✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

गजावरील राणी

ह
हृषिकेश पांडकर यांनी
Tue, 04/11/2017 - 13:35  ·  लेख
लेख
परवाच्या दुपारी टळटळीत उन्हात 'पित्तशामक नीरा' घशाखाली सारत असताना किलकिल्या डोळ्यांनी या वाड्याला न्याहळत असताना हे दृश्य दिसले.एप्रिल महिन्याचा दिवस असूनही टांगलेला आकाशकंदील येथे साजऱ्या होणाऱ्या वार्षिक दीपावलीच्या साक्ष देत होता.त्या खाली नजर टाकली आणि आश्चर्य वाटले. पुण्यातील सगळ्यात जुनी पेठ म्हणून आपण जिचे वर्णन वाचतो ती हि कसबा पेठ.पुणेरी खोचकपणा,टोपी,कोट धोतर आणि अनुनासिक आवाज,तिरकसपणा,ओतप्रोत भरलेला उपहास,पुणेरी पगडी आणि टांगा या गोष्टींचे उगम स्थान आणि पर्यायाने केंद्रबिंदू.छत्रपती वास्तव्यास येऊन गेले,पेशवे सरले,टिळक,गोखले,आगरकर वावरले,त्याबरोबर गोरा साहेबाची इथून परतला आता फक्त जुन्या आठवणी अंगाखांद्यावर मिरवत री-डेव्हलोपमेंटची' वाट बघत असलेले काही जुने वाडे राहिलेले दिवस ढकलत आहेत. वाड्याच्या माडीला लावलेल्या लोखंडी गजांवर असलेली इंग्लंडच्या राणीची कोरीव प्रतिमा साहेबांच्या पुण्याची आठवण करून देत होती.एकसंध आणि मजबूत कठड्यावर असलेली राणीची प्रतिमा पाहून १५० वर्ष गोऱ्यांनी हुकूमत राखली आणि जाता जाता अनंत ठिकाणी आपली छाप सोडून गेले त्यातीलच हा एक भाग. गोरे परतून आता ७० वर्ष होतील पण त्यांनी सोडलेल्या या पाऊलखुणा पाहताना वेगळीच मजा येते.असा कधी रिकामा वेळ मिळाला तर एकदा या पुणे ११ किव्वा पुणे ३० च्या जुन्या पुण्यातून पायी फिरा, IT हब किव्वा विद्येचे माहेरघर असणारे हे आताचे पुणे पूर्वीपासूनच गडगंज श्रीमंत होते याची प्रचिती आल्यावाचून राहत नाही :) 1 हृषिकेश पांडकर ११-०४-२०१७
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
रेखाटन
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव
मत

प्रतिक्रिया द्या
5770 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

अरे वा, हे डायकास्टचे पॅटर्न

अभ्या..
Tue, 04/11/2017 - 13:53 नवीन
अरे वा, हे डायकास्टचे पॅटर्न वापरायची फॅशन परत आलीय बरंका. फॅब्रिकेशन करणारे लोक आता हे जुन्या टाईपचे डेकोरेटिव्ह्, फ्लोरल आणि व्हिक्टोरिअन स्टाईलचे डायकास्ट पॅटर्न वापरुन गेट, कंपाउंड साठी डिझाइन्स बनवत आहेत. बाकी हे राणीचे पॅटर्न सोलापुरात लै ठिकाणी पाहिलेले आहे. काही नवलाई नाही त्यात.
  • Log in or register to post comments

मला वाटलं राणी मुखर्जी-चोप्रा

५० फक्त
Tue, 04/11/2017 - 15:39 नवीन
मला वाटलं राणी मुखर्जी-चोप्रा हत्तीवरुन साखर वाटत होती का काय
  • Log in or register to post comments

आता 'ज' चा उच्चार कसा करायचा

हृषिकेश पांडकर
Tue, 04/11/2017 - 16:21 नवीन
आता 'ज' चा उच्चार कसा करायचा हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

पुणेरी पगडी आणि टांगा या

अभ्या..
Tue, 04/11/2017 - 16:00 नवीन
पुणेरी पगडी आणि टांगा या गोष्टींचे उगम स्थान
टांगा पुण्याचे इनोव्हेशन हाय काय? तरीच. पुणेरी घोडा कुणाच्या बरोबरीने पाय कसा उचलणार म्हणा. ;)
  • Log in or register to post comments

एल ओ एल ...

हृषिकेश पांडकर
Tue, 04/11/2017 - 16:12 नवीन
एल ओ एल ... काय कमाल टिपलंय हो ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

असल्या वाड्यांमधल्या (तसल्याच

अत्रुप्त आत्मा
Tue, 04/11/2017 - 16:48 नवीन
असल्या वाड्यांमधल्या (तसल्याच ) लोकांकडे कामाला जायचा योग नै आलेला दिसत तुमच्या आयुष्यात! आला,तर परत हा असला लेख नै लिहिणार टुम्ही! ;)
  • Log in or register to post comments

=)) =))

मितान
गुरुवार, 04/13/2017 - 11:36 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

असल्या वाड्यांमधल्या (तसल्याच

अत्रुप्त आत्मा
Tue, 04/11/2017 - 16:49 नवीन
असल्या वाड्यांमधल्या (तसल्याच ) लोकांकडे कामाला जायचा योग नै आलेला दिसत तुमच्या आयुष्यात! आला,तर परत हा असला लेख नै लिहिणार टुम्ही! ;)
  • Log in or register to post comments

मस्त टिपलंय!

आषाढ_दर्द_गाणे
Tue, 04/11/2017 - 20:14 नवीन
मस्त टिपलंय!
  • Log in or register to post comments

+११

मितान
गुरुवार, 04/13/2017 - 11:37 नवीन
+११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आषाढ_दर्द_गाणे

वा!

पैसा
गुरुवार, 04/13/2017 - 11:44 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

छान फोटो.

सिरुसेरि
गुरुवार, 04/13/2017 - 13:20 नवीन
छान फोटो. वाडा बघुन "कल्हईवाले पेंडसे येथेच राहतात का ?" असा प्रश्न पडला .
  • Log in or register to post comments

जिम्मे क्वीण साड्डी व्हिक्टोरिया!

नंदन
गुरुवार, 04/13/2017 - 13:27 नवीन
नेमकं टिपलंय. अशीही एक 'गजगामिनी'!
  • Log in or register to post comments

सुरेख. जुन्या इमारती बघताना

वेल्लाभट
गुरुवार, 04/13/2017 - 15:35 नवीन
सुरेख. जुन्या इमारती बघताना मजाच येते ब्वा.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा