Skip to main content

पुतळा ( लघु कथा )

लेखक अमोल केळकर यांनी मंगळवार, 23/09/2008 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
पुतळा ------------------------------------------------------ ' साहेब ...' ' बोल ...' ' शासनाच्या प्रत्तेक निर्णयाला विरोध करायचा हीच आपली पक्षीय नीती आहे ना ? ' ' बरं ? मगं ? ' ' मग मुख्यमंत्र्यांच्या नव्या घोषणेचं आपण स्वागत आणि समर्थन कसं केलत ? ' ' कोणती घोषणा ? ' ' तीच ... शहरातल्या मध्यवर्ती भागात त्या राजनेत्याचा पुतळा उभा करण्याची ? आपण म्हणालात, की कुठल्या ही विधायक कार्यात आम्ही सत्याधार्‍यांच्या बाजूने राहू ! सत्ताधारी पक्षाला साथ देऊ ! ' ' अरे मूर्खा , पुतळा उभा करण्यासाठी वर्गणी गोळा करावी लागेल .' ' बरोबर ! ' ' या कामात आपण त्यांना मदत करु ! ' ' का ? ' ' म्हणजे वर्गणीचा काही भाग आपल्या खजिन्यात जाऊ शकेल !' ' हं ! हे ही बरोबर ! ' ' पुतळा उभा केल्यानंतर कुणी ना कुणी, कधी ना कधी , पुतळयाची विटंबना करणारच ! ' ' अं ...' '...... आणि तसं नाही झालंच, तर आपण ती व्यवस्था करु ... काय? ' पण का ? ' ' त्या निमित्याने शहरात दंगा होईल. जाळपोळ, लुटालुट होईल. मग काय, आपली चांदीच चांदी ... काय ?' ' खरंय साहेब ...'
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2880
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

हीपण झकास जमल्येय कथा! मस्त टोले हाणताय तुम्ही! येऊ द्या अजूनही! अदिती

कथेत विशेष जीवंतपणा आढळला नाही. कथाबिजाच्या अभावाने लिखाण सपक झाले आहे. पुढील कथेसाठी शुभेच्छा!

पण जरा लांबली आहे. "यू सेड इट" प्रकारचे मस्तपैकी व्यंगचित्र करण्यालायक कल्पना आहे. गल्ली-गुंड-छाप पुढारी त्याच्या बावळट पंटरला म्हणत आहे : "विरोधकाच्या पुतळ्यासाठी चंदा का गोळा करायचा विचारतोस? पुढे त्याला शेण फासायचा ऍडव्हान्स घेऊन ठेवलेलाय!!!" (मागे म्हटले की कथा फार तोकडी आहे. आता म्हणतो फार लांबली आहे. काहीतरी कुस्पटे काढायची - टीकाकार म्हणून माझे भविष्य उज्ज्वल आहे.)

आपल्या चांगल्या / वाईट प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

राजनेत्याचा पुतळा म्हणजे नक्की कोणाचा? राजनेते अनेक!राजचा तर नव्हे ना?

ही अतिलघुकथा आहे कां?