Skip to main content

गुणी बाळ

गुणी बाळ

Published on 30/12/2015 - 16:02 प्रकाशित मुखपृष्ठ
आज जरा उशिराच जाग आली. अरे बापरे ! ८ वाजले. मी कधीच इतक्या उशिरापर्यन्त झोपून रहात नाही. कारण मी गुणी बाळ आहे. आजकाल मी स्वतः आपल्या हातने ब्रश करतो, स्वतःचं सगळं आवरतो. आईला किती कौतुक वाटतं माझं! माझी खोली आवरणं, कपाट आवरणं, बाहेर जाताना माझ्या सगळ्या गोष्टी घेणं हे आता खरं तर स्वतःचं स्वतः करण्याइतका मोठा झालोय मी. पण आईला ते पटतच नाही. खरच मोठा झालोय मी आता. असो. पटापट आवरुन खाली नाश्त्याला जावं; नाहीतर तो भरवायला कोणीतरी वरती माझ्या खोलीत यायचं. आमचा गोतावळा खूप मोठा. घरात माणसंच माणसं. आई, काकू, काका, मावशी, आत्या अगदी सगळेच्या सगळे. पण कोणालाच मी मोठा झालोय हे पटत नाही. आता आवरुन लौकर ऑफिसला जावं. नाहीतर बायको खालून आवाज देईल. हो मी ऑफिसला जातो आणि माझं लग्नही झालंय. म्हणलं ना मी मोठा झालोय! आज ऑफिसमध्ये जाऊन खूप लोकांसमोर फिलॉसॉफिकल लेक्चर्स झाडायची आहेत, त्यांना कुटुम्बाचं महत्त्व पटवून द्यायचं आहे. मग ते लोक माझं कौतुक करतील. करणारच ना. मी आहेच्चे गुणी बाळ! बाकी तसं फार काम नसतं मला ऑफिसमध्ये. माझा स्वतःचा बिजनेस असला म्हणून काय झालं ! हो..माझा बिजनेस आहे. आहे की नाही मी गुणी बाळ? आईचा खालून आवाज आला. आता एवढी माणसं आहेत घरात ; पण सगळ्यांच्या IQ ची बेरीज केली तरी ती माझ्या बायकोच्या आईच्या IQ पेक्षा कमीच येईल. पण मी असा विचार करु शकत नाही. गुणी बाळ आहे मी! बायको वरती यायला लागली आहे. ती सुद्धा आमच्या घरात अगदी शोभेल अशी आहे. गोडगोड वागणारी, आदर्शवादी, बावळट.. पण मी नाही असं काही म्हणणार. मी अगदी गुणी बाळ आहे. आता तर मलाही एक गुणी बाळ होणार आहे. फक्त कधी ते माहीत नाही. असो. दाराबाहेरुन आवाज आला. "श्री दार उघड. काय करतोयेस एवढा वेळ ?" "काही नाही गं..तू किती हुशार आहेस असा विचार करत होतो.." तर तिने तिचा पेटन्ट डायलॉग मारला "काहीही हां श्री"!!! -मीनल
लेखनप्रकार

याद्या 5855
प्रतिक्रिया 34

पण सगळ्यांच्या IQ ची बेरीज केली तरी ती माझ्या बायकोच्या आईच्या IQ पेक्षा कमीच येईल. पण मी असा विचार करु शकत नाही. हॅ.हॅ.हॅ... ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- नटसम्राट... { असा नट होणे नाही ! }

In reply to by नाखु

गेली कित्येक वर्षे मी वेड्या खोख्यात डोके घालून बसत नाही आणि हिंदी सिनेमे बघण्याचे बौद्धिक, शारिरीक आणि आर्थिक कष्ट पण घेत नाही. त्यामुळे वरील विषयाला आपला पास. बाद्वे, वेड्या खोक्यात डोके न घातल्याने आणि हिंदी सिनेमे न बघीतल्याने, बराच वेळ मिळतो, असे आमचे म्हणतात.ते काही खोटे नाही.

In reply to by मुक्त विहारि

"बाद्वे, वेड्या खोक्यात डोके न घातल्याने आणि हिंदी सिनेमे न बघीतल्याने, बराच वेळ मिळतो, असे आमचे म्हणतात." बाद्वे, वेड्या खोक्यात डोके न घातल्याने आणि हिंदी सिनेमे न बघीतल्याने, बराच वेळ मिळतो, असे आमचे "बाबा महाराज" म्हणतात.

In reply to by मुक्त विहारि

अज्ञानात सुख असतं. तुम्हाला असेच सुख लाभत राहो... माझ्या नशिबाने मी या मालिकेचे पोस्टरही पाहिलेले नाही.

In reply to by मुक्त विहारि

रोज [सोम ते शनी ] रात्रो आठ वाजता z मराठी वाहिनी tv वर लाऊन- अर्धा तास -बसल्यास असले लिखाण आनंद देऊ शकते लिखाणाचा आनंद टाळावा आमचा अनाहूत सल्ला

बा द वे तुम्ही ईन्ग्रजीतले मीन की मराठीतले??

शेवटच्या ट्विस्टकरिता ★★★☆☆ तीन स्टार

काहीही हं मीनल !!! असो. २३ जानेवारी नंतर गुणी बाळ आणी त्याच्या घरातली सर्व गोड गोड माणसे दिसणार नाहीत असे वाटतेय.