नवीन नात्यांना समजून घेण्यातली गरज!
लेखनप्रकार
नवीन नात्यांना समजून घेण्यातली गरज!
नाती म्हटलं की आपल्या मानत रक्ताची नाती उभी राहातात. पण ही रक्ताची नाती मुळात निर्माण होतात ती एका विश्वासाच्या नात्यामुळेच. पती-पत्नीचं नातंच मुळी केवळ प्रेम आणि विश्वास यावर उभं राहातं. अर्थात पुढे जाऊन त्यात प्रेम किती आणि विश्वास किती हे मोजणं अवघड जातं. अनेकदा अनेक जोडप्यांमध्ये लग्नाच्या काही वर्षांनंतर प्रेम किंवा विश्वास उरतोच असं देखील नाही. तर लग्नानंतर निर्माण झालेल्या अनेक नात्यांच्या गुंतागुंतीमुळे हे पती-पत्नीचं नातं सांभाळून घेतलं जातं किंवा टिकवलं जातं. सुरवातीच्या काळातले गुलाबी ढग संपता-संपता नवीन पाहुण्याची चाहूल असते. येणाऱ्या बाळाबरोबरच होणाऱ्या आई-बाबांचं आयुष्य बदलतं. त्यात जर घरात इतर मंडळी असतील तर मग सुरू होते खरी भावनिक लढाई. सांभाळावी लागणारी सगळीच नाती.... आपली नोकरी किंवा व्यवसाय... सण-वार.... पै-पाहुणा... यातून मग एकमेकांना फारसा वेळ देता येतोच असं नाही. त्यातून कधी कधी होणारी भावनिक कुचंबणा ही दोघांचीही असते. केवळ पत्नी/आईच सगळं सांभाळत असते असं माझं मत नाही; तर अनेकदा पती/वडील देखील अनेक भावनिक दोलायमानतेतून जात असतात. या सगळ्याचा परिणाम मूळच्या पती-पत्नी या नात्यावर नकळतपणे होत असतो. पहाता-पहाता दिवस-महिने-वर्ष संपतात. मुलं मोठी होतात आणि त्यांच्या आयुष्याच्या मार्गी लागतात. पण तोवर पती-पत्नींमध्ये काहीसा दुरावा निर्माण झाला असतो. एकमेकांबरोबर ते असतात तर खरे.... सहली.... मित्र-मैत्रिणींबरोबर भेटी-गाठी.... सण-समारंभ एकत्र साजरे करणं सगळं अगदी बिनबोभाट चालू असतं. पण मनाचं जोडलेलं असणं तितकंच महत्वाच नाही का? अनेकदा ते अभावानेच दिसतं. सवईमुळे एकमेकांची घेतलेली काळजी... किंवा आता या वयाला येऊन मी एकटी पडेन किंवा एकटा पडेन म्हणून साथीदाराला सांभाळणं वेगळं आणि मनात असलेल्या प्रेमामुळे सोबत असणं वेगळं. अर्थात हे 'प्रेम' प्रत्येकानं आपलं आपण ठरवायचं असतं.
लग्न! केवळ शिक्षण पूर्ण करून नोकरी-धंद्याला लागलं....वयात आलं....प्रेम केलं.... म्हणून करतो आपण. आपली मानसिकताच ती असते. पण कधी कोणी असा विचार का नाही करत.... सोबत राहण्यासाठी.... आयुष्य एकत्र समरसून जगण्यासाठी लग्न करावं. मुलं जन्माला घालणे.... माझ्या/तुझया आईवडिलांना सांभाळणे.... आर्थिक जवाबदऱ्या एकत्र सांभाळणे हे लग्नाचे मुद्दे का असावेत? काही दिवसांपुर्वी एका बावीस वर्षाच्या मुलीने मला सांगितले की मी आता हळूहळू माझ्या करियरमध्ये काहीतरी करायला लागले आहे. अजून थोडा वेळ लागेल पण मला माहीत आहे की मी पुढे जाऊन नक्की यशस्वी होईन. माझ्या आई-वडिलांची मला साथ देखील आहे. सगळं छान चालू आहे पण अलीकडे आई-बाबांना माझ्या लग्नाची काळजी लागून राहिली आहे. खर सांगू का मला तर वाटतं की मला आयुष्यात पुरुषाची आधारासाठी गरजच नाही. पण सुखी समाधानी आयुष्यासाठी सोबती हवा आहे; आयुष्य परिपूर्णतेने जगण्यासाठी सोबत हवी आहे. पण म्हणून लग्नाचा अट्टहास नाही करायचा मला. इतकी वर्षे मी माझ्या आई-वडिलांबरोबर राहिले त्यांची तत्व-त्यांचे विचार... या घरातल्या सवई सोडून आणि केवळ लग्न केलं म्हणून एखाद्या मुलाच्या घरातले विचार-आचार मान्य करायचे हे मला पटत नाही आहे. अर्थात त्याचा अर्थ मी केवळ स्त्रीवादी विचारांची किंवा मुक्त नात्यात राहण्याच्या विचारांची आहे अस देखील नाही. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की लग्न करताना आयुष्य जोडीने जगावं... लग्नामुळे येणाऱ्या नवीन जवाबदऱ्या दोघांनी सांभाळून आपल्या वयाला आवश्यक असे मोकळे श्वास देखील दोघांनी अनुभवावेत. केवळ लग्न झालं म्हणून आपल्या मित्र-मैत्रिणींना दोघांनीही तिलांजली द्यायची गरज नाही... मात्र लग्नाच्या बंधीलकीला विसरायचं नाही.
काहीसे पटले मला तिचे विचार. पण इतके आदर्शवादी संसार आपल्या आजूबाजूला होताना आपण बघतो तरी का? लग्न म्हणजे 'जुळवून घेणे' असं अजूनतरी आपल्या समाजात आहे. दुर्दैवाने अजूनही आपण घरच्या कर्त्याची भूमिका केवळ पुरुषाकडे देतो. त्यामुळे अनेकदा पुरुष त्यांच्या खऱ्या वयापेक्षा जास्त मोठे वाटतात; आणि याउलट स्त्रीची तिची हुशारी... समजूतदारपणा तिने किती वर्षे संसार केला आहे यावर ठरवला जातो. त्यामुळे तसे म्हंटले तर दोघांवरही अन्यायच नाही का? मुलगा त्याच वय विसरून जातो... आणि वयाबरोबर गुलाबी ढगसुद्धा... मुलगी मात्र जवाबदारी नसल्यामुळे अडकून राहाते स्वप्नांच्या राज्यात!
.... आणि मग मी वर म्हंटल्याप्रमाणे अनेकदा अनेक जोडप्यांमध्ये लग्नाच्या काही वर्षांनंतर प्रेम किंवा विश्वास उरतोच असं देखील नाही. मात्र आजची पिढी थोडी वेगळी आहे... काहीशी स्वतंत्र विचारांची आहे.... मागील पिढीमध्ये लग्नाची बोलणी होताना जवाबदाऱ्यांची जंत्री मोजली जायची. मात्र आजच्या पिढीमध्ये वयक्तिक आणि जोडीदाराच्या स्वप्नांचा अगोदर विचार करण्याची प्रवृत्ती वाढते आहे.
मला वाटतं बदल होतो आहे.... चांगला की वाईट हे काळच ठरवेल... पण बदल होणे ही समाजव्यवस्थेची गरज आहे. त्यामुळे आजच्या लग्नाळू मुलांच्या आणि मुलींच्या पालकांनी त्यांच्या विचारांना समजून घेणं आवश्यक आहे. 'आमच्या वेळी असं नव्हतं.' 'लग्न म्हणजे adjusments आणि जवाबदऱ्या'; हे सांगणं थांबवलं पाहिजे. थोडं त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ दे की! आपल्याला खूप काही करायचं होतं... कदाचित आपण नाही करू शकलो... पण आजची मुलं प्रयत्न करत आहेत... तर करू देत की! त्यांच्या पाठीशी उभं राहून 'क्या जमाना बदल राहा हे?' हा प्रश्न विचारण्यापेक्षा... 'हा... जमाना बदल रहा हें; मैं साक्षीदार हूं!' असं म्हणायला काय हरकत आहे.
