Skip to main content

छि _ _

लेखक नीलमोहर यांनी शनिवार, 10/10/2015 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
छि _ ल, पचकन थुंकल्यासारखी ती शिवी त्याने दिली, एकदा... दोनदा... अनेकदा... मन भरेपर्यंत. तिथेच उभ्या असलेल्या मला ते ऐकून अंगावरून काहीतरी गिळगिळीत सरपटत गेल्यासारखं वाटत होतं. श्रीगणेश चतुर्थीच्या आदला दिवस. रस्त्यांवर भरपूर ट्रॅफिक, गोंधळ. इतर पर्याय नसल्याने आणि लांब जायचे असल्याने पीएमपीएमएलने प्रवास करावा लागणार होता. मनपाला बसमध्ये चढले, खचाखच गर्दी. आम्ही ४-५ जणी बसच्या डावीकडील बाजूस लेडीजना उभे राहण्यासाठी जागा असते तिथे थांबलो होतो, बस थोडी पुढे गेली असेल तोवर मागून तिघांचं एक टवाळ टोळकं धक्काबुक्की करत पुढे आलं. हिंदी भाषा बोलण्याच्या पध्दतीवरून वरून युपी-बिहारी वाटत होते, त्यातील एकाने भरपूर घेतली होती (सुवास पसरला होता), त्याला धड सरळ उभंही रहता येत नव्हतं, त्याचं विमान टेक-ऑफ करून ढगांपल्याड पोचलेलं सहज कळत होतं. हे लोक सरळ लेडिज जवळ येऊन रेलू लागले, अविर्भाव असा की बसच्या धक्क्यांमुळे चुकून तसं होतंय, आम्ही अजून डावीकडे सरकत होतो पण आता सरकायला जागाच नव्ह्ती. तिथल्या एका मुलीने गोडीत त्यांना पुरूषांच्या रांगेत उभे राहण्यास सांगितले, तेवढयापुरतं सरकल्यासारखं करून पुन्हा त्यांनी तोच प्रकार चालू ठेवला, बळेच धक्के देण्याचा. तो पायलट यात आघाडीवर होता. इतर लोक नेहमीप्रमाणे सोयिस्कररीत्या बघ्याची भूमिका घेऊन गंमत बघत होते. पुढचे एक आजोबा त्याला समज देत होते तर तो त्यांनाच बुढ्ढा क्या बक रहा है इ. अचकट विचकट शेरे मारायला लागला. अशावेळेस स्त्रिया जास्त बोलू शकत नाहीत कारण समोरचा चिडून काय करेल, बोलेल याचा नेम नसतो, त्यामुळे मी दुर्लक्ष करत होते, त्यांच्याकडे पूर्ण पाठ करून मध्ये बॅग घेऊन उभी राहिले होते. कुठे झाशीची राणी बनावं आणि कुठे शांत राहून दुर्लक्ष करावं हेही आपल्याला कळलं पाहिजे असं माझं सरळमार्गी मत. त्या मुलीलाही मी समजावत होते की सांगून सुधारणार्‍यांपैकी ते लोक नाहीत, उगीच नादी लागू नको, पण तीही हट्टाला पेटली होती. बोलता बोलताच तिने ओढणी पूर्ण चेहर्‍याला घट्ट बांधून घेतली होती, माझाही स्कार्फ होताच.( साध्याशा स्कार्फ मुळेही काहीवेळेस किती आश्वासक, सुरक्षित वाटतं ते अशा चेहर्‍यावर स्कार्फ, स्टोल इ. बांधणार्‍या मुलींना नावं ठेवणार्‍यांना कसं कळावं.) तो अजून बरळतच होता, खुदको मिस इंडिया समझती है, ये कोई लडकी है क्या.. काहीही फुटकळ कमेंट्स चालू होते. तीही चिडून त्याला धडा शिकवायच्या इराद्याने काही-बाही सुनावत होती. तेव्हाच कधीतरी डोकं सटकलेला तो शिवी देऊन मोकळा झाला.. छि _ ल, सा _ !! ................ ................ त्यानंतरही अजून काही बोलण्यासाठी, लक्ष वेधून घेण्यासाठी तो माझ्या हाताला स्पर्श करू पहात होता. मी आपल्याच संयमाची परिक्षा पाहत त्याच्याकडे ढुंकूनही न पाहता स्थितप्रज्ञ उभी.. त्यानंतर मात्र सगळ्यांनी आरडाओरडा सुरू केला आणि कंडक्टरला त्या तिघांना खाली उतरवण्यास भाग पाडले, एवढा वेळ मजा बघणार्‍या पब्लिकनेही आता त्यांना पुढे ढकलून उतरवले, एकदाची बस पुढे निघाली. ती मुलगी शेजारील मुलीला तिने अशा किती लोकांना कसं सरळ केलं त्याचे किस्से सांगू लागली होती. माझ्या कानात मात्र राहून राहून ती शिवी घुमत होती, अंगावर अ‍ॅसिड ओतल्यावर कसं वाटत असेल तसं काहीसं ते शब्द कानावर पडल्यावर वाटलं होतं.. याआधी फक्त चित्रपट, पुस्तके, टिव्ही इ.वर ऐकलेलं एवढया जवळून प्रत्यक्ष ऐकण्याचा अनुभव पहिलाच. इतकी वाईट शिवी देण्यामागे तसंच काही कारण असावं तर तेही नव्हतं.. कोणासाठी होती ती शिवी ? त्याला विरोध करणार्‍या त्या मुलीसाठी, माझ्यासाठी, बसमधील इतर महिलांसाठी ? पूर्ण स्त्रीजाती साठीच कदाचित.. काय नव्हतं त्या शिवीमध्ये ? राग, तिरस्कार, विखार, वासना ? सगळंच, त्याशिवायही अजून काही.. त्याच्यात आणि बाकी लोकांत असणार्‍या सामाजिक, आर्थिक, मानसिक, शैक्षणिक सर्वच बाबतीतील विषमतेमुळे आलेले, वर्षानुवर्षे साठलेले कुठले कुठले गंड त्या एका शिवीतून बाहेर पडले होते. त्या क्षणी मनात चमकून गेलं ते १६ डिसे, निर्भया प्रकरण. त्या घटनेनंतर, एक व्यक्ति दुसर्‍या व्यक्तिशी इतकं निर्दयी, कॄर, भावनाशून्य रित्या कसं वागू शकते हा प्रश्न कायम पडायचा, त्याचं उत्तर थोडंफार मिळाल्यासारखं वाटलं. दोन्ही घटनांमध्ये इतर काहीही समान नाही, फक्त एकच - मनोवृत्ती. वर्षानुवर्षे ठाकून ठोकून डोक्यात फिट्ट बसवलेली तीच ती टिपीकल पुरूषी मनोवृत्ती जी अशा लोकांमधे स्त्रियांबद्दल पराकोटीचा तिरस्कार उत्पन्न करते. स्त्रीयांना कायम तुच्छ, कमी लेखणारी, त्यांनी विरोध केलेला जराही न खपणारी मानसिकता. त्यांनी कायम घराच्या चार भिंतींआड रहावं, सदा सर्वकाळ कामाला जुंपून घ्यावं, काहीही बोललेलं, मारलेलंही चालवून घ्यावं, पुरूषांसमोर आवाज चढवू नये, बाहेर पडू नये, नौकरी करू नये, परपुरूषांशी बोलू नये, जास्त शिकू नये, जास्त बोलू नये, जास्त विचार सुध्दा करू नये.. एक ना दोन हजार बंधन घालणारी मानसिकता. अर्थात हे सरसकटीकरण नाही. समाजातील काही ठराविक वर्गांतील ठराविक लोकांचीच अशी मनोवृत्ती असेल. त्यावेळी मला अशा समाजात राहणार्‍या स्त्रियांसाठी वाईट वाटत होतं ज्यांच्यासाठी या आणि याहून वाईट शिव्या ऐकणे रोजचेच असेल, नेहमीच्याच शिव्या आणि मारहाणीने ज्यांच्या संवेदना बधीर झाल्या असतील. त्याचवेळी या विचाराने हायसं वाटत होतं की सुदैवाने आपला जन्म एका सुशिक्षित, सुसंस्कृत परिवारात झालाय, आपण अशा समाजात वावरतो जिथे साधारणपणे अशी प्रवृत्ती लांबपर्यंत दिसून येत नाही, जिथे आपल्याला हवे तसे जगण्याचे स्वातंत्र्य आहे. जिथे आपल्याला बर्‍यापैकी सन्मान मिळतो, कमी लेखलं जात नाही, जिथे पुरूष स्त्रियांबद्दल टोकाचे वाईट विचार करत नाहीत, जिथे सामान्यतः नवरे-बायकांना, मित्र-मैत्रिणींना, भाऊ-बहिणींना, पुरूष स्त्रियांना रिस्पेक्ट देतात,शिव्या नाही. म्हटलं तर ही एक किरकोळ घटना, पण डोक्यात खूप सारे विचार, त्रास, मनस्ताप देऊन गेली. अर्थात हा काही एकमेव प्रसंग नाही, असे अनेक नकोसे अनुभव येतच असतात, फक्त त्या एका शिवीमुळे हा अनुभव जास्त जिव्हारी लागला, एरवी चुकूनही कधी मनात येत नाही तो एक स्त्री असल्याबद्दलचा पश्चात्ताप एका क्षणापुरतं का होईना, जाणवून गेला.. इतकंच..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 31410
प्रतिक्रिया 225

प्रतिक्रिया

निमोताई, लेख पटला. त्रास होतोच हे असे वाचुन. अनेकांनी आवाज का उठवला नाही याबद्दल लिहिले आहे. प्राची अश्विनी म्हणतात तसे अनुभव अनेकींना असतीलही, पिराचे मुद्देही पटतात, विरोध करावा शक्य तेव्हा हे काही अंशी बरोबरही वाटते, पण म्हणुन हे सगळे सेफली हँडल होईल, निभावुन नेता येईल हेही खात्रीने सांगता येणार नाही. वर पिशीने जे लिहिले आहे, तसेही होते. स्रुजाने जे लिहिले आहे तशी मानसिकता होणे हे काही पुर्वीच्या अनुभवातुनही येऊ शकतं. किंवा एकदा विरोध करायला जमला नाही, म्हणजे लगेच कमजोर, अबला, एकटीला का जमत नाही विरोध करायला, असेही म्हणता येत नाही. रात्री दहा पर्यंत पिशीने पाठपुरावा केला, पण उत्तर काहीच आले नाही. पुढच्या वेळी उगाच कशाला वेळ घालवा, मलाही माझा अभ्यास आहे, परीक्षा आहे असा विचार तिने केला तर तो चुक ठरणार नाही. कधीतरी ही स्त्री कुणाची आई असते, जिला घरातली काळजी जास्त असल्याने इथे दुर्लक्ष करणे क्रमप्राप्त होते किंवा अजुन काही. ते त्या त्या वेळच्या प्रसंगानुसार बदलु शकतं. मुळात हे असे प्रसंग, कधी टोकाचे तर कधी नुसते धक्के, काहीतरी कमेंट्स असे प्रकार बहुतांशी मुली नेहमीच अनुभवत असतात. आणि त्यातुन या सगळ्याला चारदा विरोध करुनही पाचव्यांदा आता किती आणि काय बोलायचे असे वाटुन काही वेळा बाजुला होणे स्वाभाविक आहे. स्त्री आहोत म्हणुन असे नव्हे, तर इतर अनेक वेळा पुरुषही ही भुमिकाच स्विकारत असतात. गणपतीच्या वर्गणीसाठी गुंडांची मंडळे, राजकारण्यांनी अडवलेली कामे, सरकारी कामे इथपासुन तर अनेक बाबतीत, एकच प्रकार दहादा झाला तर तेवढ्यापुरते काहीही करुन काम पुर्ण करण्याकडेच कल असतो. आपला मध्यमवर्गीय समाज कातडीबचाव धोरणच स्विकारत असतो. आता ते प्रत्येक वेळी बरोबरच आहे असे नाही. विरोध करण्याची मनोवृत्ती वाढायला हवी, इतर पुरुषांकडुन मदतीपेक्षाही आपण आपले संरक्षण करण्यास स्त्रियांनी अधिकाधिक समर्थ व्हावे, मानसिक आणि शारिरीक क्षमता वाढवायला हवी या सगळ्याशी प्रचंड सहमत आहेच. पण वरच्या प्रसंगात मदत केली नाही म्हणुन धागाकर्तीने त्या प्रसंगी चूक केली असेही वाटत नाही.

