श्रीकृष्ण (महाभारतातील व्यक्तिचित्रे )
काही वर्षांपूर्वी " महाभारतातील व्यक्तिचित्रे " या लेखमालिकेत भीष्म, द्रौपदी, पार्थ, इ. पांच पात्रांचा; महाभारतात म. व्यासांनी त्यांच्याबद्दल काय लिहले याचा परिचय करून दिला होता. एका विषयावर किती लेख लिहावयाचे व असे लेख किती लांबवावयाचे याबद्दल मीच साशंक असतो त्यामुळे वाचकांचा आग्रह होता तरी थांबलो. पण हेही खरे की श्रीकृष्णाबद्दल लिहले नाही तर "महाभारताबद्दलच " लिहावयाचे राहिले असे म्हणावे लागेल ! कृष्ण व कर्ण समोर ठेवून तर महाभारत लिहले. श्रीकृष्णाविषयी म. व्यास काय लिहतात ते जाणले नाही तर तुम्ही महाभारत वाचले नाही: ना तुम्हाला श्रीकृष्ण कळला. आता तुम्ही म्हणाल " महाभारत न वाचताही आम्ही लहानपणापासून भगवान श्रीकृष्णाला जाणत आलो आहोतच.कीं ! अगदी खरे. तुम्ही भगवान कृष्णा ला ओळखत आलात. पण महाभारतात "विश्वदर्शन, जयद्रथवधाच्यावेळी सूर्य झाकाळणे, पांडवांच्या मृत नातवाला जिवंत करणे असे मोजके प्रसंग सोडले तर म. व्यासांनी श्रीकृष्णाला भगवान म्हणून वर्णलेच नाही. तो या पृथ्वीवरील एक मानवच आहे, मान्य, महामानव आहे, पण मानव च.
महाभारतात श्रीकृष्ण कसा रेखाटला आहे हे पहाण्याआधी आपण श्रीराम व श्रीकृष्ण यांच्याकडे
वळू. दोघेही विष्णूचे अवतार मानले जातात. अवतार का घेतले जातात ? गीतेत त्याचे उत्तर आहे "अभ्युत्थानार्थ धर्मस्य " प्रत्येक युगातल्या धर्माच्या पालनाकरिता, धर्म नष्ट होऊ नये, म्हणून
अवतार. आता प्रत्येक युगात धर्म एकच असता तर भगवानाचे काम सोपे झाले असते. पण तसे दिसत नाही.
राम व कृष्ण यांच्या समोर धर्म म्हणून जी तत्वे होती ती अगदी निरनिराळी होती. समाजाच्या संघटनेत कुटुंब हा पहिला घटक व अनेक कुटुंबे वा कुल यांनी बनणारा समाज हा दुसरा घटक. या दोन घटकांचा धर्म भिन्न भिन्नच असणार. रामाच्या वेळीं कुटुंब हा प्रमुख घटक होता व त्यामुळे कुटुंबाचा प्रमुख जो "पिता", त्याची आज्ञा सर्वांनी पाळणे हा "धर्म" होता. ती आज्ञा चूक कीं बरोबर याला महत्व नव्हते. लक्ष्मण रामाला ती आज्ञा चूक हे पटवून देण्याचा प्रयत्न अनेक वेळा, परोपरीने करतोही. रामही ते कवूल करतो. पण ती आज्ञा मोडावयाचे तो नाकारतो. रामाच्या वेळच्या धर्माचे पालन तो करतो.
कृष्णाच्या वेळीं परिस्थिती बदलेली असते. आता विस्तारलेल्या लोकसंख्येमुळे, अनेक कुलांमुळे, समाज हा प्रमुख घटक झालेला असतो. समाजाच्या धर्मात पित्याने दिलेली आज्ञा जर चुकीची असेल, त्याने समाजावर विपरित परिणाम होणार असेल तर ती पाळणे धर्माच्या विरुद्ध झाले असते.
महाभारतात म्हटले आही कीं
त्यजेदेकं कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत !
ग्रामं जानपदस्यार्थे आत्मार्थं पृथिवीं त्यजेत !!
कुळासाठी कुटुंबातील एकाचा त्याग करावा, गावासाठी कुलाचा, देशासाठी गावाचा आणि आत्म्यासाठी पृथ्वीचा.
इथे स्पष्टपणे देशासाठी, समाजासाठी व्यक्तीचा-कुळाचा त्याग करावयास सांगितले आहे. रामाच्या जागी कृष्ण असता तर त्याने दशरथाची आज्ञा मुळीच पाळली नसती.
हे सर्व प्रथम सांगण्याचे कारण महाभारतातील कृष्ण समाजपालनासाठी झगडला आहे. "परित्राणाय साधूनाम, विनाशाय च दुष्कृताम" कशासाठी ? तर समाजधारणेसाठी. पण हे सर्व त्याने "मनुष्य" रूपाने निभावले आहे.
समाजरक्षण हा धर्म ठरवल्यानंतर त्याने अत्यंत विवारपूर्वक "धर्म" म्हणजे काय ह्याचा अभ्यास केला. गीतेमधे सर्व उपनिषदांचे सार आहे असे म्हणतात. याचा अर्थ त्याने सर्व उपनिषदांचा खोल अभ्यास केला होता हे स्पष्ट दिसून येते. आपल्या तत्वज्ञानात एकमेकाविरुद्ध विचार प्रकट झालेले आहेत. कृष्णाने आपल्याला पटलेले विचार उचलले.
त्याकाळी प्रचलित असलेल्या धर्मकल्पना, जशा युधिष्टिराच्या होत्या, त्यांना त्याने विचारपूर्वक मुरड घातली. भीष्म-द्रोणाचार्य यांसारखे महात्मे अन्यायाच्या बाजूने लढतात हे विदारक सत्य आहे व धर्माने लढून त्यांना जिंकणे अशक्य आहे हे त्याला माहीत होते. "अश्वथामा मेला" अशी अफवा पसरवून द्रोणांना शस्त्रसंन्यास घ्यावयास लावून त्यांचा वध करणे त्याला मान्य होते. भले त्यामुळे युधिष्टिराचा रथ चार अंगुले खाली उतरून जमिनीला टेकला याची त्याला पर्वा नव्हती. नच, तो रथ जमिनीत गाडला गेला असता हे तो पुरेपुर जाणून होता. कृष्ण मोठा व्यवहार पंडित होता. मानवी व्यवहारातील शक्याशक्यतेच्या मर्यादा तो जाणून होता. तारतम्याचे अवलोकन हे त्याच्या बुद्धीचे वैशिष्ट्य होते. त्याच्या मते धर्माची विचारसरणी म्हणजे व्यवहारपांडित्य. जयद्रथ-दुर्योधन वचाच्या वेळीं त्याने हा दृष्टिकोन ठेवला. अशा सर्व वेळीं त्याचा धर्म "मानुष" होता. भगवान श्रीकृष्णाला असे करावयाची गरजच पडली नसती.
जरासंध हा जुलुमी सम्राट होता.पण तो अतिशय शूर होता. सतरा वेळा युद्ध करूनही त्याचा बिमोड करणे शक्य नाही हे पाहिल्यावर कृष्ण नुमाटपणे द्वारकेला निघून गेला. तो राजसूय यज्ञाच्या वेळी युधिष्ठीराला म्हणतो " तीनशे वर्षे लढूनही आम्हाला त्याला जिंकता आले नसते." एका मानवा "ची कबुली.
जयद्रथ वचाची अर्जुनाची प्रतिज्ञा ऐकून तो म्हणतो, "आम्हाला न विचारता तू अशी मूर्खासा
रखी प्रतिज्ञा कां केलीस ?" त्याला रात्रभर झोप येत नाही. तो दारुणाला, आपल्या सारथ्याला, आपला रथ सज्ज कराववास सांगतो. "अर्जुनाला अपयश आले तर मी युद्ध करून कौरवांचा पाडाव करीन" असे तो म्हणतो. इथेही कृष्ण मानवच आहे.
पांडवांवर आलेला सर्वात घोर प्रसंग म्हणजे द्रौपदी वस्त्रहरण.यावेळी तो पांडवांना उपयोगी पडत नाही. पुढे वनात असलेल्या पांडवांना तो भेटतो तेव्हा तो म्हणतो ’मला याची कल्पना नव्हती; मी दुसरीकडे गुंतलो होतो;नाही तर मी द्युत होऊनच दिले नसते." हीही एका मानवाची कबुली. भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला वस्त्रे पुरवली अशी कथा महाभारतात नाही.
जरासंधाला युद्धात जिंकणे शक्य नाही हे जाणून तो त्याला भीमाकडून वैयक्तिक युद्धात मारतो. इथेही तो माणुस आहे; नाहीतर भगवानाला एका राजाला मारणे अशक्य होते काय ? त्या पुढील भाग महत्वाचा आहे. जरासंधाने कैदेत टाकलेल्या राजांना तो मुक्त करतो व जेव्हा त्यांनी कृतज्ञतापूर्वक विनविले "आम्हास काही सेवा सांगा" त्या वेळी त्याने "तुम्ही युधिष्ठिरास साह्य करावे अशी आज्ञा केली. पांडवांना उद्या गरज लागली तर या सर्व राजांची मदत निश्चित केली. त्याने जरासंधाचे राज्य खालसा न करिता त्याच्या मुलाला दिले हे लक्षात घेण्यासारखे आहे ही इहलोकातील राजकीय खेळी आहे.
मानवी स्वभाव हा विश्वातला एक मोठा चमत्कार आहे. परस्पर विरोधी गुण त्याच्या मनात एकाच वेळीं नांदू शकतात..विवेक, व्यवहारदृष्टी, स्थिर प्रज्ञा, हा कृष्णाच्या प्रकृतीचा स्थायी भाव पण त्याचे वंयक्तिक जीवनातले रागद्वेष अतिशय तीव्र होते असे दिसते
शिष्टाईकरिता कृष्ण जाणार होता त्यावेळी द्रौपदीला भीती वाटली की हा युधिष्ठिराच्या इच्छॆनुसार समेट वगैरे करतो कीं काय.. तिच्या आक्रोशाला उत्तर देतांना कृष्ण म्हणतो ’कृष्णे, भिऊ नकोस. कौरव स्त्रीया विधवा होऊन रडत असलेल्या लवकरच तुझ्या दृष्टीला पडतील रणांगणात कौरवांची प्रेते कोल्हेकुत्री खातांना दिसतील यात शंका बाळगू नकोस." आपल्या प्रिय भगिनीची दुर्दशा करणार्या
कौरवांबद्दल त्याच्या मनात इतका द्वेष होता की तो शिष्टाईकरता गेला नव्हताच. त्याला युद्ध पाहिजेच होते . कौरवांकडे जाण्याचे कारण कुंतीला भेटावयाचे आणि कर्णाला फोडता येते का हे पहावयाचे एव्हढेच होते
तो शिष्टाईकरिता आला असतांना दुर्योधन त्याला भोजनाचा आग्रह करू लागतो. कृष्ण प्रथम सौम्यपणे ते नाकारतो पण फारच आग्रह होऊं लागल्यवर ताडकन सांगतो "लोक दुसर्याकडे भोजनाकरिता जातात ते दोन कारणांनी. पहिले म्हणजे दोघांमधील प्रेमाने व दुसरे म्हणजे घरी जेवावयास काही नाही म्हणून. तुझ्या माझ्यात प्रेम नाही व मी अन्नाला अजून महाग झालेलो नाही." एका तडफदार माणसाने द्यावे असेच हे उत्तर आहे.
यादवीच्या वेळी शक्य असूनही तो ती टाळत नाही. नियतीशी संघर्ष करण्याऐवजी शांतपणे एकांतात, अरण्यात तो आपली जीवनयात्रा संपवितो.
असो. जास्त उदाहरणे देण्याची गरज नाही. पण त्याच्या जीवनकालातच भीष्म, विदूर, कुंती अ शा ज्येष्ठ व्यक्ती, आणि सर्वसाधारण माणसे त्याला "अवतार" मानत होते असे दिसते. याचे कारण म्हणजे त्याची श्रेष्ठ नीतीमत्ता, असाधारण शौर्य, अलौकिक धर्मधारणा, सत्य-असत्य यातील सूक्ष्म फरक जाणण्याची प्रगल्भता. सर्वथा योग्य असूनही त्याने कधीही सम्राटपदाची इच्छा बाळगली नाही. स्वत:करिता काहीही न अपेक्षिता समाजकल्याण हे एकच ध्येय त्याच्या समोर होते. युद्धानंतर गांधारी त्याला "तू हे युद्ध टाळण्यास समर्थ असतांना तसे कां केले नाहीस ? असे विचारते व त्याला शापही देते. कृष्ण तो शांतपणे स्विकारतो.
महाभारत हे भारतभूमीचे वैभव आहे. कृष्ण हा त्या वैभवातला कौस्तुभमणी
शरद
वाचने
31780
प्रतिक्रिया
63
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान !
:)
सुरेख लिहिलेत!
नेहमीप्रमाणे मस्त
+1
छान लिहीलंय !
व्यक्तीपुजेच्या मर्यादा समोर येताच 'नास्तिक मुर्तीपुजक' व्हावे
In reply to छान लिहीलंय ! by उगा काहितरीच
अख्या जगात एकच व्यक्ती इतका
श्रीराम जिथे न्यायाच्या
In reply to अख्या जगात एकच व्यक्ती इतका by जॉनविक्क
उत्तर रामायण वाचावे
In reply to श्रीराम जिथे न्यायाच्या by आदिजोशी
उत्तर रामायण वाचावे
In reply to उत्तर रामायण वाचावे by जॉनविक्क
वाह. म्हणजे चर्चाच संपली की.
In reply to उत्तर रामायण वाचावे by आदिजोशी
वा वा !!! वाचनीय. सुंदर
खूप आवडले. पण त्रोटक वाटतंय.
ह्म्म...
, 'अन्तीम सत्य'
In reply to ह्म्म... by सोत्रि
गीता फक्त अर्जुनाला युद्धास
In reply to , 'अन्तीम सत्य' by जॉनविक्क
यावर स्वतंत्र धागा मिपावरच लिहावा
In reply to गीता फक्त अर्जुनाला युद्धास by सोत्रि
गीता फक्त अर्जुनाला युद्धास
In reply to , 'अन्तीम सत्य' by जॉनविक्क
उत्तम लेख. पण त्रोटक वाटला.
चांगलंय. अर्थात् कृष्णाच्या
+१
In reply to चांगलंय. अर्थात् कृष्णाच्या by राघव
कालयवन तर उघड उघड नंतरची भर
In reply to चांगलंय. अर्थात् कृष्णाच्या by राघव
होऊ शकेल, शक्यता नाकारता येत
In reply to कालयवन तर उघड उघड नंतरची भर by प्रचेतस
महाभारतात यवनांचे चिक्कार
In reply to होऊ शकेल, शक्यता नाकारता येत by राघव
मग हे सर्व उल्लेख नंतरचेच काय
In reply to महाभारतात यवनांचे चिक्कार by प्रचेतस
होय. हूण आदींचे उल्लेख नंतरचे
In reply to मग हे सर्व उल्लेख नंतरचेच काय by राघव
:)
In reply to होय. हूण आदींचे उल्लेख नंतरचे by प्रचेतस
अवांतरः रामायणात चक्क तथागत
In reply to होय. हूण आदींचे उल्लेख नंतरचे by प्रचेतस
होय. :)
In reply to अवांतरः रामायणात चक्क तथागत by अभ्या..
साशंक
In reply to होय. हूण आदींचे उल्लेख नंतरचे by प्रचेतस
'तथागत' असा उल्लेख आहे जो
In reply to साशंक by सोत्रि
तथागत - ज्या प्रमाणे बोलतो
In reply to 'तथागत' असा उल्लेख आहे जो by प्रचेतस
पूर्ण श्लोक असा आहे.
In reply to तथागत - ज्या प्रमाणे बोलतो by सोत्रि
संस्कृत सामासिक शब्दांची फोड
In reply to पूर्ण श्लोक असा आहे. by प्रचेतस
बौद्धमतावलंबीही
In reply to पूर्ण श्लोक असा आहे. by प्रचेतस
का बरे साशंक?
In reply to बौद्धमतावलंबीही by सोत्रि
बुद्धाचा कालखण्ड ~ ५५० BCE
In reply to का बरे साशंक? by माकडतोंड्या
रामाचा कालखंड जुना, रामायण
In reply to बुद्धाचा कालखण्ड ~ ५५० BCE by सोत्रि
ही शब्दयोजना माझीच,
In reply to बौद्धमतावलंबीही by सोत्रि
कृष्ण ही कॄष्ण हे नाव
कृपया संदर्भ द्या
In reply to कृष्ण ही कॄष्ण हे नाव by माकडतोंड्या
स्वागता बद्दल आभार
In reply to कृपया संदर्भ द्या by शरद
नेहमीप्रमाणेच उत्तम लेखन.
थोडा खुलासा
मला असे म्हणावयाचे आहे कीं
In reply to थोडा खुलासा by शरद
युद्धात ज्येष्ठ आप्तस्वकिय
In reply to मला असे म्हणावयाचे आहे कीं by माहितगार
सर्वप्रथम आपण खुप चांगले
In reply to युद्धात ज्येष्ठ आप्तस्वकिय by सोत्रि
स्पर्धा नेमक्या कोणत्या
In reply to सर्वप्रथम आपण खुप चांगले by माहितगार
मला असे म्हणावयाचे आहे कीं
In reply to थोडा खुलासा by शरद
खूपच जास्त सुंदर
अभ्युत्थानार्थ धर्मस्य नव्हे
यदा यदा हि धर्मस्य
In reply to अभ्युत्थानार्थ धर्मस्य नव्हे by llपुण्याचे पेशवेll
कृपा करून हा लेख मायबोलीवर
मायबोली
In reply to कृपा करून हा लेख मायबोलीवर by तमराज किल्विष
सुरेख..!
वाह उत्तम लेख आणि भर म्हणून
शरद सर खूप धन्यवाद. करतो मी.
थोडक्यात छान समजावले..
नेहमी मागा यांचे प्रतिसाद
छान लेख !
Prahappy hi khup dhanywad!
Ji cha hi zala.