Skip to main content

माया

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी मंगळवार, 13/10/2015 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
माई कितीतरी दिवस अंथरूणाला खिळलेल्या आहेत. शकू त्यंाची सेवा करतेय,त्यांचा हिडीसफिडीस पणा सहन करत. पण आज कदाचित शकू येणार नसावी,मनातल्या मनात त्या म्हणाल्या. “फोटू काडायला जायचंय सगळयानी ऊद्याच्याला,तांबडी साडी मातूर पायजे“ शेजारची कामवाली शकुला कांहींतरी सांगत होती. देव बसणार,उद्या पहिला दिवस, वार मंगळवार म्हणून लाल रंगाच्या पोषाखात कामवाल्या ग्रुपचा फोटो घेणार, आणि परवाच्याला पेपरात छापणार, “दुपारी दोन च्याला जायला पायजे“ त्यंाची कुजबुज माईंच्या कानावर आली होती. पण शकू नेहमीप्रमाणं कामावर आली होती.नेहमीचंच जुनेरं अंगावर. “ तूला जायचं नाही?“ माई “कुटं?“ “वंदना बरोबर“ “तुमास्नी काय ठाव?“ “लांबड राहू दे, तुला जायचं कां नाही?“ “न्हाई“ “कां?“ “न्हाई“ “बांकीच्या?“ “जाणार हाईत“ “तू लवकर आवर“ “बर“ पण ती रेंगाळच राहिली.घड्याळात एकाचा ठोका झाला, तश्या माई बोलल्या,“ पूरे झालं काम शकू,ही किल्ली घे कपाटाची, आणि घे त्यातली एखादी चांगली लाल साडी हुडकून,आणि नंतर तूलाच ठेव ती,नाहीतर नंतर तुम्हालाचं फाडायच्या आहेत त्या , आमच्यात कोण साडी नेसतंय कांय?“ माईंचा तुसडेपणा शकुनं अनुभवला होता पण ही माया तिला नवीन होती. तिचे डोळे पाण्यानं भरून आले. .
लेखनविषय:

वाचने 2334
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया