✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्राणिसंग्रहलयांवर(zoo) बंदी घालावी काय?

ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी
Sat, 05/28/2016 - 16:41  ·  लेख
लेख
टोकीयोच्या प्राणी संग्रहलयामध्ये अत्यंत कमी जागेत आपले ६० वर्षांचे आयुष्य खर्ची घातलेल्या ट्राजिक हनाको या हत्तीणीचा एकाकीपणामुळे मृत्यु झाला आहे. ही हत्तीण दोन वर्षांची असताना तिला थायलंड ने जपान सरकारला भेट म्हणून दिले होते.तेव्हापासून ति काँक्रीटच्या एका छोट्या जागेत आपले आयुष्य व्यतीत करत होती.मुक्या प्राण्यांना अशी क्रूर जन्मठेप देणं ती ही माणसांच्या करमणूकीसाठी हे घृणास्पद कृत्य आहे. http://m.huffpost.com/us/entry/hanako-loneliest-elephant-dies_us_57475cb9e4b0dacf7ad46a3a?section=india आपण आज पासून ही शपथ घेऊयात की कोणत्याही प्राणी संग्रहलयाला आपण भेट देनार नाही, जिथे अत्यंत तोकड्या जागेत प्राणी डांबुण ठेवलेले दिसल्यास PETA वा तस्तम प्राणिमित्र संघटनांना निदर्शनास आणुन देऊ प्राण्यांनाही मन असते ,या भावनेतून अशी वागणुक कुठल्याच प्राण्याला देऊ नये फिशटॅंक मध्ये मासे पाळणे ,पिंजर्यात पक्षी पाळणे वा तत्सम क्रूर गोष्टी घरी आनू नयेत .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज

प्रतिक्रिया द्या
4860 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

तुमचे एकुण आयडी

प्रसाद_१९८२
Sat, 05/28/2016 - 17:59 नवीन
तुमचे एकुण आयडी आहेत तरी किती हो. "चंद्रनील मुल्हेरकर" हा आयडी उडाला बहुतेक तुमचा, इतक्या लवकर आयडी अ‍ॅप्रव्हुल तरी कसे होतात तुमचे. http://www.maayboli.com/node/58837 http://aisiakshare.com/node/5202
  • Log in or register to post comments

मला वाटत

रुस्तम
Sun, 05/29/2016 - 00:26 नवीन
मला वाटत ते 10 12 आयडी साठी रिक्वेस्ट टाकून ठेवत असतील. 1 आयडी ब्लॉक झाला कि नवीन रिक्वेस्ट टाकून 10 12 आयडी पैकी एखादा वापरत असावेत. जुना आयडी। ब्लॉक होई पर्यंत नविन आयडी तयार ☺
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

टर्बोचार्जड फिलॉसॉफर

भाते
Sun, 05/29/2016 - 11:05 नवीन
याचे सध्याचे मिपावय आहे १ वर्ष ६ महिने. म्हणजे दिड वर्षापुर्वीच याने हा आयडी घेतला होता. आधीचे वापरलेले अनेक आयडी बंद झाल्यावर हा न वापरलेले बाकीचे आयडी वापरतो. एकच लेख अनेक ठिकाणी टाकताना एकाच आयडीने ते सर्व स्थळावर टाकण्याची साधी काळजी सुध्दा न घेतल्याने मग तो पकडला जातो. अवांतर : सध्या पीएचडी करायचा विचार करतो आहे. 'एखाद्या संस्थळावर अनेक आयडी घेण्याचे फायदे तोटे' या विषयावर प्रबंध सादर करावा म्हणतो. स्वर्गीय नाना आणि त्याचे डझनभर डूआयडी मार्गदर्शक असताना प्रबंध लिहिणे सहज सोपे जाईल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

नानासाहेब परत परत आलेले

श्रीगुरुजी
Sun, 05/29/2016 - 19:17 नवीन
नानासाहेब परत परत आलेले दिसताहेत. नानासाहेब नेफळे हा आयडी डिलीट झाल्यावर हे काकासाहेब केंजळे या आयडीने मिपावर वावरायला लागले. जेव्हा काकासाहेब केंजळे हा आयडी पहिल्यांदाच बघितला तेव्हा त्याचे वय पाहिले आणि आयडीचे वय २ वर्षे बघून थक्क झालो होतो. हे रोज २-३ नवीन आयडींची रिक्वेस्ट देतात असं दिसतंय आणि यांच्या स्टॉकमध्ये कोणत्याही दिवशी १०-१२ तयार आयडी असतात. एक गेला की लगेच स्टॉकमधला पुढचा आयडी पोतडीतून बाहेर येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते

गुरुजी धन्य्वाद

नाखु
Mon, 05/30/2016 - 09:23 नवीन
पण त्याचं असं आहेना की नव्या अवतारातील पापांचा हिशेब नव्याने धरला जात असल्याने शंभर होईपर्यंत काही होत नाही,मुल्हेरकर प्रकरणात हातोहात दिसले आहे. यांचे अत्ताशी कुठे ५-७ झाले असतील. सावध नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

एव्हढि सावध सुरवात करूनही

श्री गावसेना प्रमुख
Sat, 05/28/2016 - 18:46 नवीन
एव्हढि सावध सुरवात करूनही तुम्ही कसे काय ओळखले बुवा
  • Log in or register to post comments

लेख भले डू आयडीचा असेल

बोका-ए-आझम
Sat, 05/28/2016 - 18:56 नवीन
पण मुद्दा बरोबर आहे. पण झूंना भेट न देऊन हा प्रश्न सुटेल असं वाटत नाही. अशा अनास्थेचं कारण बहुसंख्य झू सरकारी मालकीचे असतात. ते PPP (Public Private Partnership) मध्ये चालवणं हा एक उपाय असू शकतो.
  • Log in or register to post comments

ओडिशा मधील नंदन कानन झुलॉजिकल

नाईकांचा बहिर्जी
Sat, 05/28/2016 - 21:32 नवीन
ओडिशा मधील नंदन कानन झुलॉजिकल पार्क सरकारी आहे का?? काही आईडिया आहे आपल्याला??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

कल्पना नाही

बोका-ए-आझम
Sun, 05/29/2016 - 12:31 नवीन
पण मुंबईतला राणीचा बाग सरकारी आहे आणि तिथली सरकारी अनास्था धन्यवाद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाईकांचा बहिर्जी

जिकडे फार चांगल्या रितीने

कंजूस
Sat, 05/28/2016 - 19:52 नवीन
जिकडे फार चांगल्या रितीने प्राणी संभाळतात ( ओस्ट्रेलिया वगैरे ) तिकडे पाठवा.वाघांनाही इतके छान ठेवले आहे आपल्यापेक्षा चांगले.
  • Log in or register to post comments

मस्तच धागा

भाते
Sat, 05/28/2016 - 20:16 नवीन
नानामाई आणि इतर… यांच्या डूआयडीच्या अश्याच महाटुकार धाग्याची मी वाट पहात होतो. :) शपथ? देनार? डांबुण? आनू? बेशुद्ध मराठी! जर तुला सरळ शुध्द मराठीत लिहिता येत नसेल तर मिपावर कशाला येतोस रे? संपादक मंडळ या डझनभर डूआयडीवर आतातरी काही कार्यवाही करणार आहे का???
  • Log in or register to post comments

मिपावर शुद्ध लेखन?

राही
Tue, 05/31/2016 - 16:30 नवीन
'मिपा'वर शुद्धलेखनाचा आग्रह? आपणांस 'मिपा'स्थापनेचा इतिहास माहीत नाही का? खरेच पूर्वीचे मिपा आता राहिले नाही. हर हर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते

:@

viraj thale
Sat, 05/28/2016 - 22:13 नवीन
:@
  • Log in or register to post comments

आधी चिकन मटण वगैरे.

चित्रगुप्त
Sat, 05/28/2016 - 22:18 नवीन
आधी सर्वजण चिकन मटणादि पदार्थ खाणे बंद करा, प्राणिसंग्रहालय ही फार दूरची गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments

पण आइडी मरतीलच कशाला?

कंजूस
Sun, 05/29/2016 - 14:05 नवीन
पण आइडी मरतीलच कशाला?
  • Log in or register to post comments

.मुक्या प्राण्यांना अशी क्रूर

मार्मिक गोडसे
Sun, 05/29/2016 - 14:48 नवीन
.मुक्या प्राण्यांना अशी क्रूर जन्मठेप देणं ती ही माणसांच्या करमणूकीसाठी हे घृणास्पद कृत्य आहे.
सहमत. जंगली प्राणी बघण्याची ज्या कोणाला हौस असेल अशांना सर्व सोयी सुविधायुक्त अशा बंद पिंजर्‍यात जंगलात ठेवावे, आपसूक जंगली प्राण्यांचे दर्शनही होइल व बंदिस्त प्राण्यांचे दु:खही समजेल
  • Log in or register to post comments

बरोबर, जंगलात जाऊनच प्राणी

sagarpdy
Mon, 05/30/2016 - 10:46 नवीन
बरोबर, जंगलात जाऊनच प्राणी पाहण्यात खरी मजा आहे. सर्पोद्यानात आळशी, हौदात पडून राहिलेले साप बघून झोप येते. ट्रेक करताना कधी चुकून साप दिसला कि जी फाटते त्यात खरी मजा आहे. [ज्युरासिक पार्क झालंच पाहिजे]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

प्राणिसंग्रहलयांवर बंदी घालावी काय?