In reply to by मधुरा देशपांडे

कधीतरी ही स्त्री कुणाची आई असते
...अगदी अगदी मधुरा..(डी.प्र.) शाळा, कॉलेज, नोकरी करतांना असले असंख्य अनुभव आलेत. पण ईथे लिहीतेय तो भयावह अनुभव आला तेंव्हा माझा तेंव्हा ३ वर्षांचा असलेला मुलगा माझ्या बरोबर होता. खरच सांगते, लहान मुल बरोबर असलं की स्त्री सगळ्यात हेल्पलेस असते. ईथे काही प्रतिसाद ,प्रतिकार का नाही केला, आवाज का नाही उठवला, आले असते की लोकं मदतीला ' या किंवा तत्सम अर्थाचे आहेत. (म्हणजे हाच अर्थ कदाचित निघत असावा...काय्ये की त्या प्रतिसादतील वाक्यरचना ईतकी क्लिष्ट आहे की बहुतेक हाच अर्थ असावा अशी मी समजुत करुन घेतली...:;)..) तर झालं होतं असं की, आमच्या स्टेशनवरून दुपारी लेडीज डब्ब्यात फारसं कोणी नसतं, आणी पुढलं स्टेशन १० मिनीटांवर, म्हणून मी माझ्या लहान मुलासकट जेंट्स डब्ब्यात बसले. लोकल सुटल्याबरोबर डब्ब्यात एक आडदांड शरीराचा, लाल तांबारलेल्या डोळ्यांचा फुल्ल टाईट माणुस चढला. माझ्या बाजूला अंतर ठ्वून तिसर्‍या सीट वर आणखीन एक जण होता. तर, दुसरीकडे जागा असुनही हा माणुस आमच्या अगदी मधे येऊन बसला. आणि लगेच खेटायला सुरुवात. मी घाबरून आजुबाजुला काही मदत पहायला लागले. पण अख्ख्या डब्ब्याने नजर चुकवली. आणि मी अजिब्बात त्यांना दोष देत नाही. ह्या गुंडाकडे चाकु, सुरा, कट्टा काहिही असण्याची शक्यता होती. असल्या जनावरांपुढे बाकी पुरुषही एका स्त्री ईतकेच हेल्पलेस असतात हे नक्की. खिडकीपाशी उभ्या असलेल्या मुलाला खसकन ओढून मी आमच्यामधे अक्षरशः चेपवुन बसवले. पुढच्या स्टेशनवर थोड्या अंतरावर मला पोलीसही दिसले. पण मुलाला घेऊन तिथपर्यंत पोचणं अशक्य होत. आणि मुलाला तिथे ठेवून जाणं तर मी शक्यच नव्हतं. टोटली हेल्पलेस.. त्या माणसाची हिम्मत आता वाढलेलीच होती. पुढच स्टेशन येण्या आधीच मी मुलाला अक्षरशः काखोटीला मारलं. आणि दाराकडे पळाले. तो माणुस पण मागोमाग आला. तिथे कमी लोक होते आणि तो माणुस अगदी माझ्या मागे आला. दरवाज्यात कॉलेजची मुलं उभी होती. ती पण बिचारी हा प्रकार पाहून घाबरून गेली. त्यावेळी मला जे आणी जसं सुचलं तशी मी वागले. तिथल्या एका मुलाचा हातात घट्ट धरून मी त्याला अगदी खेचतच दुसर्‍या दरवाजात घेऊन गेले. त्याला म्हणाले, 'तुला कुठेही जायच असो, तू आता या स्टेशनवर माझ्या बरोबर उतर आणि मला रीक्षा स्टँड पर्यंत घेऊन चल.' स्टेशन वर आम्ही चालत्या गाडीतुनच उतरलो आणी कसबसं पळत सुटलो. तो माणूसही आमच्या मागे शिव्या देत, घाण बोलत येत होताच. आम्ही रुळावर उडी मारली आणि अगदी काही पावलच पुढे गेलो तर या माणसाने एक मोठ्ठा दगड आम्च्या दिशेने फेकून मारला. पण ईतक्यात त्या रुळांवरुन फास्ट लोकल गेली आणि आम्ही वाचलो म्हणायचो. या माणसाला कसलाही प्रतिकार करणं मला अशक्यच होतं त्यातून लहान मुलगा बरोबर. किंबहुना प्रतिकार करणे वगैरे माझ्या मनातही आलं नाही. फक्त आणि फक्त माझ्या छोट्या मुलाची चिंताच माझ्या डोक्यात होती. आता विचार करुनही माझा थरकाप होतो की या प्रसंगात किती किती रिस्क घेतली होती मी, चालत्या गाडीतुन मुलासकट उतरणे, रुळांवरून गाडी न बघता पळणे. त्या कॉलेजीयन मुलाला तर अक्षरशः भरीलाच घातला होता. विशीचाच असावा तो ही. त्या क्षणापासून आजपर्यंत आणि यापुढेही भारतात पब्लीक ट्रान्स्पोर्ट ने प्रवास करणं मी सोडून दिलय. ह्या ईतक्या अनुभवांमुळे, जनरलाईझ न करता, पण मलाही वेल्लाभट, आणी बिका यांच्यासारखच म्हणावसं वाटतं.

In reply to by स्वप्नांची राणी

तर या माणसाने एक मोठ्ठा दगड आम्च्या दिशेने फेकून मारला.
अगदी फुलथ्रॉटल साहेबांची आठवण झाली. तसंच वर्णन, तसंच वर्तन.

स्रुजाचे मुद्दे जरी मला पटत असले (की का म्हणुन भानगडीत पडा.. त्यातुन पुढे काहिही वेळ येऊ शकते..) तरीही बसमध्ये जिथे ५० माणसं असतात तिथे जर एक मुलगी स्वतःहुन विरोध करत असेल तर आपण तिला नक्कीच सपोर्ट करायला हवा. चार पोरींनी मिळुन जरी आवाज वाढवला तरी फरक पडतो. "कशाला नादाला लागा" हा उपाय सर्वत्र अ‍ॅप्लिकेबल नाही. कधी कधी तो वापरावा लागतोच.. नो डाऊट. पण सार्वजनिक ठिकाणी तरी आवाज वाढवायलाच हवा. मुलींनी तरी मुलींना नेहमी सहकार्य करायलाच हवे. नाहीतर मग असल्या पुरुषांच फावणारच..

आता हे थोडेसे अवांतर होईल, पण तरीही वर आलेले मुद्दे बघता लिहावेसे वाटतेय. मिपा ही एक आंतरजालावरील जागा. आभासी जग. इथेच असणारा अनाहितांचा, अर्थात स्त्रियांचा एक ग्रुप, काही स्त्रिया ज्या अनाहिता सदस्य नाहीत आणि इथेच असणारे अनेक पुरुष आयडी हे सगळे इथले लोक. आता बघा, स्त्रियांसंबंधी कुठलाही लेख आला, की काय होते. काही जण संयमित प्रतिसाद देतात, स्त्रियांच्या विरोधातले काही असेल तर काही जणी शक्य तिथे विरोध करतात. मग काय होतं, एका स्त्रीने, जिने असा विरोध केला, तिच्याबाबत - १. डिफॉल्ट ती स्त्री आहे म्हणजे अनाहिता असणारच असं गृहित धरुन आल्या हाणाहिता, येतीलच आता, कंपुबाजीचे आरोप आणि बरंच काही सुरु होतं. २. तिला जी दुसरी स्त्री सपोर्ट देते, तिलाही मग तीच लेबल; तेच प्रतिप्रश्न, कंपुबाजीचा आरोप... ३. समजा दुसर्‍या एका स्त्रीने काही वेगळी मते मांडली, तर लगेच 'बघा कशा भांडतात' अशा कमेंट्स, म्हणजे दोन स्त्रियांनी एखाद्या मुद्द्यावर वेगळी मतं मांडली की समजायचे लगेच भांडण वगैरे... ४. काही स्पेसिफिक आयडींकडुन नवीन काड्या, फक्त गम्मत बघण्यासाठी, हे काही वेळा सरळ सरळ सांगितलेही जाते की बघा अनाहितांना कसे छळले, त्यावर इतरांच्याही सपोर्टिंग कमेंट्स इत्यादी. काही वेळा 'आम्ही कुठे काही बोललो' असे साळसुद आव आणले जातात, पण तेही ज्यांच्याबद्दल बोललं जातंय, त्यांना कळत असतंच. ५. अजुन काही वेगळे प्रकार, नवीन धागे आले की जुने मुद्दे बाजुला, पण तिथेही हाच प्रकार चालु या सगळ्यात अनाहिता, अथवा अनाहिताच्या सदस्य नसलेल्या स्त्रिया काही मुद्दे घेऊन विरोध करुन बघतात, पण ते सोडुन नवीनच मुद्दे घेऊन भांडणे उकरुन काढण्याचा काहींचा प्रयत्न दिसतो. आणि मग काय होतं, एका स्टेजला त्याही बाजुला होतात. कशाला उगाच वादात पडा असा विचार करुन. मग गम्मत बघणार्‍यांची चिडचिड होते, अजुन नवीन काड्या. हे चालुच राहतं, अशा कितिकशा वेळी इथले इतर पुरुष आयडी अनाहितांच्या बाजुने उभे राहुन त्या काड्या सारणार्‍यांना विरोध करु पाहतात? नाही, लगेच काही गैरसमज होऊ शकतील तेव्हा हे आधीच सांगते की मला किंवा कुणालाच इथे मिपावर मदतीची अपेक्षा नाहीये....हे फक्त उदाहरण म्हणुन दिले आहे. फक्त आवाज उठवला की लगेच हजार लोक धावुन येतात असेही नाही. अगदी वाईट पद्धतीने अनाहितांबद्दल बोललेले पाहिले आहे, अशा वेळीही गम्मत बघणारेच जास्त असतात. एखाद्या आयडीचे चुकते आहे, का उगाच अनाहितांविरुद्ध बोलले जाते असे म्हणणारे कमी असतात. आभासी जगात आणि प्रत्यक्ष वावरात फरक असतो हेही माहिती आहे, आणि म्हणुनच काही वेळा प्रत्यक्षात, जिथे जिवाची भिती असते, तिथे बेटर सेफ दॅन सॉरी हे धोरण स्विकारले जाते. आता याही प्रतिसादातुन फाटे फोडले जातीलच, आवश्यक तिथेच प्रत्युत्तरे दिली जातील, अन्यथा नाही. या सर्व प्रतिसादात अनाहिता नसलेल्या स्त्री सदस्यांनाही विनाकारण त्रास होतो. त्या मिपावरच्या एक सदस्य हे खरेतर पुरे आहे, त्यांना सपोर्ट करणे अथवा विरोध, वेगळी मते मांडणे यात अनाहिता म्हणुन काही वेगळे नाही.

In reply to by मधुरा देशपांडे

अतिशय नेमके. या नेमक्या प्रतिसादानंतर अजून काही बोलायची गरज आहे असे काही वाटत नाही. फाटे फुटले तर फुटूदेत. या लेखावर अनेक पुरुष आयडींनी अतिशय विवेकी आणि त्यांचा पाठिंबा देणारे विचार मांडलेच आहेत. तशा विचारांचे लोक समाजात वाढीला लागावेत एवढीच इच्छा.

In reply to by पिशी अबोली

मधुरा देशपांडे आणि पिशी अबोली दोघींशी १००% सहमत.

फक्त आवाज उठवला की लगेच हजार लोक धावुन येतात असेही नाही.
एखाद्या उदाहरणातून असे दाखवून देऊ पाहिले की विरुद्ध उदाहरणे असूनही विरुद्ध बाजू जणू होत्याची नव्हतीच होते, नै का?

अप्रतिम लेखन !
टिपीकल पुरूषी मनोवृत्ती
अर्थात हे सरसकटीकरण नाही.
ह्या दोन सेल्फ कॉन्ट्रॅडिक्टरी वाक्यांनी घोळ केला इतकेच !!

