थोडी कॉफी, थोड्या गप्पा
लेखनविषय (Tags)
6.30 pm
You are late.
I always am.
हम्म..
come on! एक तर इतक्या महिन्यांनी भेटतोय. वेळेवरून ऐकवणार का?
का ऐकवू नये? मी काय तुझी गर्लफ्रेंड किंवा बायको आहे का? तुझं मन जपायला?
बोर नको करूस. छान दिसतेयस.
thanks. पण विषय बदलू नकोस.. मगाचपासून इथे एकटी बसलेय. वेटरला मी इतकी बिचारी वाटले की माझी कॉफीची सुद्धा ऑर्डर घ्यायला आला नाही.
हां बाई, sorry. तुला सवय नसेल ना अगदीच, कुणा मुलाची वाट बघायची?
of course. कशी असेल? तुझ्यासारखे नमुने कमीच. चल आता, I need coffee.
...करियर, बायको, बॉयफ्रेंड, मागच्या भेटीच्या आठवणी, आणि कॉफी...
7.15 pm
चल आता.
कुठे?
फेरी मारू चल, एफसीमधे चक्कर मारू.
ओके.
...एफसी लाईफ, पाऊस, झाडे...
7.30 pm
इथे बसूया का?
सिक्युरिटी बसू नाही देणार.
तो येईतो बसू.
ठीके.
...राजकारण, आयुष्याची स्वप्ने, सामाजिक प्रश्न...
8.00 pm
hello, हां, कुठे आहात? अरे मी इथे मैत्रिणीला भेटायला आलोय. आलोच एक १० मिनटात.
१० मिनटात? वैतागलास इतक्यात?
अगं, मित्र आलाय यूएस वरून. ते सगळे भेटणार होते.
मग सांगायचं ना, एक तर मी इतक्या दुरून आले. तुझी वाट बघण्यात अर्धा वेळ गेला..
अगं, मग मी थांबू का?
नको. आता तुझं दुसरं काही ठरलेलं होतं ते कळल्यावर मला बरं नाही वाटणार तू थांबलास तर.
चल मग, परत भेटू नक्की. इतक्या काळानंतर नको भेटत जाऊ. छान वाटतं भेटून गप्पा मारायला.
आह, as if माझे मित्र थांबलेत म्हणून मी कटवतेय तुला..तुलाच तर घाई आहे पळायची.
हो, खरं तर.
चल मग, bye.
bye.
9.00 pm
पोचलीस ना?
हो.
मी अजून मित्रांसोबत आहे.
ओके.
रागावलीस?
मी? का?
अशी तुटक का बोलतेयस?
ओये, हेलो.. आज तुझ्यासोबत दीड तास गप्पा ठोकून आलेय. आणि म्हणे तुटक बोलतेय.
ह्ये ह्ये. चल मग, नंतर बोलू.
10.00 pm
आत्ता आलो घरी.
घरी? मला वाटलं आज मित्रांसोबत पुण्याच्या रस्त्यांवर फुंकत घालवणार तू रात्र.
नो, जस्ट आलो.
हम्म.
तू खूप छान दिसत होतीस.
आय नो. मी नेहमीच छान दिसते.
that’s true. पण तुला भेटून छान वाटतं मला. परत भेट कधीतरी.
शुअर.
चल, गुड नाईट.
गुड नाईट...
बाय द वे, तूपण छान दिसत होतास.
रियली?
हां, थोडा जंगली, पण सूट्स यू.
हा हा, thanks.
चल, गुड नाईट..
...
Last seen 12.40
Last seen 12.45
...चुकलेले ठोके, हललेलं काही, काही तास, काही भास...
प्रतिक्रिया
कुछ कॉफी के सिप याद आ गये. ;-
होता है.. होता है! :)
For the record, काल्पनिक आहे.
ओक्के ;)
बर्र बाबा.. काय पण रीअलिस्टिक
तेच ना
तुम्हाला माहिती असेल नाही
खरय. "ती" कुठेय?
ऊद्या येइल
सगळं काल्पनिक म्हणणाऱ्या
:))
किति क्युट लहिलय :)
पिशे मस्त लिहिलय. मला आधी
लेखन आवडले.
छान!
तू हसलीसच ना! मी हसू आवरले
=))
कसलं गोड =))
गप्पा आवडल्या.
+१
मम! पिशीला :)
मस्त!
:)
काल्पनीक
दंगेखोर मुलींचा माझ्यावरचा
नेहमीच्या लिखाणापे़क्षा वेगळे
एफसी आणि कॉफी.... जुने दिवस
एकदम मस्त
आवडलं
सुरेख !
काल्पनिक आहे? खरचं? वाटत नाही
पिशे मस्त!पण काल्पनिक का? बर
पिशे मस्त!पण काल्पनिक का? बर
पिशा मस्त. हे सत्यात उतरावे
छान!
ही घटना काल्पनिकच आहे हे मी
छान लिहिलं आहे. आवडलं
शब्दांवाचुन कळले सारे...शब्दांच्या पलिकडले
मस्त लिहीलय.
:)
:-)
मस्तं!
धन्यवाद!
वा वा.. पुन्हा पुन्हा भेटत