लेखातल्या निरीक्षणांशी सहमत आहे. नुकताच साहित्याचा नोबेल पुरस्कार फ्रेंच लेखक ल क्लेझिओ यांना मिळाला. त्यावर फ्रान्सच्या पंतप्रधानांची प्रतिक्रिया 'फ्रेंच संस्कृती/प्रभावाच्या तथाकथित र्हासाच्या आरोपाला हे चोख उत्तर आहे' अशी टिपीकल राजकीय होती.
रवांडा वगळले तरी इतर पंचवीस-एक देशांत अजूनही फ्रेंच अधिकृत भाषा आहे. मात्र इंग्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे तिचे प्रभावक्षेत्र ओसरते आहे, हे नक्की. तुम्ही घेतलेला जगातल्या सर्वात प्रभावी भाषांचा धावता आढावा आवडला. कदाचित मँडरीन सोडली, तर इंग्रजीच्या प्रभावक्षेत्राला धक्का लागेल असे वाटत नाही.
भाषेविषयक टिपण्णी आवडली. इंग्रजीचे भाग्य / पारडे तुम्ही म्हणालात तसे जरा भारी आहे.
बाकी रवांडा हा अफ्रिकेतील एक टिनपाट देश. मला टिनपाट शब्दाचा नेमका अर्थ माहीत नाही. कोणास माहीत असल्यास सांगावा. प्रथमदर्शनी तरी टिनपाट हा उल्लेख हिणकस वाटतो आहे. सुनिल यांचे लेखन व मत वाचनीय असते म्हणुन विनंती की जमल्यास त्या वाक्यात सुधार करावा. तुम्हाला आवडेल का तुमच्या देशाचा असा हलका उल्लेख कोणि केला तर?
मुळ शब्दटिन पॉट असा आहे. पत्र्याचा डबा. 'टिनपाट' हा अपभ्रंश आहे.
कमी महत्त्वाचा, कमी किमतीचा, नगण्य, चिल्लर, हिणकस असा अर्थ डिक्शनरीत दिला आहे.
जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
भाषांच्या प्रभावासंबंधीचा आढावा आवडला. इंग्रजीचे पारडे जड आहे आणि राहिल असेच वाटते.
लेख आवडला.
सहज यांनी टिनपाट शब्द बदलवा असे सुचवले आहे त्याला मी सुद्धा सहमत आहे.
--लिखाळ.
प्रतिसादकांचे आभार!
सहज / लिखाळ,
तुमचा टिनपाट ह्या शब्दाबद्दलचा आक्षेप समजला. खरे म्हणजे हा शब्द वापरण्यामागे मला रवांडा हा (फ्रान्सच्या) तुलनेने कसा यकश्चित, बिन महत्वाचा आहे, असेच सुचवायचे होते. यात रवांडाला हिणवणे हा हेतू अजिबात नाही. उलट फ्रान्ससारख्या पाच "बड्या" देशांपैकी एकाला, त्यांच्या भाषेला हा (नगण्य असूनही) कसे जाहीर आव्हान देतो, हेच दाखवायचे होते. आणि ते सगळे टिनपाट ह्या शब्दातून ते व्यवस्थित व्यक्त होते असे मला वाटते. दुसर्या शब्दाने तो परिणाम कदाचित साधला जाणार नाही.
सुनिल यांचे लेखन व मत वाचनीय असते
कसचं कसचं!
नंदन,
फ्रान्सच्या पंतप्रधानांची प्रतिक्रिया 'फ्रेंच संस्कृती/प्रभावाच्या तथाकथित र्हासाच्या आरोपाला हे चोख उत्तर आहे' अशी टिपीकल राजकीय होती
काय गंमत आहे! खरे म्हणजे हा लेख लिहायला कारणीभूत ठरली ती हीच प्रतिक्रिया. तसा रवांडाचा निर्णय होऊन बराच काळ लोटला होता.
पेठकर,
टिनपाट शब्दाची व्युत्पत्ती इथे सांगितल्याब्द्दल धन्यवाद.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
दिवसागणिक इंग्लीशचा प्रभाव वाढतो आहे. फ्रेन्चमात्र आपल्या गतवैभवाच्या नॉस्टेलजियातून बाहेर पडायला तयार नाहीत. रवांडाच्या निर्णयाने त्याच्या ढासळत्या बुरुजाचा एक दगड कोसळला इतकेच.
वा!
सुनीलराव, उत्तम लेखन...
तात्या.
भाषांच्या जागतिक जडण घडणीचा व सद्य परिस्थितीचा अतिशय मोजक्या शब्दांत व साध्या भाषेत घेतलेला वा लघु-अढावा आवडला.
आपला,
(प्रभावित) भास्कर
आम्ही येथे वसतो.
फ्रेंच आणि इंग्लिश भाषेत नेमका काय फरक आहे?
लिपी, व्याकरण आणि शब्द या अर्थाने थोडा खुलासा / माहिती दिली तर बरे होईल.
मी काही फ्रेन्चचा जाणकार नाही (तसा इंग्लीशचाही फार जाणकार आहे अशातलाही भाग नाही). पण जेवढे ठाउक आहे ते सांगतो.
मूळात इंग्लीश ही इंडो-युरोपियन कुटुंबातील जर्मॅनिक शाखेतील भाषा आहे तर, फ्रेन्च ही त्याच कुटुंबातील रोमन गटातील भाषा आहे.
लिपी - दोन्ही भाषा रोमन लिपीच वापरतात. फ्रेन्च त्यांच्या उच्चाराच्या सोयीसाठी काही अक्षरांवर एक्सेन्ट (आडव्या रेषा) देतात. (जर्मन उमलाऊट देतात).
व्याकरण - (मिपावर व्याकरणावर लिहायला बंदी आहे!) फ्रेन्चमध्ये फक्त दोनच लिंगे आहेत - पुल्लिंग आणि स्त्रीलिंग. नपुंसकलिंग हा प्रकार फ्रेन्चांना व्याकरणातही मान्य नाही!
याउप्पर फ्रेन्च व्याकरण मला ठाउक नाही.
शब्द - वर सांगितल्या प्रमाणे, इंग्लीशमधील बरेच शब्द हे जर्मन मूळ असलेले आहेत (विशेषतः क्रियापदे) तर फ्रेन्चची बरीच शब्दसंपदा लॅटीनमधून आलेली आहे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
१. काही अपवाद असले तरी इंग्रजीपेक्षा फ्रेंच स्पेलिंग आणि उच्चार बरेचसे फोनेटिक आहेत.
२. इंग्रजीत - किमान विलायती आणि अमेरिकन इंग्रजीत, एखाद्या शब्दाचा उच्चार करताना त्यावर कुठे जोर द्यायचा हे महत्त्वाचे आहे. फ्रेंचमध्ये तसे नाही.
३. कर्माचे लिंग माहीत असणे महत्त्वाचे आहे. त्याप्रमाणे प्रेपोझिशन (मराठी शब्द विसरलो :(.) बदलते.
युरोपीयन भाषा या बहुतांशी रोमन लिपी वापरतात.
इंग्रजी आणि फ्रेंच या शेजारच्या भाषा असूनही लिपी सारखी असुनही वेगळ्या आहेत. फ्रेंच चा पराभाव हिण्यामागचे कारण इंग्लंड मधली इम्ग्रजी नसून अमेरिकेतली इंग्रजी आहे
व्यापारासाठी जास्त प्रमाणात वापरली जात असलेली भाषा म्हणून तिचा प्रभाव वाढला
शिवाय नवे शब्द आत्मसात करणे हा इंग्रजीचा सर्वात मोठा विषेश गुण इंग्रजीचे प्रस्थ वाढण्याचे एक महत्वाचे कारण अहे.
सर्व्हावल ओफ द फिटेस्ट ...हा नियम भाषेलाही लागु होतो.
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
शिवाय नवे शब्द आत्मसात करणे हा इंग्रजीचा सर्वात मोठा विषेश गुण इंग्रजीचे प्रस्थ वाढण्याचे एक महत्वाचे कारण अहे.
प्रशासकीय अनुमती हा प्रकार फ्रेंचमधे ही आहे काय ? म्हणून ते आणि हे दोन्ही ढेपाळले काय ? :D
सुनिलशेठ,
धन्यवाद. माझा तर्क बरोबर निघाला :)
इतरांना शब्द काय ? पोर्तुगिज आणि फ्रेंचांना ? जर्मन लोकांसाठी शब्द नाही .. बरोबर ?
--
अवांतर
( गेस आणि लॉजिक या दोन्हीसाठी मराठीत एकच शब्द आहे का ? - तर्क)
पोर्तुगिजांना बहुधा फिरंगी हा शब्द वापरीत. सध्या फिरंगी हा शब्द सर्वच परदेशींना सर्रास वापरतात.
फ्रेन्चांचा मराठ्यांशी थेट संबंधच आला नाही. म्हणून कदाचित त्यांच्यासाठी वेगळा शब्द नसावा.
जर्मन हे सर्वात अयशस्वी वसाहतकार. तसा त्यांनी अफ्रिकेत प्रयत्न केला होता पण तो फसला. भारतात तर ते आलेच नाहीत!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
( गेस आणि लॉजिक या दोन्हीसाठी मराठीत एकच शब्द आहे का ? - तर्क)>>>>>>
गेस म्हणजे अंदाज आणि लॉजिक म्हणजे तर्क.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
प्रतिक्रिया
सहमत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सुनील
टिनपाट..
चुकून....
असेच म्हणतो.
भाषांच्या
धन्यवाद!
धावता आढावा
दिवसागणिक
सुंदर लेख
चांगला लेख
दोघा भाषेतील नेमका फरक काय आहे?
काही उत्तरे ..
अजून काही
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
युरोपीयन
फ्रेंच -
भाषा..
भाषा..
फ्रेंच - मराठी
इंग्रज आणि डच
इतर ?
पोर्तुगीज
आले होते.
मी तर समजत
( गेस आणि