गुरुचे कोणत्याही रूपात दर्शन होते. म्हणजे, जटाभस्मांकित किंवा मस्तकामागे तेजोवलयांकित, गळाभर माळा, भाळी चंदनाचा टिळा, असेच गुरूचे रूप असले पाहिजे असे नाही...
जगातली, आसपासची चल वा अचल, सजीव वा निर्जीव वस्तूदेखील आपल्याला गुरुमंत्र देऊन जाते.
फक्त त्याच्या आकलनाची शक्ती हवी!
***-****-****
आज मी प्रयोगादाखल गुरुशोध सुरू केला, आणि माझ्याच मनातले हे माझे विचार मला तंतोतंत पटले.
.... मी विचार करत बसलो होतो. नजर निरुद्देशपणे जमिनीवर स्थिर होती.
तितक्यात एक मुंगी समोर आली. मला माझा विचार आठवला.
मुंगीच्या रूपाने गुरूच तर समोर आला नसेल?
मी मनाशी हसलो. विचार झटकून टाकला.
... आणि चाळा म्हणून, मुंगीची वाट बोटाने अडविली.
क्षणभर मुंगी बावरली. एका जागी थांबली. मग तिने वाट बदलून पुढे जायचा प्रयत्न सुरू केला.
... मी पुन्हा बोट आडवे घालून तिचा तो रस्ताही अडवला.
ती पुन्हा बाजूला वळली. मी पुन्हा तिचा रस्ता रोखला.
असं खूपदा झालं. आता मला मुंगीची गंमत वाटू लागली होती. आमचा रस्ता रोकोचा खेळही रंगात आला होता.
तेवढ्यात मला एक गोष्ट मनात चमकली.
... या एवढ्या अडथळ्यांनंतरही, मुंगी पुढे जाण्यासाठीच धडपडत होती!
ती माघारी फिरली नव्हती.
... मग पुन्हा मी तिचा रस्ता अडवला.
आता मुंगीने तिची सारी ताकद पणाला लावून माझ्या बोटाला चावा घेतला होता...
तरीही मी बोट बाजूला केले नाही.
... अखेर तिचा नाईलाज झाला. ती चक्क बोटावर चढली, आणि बोटाचा अडथळा पार करून, ओलांडून पलीकडे गेली.
शांतपणे तिने तिचा मार्ग पकडला होता!
***-****-***
असा, कोणत्याही रूपात भेटणारा गुरूदेखील आपल्या वागण्यातून, कृतीतून, दृष्टान्त देत असावा, असा आणखी एक विचार माझ्या मनात आला!
गुरुमुंगीच्या भेटीतून मला माझेच विचार मनोमन पटले!
मी क्षणभर डोळे मिटले.मुंगीला मनोमन नमस्कार केला.
ती मुंगी हसते आहे, असा मला मिटल्या डोळ्यापुढे भासही झाला.
मी डोळे उघडले. समोर, आसपास, कुठेच ती मुंगी दिसत नव्हती!
****-***
तिने दिलेला दृष्टान्त मात्र, मनावर ठसला!
... आपल्या वाटेवर कितीही अडथळे आले, तरी माघार घ्यायची नाही.आधी सामोपचाराने घ्यायचे, नाहीच, तर, इंगाही दाखवायचा, त्यानेही जमले नाही, तर सरळ अडथळे ओलांडून पुढे जायचे!
... गुरुमुंगीला प्रणाम!
आता पुढचा गुरू कोणत्या रूपात भेटतो, याची उत्सुकता आहे!
वाचने
4878
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
तुमचं बोट कसंय मग आता?
+१
In reply to तुमचं बोट कसंय मग आता? by एस
हा हा
In reply to तुमचं बोट कसंय मग आता? by एस
बरं साप समोर आला नाही!
सोप्पंय,
In reply to बरं साप समोर आला नाही! by विवेक ठाकूर
तन डोले मेरा मन डोले गाणं म्हणून
In reply to सोप्पंय, by नीलमोहर
=)) काय खवचटपणा!!
In reply to बरं साप समोर आला नाही! by विवेक ठाकूर
.
In reply to =)) काय खवचटपणा!! by असंका
म्हणजे नाहीएत असं म्हणायचं
In reply to . by सस्नेह
ते
In reply to म्हणजे नाहीएत असं म्हणायचं by अजया
मोस्ट रेव्हरंडा गुरुद्येवा
In reply to ते by सस्नेह
गुरुला गाढव साक्षी =))
In reply to मोस्ट रेव्हरंडा गुरुद्येवा by अजया
नगिना
गुरु मुंगी कुठे चालली होती बरे?
गुरूकुलात!
दत्ताला २४ गुरू होते ना ?
.
In reply to दत्ताला २४ गुरू होते ना ? by उगा काहितरीच
धन्यवाद
तुमच्या पत्रकारितेतील
चांगला प्रयत्न
कुणाचा ?
In reply to चांगला प्रयत्न by कविता१९७८
दोघान्चा :)
In reply to कुणाचा ? by सस्नेह
गुरु आवडला.
गुरुविण कोण दाखविल वाट असे
गुरु
गुरुविण कोण लावितो वाट? आठवले