वाचने
30776
वाचनखूण
प्रतिक्रिया
62
अमेरिकन नात्यांना समजून घेण्याची गरज
धन्यवाद
In reply to धन्यवाद by ज्योति अळवणी
ताई खरे सांगू का
In reply to ताई खरे सांगू का by जॉनविक्क
जॉनविक जी
In reply to जॉनविक जी by ज्योति अळवणी
तो आपणास पडणं फार आवश्यक आहे
काहीही?
In reply to काहीही? by यशोधरा
कदाचित माझं म्हणणं नीट मांडलं
In reply to कदाचित माझं म्हणणं नीट मांडलं by ज्योति अळवणी
वेळ न येणं आणि निर्णय घेऊ न
In reply to वेळ न येणं आणि निर्णय घेऊ न by यशोधरा
मी देखील तेच म्हणते आहे.
In reply to कदाचित माझं म्हणणं नीट मांडलं by ज्योति अळवणी
त्यामुळे कदाचित त्यांची
In reply to त्यामुळे कदाचित त्यांची by यशोधरा
अगदी पंधरा ते वीस
In reply to अगदी पंधरा ते वीस by ज्योति अळवणी
ज्योती ताई, लेख आणि एकूण
In reply to ज्योती ताई, लेख आणि एकूण by यशोधरा
जोपर्यंत
In reply to काहीही? by यशोधरा
कदाचित माझं म्हणणं नीट मांडलं
अळणी वाटते आहे.
अळणी वाटते आहे.
In reply to अळणी वाटते आहे. by जालिम लोशन
"पकाऊ" हा शब्द वापरला असता तर
In reply to "पकाऊ" हा शब्द वापरला असता तर by जॉनविक्क
नाही लेख पकावु नाही आहे.
In reply to नाही लेख पकावु नाही आहे. by जालिम लोशन
कदाचित विषय नीट मांडला गेला
In reply to कदाचित विषय नीट मांडला गेला by ज्योति अळवणी
माफ करा, पण मुलांना संसारात
In reply to माफ करा, पण मुलांना संसारात by यशोधरा
स्त्री शी जुळवून घेणे
In reply to स्त्री शी जुळवून घेणे by जॉनविक्क
स्त्री समानतेसाठी सुशिक्षित, सबला बनत आहे
In reply to स्त्री शी जुळवून घेणे by जॉनविक्क
कुठल्या जगात वावरता? ;)
In reply to कुठल्या जगात वावरता? ;) by यशोधरा
तेच जग
In reply to तेच जग by जॉनविक्क
सोपी गोष्ट समजून घ्या
In reply to तेच जग by जॉनविक्क
डोळेझाक तर केलीच आहे, पण ती
In reply to डोळेझाक तर केलीच आहे, पण ती by यशोधरा
वा तुम्ही तर राजकारण करावे
In reply to वा तुम्ही तर राजकारण करावे by जॉनविक्क
म्हणजे विरोधी मताचा आवाज
In reply to म्हणजे विरोधी मताचा आवाज by यशोधरा
वाटणार नाही याची खात्री होतीच
ज्योती ताई
In reply to ज्योती ताई by श्वेता२४
केवळ शहरी, उच्च मध्यमवर्गीय,
In reply to केवळ शहरी, उच्च मध्यमवर्गीय, by यशोधरा
मी हेच म्हणतेय यशोताई
ग्रामीण भाग, निमशहरी भाग व विचारानं आधुनिक नसलेल्या परंपरावादी समाज - ह्या समाजातल्या स्त्रिया काय कमी कर्तृत्ववान असतात? संधी मिळण्याचा, स्व जाणीव व्हायचा अवकाश असतो. ठिणगी असतेच, स्फुल्लिंग पडायचा अवकाश असतोमाझा प्रतिसाद वाचला तर मी हेच म्हणतेय की तेथील स्त्रिया कर्तृत्ववान असतात पण त्याना आजही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही. सावित्रीबाई, बहिणाबाई या लाखो त एक असतात. मी सर्वसामान्य पणे जे दिसतेय. आणि घडत असताना पाहतेय त्याबद्दल बोलले. बाकी तुम्हाला लेखातल्या ज्या गोष्टी खटकल्याचा त्या मलाही खटकल्या. पण लेखिकेने नंतर प्रतिसादात जी भूमिका घेतली त्यावरुन मी तो प्रतिसाद दिला. असोह्या ओळींवरून असे वाटले
२४ यांनी प्रतिसादात जे
In reply to २४ यांनी प्रतिसादात जे by ज्योति अळवणी
पण स्त्रीची मतं आणि
In reply to २४ यांनी प्रतिसादात जे by ज्योति अळवणी
ज्योती, कधी पुण्याला आलात तर
In reply to ज्योती, कधी पुण्याला आलात तर by यशोधरा
वरचेवर पुण्याला येणे होते.
In reply to वरचेवर पुण्याला येणे होते. by ज्योति अळवणी
नक्की. वाट बघते.
In reply to नक्की. वाट बघते. by यशोधरा
हा कट्टा झाला तर मला श्रोता
In reply to हा कट्टा झाला तर मला श्रोता by टवाळ कार्टा
टका
In reply to हा कट्टा झाला तर मला श्रोता by टवाळ कार्टा
कट्टा नक्की होणार पण ज्योती
In reply to कट्टा नक्की होणार पण ज्योती by यशोधरा
अगदी खरं
मी तर ह्याच्या पुढे जावून विचार करतो
In reply to मी तर ह्याच्या पुढे जावून विचार करतो by Rajesh188
स्त्री आणि पुरुष लग्न कशा
In reply to स्त्री आणि पुरुष लग्न कशा by जॉनविक्क
विवाह आणि कुटुंब व्यवस्था टिकवणे पुरुषांची कमजोरी नाही
In reply to विवाह आणि कुटुंब व्यवस्था टिकवणे पुरुषांची कमजोरी नाही by Rajesh188
अहो तसं काही नाहीये
In reply to विवाह आणि कुटुंब व्यवस्था टिकवणे पुरुषांची कमजोरी नाही by Rajesh188
अहो तसं काही नाहीये
In reply to अहो तसं काही नाहीये by जॉनविक्क
अरे प्रतिसाद कुठे गायब झाला ?
हल्ली लोकांचे विचार विनोदी झाले आहेत
In reply to हल्ली लोकांचे विचार विनोदी झाले आहेत by श्वेता२४
अगदी, अगदी.
In reply to हल्ली लोकांचे विचार विनोदी झाले आहेत by श्वेता२४
दुसऱ्या शिकवी ब्रह्मन्यान
In reply to दुसऱ्या शिकवी ब्रह्मन्यान by Rajesh188
दुसऱ्या शिकवी "ब्रह्मन्यान"?
नाती हवीत कशाला ?
अरे भ
In reply to अरे भ by सस्नेह
अरे भ ई असे वाचावे
आयुष्य खूप छोट आहे
In reply to आयुष्य खूप छोट आहे by Rajesh188
फारच negetive आहात बुवा
In reply to आयुष्य खूप छोट आहे by Rajesh188
फारच negetive आहात बुवा
मी निगेटिव्ह नाही
In reply to मी निगेटिव्ह नाही by Rajesh188
बऱ्याच अंशी सहमत
फक्त शहरी वातावरणाचा विचार केला तर
घर फक्त दोघांचे