(घंटा हलवून बघ)
शब्दावरती रागावू नकोस
विचार करून बघ
झोपलेल्या मेंदूची
घंटा हलवून बघ
शेवाळलेल्या मनावरती
पूर्वग्रहाचे थर
इतिहास परंपरा जाऊ देत
वर्तमान घट्ट धर
अनुदान माफी काही नकोत
पीक ऑरगॅनिक लाव
तेव्हा तुला मिळेल
शहरी मॉलमधला भाव
दिसतो तसा नाही शहरी
स्वार्थी व मग्रूर
बळीराजाच्या दुःखासाठी
त्याचाही भरतो ऊर
देऊ नकोस टॅक्स मित्रा
तुझ्या शेतकी उत्पन्नापाई
भारताच्या भल्यासाठी
भलेही इंडिया टॅक्स वाही
धरू नकोस फास मित्रा
जरी निराशेची धग
डोळे उघडून खाटेशेजारील
बायका पोरांकडे बघ
चिंता नकोस करू मित्रा
श्रद्धेनं वारी घेवं
मध्यस्त काढून बाजूला
माल कस्टमरपुढे ठेव
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्त
पगो भैया
मस्त...
जोरदार
प्लस वण.. टू चाणक्य!
अजून
भारीच कविता की. जमलीय बरका.
वा !
जमलंय.
मस्तच
स्वतंत्र कविता म्हणून उत्तम
+१
हा कविता विभागात का नाही?
आवडली कविता.
मस्त हो...
कविता भावली.
एक नंबर राव.
कविता आवडली.
एक नंबर !