Skip to main content

मला गुरू भेटला!...

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 08/01/2016 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
गुरुचे कोणत्याही रूपात दर्शन होते. म्हणजे, जटाभस्मांकित किंवा मस्तकामागे तेजोवलयांकित, गळाभर माळा, भाळी चंदनाचा टिळा, असेच गुरूचे रूप असले पाहिजे असे नाही... जगातली, आसपासची चल वा अचल, सजीव वा निर्जीव वस्तूदेखील आपल्याला गुरुमंत्र देऊन जाते. फक्त त्याच्या आकलनाची शक्ती हवी! ***-****-**** आज मी प्रयोगादाखल गुरुशोध सुरू केला, आणि माझ्याच मनातले हे माझे विचार मला तंतोतंत पटले. .... मी विचार करत बसलो होतो. नजर निरुद्देशपणे जमिनीवर स्थिर होती. तितक्यात एक मुंगी समोर आली. मला माझा विचार आठवला. मुंगीच्या रूपाने गुरूच तर समोर आला नसेल? मी मनाशी हसलो. विचार झटकून टाकला. ... आणि चाळा म्हणून, मुंगीची वाट बोटाने अडविली. क्षणभर मुंगी बावरली. एका जागी थांबली. मग तिने वाट बदलून पुढे जायचा प्रयत्न सुरू केला. ... मी पुन्हा बोट आडवे घालून तिचा तो रस्ताही अडवला. ती पुन्हा बाजूला वळली. मी पुन्हा तिचा रस्ता रोखला. असं खूपदा झालं. आता मला मुंगीची गंमत वाटू लागली होती. आमचा रस्ता रोकोचा खेळही रंगात आला होता. तेवढ्यात मला एक गोष्ट मनात चमकली. ... या एवढ्या अडथळ्यांनंतरही, मुंगी पुढे जाण्यासाठीच धडपडत होती! ती माघारी फिरली नव्हती. ... मग पुन्हा मी तिचा रस्ता अडवला. आता मुंगीने तिची सारी ताकद पणाला लावून माझ्या बोटाला चावा घेतला होता... तरीही मी बोट बाजूला केले नाही. ... अखेर तिचा नाईलाज झाला. ती चक्क बोटावर चढली, आणि बोटाचा अडथळा पार करून, ओलांडून पलीकडे गेली. शांतपणे तिने तिचा मार्ग पकडला होता! ***-****-*** असा, कोणत्याही रूपात भेटणारा गुरूदेखील आपल्या वागण्यातून, कृतीतून, दृष्टान्त देत असावा, असा आणखी एक विचार माझ्या मनात आला! गुरुमुंगीच्या भेटीतून मला माझेच विचार मनोमन पटले! मी क्षणभर डोळे मिटले.मुंगीला मनोमन नमस्कार केला. ती मुंगी हसते आहे, असा मला मिटल्या डोळ्यापुढे भासही झाला. मी डोळे उघडले. समोर, आसपास, कुठेच ती मुंगी दिसत नव्हती! ****-*** तिने दिलेला दृष्टान्त मात्र, मनावर ठसला! ... आपल्या वाटेवर कितीही अडथळे आले, तरी माघार घ्यायची नाही.आधी सामोपचाराने घ्यायचे, नाहीच, तर, इंगाही दाखवायचा, त्यानेही जमले नाही, तर सरळ अडथळे ओलांडून पुढे जायचे! ... गुरुमुंगीला प्रणाम! आता पुढचा गुरू कोणत्या रूपात भेटतो, याची उत्सुकता आहे!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4878
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

पटलं, आवडलं..

In reply to by विवेक ठाकूर

साप समोर आला तरी घाबरायचं नाही.. ते पिक्चर, सिरीयल मध्ये दाखवतात तसं करायचं, शांतपणे गुढघे टेकून बसायचं, डोळे मिटायचे आणि हात जोडायचे. साप आल्या रस्त्याने निघून जाईल :)

In reply to by सस्नेह

मोस्ट रेव्हरंडा गुरुद्येवा तेच याबद्दल आम्हाला यत्किंचितही संदेह नाही! गाढवाला विचारा पाहिजे तर ;)

नगिना, नागिन या सिनेमांतील बिनवरील संगीत ऐकून थिएटरमध्ये नाग , साप शिरले व डोलू लागले असे सांगतात .

दत्ताला २४ गुरू होते ना ? कुणी सांगू शकेल का कोणते ते ? त्यापैकी मुंगी, मधमाशी होते बहुतेक .

मिपा सदस्यांच्या प्रतिक्रिया/प्रतिसाद खूप बोलके, चोखंदळ, अभिरुचीपूर्ण आणि मार्गदर्शक आहेत. लेखनास प्रेरणा मिळावी अशाही आहेत. धन्यवाद

गुरुविण कोण दाखविल वाट असे म्हणतात पण चालणार्‍या गुरुची वाट तुम्ही अडवल्यावर त्याने बरा धडा शिकिवला. ;)

जे लोक अहन्कारी पणे सुयोग्य गुरुला शारन जात नाहित ते लोक याप्रकारे पळ्वाट शोधतात.