दिगोचि
Sun, 05/29/2016 - 14:50 नवीन
याच विषयावर सिन्थेटिक जिनियस या नावाने पण एक धागा मायबोलि या सन्केतस्थळावर वाचला. म्हणून टर्बोचार्जड फिलॉसॉफर व सिन्थेटिक जिनियस ही एकच व्यक्ती असा माझा अन्दाज आहे. मला वाटते माझ्याप्रमाणे अनेक जण मिपा व माबो वाचत असतील मग असे दोन्ही ठिकाणी लिहून काय प्रतिसाद येतात त्यावरून वाचकान्चे काय मत आहे असा रिसर्च लेखकाला करायचा आहे का? असे असेल तर उत्तम. मी वाट पहात आहे.
  • Log in or register to post comments

वांझोटी चर्चा.

खालीमुंडी पाताळधुंडी
Mon, 05/30/2016 - 11:52 नवीन
वांझोटी चर्चा. भूतदया वगैरे ढोंग आहे,मनुष्य हा सुद्धा प्राणीच आहे,जो प्राणी बलशाली,बुद्धीमान असेल तो इतर प्राण्यांवर राज्य करेल त्या उक्तीप्रमाणेच आज आपण प्रगत प्राणी म्हणून वावरत आहोत आणि आपल्या मनोरंजनासाठी म्हणून आपण काही प्राणी कैद केले तर मला त्यात काही वावगं वाटत नाही. जंगलामध्ये माणूस गेल्यावर इतर प्राणी माणसावर दया दाखवत नाहीत,तर आपण का दाखवावी.
  • Log in or register to post comments

प्राणिसंग्रहालयांवर बंदी

एस
Mon, 05/30/2016 - 18:18 नवीन
प्राणिसंग्रहालयांवर बंदी घालावी का? - हो.
  • Log in or register to post comments

बंदी घालावी

पैसा
Tue, 05/31/2016 - 14:12 नवीन
प्राणीसंग्रहालयावर बंदी घालावी. आपल्याकडेही हल्लीच डॉ प्रकाश आमटे यांच्या वाघिणीच्या दुर्दैवी बछड्यांचा अंत केवळ प्राणीसंग्रहालयाच्या नालायक लोकांमुळे झाला होता.
  • Log in or register to post comments

सहमत. बंदी घालावी.

पद्मावति
Tue, 05/31/2016 - 15:59 नवीन
सहमत. बंदी घालावी. वाघ, सिंह, हत्ती यासारख्या रुबाबदार प्राण्यांना त्या पिंजरयांमधे बघवत नाही. पक्ष्यांनाही पिंजरयात डांबणे हा तर क्रूरतेचा कळस. त्यापेक्षा अभयारण्ये वाढविण्याकडे भर द्यावा.
  • Log in or register to post comments

@पद्मावती ,सहमत

टर्बोचार्जड फिलॉसॉफर
Tue, 05/31/2016 - 16:23 नवीन
@पद्मावती ,सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

सहमत, बंदी घालावी..

ब़जरबट्टू
Tue, 05/31/2016 - 16:57 नवीन
नुकतीच ही बातमी बघितली.. http://www.mirror.co.uk/news/world-news/astonishing-new-footage-shows-gorilla-८०८२१६८ माणसाच्या चुकेमुळे एका गोरिल्ल्याचा हकनाक बळी गेला.. :( तुम्हीच राव त्यांच्या जागेत अतिक्रमण करताय, तुम्हीच गोळ्या घालताय, खुप वाईट वाटले.
  • Log in or register to post comments

आयला..

ब़जरबट्टू
Tue, 05/31/2016 - 16:59 नवीन
http://www.mirror.co.uk/news/world-news/astonishing-new-footage-shows-gorilla-8082168
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू

आई..गं. अतिशय दुर्दैवी घटना.

पद्मावति
Tue, 05/31/2016 - 18:42 नवीन
आई..गं. अतिशय दुर्दैवी घटना. वीडियो वरुन तरी असे वाटतंय की तो गोरिल्ला हिंसक झाला नव्हता. लोकांच्या किंचाळल्याने तो गोंधळून गेला बुहुतेक आणि त्या मुलाला स्वत:बरोबर सुरक्षित जागी घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असावा. त्याला गोळ्या घालण्याच्या ऐवजी स्टन गन नी बेशुद्ध पाडलं असतं तर?.. असा विचार मनात आला.
  • Log in or register to post comments

हो,

ब़जरबट्टू
Wed, 06/01/2016 - 10:42 नवीन
तसा विचार केला गेला प्राणीसंन्ग्रहातर्फे, पण गोरिल्ला पुर्ण बेशुध्द होण्यासाठी ३० मिनिटे लागली असती, व या प्रक्रियेत तो हिंसक होउ नये, म्हणून हा निर्णय घेतल्या गेला. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा