Skip to main content

(भेट तुझी अन नेट माझी)

लेखक रुपी यांनी शनिवार, 23/07/2016 04:44 या दिवशी प्रकाशित केले.
बागेत काही 'खारी' अशा येतात, कि त्यांचा धुमाकूळ किंवा खादाडी खूपच कमी वेळेची असते... काही सेकंदाची, फार-फार तर एक-दोन मिनिटांची... पण त्या आपल्या फळांवर खूप खोल दात मारुन जातात.. कुठे कुठे केर करुन जातात... आणि नंतर तुम्हाला ती फळे टाकून देताना परत-परत आठवत राहतात :/ :/ मी त्या वेळी घराच्या दुसर्‍या मजल्यावर होते... लोणी कढवून तूप बनवत होते... खिडकीतून 'बदामा'च्या झाडाच्या फांदीवर अशीच 'ती' (खार :/ ) मला नजरेस पडली... ती बहुधा तिथे रोजच येत असावी...इकडेतिकडे पहात होती... बदामवर बदाम फस्त करत होती ती... आमची नजरेला नजर झाली... पाच-दहा सेकं ती माझ्याशी काही तरी बोलली...नजरेने... बहुतेक मला खिजवले असेल :/ :/ आता माझी सटकली आणि मी पळत बाल्कनीत गेले.. नंतर ती मला कधीच भेटली नाही...पण अनेक वेळा तिचा तो चेहरा मला आठवत राहिला... अगदी मघाशी सफरचंदाच्या झाडावर जाळी टाकताना देखील !! (प्रेरणा)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2075
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

=))

-) मोनुला

In reply to by श्रीरंग_जोशी

हा हा :) प्रतिसाद चुकून एकदाच पडला ;)