(रूपक कथा)
नुकताच गेलेल्या पितृपक्षातली गोष्ट. बर्याच महिन्यांनी मला माझा एक जुना मित्र भेटला. डॉक्टर ए.आर. शहाणे त्याचे नाव. नावाप्रमाणेच अत्यंत हुशार. विषय कुठलाही असो, ज्ञान पाजायला नेहमीच उत्सुक. पण या वेळी त्याचा चेहरा मरगळलेला होता. मी विचारले कसली चिंता करतो आहे. तो म्हणाला तुला माहितच आहे, दरवर्षी मी पितरांना प्रसन्न करण्यासाठी ब्राम्हणाला घरी जेवायला बोलवितो, दान-दक्षिणा देतो. मी म्हणालो, त्यात एवढे उदास असण्याचे कारण काय. तो म्हणाला, गेल्या वर्षी हा ब्राम्हण पितृपक्षात घरी आला होता, जेवण झाले, दक्षिणा दिली. त्या वर त्याचे समाधान झाले नाही. जाताजाता माझ्या ५ वर्षाच्या मुलाच्या नाकावर मुक्का मारला आणि म्हणाला या वर्षी तुझ्या मुलाचे नाक तोडले आहे पुढच्या वर्षी तुझ्या मुलाची तंगडी तोडणार आहे. मी म्हणालो, एक मुस्कटात का नाही लावली त्याला? तो उतरला, एक तर अतिथी आणि त्यात ब्राम्हण. कसा मारणार त्याला. मुलाला हॉस्पिटलला घेऊन गेलो, नाकाचे हाड तुटले होते, सर्जरी करावी लागली. मी म्हणालो, झाले गेले विसरून जा. आता त्या ब्राम्हणाला पुन्हा घरी बोलवू नको, इतरांना हि तसे करायला सांग. चांगली अद्दल घडव त्याला. त्या वर तो म्हणाला, असे कसे करू शकतो, जुने संबंध आहेत, त्याच्या सोबत. त्याला वाळीत टाकणे केंव्हाही उचित नाही. येत्या रविवार मी त्यालाच घरी बोलविणार आहे.
आता काय म्हणणार, अश्या उच्च शिक्षित विद्वान माणसाला. मी कपाळावर हात मारला, डोळ्यांसमोर, पायाला प्लास्टर बांधलेल्या अवस्थेत त्याच्या मुलाचा चेहरा डोळ्यांसमोर तरळला.
वाचने
7955
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय?????
ऐकावे ते नवलंच...
रुपक समजले नाही.
हे बहुतेक भारत-पाकिस्तान
अच्छा, ओके.
In reply to हे बहुतेक भारत-पाकिस्तान by डॉ सुहास म्हात्रे
युती बद्दल तर नाही ना?
In reply to हे बहुतेक भारत-पाकिस्तान by डॉ सुहास म्हात्रे
अशा लबाड ब्राह्मणांच कशाला
अगदी बरोबर मित्र हुशार आहे पण
In reply to अशा लबाड ब्राह्मणांच कशाला by कायरा
खिक्क...इतके सोपे रुपक समजत
+10000000
In reply to खिक्क...इतके सोपे रुपक समजत by टवाळ कार्टा
त्याला लागणारी तीक्ष्ण
In reply to +10000000 by संदीप डांगे
दोन: रूपक भारत पाक संबंध व
In reply to त्याला लागणारी तीक्ष्ण by पिलीयन रायडर
हं मग ते अंमळ हुकलंय म्हणुनच
In reply to दोन: रूपक भारत पाक संबंध व by संदीप डांगे
नक्की का?
In reply to त्याला लागणारी तीक्ष्ण by पिलीयन रायडर
डॉक्टर ए.आर. शहाणे आणि श्राद्धाचा ब्राम्हण
काही कळलं नाही. असं कसं असू
तेच ना...
In reply to काही कळलं नाही. असं कसं असू by रेवती
डॉक्टर ए.आर. शहाणे त्याचे नाव
हे रुपक असेल तर कहानी कुछ और
In reply to डॉक्टर ए.आर. शहाणे त्याचे नाव by सचु कुळकर्णी
???
In reply to हे रुपक असेल तर कहानी कुछ और by सचु कुळकर्णी
संदिप भौ मले तर ते केजरीवाल
In reply to ??? by संदीप डांगे
ओ डांगे बुआ, ओ सचिन भाऊ
In reply to संदिप भौ मले तर ते केजरीवाल by सचु कुळकर्णी
रुपक पहचानो मिलन महा आकडा २०१६"
In reply to ओ डांगे बुआ, ओ सचिन भाऊ by कैलासवासी सोन्याबापु
(रूपक कथा)
चुक ते चुकच आहे. माझ्या
रुपक कथा असल्याचा दाट संशय
What exactly is this..
आता कस आता कस अं, आम्हाला पण
In reply to What exactly is this.. by जव्हेरगंज
अगदी अगदी!!
In reply to आता कस आता कस अं, आम्हाला पण by राजाभाउ
ए . आर .
=))
श्या, कुनाला काय्बी कल्ला नाय.
अवो, पतंजलीची अॅड आहे ती! कितीपण खराब प्रॉडक्ट विकले, त्याने नाक फुटलं, पुढे तोंड हात पाय तुटले तरी तेच घेणार अशी गोष्ट आहे.
छ्या असा
In reply to श्या, कुनाला काय्बी कल्ला नाय. by आनंदी गोपाळ
आनंदी गोपाळ (निश्चितच हे खरे
In reply to श्या, कुनाला काय्बी कल्ला नाय. by आनंदी गोपाळ
मार्केटिंग व गुणवत्ता यांचा काय संबंध?
In reply to आनंदी गोपाळ (निश्चितच हे खरे by विवेकपटाईत
बाप रे काय हिंसक धागा आहे ...