Skip to main content

शतशब्दकथा स्पर्धा-२०१७ बांडगुळ

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 23/02/2017 या दिवशी प्रकाशित केले.
aaaaaa रणखांबे मास्तर लईच दार्शनिक. परीक्षेत दुसऱ्याचं बगून ल्हिवायचो तर म्हनायचा '' तू लेका बांडगूळच रहाणार आयुष्यभर '' लई राग याचा तवा . धाव्वी काय लाभली नाय - आलो पुन्यात . वळखीतनं युवराजदादाला भेटलो , पुढारी माणूस, कामबी मिळालं . यका खबदाडीत झेरॉक्स मशीन टाकून दिली. आकडा टाकून कनेक्शनबी दिलं. फिप्टी - फिप्टीला आपल्या बाचं काय जातंय ? दिपवाळी झाली. गावाकडनं आलो. दादा बोल्ले , ''आजपासनं दुकान तुझं ! दोन लाख तुझ्या खात्यात टाकलेत- कुटं बोलला तर तंगडं तोडीन. रोच्च्याला मिळतील तशे परत कर !'' कळायचंच बंद झालं. कायतरी लफडा केलाय युवराजानं! रातच्या यष्टीनं गावाला छू ! मास्तर म्हनला ब्येस केलंस - आता आमचं दुकान सांबाळ. हाय मी पाठीशी... ! फुडाऱ्याचं बांडगूळ व्हन्यापरीस मास्तरचं झालेलं बरं !!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1449
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया