✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वेडा कुंभार

व
विनायक प्रभू यांनी
गुरुवार, 11/13/2008 - 19:31  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16658 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

ब
बकासुर Fri, 11/14/2008 - 15:07 नवीन

ताईच्या संमतीने अगदी तिच्यादेखत.

गदिमा लिहितात.... रक्तही जेथे सूड साधते तेथे कसली माया कोण कुणाची बहीण भाऊ पती पुत्र वा जाया सान्गायाची नाती सगळी हेच खरे.
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Fri, 11/14/2008 - 18:36 नवीन

वेडा कुंभार

मन सुन्न झाले .उगिच सदर उगिच वाचले असे वाटले. असले वास्तव मन अस्वथ करत.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 11/14/2008 - 19:08 नवीन

सुन्न..

भयानक वास्तव वाचून सुन्न झाले, स्वाती
  • Log in or register to post comments
न
नारायणी Fri, 11/14/2008 - 21:12 नवीन

आता?

विप्र,नंतर कधी तुमच त्या मुलिशी बोलणं झालं का? काही खबरबात मिळाली का तिची? आता कशी आहे ती?
  • Log in or register to post comments
र
रामदास Fri, 11/14/2008 - 23:36 नवीन

बालकदिनाच्या दिवशी

पालकांच्या पोटात जोरात गुद्दा मारलात प्रभू सर. बेसावध पालक सावध होतील.दिवसेंदिवस परीस्थीती कठीण होत चालली आहे.माझ्या एका कवितेत मला नुकत्याच वयात आलेल्या मुलीच्या आईच्या मनातली घालमेल तुमच्या कानावर घालतो.(तेव्हा तुम्ही मिपावर नव्हता) जिवण तोंडावर घट्ट दादरा बांधून माय म्हणते. मोठी झाली बाय माझी. येता जाता अंधारात माजघराच्या लपू नको आता. आणि एक सत्यघटना पण सांगतो. मराठवाड्यातली एक गोष्ट.एका छोट्या गावात एकच बस रोज यायची. वाहक आणि चालकाची जेवणाची सोय गावातल्या एका विधवेकडे.तिला एक छोटी मुलगी. गावातल्या पुंडाईने घाबरलेल्या त्या बाईनी (केवळ भितीपोटी) मुलीचे लग्न करायचे ठरवले. मुलगी दिसायला थोराड होती पण वयात आलेली नव्हती.आईनी मुलीला लग्नाच्या भरीस पाडून तरुण वाहकाशी लग्न लावून दिले.मुलगी अजाण. लग्न म्हणजे काय हे नाही माहीती. महीन्याभरानी जावई मुलीला घेऊन परत आला. सासुला लाख शिव्या घातल्या. लग्न करून काय उपयोग झाला. मुलगी तर अजून वयात आलेली नाही, सबब लग्नाचा खर्च परत द्यावा. आता या बाई कडे पैसे कुठले द्यायला. तिनी जावयाला सांगीतलं ही वयात येईपर्यंत तू मला वापर. दोन वर्षानी मुलगी वयात आली पण आईला जावयाची सवय झालेली.आई आणि मुलीला जवळ जवळ एकाच वेळी दिवस गेले.मुलीला सगळ्या प्रकाराचा अंदाज आला. तिनी आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्या पोटातलं बाळ वाचलं पण मुलगी गेली. त्यानंतर त्या बाईनी आणि जावयानी लग्न केलं . बाईच्या वाटेला किती दुर्दैवाचे दशावतार येतात ह्याचे हे उदाहरण. आता प्रभूदेवा सांगा.आईची काय चूक ? मुलीची काय चूक? जावयाची काय चूक ? उत्तर नाही दिलत तर पुढच्या जन्मी पण हेच समुअपदेशनाचं काम करावं लागेल.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 11/15/2008 - 03:11 नवीन

छे:

काय सांगताय साहेब? हे तर फारच सुन्न करणारं आहे. विप्रंच्या अनुभवापेक्षाही वाईट.
आता प्रभूदेवा सांगा.आईची काय चूक ? मुलीची काय चूक? जावयाची काय चूक ?
काहीच कळत नाहिये. मति गुंग झाली आहे.
उत्तर नाही दिलत तर पुढच्या जन्मी पण हेच समुअपदेशनाचं काम करावं लागेल.
तुमची विक्रम वेताळाची जोडी जमली वाटतं? :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
ब
ब्रिटिश Sat, 11/15/2008 - 14:45 नवीन

ह्यान चुक

ह्यान चुक जर आसलीच त ती गरीबीची ती पन आपल्या नजरंतून बाकी नर मादी म्हंजे जगमान्य नात मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
व
विनायक प्रभू Sat, 11/15/2008 - 11:10 नवीन

चूक

कसली नाती कसली गोती मी पाहिली ती फक्त संबंधांची माती कधी मी वेताळ, तर कधी विक्रमादित्य सुद्धा.
  • Log in or register to post comments
प
पूजादीप Sat, 11/15/2008 - 11:34 नवीन

शिवरायांन

शिवरायांनी नेमून दिलेली हातपाय तोडण्याची शिक्षाच सर्वात उत्तम..! मी अगदी मनापासुन सहमत आहे. ती मुलगी बिचारी जन्मभर सोसनार आनि गुन्हेगाराला का सोडायच. त्यालाही जन्मभराची अद्दल घडायला पाहिजे.
  • Log in or register to post comments
म
मनीषा Sat, 11/15/2008 - 13:11 नवीन

खरोखरच..

मन सुन्न करणारा, नाते संबंधांवरचा विश्वास संपवणारा असाच प्रसंग आहे .. यात जो गुन्हेगार आणि त्याला साथ देणारे, यांना शिक्षा व्हायलाच हवी .. पण शारीरिक नको तर आयुष्यभर त्याने केलेल्या कृत्याची त्याला खंत वाटेल अशी हवी. आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे त्या लहान मुलीला धीर देउन तीला समजवायला हवे जे झाले त्याची तीने लाज बाळगण्याची काहीच आवश्यकता नाही .. तो केवळ एक अपघात होता, आणि त्यामुळे तिच्याकडे बघण्याच्या समाजाच्या दृष्टीकोनात काहीच फरक पडत नाही .
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा