यांचा बंदोबस्त करावा असे सुचवले होते...१९२० च्या सुमारास असेल... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Tue, 12/09/2008 - 02:53 नवीन

काही तरी गफला असेल हो ...

आहो मास्तर , तुमची काही तरी चुक झाली असेल .. गांधी म्हंटले असावेत, कुत्रा जर एका पायाला चावला तर दुसरा पाय पुढे करावा, त्यामुळे कुत्र्यांच मनपरिवर्तन होतं आणि मग ते पुन्हा कोणाला चावत नाहीत. (प्रतिसाद गांधीवाद्यांना समर्पित) - टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
घ
घाटावरचे भट Tue, 12/09/2008 - 02:55 नवीन

दुसरा पाय

दुसरा पाय पुढे केल्यावर कुत्र्याने चावण्याऐवजी वेगळंच काही केलं तर??? त्यापेक्षा दगडाचा उपाय बरा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 12/09/2008 - 08:57 नवीन

हा हा हा हा

गांधी म्हंटले असावेत, कुत्रा जर एका पायाला चावला तर दुसरा पाय पुढे करावा, त्यामुळे कुत्र्यांच मनपरिवर्तन होतं आणि मग ते पुन्हा कोणाला चावत नाहीत. हा हा हा गांधीविचार समजून घ्या रे ! तुमच्या अशा विचार करण्यामुळे माझा गांधी विचारांवरचा विश्वास डळमळीत व्हायला लागला राव ! गांधीजींचा विचार पीव्वर गांधीवाद्यांना कळला नाही म्हणतात, तेव्हा आपलीही गोष्ट निराळीच म्हणा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
परिकथेतील राजकुमार Tue, 12/09/2008 - 11:30 नवीन

>>गांधी

>>गांधी म्हंटले असावेत, कुत्रा जर एका पायाला चावला तर दुसरा पाय पुढे करावा, त्यामुळे कुत्र्यांच मनपरिवर्तन होतं आणि मग ते पुन्हा कोणाला चावत नाहीत. =)) =)) आणी तरीहि ते पुन्हा चावले तर मग आपण त्याला चावावे आणी त्यास चावले गेल्यावर होणार्‍या वेदनांची जाणिव करुन द्यावी !! दुरात्मा चावरे |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
व
वेलदोडा Tue, 12/09/2008 - 01:56 नवीन

ह्म्म्म्...

ह्म्म्म्...छान आहे गोष्ट.
  • Log in or register to post comments
श
शंकरराव Tue, 12/09/2008 - 02:42 नवीन

कथा आवडली

कथा आवडली पुढील लेखनास शुभेच्छा
  • Log in or register to post comments
व
वर्षा Tue, 12/09/2008 - 03:53 नवीन

चांगलं

चांगलं लिहिलंय. आवडलं. अवांतरः पुढील वेळेस एक ओळ रिकामी सोडून पॅराग्राफ पाडल्यास वाचायला अजून चांगलं वाटेल.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 12/09/2008 - 08:03 नवीन

सही रे कथा!!

‘माझ्या सारखेच मित्र इतरांना पण आहेत कानमंत्र देणारे’.... :-D १९९५ साली डीसेंबरात आम्ही काही मित्र व्यायामासाठी लवकर उठत असू.. सकाळी -स़काळी ग्राउंडावर जाय्चो आणी व्यायाम आणी फूटबॉल असा कार्यक्रम असायचा... एक कुत्र रोज भूंकायच... वैताग आणलेला.....जीव मोकलून भूंकायच ते बेणं...... आम्ही पण प्राणीमात्राच्या भूतदयेला जागून त्याला लै वैताग द्यायचो.. असं करता -करता एके दिवशी त्या कुत्र्याचा घसा बसला( गंमत वाटतेय का? खरये!!) तेव्हा पासून त्या कुत्र्याने आम्हाला भूंकायचा नाद सोडला.... आणी आमची चांडाळ चौकडी दिसली की ते शेपूट घालून पळून जायचं.... (भटक्या) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 12/09/2008 - 09:04 नवीन

:)

स्टोरी भारी आहे, आवडली !
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 12/09/2008 - 09:41 नवीन

गोष्ट आवडली

गोष्ट आवडली. लहानपण कुत्र्यांच्याच सोबत गेल. आताही कुत्री जवळ येतात.
कारण माझ्या मित्रांनी दिलेला कानमंत्र होताच की माझ्या लक्षात –"कुत्र कधी अंगावर आलं किंवा पाठीमागे लागलं तर पळायच नाही, तर आपण तीथेच उभं रहायचं किंवा जागेवर बसुन जायचं म्हणजे कुत्रा आपल्याला काहीच करत नाही. कुत्रे फक्त भुंकायचे काम करतात. ते कधीच चावत नाहीत उलट तेच आपल्याला घाबरतात
एकदा झोपडपट्टीतुन मोटरसायकलवर चाललो होतो. एक आडदांड कुत्रे माझी पिंडरी पकडायला वेगान धावत आल. मी वेग कमी करुन मोटर सायकल थांबवली. कुत्र्याला यु यु यु असे प्रेमाने केले. कुत्रे अचंबित झाले आन अक्षरशः मान खाली घालुन निघुन गेले. कारण असे काही होईल हे त्याला अपेक्षितच नव्हते. गावाकडे आमचेच कुत्रे मला चावले. पण चुकुन. सगळ्यांचेच पांढरा शर्ट खाकी चड्डी व गांधी टोपी असायची. इतर मुलांशी मस्ती करताना आमच्या राजाने हल्ला केला तो माझ्यावरच . नंतर गुपचुप मार खाउन घेतला. खरं तर त्याला वाटल होत कि मलाच कुणी तरी मारतय. म्हणुन तो संरक्षण करायला आला होता. पण नेम चुकला. नंतर पुण्याला येउन तीन इंजेक्षने पोटात घेतली होती. फिरकीची. सर्व माणसे सारखी नसतात. कुत्र्यांचेही तसेच आहे. त्यांच्यात एखादा कुत्रा गद्दार निघाला कि ते म्हणतात साला "आदमी" निकला. कुत्र्यांविषयी प्रेम किंवा भय हे माणसातल्या जीन्स शी निगडीत असावे. काही माणसे कुत्रा या कल्पनेलाच घाबरतात. प्रत्येक कुत्रा हा माणसाला चावण्यासाठीच जन्माला आला आहे अशी त्यांची समजूत असते.त्यामुळे तो प्रेमाने जवळ आला तरी तो चावण्यासाठीच आला आहे असे समजून त्यांची घाबरगुंडी उडते. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 12/09/2008 - 09:51 नवीन

गोष्ट आवडली

एकदा झोपडपट्टीतुन मोटरसायकलवर चाललो होतो. एक आडदांड कुत्रे माझी पिंडरी पकडायला वेगान धावत आल. मी वेग कमी करुन मोटर सायकल थांबवली. कुत्र्याला यु यु यु असे प्रेमाने केले. कुत्रे अचंबित झाले आन अक्षरशः मान खाली घालुन निघुन गेले. कारण असे काही होईल हे त्याला अपेक्षितच नव्हते. चला लोकांवर नाही तर कुत्र्यांवर गांधीगिरी चालते तर :-) गावाकडे आमचेच कुत्रे मला चावले. पण चुकुन. सगळ्यांचेच पांढरा शर्ट खाकी चड्डी व गांधी टोपी असायची. इतर मुलांशी मस्ती करताना आमच्या राजाने हल्ला केला तो माझ्यावरच . नंतर गुपचुप मार खाउन घेतला. खरं तर त्याला वाटल होत कि मलाच कुणी तरी मारतय. म्हणुन तो संरक्षण करायला आला होता. पण नेम चुकला. नंतर पुण्याला येउन तीन इंजेक्षने पोटात घेतली होती. फिरकीची. काय राव पोलीसात होता ना तुम्ही विज्ञानवादी. अहो कुत्र्याचे डोळे बांधले तरी ओळखु शकतो वासाने. ते सुद्धा रोजच्या सवयीच्या माणसाला. कुत्र्याने डाव साधला हिशोब चुकता केला त्या घोळक्यात ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
म
मदनबाण Tue, 12/09/2008 - 09:50 नवीन

मस्त लिहले

मस्त लिहले आहेस... आमच्या इथं सुध्दा जाम माजुरडे कुत्तरडे आहेत,,साल्यांना रात्रीच खुमखुमी येते भुंकायची,,रात्रभर भुंकाभुंकी चालु असते,,तो कुत्रे उचलुन नेणारा ट्रक अनेक वर्ष दिसलाच नाही.. चुकुन मला झोप लागलीच की ह्यांची भुभु सभा सुरु होते..झोपचं खोबरच करुन टाकतात!!आणि सकाळी पहाव तर लांब तंगडी करुन मस्त झोपलेले असतात.. (त्रस्त ठाणेकर) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Tue, 12/09/2008 - 21:30 नवीन

तो कुत्रे

तो कुत्रे उचलुन नेणारा ट्रक अनेक वर्ष दिसलाच नाही.. माझ्या माहितीप्रमाणे ही कुत्रे उचलणार्‍या ट्रकची संकल्पना आता बंद केली आहे.... मनेका गांधी यांची कृपा ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
व
वेताळ Tue, 12/09/2008 - 10:01 नवीन

हो कुत्रा भुंकताना अंगावर धावत आला

के अजुनही खुप भिती वाटते,ती कुत्र्याची नाही तर रेबीज इंजेक्शनची. बाकी सगळीकडे कुत्रा स्वभाव हा सारखाच असतो. प्रत्येक कुत्र्याला अनोळखी माणुस चोर वाटत असतो.म्हणुनच म्हण आहे ना की कुत्र्याच शेपुट वाकड ते वाकडच.मला एक दोनदा आमची पामेरिअन कुत्री चावली होती. पंरतु मी त्यावर देशी औषध घेतले. सहसा पाळलेला कुत्रा चावला तर रेबीजची भिती नसते. परंतु त्यावर चा उपाय म्हणजे रेबिजची लस घेतलेली बरी. आजकाल पेटा व मनेका गांधीच्या कृपेने समुच्च श्वानकुलाला चांगले दिवस आले आहेत. कुत्रा मारणेस आता कायद्याने बंदी आहे.त्यामुळे श्वानसंख्या इतकी वाढलेली आहे की विचारु नका. पण सरकार कडुन जी उपाययोजना चालु आहे ती खुपच हास्यास्पद आहे. ते म्हणजे श्वानानचे कुंटुबनियोजन करणे. ह्याचा परिणाम आजकाल आपल्याला सर्वत्र दिसतच आहे. वेताळ
  • Log in or register to post comments
स
सोनम Tue, 12/09/2008 - 13:17 नवीन

अनुभव

:-C :-C :-C :-C :-C :-C आम्हीही हा अनुभव घेतला आहे... कुत्र्याने चावायचे ठरवले असले की तो चावतो ( तुम्ही जागेवर उभे रहा किंवा पळा).... बरोबर आहे कुत्रा हा काहीही करुन चावतोच. (तुम्ही पळा वा न पळा) माझ्या वडिलानी कुत्र चावले होते त्यान॑तर ते इजेक्शन घेणे. मला थोडा वेगळा अनुभव आला होता एकदा मी शाळेत जाताना(सकाळी ६.३० वाजता तेव्हा हिवाळा असल्याने अ॑धारच होता) तेव्हा मी सातवीला होते त्यामुळे मला ही भीती वाटत होती एक कुत्रे आमच्या घरापासून माझ्या मागे लागले ते शाळेतपर्यत मागे लागले परत घरी येत होते तेव्हा ते कुत्रे तिथेच फिरत होते. तेव्हापासून मी ही कुत्रा दिसले की त्यापासून ला॑बच राहते (पुण्याची सोनम) राम राम मिपा
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 12/09/2008 - 20:19 नवीन

अरे वा !

अरे वा ! मस्त किस्सा ! :) मजा आली. माझा भाउ नोकरीसाठी दुसर्‍या गावाला जायचा. त्याला भल्या पाहटे चार वगैरे वाजता बरेचदा एसटी पकडायला जायला लागे. तेव्हा पुढल्या चौकातली कुत्र्यांची टोळी फार भुंके आणी ते कुत्रे अंगावर येत. हे पाहता माझ्या आजोबांनी त्याला युक्ती सांगीतली. तो रोज ग्लुकोज बिस्किटांचा पुडा घेऊन जायला लागला आणि कुत्रे अंगावर आले की चार बिस्कीटे टाकायला लागला. चार सहा वेळा असे केल्यावर त्याच्या अंगावर ती कुत्री येईनाशी झाली. (त्यांचे हृदय परिवर्तन झाले ;) ) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
स
संजीव नाईक Tue, 12/09/2008 - 20:32 नवीन

कुत्र आणि कानमंत्र

गोष्ट आवडली खुपच सुदंर अनुभव आहे. पण एक गोष्ट खटकली ती .........तुझे नाव इंग्रजीत आहे ते मराठीत कर नाहीतर ? संजीव
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Wed, 12/10/2008 - 09:36 नवीन

सावधान! कुत्रा मोकळा आहे!

(या आठवड्याच्या `मुक्तपीठ'मध्ये आलेला हा लेख अवश्य वाचा.) नुकताच एका परिचितांकडे जाण्याचा योग आला. (सोयीसाठी आपण त्यांना कुलकर्णी काका म्हणून या.) त्यांचा कोथरूडला बंगला आहे. दुचाकी लावण्याअगोदर डावीकडे-उजवीकडे नजर फिरवली. कुठे "नो पार्किंग', "सम दिनांक पार्किंग', "विषम दिनांक पार्किंग', येथून ५० फूट पुढे पार्किंग करू नये,' "तिथून १०० फूट इथे पार्किंग करण्यास बंदी' इत्यादी पाट्या नसल्याची खात्री करून घेतली. बंगल्याच्या फाटकासमोर पोचलो. फाटकावर तीन पाट्या एका खाली एक अशा लावल्या होत्या. पहिली पाटी कुलकर्णी काकांचे पूर्ण नाव, शैक्षणिक अर्हता, तसेच बंगला क्रमांक. दुसरी पाटी- "सावधान! कुत्रा मोकळा आहे.' तिसरी पाटी- "कृपया जाता-येता फाटक बंद करणे ....आज्ञेवरून' आता दुसरी पाटी वाचल्यानंतर तिसरी पाटी वाचली काय आणि न वाचली काय- दोन्ही सारखेच होते. फाटकाची कडी लावलेली नव्हती, त्यामुळे फाटक अर्धवट उघडे होते. मी पुढे होऊन सर्वप्रथम अर्धवट उघडे असलेले फाटक आवाज न करता हळूच बंद केले. त्याची कडीसुद्धा लावली. मग फाटकाबाहेर उभा राहून "मोकळा कुत्रा' कुठे दिसतो का, ते पाहू लागलो. दूरवर एक घोटा पिंजरा व त्यात असलेला कुत्रा दिसला. मात्र, पिंजऱ्याचे दार उघडे होते. मी बाहेर उभा राहून कुलकर्णी काकांना हाका मारल्या. चार हाका मारल्यानंतरही कोणी बाहेर आले नाही. कुलकर्णी काका नाही तर नाही, निदान त्यांचा कुत्रातरी आपल्या हाकेला "ओ' (का "भो') देईल असे वाटले होते! पण कुत्रा त्याची पिंजऱ्यातली जागा सोडायला तयार नव्हता. पाचव्या हाकेला समोरच्या बंगल्यातले गृहस्थ बाहेर आले. मला म्हणाले, ""अहो बाहेरून कशाला हाका मारताय, सरळ आता जा की.'' मी त्यांना पाटी दाखवली. त्यावर ते म्हणाले, ""त्यांचा कुत्रा काही करत नाही. अगदी बिनधास्त राहा!'' एवढे सांगूनसुद्धा माझी हिंमत झाली नाही. सहाव्या हाकेला कुलकर्णी काका बंगल्याबाहेर आले. त्यांनी फाटकाजवळ येऊन मला त्यांच्या घरात नेले. घरात शिरताना मी दार लावायला लागलो. त्यावर त्यांनी त्या दारातून वारा चांगला येतो ही सबब सांगितली व दार उघडे ठेवले. गप्पाटप्पा, खाणेपिणे झाले. पण माझे अर्धे लक्ष त्या उघड्या दाराकडे होते. त्यांचा "मोकळा कुत्रा' त्या दरातून माझी भेट घ्यायला कधी आत येईल याची खात्री नव्हती. सुदैवाने आम्ही निघेपर्यंत तो आत आला नाहीच, शिवाय एकदाही भुंकलादेखील नाही. मी मनातल्या मनात देवाचे आभार मानले. निघताना कुलकर्णी काका म्हणाले, ""चल, तुझी आमच्या रॉकीशी ओळख करून देतो.'' यावर मी म्हणालो, ""कशाला, कशाला? तुम्हाला पुन्हा उठायचा त्रास! मी पुढच्या वेळेस येईन, तेव्हा ओळख करून घेईन. आज मी जरा गडबडीत आहे.'' पण कुलकर्णी काका उत्साहाने ओतप्रोत भरले होते. त्यांनी मला जवळजवळ ओढतच पिंजऱ्याजवळ नेले, ते म्हणाले, ""एकदा ओळख झाली म्हणजे पुढच्या वेळेस तुला हाका मारत बसायला नको. मला हल्ली जरा कमी ऐकू येतं.'' त्यांचा रॉकी अजूनही त्याच्या पिंजऱ्यात तसाच बसला होता. त्याने जरादेखील चुळबुळ केली नाही. मी मात्र चौदा इंजेक्‍शने घ्यावी लागतील, की नवीन पद्धतीनुसार तीन इंजेक्‍शनांवर भागेल, याचा विचार करत होतो. शिवाय ही इंजेक्‍शने पोटावर घ्यायची का दंडावर, हाही प्रश्‍न होताच. तोच कुलकर्णी काका म्हणाले, ""हा बघ आमचा रॉकी. तू उगाचच याला घाबरत होतास.'' मी त्या कुत्र्याकडे बघितले आणि मला धक्काच बसला. हुबेहूब खऱ्या कुत्र्यासारखा दिसणारा तो एक पुतळा होता. माझ्या जिवात जीव आला. मी सुटकेचा निःश्‍वास टाकला. कुलकर्णी काकांनी स्पष्टीकरण दिले, ""आज-काल बंगल्यात राहायचे म्हणजे कुत्रा हा हवाच. पण कुत्रा पाळणे ही काही सोपी गोष्ट राहिली नाही. त्याचे खाणेपिणे, औषधपाणी, त्याला वेळोवेळी फिरायला नेणे-या सगळ्या गोष्टी बघायला लागतात. यावर मी हा उपाय काढला. एकदाच काय तो खर्च केला. निदान थोडंतरी सुरक्षित जीवन जगता येतं.'' आता माझी ट्यूब पेटली. समोरचे बंगलेवाले मला "बिनधास्त राहा' असे का म्हणाले ते कळले. - अजित भालचंद्र पेंडसे
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 12/11/2008 - 21:40 नवीन

अनुभव

आम्हि रात्रपाळी करतो. असे अनुभव आपण सर्वांनी एकमेकांना वाटल्यास फार उपयोग होतो. कुत्रा जवळ आला की शांत ऊभे रहावे. मोटरसायकल थांबवावी. नंतर जोरात "हाड हाड" करावे. कुत्र्यांची टोळी असल्यास दगड मारावा किंवा तशी अऍक्ष्न करावी. आंतरजाळावर याविषयी बरीच माहिती आहे. ( त्यात भारतीय जाळे-जागा नाहीत.)(म्हणुन सावधान ! कुत्रे पण तिकडीलच आहेत.) -( सणकी )पाषाणभेद
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा