...ती गेली की क्षण क्षण युगांसारखा होतो, ती आली की सळसळत चैतन्य येते, आनंद येतो, जीवनात जान येते ! ,
अशी ही ‘ती’ म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून पहिलीच आहे नेहमी...!
आणि ती आहे वीज ! -- आजच्या युगातली एक जीवनावश्यक बाब.
जलसंपत्तीप्रमाणेच वीज ही राष्ट्रीय संपत्ती आहे. आता संपत्ती म्हटली की चोरीचा धोका आला ! आणि ही संपत्ती काही कडीकुलुपात ठेवता येत नाही. तेव्हा हिचे संरक्षण म्हणजे एक अवघड प्रकरण आहे.
विजेची चोरी हा गुन्हा आहे आणि त्याबद्दल फौजदारी केस आणि तुरुंगवाससुद्धा होऊ शकतो. तरीही याबद्दल एक प्रकारची बेफिकिरी दिसून येते. सर्वसाधारण पणे पश्चिम महाराष्ट्रापेक्षा पूर्वेकडे हे प्रमाण जास्त आहे. काही प्रतिष्ठित उद्योगधंदेसुद्धा वीज-चोरीसारख्या अनिष्ट गोष्टी सर्रास करताना आढळले आहेत.
वीज चोऱ्या पकडण्यासाठी खास पथके नियुक्त केलेली असतात. पूर्वेकडच्या भागात अशाच एका पथकाचे नियंत्रण करण्याची एकदा वेळ आली होती. तेव्हा विजेची चोरी करण्यात आणि ती पकडण्यातही किती कल्पकता असते हे बघायला मिळाले. त्यातले काही मजेदार किस्से.
भाग बरेचदा अनोळखी असे. पोलिसांचे जसे खबरे असतात, तसे आमचेही. हे खबरे म्हणजे लोकल माहितगार व्यक्ती. त्या त्या भागातल्या वायरमन लोकांना सर्वसाधारणपणे चोऱ्यावाले ठाऊक असत. पण त्यांनी चोरी पकडली तर नंतर त्या भागात काम करणे जिकिरीचे होई. म्हणून ते प्रत्यक्ष भाग न घेता आम्हाला मार्ग दाखवत. पुढे चोरी पकडली तरी ते तांत्रिकदृष्ट्या सिद्ध करणे फार तापदायक काम असे. डायरेक्ट मीटरमध्ये लुडबुड केलेली बरेचदा वरवर पाहणी करून दिसत नाही. मग मशीन लावून युनिटची तुलना केल्यावर फरक दिसे. त्यानंतर मीटर काढून सील करून त्यावर ग्राहक आणि साक्षीदाराची सही घेणे, ते व्यवस्थित सील करणे, तपासणीला पाठवणे, मग टेम्परिंग कन्फर्म झाल्यावर चोरीचा हिशेब काढणे इ. सोपस्कार होत. तत्पूर्वी ग्राहकाकडून अंदाजे फरकाची रक्कम भरून घ्यावी लागे. तिथेच मतभेद होत. वीज चोर काही केल्या सहकार्य करीत नसे. चोरी नेमकी कधीपासून सुरू होती, ते कळायला पुष्कळदा मार्ग नसे. मग कमीतकमी कालावधी म्हणजे सहा महिन्याच्या बिलाची फरक रक्कम काढून कोटेशन द्यायचे आणि रक्कम भरून घ्यायची. ही रक्कम ग्राहक काही केल्या मान्य करत नसे.
ग्रामीण भागात दादागिरी. ‘चोरी बिरी काही नाही, बिल भरणार नाय, कनेक्शन बंद करू देणार नाय’ ही भाषा. मग पोलिसांची मदत घ्यावी लागे. हजार लफडी.
एकदा एका घरात मीटरमध्ये गडबड आहे असे अनेक जणांकडून कळले होते. पण चेकिंगला गेले की घरमालकिणीला दुरूनच दिसे. मग ती पाळलेला कुत्रा मोकळा सोडे आणि आपण घरात जाऊन दार बंद करून बसे. कुत्रा वायरमन लोकांना कंपाउंडच्या आत येउच देत नसे. मग आमच्या वायरमनने एकदा गुंगीचे औषध घातलेले बिस्कीट आधीच कुत्र्याला चारले आणि मग मागील दाराने जाऊन चेकिंग केले. चोरी होतीच. मीटरमध्ये अंदाधुंद गडबड. मशीन लावायची गरजच पडली नाही. टेम्परिंग सरळ दिसत होते. सापडली ना चोरी न काय ? घरमालकीण कधी न ऐकलेल्या शिव्या देऊ लागली. पोलिसांचं नाव काढल्यावरच गप्प झाली.
असाच आणखी एक किस्सा.
बऱ्याच दिवसापासून ही केस सस्पेक्टेड होती. दुमजली घर. मीटर जिन्यात अत्यंत अडचणीच्या ठिकाणी. तिथे उजेड बेतास बात होता. मीटर बघायला दिवसासुद्धा टॉर्च वापरावा लागे.
घरात बारा पंधरा माणसे. वर-खाली मिळून आठ-दहा खोल्या. आठ दहा ट्यूबलाईट्स, दोन फ्रीज, दोन टीव्ही,आणि इतर भरपूर वापर. पण बिल जेमतेम पन्नास युनिट्स. वायरमनला पक्की खात्री होती की चोरी आहे. पण मीटरच्या पारदर्शक कव्हरमधून टॉर्चच्या उजेडात काहीच संशयास्पद आढळत नव्हते. कुठे अन कशी गडबड केलीय तेच समजत नव्हते. बरं, जास्त तपास अन चिकित्सा करायचा प्रयत्न केला तर वायरमनचीच गचांडी धरली जाण्याची शक्यता.
मागच्याप्रमाणेच आम्ही तिघे चौघे सस्पेक्टेड स्पॉटवर गेलो. जाताना दुसऱ्याच भागातल्या वायरमनला बरोबर घेतले होते. मोठा टॉर्च बरोबर नेला होता. अडचणीच्या चिंचोळ्या जिन्यात आमचे पथक खाटखुट करू लागताच घरातले अन शेजारचे दहा-पाच मेंबर गोळा झाले अन आमचे अंधारातील कृष्णकृत्य (?) टाचा उंचावून उत्सुकतेने पाहू लागले.
नित्याप्रमाणे त्या भागातील नेहमीच्या वायरमनला पाचारण केले गेले. तो आल्यावर पहिले त्याची झाडाझडती. मग मुख्य काम सुरु झाले.
चोरी ओळखण्याची हमखास पद्धत म्हणजे मीटरचा मेनस्विच बंद करायचा अन मग घरातील लाईट्स अन विजेची उपकरणे एकामागोमाग एक सुरु करायची. एक जरी सुरु झाले, तरी चोरी आहे, हे निश्चित झाले. त्याप्रमाणे वायरमनला मेनस्विच बंद करण्यास फर्मावले आणि ट्रायल घेतली. मेनस्विच बंद असूनही वरच्या मजल्याच्या अर्ध्या भागातील सर्व लाईट्स आणि उपकरणे सुरूच होती !
म्हणजे चोरी आहे हे नक्की झाले. आता कुठून अन कशी ते शोधल्याशिवाय पंचनामा कसा करणार ? आम्ही पाच जणांनी मिळून डोळ्यात तेल घालून सगळे वायरिंग तपासले. घरातील वायर अन वायर पिंजून काढली. मीटर खालून वरून तपासले. पण छे ! कुठेच काही गडबड दिसेना. आता काय करावे ? चक्कीत जाळ झाला !
मग खाली जाऊन आम्ही डोक्याला डोकी लावली. पलीकडच्या भागातून बोलावून आणलेल्या वायरमनमामांनी युगत लढवली. आम्हाला डोळा मारला आणि शेजारीच रहात असलेल्या घरमालकाच्या पुतण्याला हाक मारून गल्लीच्या कोपऱ्यावर घेऊन गेले. आम्ही पलीकडच्या गल्लीतल्या हॉटेलात च्यापाणी करत बसलो.
इकडे पुतण्याला वायरमनने हॉटेलात नेऊन चहा पाजला आणि अघळपघळ गप्पा सोडल्या. चुलत्या-पुतण्यांचे काही बरे नव्हते, ही गोष्ट वायरमनमामांना ठाऊक होती. चहा पोटात गेल्यावर पुतण्या बोलता झाला. मीटरची मेख त्याला बरोब्बर माहिती होती.
लगेच मामा परतून आले आणि आम्हाला फोन मारला. गेलो.
परत बघे मंडळी जमा झाली. मामांनी खिशातून एक भक्कम चाकू काढला. मीटर अन भिंतीच्या मधल्या सापटीत टॉर्चचा झोत टाकला आणि चाकूचे पाते आत खुपसले. जsरा ताण दिला अन फट मोठी झाली. मग त्यांनी आम्हाला एकेकाला येऊन फटीत डोकवायला सांगितले. बघतो तर काय, त्या फटीतून एक केबल मीटरच्या बाहेरून थेट भिंतीत गेलेली दिसली. आमच्या खांबावरची केबल मीटरमध्ये जाण्यापूर्वीच तिला वाटा फुटल्या होत्या. भिंतीला बेमालूम आरपार भोक पाडले होते अन त्यातून ती केबल जिन्याच्या आधार-पाईपमध्ये अलगद शिरली होती ! आणि तिथून छुप-छुपके वरच्या अर्ध्या मजल्याला वीज पुरवत होती !
झाले. समोरच्या बघ्यांमधल्याच दोघांना पकडले आणि पंच बनवले. पंचनामा केला. मालकाची घाबरगुंडी उडालेली. त्याच्या सह्या घेतल्या. बिलाचे रेकॉर्ड काढून हिशेब केला आणि फरकाचे बिल काढून मालकाच्या हातात ठेवले.
या प्रकाशाची किंमत काही हजारात गेली होती !
(क्रमशः )
वाचन संख्या
34345
प्रतिक्रिया
108
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाचतेय. पुभाप्र
मस्त लेखन, पुढील भागाच्या
एनर्जीवर एकेकाळी काम केल्याने
ताई ते वायरमन करुन देतेत ते
अरे !
In reply to ताई ते वायरमन करुन देतेत ते by अभ्या..
ह्या ह्या, तोच आलेला विचारत.
In reply to अरे ! by सस्नेह
वाट पाहीन पण यष्टीनेच जाईन???
In reply to ह्या ह्या, तोच आलेला विचारत. by अभ्या..
नाई. कधी रेल्वे तर कधी बाईकने
In reply to वाट पाहीन पण यष्टीनेच जाईन??? by उडन खटोला
रोचक
चुंबकाने जुन्या प्रकारचे मिटर
In reply to रोचक by नाखु
रिमोटने अफेक्ट होणारी मीटर्स
In reply to चुंबकाने जुन्या प्रकारचे मिटर by मार्मिक गोडसे
काय एक एक लोक असतात?
येते की!
In reply to काय एक एक लोक असतात? by ज्ञानोबाचे पैजार
झकास!
In reply to येते की! by खेडूत
अन मोठ्या प्रमाणात केली तर विधानसभेत!याला म्हणतात शालजोडीतला!काही मंडळी चाळीस वर्षे मस्त
In reply to झकास! by बहुगुणी
हे हे !
In reply to काही मंडळी चाळीस वर्षे मस्त by खेडूत
बाब्बौ...भारीये
चांगला विषय व लेख.
हे हे..!
In reply to चांगला विषय व लेख. by मार्मिक गोडसे
वीजगळती त्याठिकाणच्या
In reply to चांगला विषय व लेख. by मार्मिक गोडसे
तथापि वीज गळतीच्या समप्रमाणात
In reply to वीजगळती त्याठिकाणच्या by सस्नेह
किती प्रमाणात वीजचोरी
In reply to तथापि वीज गळतीच्या समप्रमाणात by मार्मिक गोडसे
तथापि वीज गळतीच्या समप्रमाणात
In reply to वीजगळती त्याठिकाणच्या by सस्नेह
म्हणजे माझ्या आजुबाजुला कुणी
In reply to तथापि वीज गळतीच्या समप्रमाणात by स्रुजा
केवळ ग्राहकांना शिक्षा नको
In reply to वीजगळती त्याठिकाणच्या by सस्नेह
काय एकेक लोक तरी!
आकडे
In reply to काय एकेक लोक तरी! by पैसा
त्याला कतियाबाजी असा लय भारी शब्द आहे.
In reply to आकडे by सस्नेह
भारी किस्से. पुभाप्र.
खरं गरिब लोक इमानदारीने येईल
खरं तर वीज चोरीची खबर जो
बरोबर
In reply to खरं तर वीज चोरीची खबर जो by मार्मिक गोडसे
लिहीण्याची स्टाईल लै भारी.
दामिनी नाही हो
In reply to लिहीण्याची स्टाईल लै भारी. by मितभाषी
हाहाहा ते आहेच.
In reply to दामिनी नाही हो by सस्नेह
तुमि बि येमेशिबि मदे हाये?
In reply to हाहाहा ते आहेच. by मितभाषी
नाही.
In reply to तुमि बि येमेशिबि मदे हाये? by उडन खटोला
वेगळा विषय !!. भारी किस्से
व्वा
सालं अंदाजपंचे बील मारत गेले
In reply to व्वा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
यशो, महावितरणचे नवीन मोबाईल अ
In reply to सालं अंदाजपंचे बील मारत गेले by यशोधरा
धन्यवाद. ऍप डाउनलोडवले आहे.
In reply to यशो, महावितरणचे नवीन मोबाईल अ by सस्नेह
धन्यवाद. अॅप डाऊनलोड करते
In reply to यशो, महावितरणचे नवीन मोबाईल अ by सस्नेह
लगेच करते स्नेहाताई, धन्यवाद
In reply to यशो, महावितरणचे नवीन मोबाईल अ by सस्नेह
. पण चेकिंगला गेले की
सापडला. =))
In reply to . पण चेकिंगला गेले की by मितभाषी
=))
In reply to सापडला. =)) by मितभाषी
भारी किस्से आहेत एकेक.
अॅलिस्टर मक्लिनच्या " पॉवर
रिलायन्स चे प्रिपेड मिटर चालू
In reply to अॅलिस्टर मक्लिनच्या " पॉवर by जयन्त बा शिम्पि
महावितरणचेही प्रीपेड मीटर्स
In reply to अॅलिस्टर मक्लिनच्या " पॉवर by जयन्त बा शिम्पि
भारी किस्से आहेत. पण
चांगलंय. पण मुंब्र्यासारख्या
फक्त मुंब्रा नाही,भिवंडीतही
झक्कास...भारी किस्से
उत्सवांसाठी तात्पुरता मीटर
In reply to झक्कास...भारी किस्से by मयुरा गुप्ते
काही भागात एमेशिबिला गुंडाळून
भारी किस्से ! अश्या अनेक
किस्से भारी आहेत.
भारतात तीन लाख "कोटी"
त्या पंधरा लाखातून कापून घ्या
In reply to भारतात तीन लाख "कोटी" by सुबोध खरे
डांगे अण्णा
In reply to त्या पंधरा लाखातून कापून घ्या by संदीप डांगे
धन्यवाद, डॉक,
In reply to भारतात तीन लाख "कोटी" by सुबोध खरे
सुरक्षा ठेव
In reply to धन्यवाद, डॉक, by सस्नेह
fraud mhavitaran
चोरी प्रकाशाची (१)
कठीण आहे.
अज्ञानात सुख असतेनाहो तै.
कूल
In reply to अज्ञानात सुख असतेनाहो तै. by मितभाषी
एका वायरमने एका अडानी मुलीवर
मस्त लेखमाला...
अर्रर्रर्र असं पण करतात लोक्स
चांगला व माहितीपूर्ण लेख.
व्वा!
MSEB
नमस्कार !
In reply to MSEB by ससन्दीप
इतर परवानाधारक हवेत
In reply to नमस्कार ! by सस्नेह
३. घरात कुठे लिकेज आहे का हे
In reply to नमस्कार ! by सस्नेह
अधिक्रुत वायरमन कडून तपासून
In reply to ३. घरात कुठे लिकेज आहे का हे by शलभ
घरातील लीकेज म्हणजे काय?
In reply to अधिक्रुत वायरमन कडून तपासून by सस्नेह
वायर्स/ उपकरणे जुनी झालेली
In reply to घरातील लीकेज म्हणजे काय? by एस
सगळी उपकरणे बंद असताना देखील
In reply to घरातील लीकेज म्हणजे काय? by एस
स्टँडबाय मोड वरती वीज खर्च
In reply to सगळी उपकरणे बंद असताना देखील by चतुरंग
लिकेज पाहणे.
In reply to ३. घरात कुठे लिकेज आहे का हे by शलभ
आजच्या म.टा. तील ही
In reply to MSEB by ससन्दीप
१. बिलावरील फोटोतील रीडिंग
In reply to आजच्या म.टा. तील ही by मार्मिक गोडसे
नावावरुन धागा कैतरी आध्यात्मिक आहे अस वाटलं
आउर आनदो :)
कटियाबाज म्हणून एक
वेगळा विषय.