कॉमेंट्सचे वार्षिक कॅलेंडर

निनाद's picture
निनाद in जनातलं, मनातलं
9 May 2022 - 10:59 am

कॉमेंट्सचे वार्षिक कॅलेंडर सादर करत आहे.

१५ एप्रिल ते १५ मे - काय हा भयानक उन्हाळा आहे, असा उन्हाळा आधी कधीच नव्हता! सगळेच ऋतू बदलत चालले आहेत!

३० जून च्या आसपास - पहिला पाऊस झाला आणि नंतर गुल झाला पाऊस! सगळेच ऋतू बदलत चालले आहेत!

३० जुलै - फार जास्त पाऊस झाला हो, थांबायचे नाव नाही.

३० जुलै - खांदेश-मराठवाडा-विदर्भ - पाऊस न्हयी शे औंदा! येक्दाच पल्डा मंग पाऊस गेला. आता टँकरच बोलवा लागते. सगळेच ऋतू बदलत चालले आहेत!

३० सप्टेंबर - पाऊस जास्तीच झाला थांबायचे नाव नाही! सगळेच ऋतू बदलत चालले आहेत!

ऑक्टोबर - काय भयानक ऊन आहे हे. उन्हाळा बरा असे म्हणायचे वेळ आली. सगळेच ऋतू बदलत चालले आहेत!

डिसेंबर सुरुवात - काय भयानक थंडी आहे! अशी थंडी आधी कधीच नव्हती! सगळेच ऋतू बदलत चालले आहेत!

डिसेंबर शेवट - पाऊस? अरे हे काय पावसाचे दिवस आहेत? आता नवीन ऋतु हिवसाळा वगैरे. सगळेच ऋतू बदलत चालले आहेत!

जानेवारी - काय दाट धुके होते हो? असे धुके कधीच नाही पाहिले. सगळेच ऋतू बदलत चालले आहेत!

मार्च - काय ऊन पडले आहे भयंकर! असे ऊन इतक्या लवकर कधीच नाही पाहिले. सगळेच ऋतू बदलत चालले आहेत!

१५ एप्रिल ते १५ मे - काय हा भयानक उन्हाळा आहे, असा उन्हाळा आधी कधीच नव्हता! सगळेच ऋतू बदलत चालले आहेत!

घाला भर!

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

9 May 2022 - 11:02 am | कुमार१

वर्षभरात कधीही आणि कायमच :

हल्लीच्या पिढीचं काय खरं नाही हो! आमच्या वेळेला असं नव्हतं........

कुमार१'s picture

9 May 2022 - 11:04 am | कुमार१

वर्षभरात कधीही आणि कायमच :

हल्लीच्या पिढीचं काय खरं नाही हो! आमच्या वेळेला असं नव्हतं........

या वाक्याचे पुरावे इसवी सन 1000 पासून मिळाल्याच्या नोंदी आहेत असे मागे एका लेखात वाचले होते.

निनाद's picture

9 May 2022 - 11:08 am | निनाद

नोव्हेंबर - थंडीच नाही हो यंदा! आमच्या वेळी दिवाळीत अशी थंडी पडायची की विचारू नका. सगळेच ऋतू बदलत चालले आहेत!

वर्षभरात कधीही आणि कायमच :
मिसळ्पाववर आता आधीसारखे दर्जेदार वाचायलाच नसते, केवळ वादविवाद!! आधी असे नव्हते

कर्नलतपस्वी's picture

9 May 2022 - 5:10 pm | कर्नलतपस्वी

एक चारोळी,

पुण्यात पिकणार भात
अन कोकणात पिकणार गहू
कधी येईल, किती येईल
पावसाचा नेम नाय रे भौ

अमरेंद्र बाहुबली's picture

9 May 2022 - 6:18 pm | अमरेंद्र बाहुबली

भारी, लहाणपनापासून हेच ऐकतोय. आणखी एक बारमाही कमेंट, “दुष्काळ आहे, धंदे नाहीत.”

कंजूस's picture

9 May 2022 - 8:12 pm | कंजूस

डिसैंबरात पाऊस झाला. मावा पडला मोहरावर. जळाला.

या वेळचे सीएचे पेपर्स कठीण होते.

पूर्वीचे मिपा राहिले नाही.

मित्रहो's picture

12 May 2022 - 11:09 am | मित्रहो

मस्त आहे आवडले

८ जून कवाच गेली, मिरग संपतबी आला पण पावसाचा पत्ता नाय, सारे नक्षत्र बदलले.
आबे दिवाळीच्या तोंडावर पाऊस येऊन रायला ना, . हा काय बरसादीचा टाइम हाय. काहीबी होते आजकाल
आधी उन्हाऱ्यात लग्न होत नव्हती का. हे उन व्हय का व्हय, आजकाल काही खर नाही भाऊ

चौथा कोनाडा's picture

13 May 2022 - 5:54 pm | चौथा कोनाडा

लोक काहीही धागे पाडतात.
😆
पूर्वीचे मिपा राहिले नाही.
आमच्या वेळेला असं नव्हतं.......

+१
मस्त खुसखुशीत लेखन आवडलं !

जेपी's picture

13 May 2022 - 6:10 pm | जेपी

समंद हायब्रीड हाय आताची पिढी.