नमस्कार मंडळी,
शशक स्पर्धा, श्री गणेश लेखमाला अशा यशस्वी उपक्रमांनंतर आम्ही घेऊन येत आहोत : विज्ञान लेखमाला. आधीच्या दोन उपक्रमांप्रमाणेच याही उपक्रमाला तुमच्या सहभागाशिवाय शोभा येणार नाही. तुमच्या भरघोस आणि उत्साही प्रतिसादाची आस धरून आज आम्ही ही घोषणा करत आहोत. जगभरातले शास्त्रज्ञ, भारतीय विज्ञान परंपरा, वहिवाटीपेक्षा वेगळ्या विज्ञान कक्षा, विज्ञानातल्या गंमतीजंमती अशा अनेक विविध विषयांवर आम्हाला लेखन अपेक्षित आहे. लेखमालेचा पहिला लेख २६ जानेवारीला प्रकाशित होईल आणि लेख येण्याची शेवटची मुदत असेल १५ जानेवारी.
आलेल्या प्रवेशिकांमधून लेख निवडण्याचं काम सासं मंडळ करेल. जे लेख निवडले जाणार नाहीत, त्यांना नेहमीप्रमाणेच मेन बोर्डाचं व्यासपीठ खुलं असेल. जास्तीत जास्त लेख घ्यायचा आमचा प्रयत्न राहील. प्रवेशिका आल्यावर त्याची पोच म्हणून आम्ही लेखकाला एक व्यनि करू. तुम्हाला व्यनि न आल्यास सासंमंला विचारणा करावी, म्हणजे प्रवेशिका पोहोचली नाही असं होणार नाही.
या वेळी आम्ही एक गुगल फॉर्म बनवला आहे. इच्छुकांनी या प्रवेशिका आधी भरून द्याव्यात, जेणेकरून आम्हाला फॉलो अप घेणं, लेखमालेच्या आवाक्याचा अंदाज येणं, त्यासाठी अनुक्रमणिका बनवणं इत्यादी कामांना सुरुवात करता येईल. या प्रवेशिकांची अंतिम मुदत आहे २७ डिसेंबर.
लेख पाठवताना ते साहित्य संपादक या आयडीवर व्यनि करून पाठवावेत.
गुगल फॉर्म या दुव्यावर बघता येईल.
विषयांची यादी फॉर्ममध्येदेखील बघता येईल, शिवाय इथेही डकवली आहे.
१. प्राचीन आणि अर्वाचीन ऋषी (वैज्ञानिक आणि त्यांच्या सुरस कथा)
२. आर्यभट्टाचे वारस (भारतीय विज्ञान परंपरा - आयुर्वेद, खगोलशास्त्र, गणित, सर्व प्रकारचे संशोधक)
३. विज्ञान सूक्त (मूलभूत विज्ञान संशोधनावरील (Pure science researchवरील) लेख प्रामुख्याने यावेत. astrophysics, chemistry, geology, maths, material sciences, oceanography, operations research, physics, statistics, agricultural science, biochemistry, bioinformatics, biomedical science / engineering, biophysics, biotechnology, botany and environmental science)
४. विज्ञानस्य कथा : (खुसखुशीत माहिती, विज्ञानातील गमतीजमती - उदा. चार्ल्स गुडइयरला लागलेला व्हल्कनाइज्ड रबरचा शोध, केक्युलेला स्वप्नामध्ये सापांची रिंग दिसल्यामुळे लागलेला बेन्झीन रिंगचा शोध इ. असे, पण काहीसे अप्रसिद्ध. सेरेंडिपिटीने लागलेले शोध वगैरे.)
५. हे माहीत आहे का? (सर्वसामान्यांना फारसे माहीत नसलेले विषय - उदा. 'इथॉलॉजी' (Ethology - प्राण्यांचं स्वभावशास्त्र)
६. समांतर वैज्ञानिक (विज्ञानप्रसार करणार्या व्यक्ती-संस्थांबद्दल - उदा. अरविंद गुप्ता, मराठी विज्ञान परिषद, TIFRचा 'Chai & Why' उपक्रम इ,)
७. राष्ट्र उभारणीसाठी विज्ञान
८. विज्ञानाचा भस्मासूर (वैज्ञानिक शोधांचे विध्वंसक उपयोग, उदा: अणुबाँब)
९. अद्भुत विज्ञान (पिरॅमिड्स, आश्चर्यचकित करणारी काही वास्तुशिल्पं, काही घटना, काही शोध इ.)
१०. इतर
चला तर मंडळी, कामाला लागू या. एकाहून एक सरस आणि सकस लेखमाला आजवर आपल्यातल्या गुणी लेखकांच्या जिवावर मिपाने सादर केल्या. ही लेखमालादेखील त्याला अपवाद नाही.
तुमच्या भरघोस प्रतिसादांच्या प्रतीक्षेत,
- साहित्य संपादक मंडळ
| लेखनविषय: |
|---|
वाचने
13129
प्रतिक्रिया
70
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा! शुभेच्छा. नवीन
चांगला उपक्रम. शुभेच्छा.
In reply to वा! शुभेच्छा. नवीन by रातराणी
+१
In reply to चांगला उपक्रम. शुभेच्छा. by मार्मिक गोडसे
शुभेच्छा ! नवीन मेजवानी
उत्तम कल्पना आहे.
नक्कीच त्या शाखांमधलं
In reply to उत्तम कल्पना आहे. by आतिवास
पाकशास्त्र...
In reply to उत्तम कल्पना आहे. by आतिवास
स्वयंपाक घरातल्या विज्ञानाला
In reply to पाकशास्त्र... by प्रभाकर पेठकर
धन्यवाद.
In reply to स्वयंपाक घरातल्या विज्ञानाला by स्रुजा
अतिशय उत्तम उपक्रम..धन्यवाद.
एकाच विषयावर दोन लेख यायला
एकाच विषयावर दोन लेख जरी आले
In reply to एकाच विषयावर दोन लेख यायला by एस
नवीन मेजवानीच्या प्रतिक्षेत :) !!!
उत्तम उपक्रम ! हार्दीक
प्रोजेक्ट मेनेजमेंट
धन्यवाद. फक्त एक च छोटीशी
In reply to प्रोजेक्ट मेनेजमेंट by वॉल्टर व्हाईट
हे निवेदन आवडले. सुटसुटीत आणि
पिरा,
In reply to हे निवेदन आवडले. सुटसुटीत आणि by पिलीयन रायडर
अगं मला असं दिसतं क्लिकवलं की
In reply to पिरा, by सस्नेह
या वरच्या प्रतिसादातल्या
In reply to अगं मला असं दिसतं क्लिकवलं की by पिलीयन रायडर
हां!!! समजलं समजलं!!
In reply to या वरच्या प्रतिसादातल्या by सस्नेह
इतर ही कुणाला हा प्रश्न असला
In reply to हां!!! समजलं समजलं!! by पिलीयन रायडर
विज्ञान कथा = सायन्स फिक्शन
मराठी आणि इंग्रजीतल्या सायन्स
In reply to विज्ञान कथा = सायन्स फिक्शन by विजुभाऊ
सॉरी, पण सायन्स फिक्शन चालेल
In reply to मराठी आणि इंग्रजीतल्या सायन्स by आदूबाळ
कथा स्पर्धेत चालेल. विज्ञान
In reply to सॉरी, पण सायन्स फिक्शन चालेल by गुलाम
उत्तम कल्पना !!
+11
छान.
छान
उत्तम
शुभेच्छा.
उत्तम कल्पना.....
लेखमालेस शुभेच्छा. प्रतीक्षेत
काल्पनिक आणि नवीनच्या
मी भ्रमणध्वनी वापरून मिपावर
२३८३५ )
In reply to मी भ्रमणध्वनी वापरून मिपावर by कैलासवासी सोन्याबापु
२३८३५
In reply to मी भ्रमणध्वनी वापरून मिपावर by कैलासवासी सोन्याबापु
मी भ्रमणध्वनी वापरून मिपावर
In reply to मी भ्रमणध्वनी वापरून मिपावर by कैलासवासी सोन्याबापु
आभारी आहे वल्ली जी अन यशोधरा
उपक्रम स्तुत्य आहे
शंका रास्त आहे
In reply to उपक्रम स्तुत्य आहे by पिवळा डांबिस
तसं तर कुठल्याच लेखमालेला
In reply to उपक्रम स्तुत्य आहे by पिवळा डांबिस
टायटल
In reply to उपक्रम स्तुत्य आहे by पिवळा डांबिस
बुफे/ पंगत कसंही येऊ द्या,
एखाद्या तंत्रज्ञानावर
तंत्रज्ञान आणि विज्ञान मध्ये
In reply to एखाद्या तंत्रज्ञानावर by अभ्या..
सुंदर कल्पना आहे.
27 December is close. Hurry!
चांगला उपक्रम. शुभेच्छा.
२७ डिस. फारच कमी दिवस आहेत.
२७ डिसेंबर ही
In reply to २७ डिस. फारच कमी दिवस आहेत. by मोगा
वा छान विशय
मंडळी, प्रवेशिका येऊन
चांगला उपक्रम
पाठवा, हरकत नाही. साहित्य
In reply to चांगला उपक्रम by Jack_Bauer
धन्यवाद
In reply to पाठवा, हरकत नाही. साहित्य by साहित्य संपादक
कृपया पोच द्यावी
In reply to पाठवा, हरकत नाही. साहित्य by साहित्य संपादक
लेख मिळाला आहे. उशिराबद्दल
In reply to कृपया पोच द्यावी by Jack_Bauer
माननीय साहित्य संपादक महोदय,
हरकत नाही बापु , उद्यापर्यंत
In reply to माननीय साहित्य संपादक महोदय, by कैलासवासी सोन्याबापु
खुप खुप आभार :) ___/\___
In reply to हरकत नाही बापु , उद्यापर्यंत by साहित्य संपादक
मी माझा लेख काल पाठवला आहे. क्रुपया मिळाल्याचा व्यनि करावा.
लेख मिळाला आहे, धन्यवाद.
In reply to मी माझा लेख काल पाठवला आहे. क्रुपया मिळाल्याचा व्यनि करावा. by शान्तिप्रिय
साहित्य संपादक महोदय,
विज्ञान/गणित आपण कॅालेजात
एक नक्की
हैय्य... अर्थशास्त्र विज्ञान
In reply to एक नक्की by चौकटराजा
अर्थशास्त्र
In reply to हैय्य... अर्थशास्त्र विज्ञान by आदूबाळ
एक सेल्फी अशी हि