✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अवलिया

व
विनायक प्रभू यांनी
Mon, 12/01/2008 - 18:47  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4002 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

व
वेताळ Mon, 12/01/2008 - 18:56 नवीन

विप्र

आम्हालाही सहभागी होता येईल काय? असेल तर खरडवही त्यासंबधात लिहा. वेताळ
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 12/01/2008 - 19:00 नवीन

कडकडीत...

मास्तर, कडकडीत. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 12/01/2008 - 19:07 नवीन

मी पण

मी पण सहभागी होण्यास तयार आहे. मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
र
रामदास Mon, 12/01/2008 - 19:08 नवीन

भोळा भाबडा समज

गाढवं जर गूळ हागतील तर वडारी का हो भिका मागतील ?
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Mon, 12/01/2008 - 19:12 नवीन

रामदास

मला कळले नाही. जमल्यास कृपया खुलासा कराल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
र
रामदास Mon, 12/01/2008 - 19:23 नवीन

सरकारी

माणसाना लाज असती तर ह्या चर्चेचा उपयोग.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 12/01/2008 - 19:38 नवीन

!!!

आता हे वाचल्यावर तरी लोक काही करतील अशी अपेक्षा आहे... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
य
यशोधरा Mon, 12/01/2008 - 19:38 नवीन

जरा

जरा सविस्तर लिहाल का? ह्या बाबतीत क्रिप्टीक लिहून काही फायदा नाही. सविस्तर लिहिलेत तर माझ्यासारखे लोक सहभागी होऊ शकतात, आपलाही खारीचा वाटा उचलू शकतात.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 12/01/2008 - 22:14 नवीन

लिखाळाने

लिखाळाने अवलीयाला विचारले, (म्हणजे अवलीया या आयडीला नव्हे, अवलीया ही आपली सद्सद विवेकबुद्धी असु शकेल) लिखाळ : मी काय करु शकतो? अवलीया : स्वतःचे काम नीट कर. लिखाळ : नाही पण एकदम इतकी गडबड झाली आहे, भावनेचा उद्रेक झाला आहे.. म्हणून..आता काय करु शकतो मी? अवलीया : तुझ्या आसपास पाहा तुला दिसेल की अनेक समाजकार्यात तुझी मनुष्यबळ म्हणून गरज आहे. त्यात सहभागी हो. मुंबईतल्या घटनेने एकदम हालून जाऊन पोलिस, सेना, राज्यकर्ते, त्यावरचे उपाय यापर्यंत वैचारिक आणि कृतीची मजल मारणे झेपत नसेल तर हरकत नाही. रोजच्या व्यवहारात अजून चांगला, कणखर, सत्शिल नागरीक बनण्याचा प्रयत्न कर. लिखाळ : म्हणजे? अवलीया : समाजाचा घटक म्हणून तू जेव्हढा जागरुक, सचोटीचा असशील तेवढाच समाज 'जागा' झाल्यासारखे होईल. लिखाळ : हे तर मी लहान पणापासून ऐकत आहे आणि थोडे वागायचा प्रयत्न सुद्धा करत आहे. अवलीया : तेच महत्वाचे आहे. तुझ्या कडुन प्रदुषण कमी करणे, तुझ्याकडून नियम पाळले जात आहेत याची खात्री असणे, इतरांना त्याबाबत जागरुक करणे हे तू करत राहा. आणि जे लोक काही चांगले करु पाहत आहेत त्यांना शुभेच्छा आणि प्रोत्साहन दे. तुझी क्षमता आज काय आहे ते पाहून तुला सांगतो आहे. त्या पुढचा मार्ग तुझा तुलाच दिसेल. सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वांमुखी मंगल बोलवावे हे लक्षात ठेव. समाजकार्याची बरीच शिकवण यात दडलेली आहे. अवलीयाची आणि तुमची (वाचकांची) गाठ पडली तर तो काय म्हणाला ते जरूर सांगा. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Mon, 12/01/2008 - 22:16 नवीन

चालतय

चालतय की- असे अवलिया ने म्हटले आहे लिखाळजी
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 12/01/2008 - 22:26 नवीन

अवलीया

अवलीया बोलका आणि स्पष्ट विचारांचा असल्यामुळे आनंद झाला. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
च
चतुरंग Mon, 12/01/2008 - 22:53 नवीन

विक्रम-वेताळ सारखी

विप्र-लिखाळ जोडी आणि त्यातला संवाद आवडला! :) (खुद के साथ बातां : रंगा, तुला प्रतिसाद द्यायचा असूनही तू जर दिला नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पयावर लोळू लागतील! असा दम बसल्यावर मी लगेच प्रतिक्रिया दिली! ) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
ल
लिखाळ Mon, 12/01/2008 - 23:04 नवीन

>... तर

>... तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पयावर लोळू लागतील!... < शंभर शकले (काय हा अतिरेक !) की शंभर गुलाबाची फुले? -- लिखाळभाई एम बी बी एस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
व
विसोबा खेचर Mon, 12/01/2008 - 22:19 नवीन

जबरा

जबरा प्रकटन..!
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 12/01/2008 - 22:47 नवीन

खूप खूप आवडले

प्रकटन खूप खूप आवडले विप्रकाका! -(गोंधळलेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 12/01/2008 - 22:49 नवीन

मस्तच विप्रकाका!

ह्या सर्व काही नाही ला माझ्याकडे एक उत्तर आहे. आम्ही एक विचाराची मंडळी एकत्र येउन पोलिस महानिरिक्षकांना १०० बुलेट्प्रूफ जाकिटांची भेट देणार आहोत. १२ मॅग्नम गोळ्याना प्रतिकार करणारी. हा नविन पायंडा पाडताना समाजाने घेतलेला पुढाकार ह्या शिवाय कुठल्याही व्यक्तीला प्रसिद्धी मिळणार नाही हे बघितले जाईल. किंवा अशा कृतीने सर्व सिस्टीम बदलणार असा भोळा भाबडा समज पण नाही. पण ही बदलाची सुरुवात नक्की असेल. कर्तव्यदक्ष लोकांची समयोचित, योग्य कृती महत्त्वाची! अभिनंदन!! चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 12/02/2008 - 09:16 नवीन

मी जर

मी जर सिस्टीम चा भाग असेन आणि सिस्टीम बदलायची असेल तर कधीतरी मला बदलावेच लागणार आहे.मी काय करु शकतो::::सध्या तरी काही नाही.( सिस्टीमचा तो पार्ट बदलला असेल तेंव्हा मी पण बदललेलो असेन) आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Tue, 12/02/2008 - 12:27 नवीन

नक्की

नक्कीच करु शकता, आणि करणार आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
र
राघव Tue, 12/02/2008 - 13:39 नवीन

मस्त! हा

मस्त! हा मार्ग आवडला प्रतिक्रियेचा. सुंदर! मुमुक्षु
  • Log in or register to post comments
व
वाचक Wed, 12/03/2008 - 03:51 नवीन

स्तुत्य उपक्रम पण

स्वकमाईतून दुसर्‍याला काहीतरी द्यावे हा विचार स्तुत्यच आहे पण ह्या बाबतची 'व्यावहारिकताही' लक्षात घेतली पाहीजे. पोलिसांना बुलेटप्रुफ जॅकेट्स देणे ही खरे तर सरकारची जबाबदारी आहे आणि सरकारने ती पार पाडलीच पाहिजे. त्या दृष्टीने एखाद्या गटाने पैसे जमवुन १०० जॅकेट्स देण्याने फारसा उपयोग होणार नाही. शिवाय त्यातल्या व्यावहारिक बाजू ही पाहिल्या पाहिजेत म्हणजे दर्जा प्रमाणपत्र, योग्य वाटप सुविधा, कुठल्या पोलिसांना ही मिळणार? हे सरकारच्या नियमात बसते की नाही ? (कारण प्रश्न शेवटी सुरक्षिततेचा आहे) इत्यादी बाबी. आणि ह्या कृतीचा 'दबाव तंत्र' म्हणुनही फारसा उपयोग होणार नाही त्यापेक्षा जर मृत्यूमुखी (किंवा जखमी) झालेल्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी एखादा ट्रस्ट वगैरे करता आला तर (अर्थात हे फक्त एक उदाहरण झाले - इतर अनेक शक्यता आहेत) ह्या बाबतीत प्रतिकूल मत व्यक्त केल्याबद्दल आधीच क्षमा मागतो पण तुमची तळमळ जाणवली म्हणून एवढे लिहायचे धाडस केले....
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा