या पसाऱ्याचं काय करावं?
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मी एक खरेदी वेडा माणूस आहे. खरेदीची ओसीडी झाल्यासारखं नुसती खरेदी करत असतो. फ्लिपकार्ट, अॅमेझॉन सारख्या कंपन्या निघाल्या पासून लाखो रुपयांची खरेदी केली आहे. अगोदर मॉलमध्ये फेरफटका मारुन शेपाचशेची खरेदी दिवसाआड ठरलेली.
दारात चार मोटार सायकली, एक कार उभ्या आहेत, तीन सायकली, वीस पंचवीस चपला बुटांचे जोड, चांगले असलेले पंखे, भांडीकुंडी, कुकर अडगळीत पडलेले आहेत. दोन ओव्हन नवेच्या नवे, गॅस शेगड्या, मिक्सर लॉफ्टवर जागा अडवून बसले आहेत. विजेऱ्या, घड्याळं, दोन-तीन इस्र्या, जूनं कपाट, हिटर, कुलपं, जूने सिआरटी मॉनीटर, टिव्ही, कॅमेरे आणि शेकडो पुस्तकं एकदम चांगल्या स्थितीत आहेत. भंगारात द्यायला मन होत नाही. मोबाईल हॅण्डसेट दहा-बारा पडले आहेत, कपडे बेडशीट तर साचतच जात आहेत. जुन्या कापसाच्या गाद्या जागा अडवून बसल्या आहेत. खूर्ची टेबलं अडगळीच्या खोलीत धुळखात पडली आहेत.
गरज नसताना वेगवेगळ्या पकडी, पाने, करवती, स्क्रू ड्रायव्हर, हातोड्या, ड्रील मशीन, ब्लोअर, व्हॅक्यूम क्लीनर, बागकामाची हत्यारं याची हजारो रुपयांची खरेदी करून ठेवली आहे.
दिवसातून एकदा तरी या साईटवर भेट देतोच, मेलबॉक्स सुध्दा याच साईटींच्या मेलनी भरलेला असतो. नवीन गॅजेट्स पाहिली की मन कंट्रोल होत नाही. हेडसेट, हेडफोन्स, ब्लूटुथ स्पिकर, प्रिंटर अशा अनेक गोष्टी आधी विकत घेतल्या आहेत तरी परत परत घ्याव्या वाटतात. शूज अक्षरशः न वापरता फेकून दिले आहेत. तरीही वेगवेगळ्या ब्रॅण्डचे शूज खुणावत असतात.
मनावर कितीही ताबा ठेवला तरी ब्रेक सैल केला की खरेदीची गाडी परत सुसाट धावत सुटते.
घरच्यांनी आता समजावणं सोडून दुर्लक्ष करण्याची सवय करून घेतली आहे.
एवढा पसारा करुन ठेवला पण जुन्या वस्तू टाकवत नाहीत व कोणाला सेकंडहॅंड द्यायलाही मन होत नाही. पाश्चात्त्य देशांत गराज सेल तरी असतो. पण आपल्याकडे असं नाही. ओएलेक्स, क्विकर फार डोकेखाऊ प्रकरण आहे. त्याच्या नादाला लागणं मला तरी शक्य नाही.
मी स्वत:ला खरेदीपासून कसं थांबवावं याचे उपाय कृपया सुचवा. धन्यवाद
प्रतिक्रिया
कशाला थांबवताय
ओएल एक्स, क्विकरवर फार पडून
मी स्वत:ला खरेदीपासून कसं थांबवावं याचे उपाय कृपया सुचवा.
मेष रास, वृषभ लग्न, अश्विनी
२०२५
वस्तू ठेवायच्या कुठे आणि
त्यासाठी एक मोठं घरच खरेदी
नाही हो. आधीच एक वेअर हाऊस
मग दुसरं घ्या
बोलणी चालू आहेत.
हांगाश्शी
जन्मांक सात
तुम्ही व्यनीतुन मला कोणती
छे हो मला घासाघीस प्रकाराचा
ओएल एक्स, क्विकरवर फार पडून
मला पत्ता द्या. फुकट पाठवून देतो.असा विरोधाभास का ?तिकडच्या लोकांना हाव
तुमच्याकडे कानांवर वरून
मला 24 इंच led स्क्रीन हवाय 4k पाहीजे
बत्तीस इंची आहे. पत्ता द्या.
तुमी कशाला त्रास घेता,
क्लमिश बौ
आणी हो आता चिंता सोडा, यापुढे मनसोक्त खरेदी करत रहा
धन्यवाद जवान भावा.
दर महिन्याला
समीर जी खूप सुंदर सल्ला दिला
तुम्ही इतकी खरेदी करण्याइतके
यार तुम आम खावो गुठलिया कएको गिनरयलरे बावा ?
माझ्या घरातील सर्व सरकारी
लागणार
:-( सांगू नका इडीला. उगीच
घरात एखादे कुत्रे का पाळत नाही ?
कुत्रा आहे ना. दररोज मारी
त्याला एका बिस्कीटाचे चार
व्यनि केलाय
वाचला. धन्यवाद.
_/\_
वाह, भारीच की ! लै ह्येवा
झुकती है दुनिया झुकानेवाला चाहीये !
मैंनेकिस्कोभी .. बनाया नयी.
मैंनेकिस्कोभी .. बनाया नयी.
तुमचे (लिहून) जमा केलेले लेख
तिकडे आणि इकडे एकाच दिवशी लेख
मी वस्तू फुकट वाटायला तयार
माझ्या पत्त्यावर पाठवा
बरं. आपली विच्छा पुरी करू.
पत्ता व्य.नी. करा.
सुरक्षिततेच्या कारणास्तव माझा
एक काम करा वस्तूंची लिस्ट इथे टाका
ओके. कधी भेटायचं. फोन नंबर
फोन ? कशाला ? धागा टाका
Pagination