माझा कुकिंग एक्सपिरिमेंट

मृणमय's picture
मृणमय in जनातलं, मनातलं
16 Sep 2019 - 11:21 am

नमस्कार, मी आरती, आता कुणाची विचारू नका :)

हा माझा लिहिण्याचा पहिला प्रयत्न. आमच्याकडे तसे कुणी लिहीत नाही, फक्त बोलतात आणि ते हि खूप जोरात. तर आज खास लिहिण्याचे कारण असे कि ऑफिस मध्ये काही फारसे काम नाही. ( ऑफिस मध्ये कुणालाही मराठी येत नाही ह्याचा हा फायदा) आता असा अलभ्य लाभ वर्षातू कधी तरीच होतो आणि जर हे दान पदरात नाही पाडून घेतलं तर आयुष्यात काय मिळवलं? ( आता साडी आणि पदर नसला तरी भाव महत्वाचा). तर मी आज माझ्या कुकिंग एक्सपिरिमेंट बद्दल लिहिणार आहे. सध्या युट्युब वर कूकिंग चे चॅनेल खूप जोरात चालू आहेत. प्रत्येकाचा स्वतःचा चॅनेल आणि आवडो ना आवडो सुरुवातीलाच माझा चॅनेल लाईक करा, शेर करा आणि बेल ची घंटी प्रेस करा. एवढे झाले कि माझी डोक्यात धोख्याच्या घंटा वाजायला लागतात आणि मी लगेच चॅनेल चेंज करते. आता हि पाककला सादर करायचा माझ हक्काच एकमेव स्टेज म्हणजे घर आणि माझे इवले इवले गिनिपिग. म्हणजे नवरा आणि मुलं. यातला कुणी च अंगानं इवलं इवलं नाही फक्त माझी कला पाहून त्यांची तोंडं इवली इवली होतात . तर ह्या वर्षी (नेहमीप्रमाणे) गणेश चतुर्थी ला उकडीचे मोदक करायचे ठरवले. गणपती बसले सोमवारी. बाहेर राहणाऱ्या माणसांना माहिती असेल कि असे सण वीक डेज आले कि कशी ओढाताण होते म्हणून मी सगळ्यांच्या (माझ्या) सोईने शुक्रवारी संध्याकाळी करू असे ठरवले. आदल्या दिवशी चार वेगवेगळ्या बायकांच्या रेसिपी बघून ठेवल्या. गंमत म्हणजे हे,असे मला दर वर्षी करावे लागते. मागच्या वर्षी काय केले होते ते काही केल्या आठवत नाही. बरं कसं केलं हे आठवत नाही हे ठीक आहे पण निदान कुणाची रेसिपि बघून केलं होतं हे तरी आठवायला पाहिजे कि नाही? पण नाही, माझी पाटी पार कोरी झालेली असते. तर लागणारे सामान आधीच आणून ठेवले होते. तरी बरे ऑस्ट्रेलिया मध्ये आता ९० टक्के सांगळे सामान सहज मिळते. फक्त ऑफिस मधून येताना रस्त्यावर ताजी भाजी मिळत नाही, ती हि काही ठिकाणी आता मिळते. ( काही ठिकाणी कुकर च्या शिट्ट्या ऐकायला येतात. आणि शुक्रवारी हमखास खमंग घमघमाट येतो.) शेवटी मनाची आणि ओघानेच खाणार्याच्या मनाची तयारी आहे असे मानून पाणी उकळायला ठेवलं. आणि त्याच बरोबर स्ट्रॉंग कॉफी बनवली. सगळे सोपस्कार व्हिडीओ प्रमाणे पार पडून पीठ मळायला घेतले. दहा मिनिटांच्या प्रयत्नानांतर हात दुखायला लागला म्हणून वाटलं झाले असेल आता तयार. पण हाय रेरे देवा, आता अधर्वट टाकता ही येईना. मग मनाचा हिय्या करून आणखी थोडं पाणी गरम केलं आणि मला हवे तसे छान पीठ मळून घेतले. आणि काय आश्चर्य मोदक अगदी सहज आणि सुबक जमायला लागले. मग काय सगळेच जण आपापली कला दाखवायला पुढे सरसावले. बघता बघता २१ मोदकांचे टार्गेट पूर्ण झाले आणि कन्या रत्नाला स्फुरण चढलं. तिला उरलेल्या पिठाचे डंपलिंग करायचे होते. तिला ढकलून मातुःश्री पुढे सरसावल्या. ( हा आमच्या घरातला ३६ चा आकडा बरका) मी त्यांची जुंपायच्या आत चतुराई ने लेकीचे लक्ष दुसरीकडे गुंतवून मातुश्री ना खुश केले. येवढं होत नाही तर मग क्लयमॅक्स वर असते तशी एन्टरी मारत नवरोबा म्हणतो हे काय एवढेच मोदक? हे कुणाला पुरणार? पक्का देशासाठी कारभार. पण मी हि अशा कॉमेंट्स ना भीक ना घालता आहे तो पसारा उरकला आणि आरतीची तयारी सुरु केली. ( उगाच तुमच्या मनात टांगती तलवार राहू नये म्हणून सांगते कि तेंव्हाचे मोदक अजूनही लोळत आहेत.)

http://mrinmay.simplesite.com

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

मृणमय's picture

16 Sep 2019 - 11:22 am | मृणमय

माझी दहावी झाल्यानंतर मी कलाक्षेत्र मध्ये ऍडमिशन घेतली आणि चेन्नई ला हॉस्टेल मध्ये आले. मला एकूणच इथली हवा आणि कॉलेज चा परिसर खूपच आवडला. माझे कॉलेज आणि हॉस्टेल एकाच कॅम्पस मध्ये समुद्र किनारी होते. हॉस्टेल मध्ये सगळी वाळूच वाळू. हॉस्टेल मधून घरी येताना एका बाजूला आमराई तर एका बाजूला सुंदर तलाव आणि त्यात पांढरी कमळे. वर्षातून ३ वेळा घरी जायला मिळायचे. मग प्रत्येक वेळी मला कुणी ना कुणी आणायला आणि सोडायला यायचे. कलाक्षेत्र हे आमच्या घराण्यात एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून मान्यता पावले होते त्यामुळे आरती ला भेटण्याच्या निमित्याने प्रत्येक जण आपापली हौस भागवत होता. उन्ह्याळ्याच्या सुट्टी मध्ये मला न्यायला आई बाबा आणि माझी चुलत बहीण आले होते. येताना नेहमी प्रमाणे तिरुपती बालाजी चे दर्शन घेऊन यावे असे त्यांचे ठरले. मी माझ्या अनुभवानुसार त्यांना आधीच सांगून ठेवले कि माझी परीक्षा झाली कि सरळ घरी जायचे, तुम्हाला कुठे हि जायचे असले तरी ते तुम्ही आधी जाऊन या. (तेंव्हा आई बाबा माझे ऐकत होते, आता मी माझ्या मुलांचे ऐकते - परंपरा चालू ठेवली आहे) २० वर्षांपूर्वी तिरुपती बालाजी चे दर्शन म्हणजे एक तापशचर्या होती. पण एव्हाना माझे आई बाबा ह्या अग्निदिव्यातून ३ वेळा सहीसलामत बाहेर पडले होते त्यामुळे त्यांच्या कॉन्फिडन्स ओसंडून वाहात होता. सगळ्यांचे देव दर्शन छान झाले. बाहेर आल्यावर त्यांना आणखी एक रंग दिसली. बहीण एक नंबरची मुंबईकर, रांग दिसली रे दिसली कि लगेच नंबर लावून उभी राहिली. रांग भराभर पुढे सरकताना बघून तिला भलताच आनंद झाला आणि त्याच आनंदात तिने आईला पण तिच्या सोबत रांगेत उभे केले. त्यांना वाटले देवच पावला, मनात लाडू फुटत होते कि इतक्या लगेच प्रसादाचे लाडू मिळणार. एका मोठ्या हॉल च्या दारापाशी आल्यावर त्यांना एक एक रेझर देण्यात आले.....आता तरी काही डोक्यात प्रकाश पडपडायला हवा कि नाही.... बहीण इकडे तिकडे बघू लागली ह्याचे काय करायचे म्हणून पण आई भारी आहे. आई ला विचारले तर तिचे ठरलेले उत्तर मला काय माहित तयार होते. हॉल मध्ये पाय ठेवल्या बरोबर ह्यांना साक्षात्कार झाला कि हि प्रसादाची रांग नाही तर केस कापण्याची रांग आहे....जिकडे तिकडे केसांचा ढीग पडला होता आणि ते लोक मेंढरांना धरून कशी लोकर काढतात त्याच धर्तीवर केस भादरणे चालू होते. मग काय दोघी जणींना पाळता भुई थोडी झाली.

श्वेता२४'s picture

16 Sep 2019 - 1:40 pm | श्वेता२४

छान लिहीलंय. लिहीण्याची स्टाईल आवडली.

चामुंडराय's picture

16 Sep 2019 - 9:48 pm | चामुंडराय

भारी लिहिलंय.
ऍक्टिव्ह कुकिंग एक्सपिरिमेंट आवडला.
माझे सगळे कुकिंग एक्सपिरिमेंटस् हे पॅसिव्ह असतात.

किल्लेदार's picture

16 Sep 2019 - 9:57 pm | किल्लेदार

आवडला. पंचेस छान आहेत.

जॉनविक्क's picture

16 Sep 2019 - 10:07 pm | जॉनविक्क

मृणमय's picture

17 Sep 2019 - 5:17 am | मृणमय

महेर चा वसा

सोन्या बागलाणकर's picture

17 Sep 2019 - 3:46 am | सोन्या बागलाणकर

मस्तच!
उकडीचे मोदक हे प्रकरण तसं गंभीर पण आवडीचं. सुदैवाने आमच्या जवळच एक बाई उकडीचे मोदक बनवून देतात म्हणून निभावते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Sep 2019 - 9:11 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिहिते राहा. लेखन आवडलं.

-दिलीप बिरुटे

आजी's picture

17 Sep 2019 - 10:02 am | आजी

छान आहे. आवडलं लेखन.

आनन्दा's picture

17 Sep 2019 - 4:56 pm | आनन्दा

बापरे..
माझे कूकिंग आठवले.

मोदक करायचे म्हणून मी मारे स्टोअर मध्ये जाऊन पीठ आणले, घरी येऊन मस्तपैकी पाणी उकळवुन उकड काढायाची म्हणून त्यात ओतले, पण हाय रे कर्मा, ते पीठ फुलून आले. मी चुकून पोह्याचे पीठ आणले होते.

अर्थात नंतर जाऊन मोदकाचे पीठ आणून त्याचे मोदक मी केले, पण ही फजिती मी आयुष्यभर विसरणार नाही.