आता माझा शेवटचा प्रतिसाद या धाग्यावर--- बायको (पूर्वाश्रमीची प्रेयसी - माझीच बरंका) भडकलेली असते, कधी चिडलेली असते, कधी त्रासलेली असते, कधी उदास असते. मी तिला विचारतो काय झाले...? ती सांगते खूप काही, घरात घडलेलं, बाहेर घडलेलं, काही तरी बिघडलेलं, काहितरी बिनसलेलं..... मी तिला उपाय सांगतो, उभारी आणण्याचा प्रयत्न करतो, समस्येवरचे समाधान, क्लृप्त्या सुचवतो, काही एक-घाव-दोन-तुकडे टिप्सही देतो. तिला यातलं काही नको असते, काहीही करायचे नसते... तिला कसल्याही समस्येवर कसलेही समाधान नको असते. तिला फक्त तिचे कुणीतरी ऐकून घेणारे हवे असते, तिला किती त्रास होतो, ती कशी सहन करते हे समजून घेणारे हवे असते. मला फक्त तोडफोड, खळ्ळ्ख्ट्याक करुन डोक्याला ताप देणारे प्रश्न संपवूनच टाकावे वाटतात. ती म्हणते, इथे बस आणि फक्त ऐक माझं... काहीही उपाय नकोत मला.... फक्त ऐक माझं... .... नंतर मी तिला इग्नोर मारायला लागतो.... कालांतराने.... जेव्हा ती खरीच बायको असते तेव्हा तर तीचं बोलणंही मला ऐकू येत नाही.....

In reply to by तर्राट जोकर

या प्रतिसादासाठी तजोंना माझ्यातर्फे जेव्हा कधी भेटतील तेव्हा एक मस्तानी (बाजीरावाची नाही) ;)

In reply to by तर्राट जोकर

तिला यातलं काही नको असते, काहीही करायचे नसते... तिला कसल्याही समस्येवर कसलेही समाधान नको असते. तिला फक्त तिचे कुणीतरी ऐकून घेणारे हवे असते, तिला किती त्रास होतो, ती कशी सहन करते हे समजून घेणारे हवे असते. मला फक्त तोडफोड, खळ्ळ्ख्ट्याक करुन डोक्याला ताप देणारे प्रश्न संपवूनच टाकावे वाटतात.
मेन आर फ्रॉम मार्स.. वाचले आहे ना?

In reply to by तर्राट जोकर

जोकर साहेब कितीही कंटाळवाणे असेल तरीही मी बहुसंख्य वेळेस बायकोचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतो. बर्याच वेळेस तुमच्या कडे चांगला उपाय असेल तरीही तो स्त्रियांना पटकन मान्य होत नाही.उदा स्वयंपाकाच्या बाईनी न सांगता दांडी मारली तर मी म्हणतो पोळी भाजी केंद्रातून पोळी भाजी घेऊन ये. तरीही नुसते ऐकून घेतले तरीही तो प्रश्न सुटल्यासारखा असतो. उदा मुलांना शिस्त लावणे,मुलांचा अभ्यास आणी मोलकरीण हे कधीही पूर्ण न सुटणारे प्रश्न आहेत. स्थितप्रज्ञ होऊन ऐकून घ्यायचे. पाच ते सात मिनिटांनी बायको शांत होते आणी सर्वत्र शांतता पसरते. (या काळात मी मला आज करायच्या कामांची उजळणी करून घेतो.)

In reply to by सुबोध खरे

पायांचा फ़ोटो पाठवा.. यापुढे हा सल्लाचा पाळनार आहे.. :)

In reply to by तर्राट जोकर

ती म्हणते, इथे बस आणि फक्त ऐक माझं... काहीही उपाय नकोत मला.... फक्त ऐक माझं...
पांडुरंग हरी...वासुदेव हरी...

In reply to by तर्राट जोकर

"स्त्रियांनी जास्त बोलू नये, जास्त विचार सुध्दा करू नये.." - लेखात लिहीलं आहेच ते. बाकी गंभीर धाग्याला विनोदी झालर लावण्याचे आपले प्रयत्न स्तुत्य आहेत. कालच्या आपल्या, " हे जे लेखातले विचार तुमच्या मनात आले ते का आले मग?.." या धन्य वाक्याच्या धक्क्यातून सावरतच होते तोवर हे.. अशाने मग हसू आवरत नाही आणि विचार विस्कटतात हो. असे एकाहून एक अचाट प्रतिसाद वाचतांना परत तेच वाटतं मग, ' का बरं आले ते विचार मनात..'

In reply to by नीलमोहर

तुमचा तुमच्याच विचारांच्या निश्चितीबद्दल संभ्रम आहे. तो संभ्रम लक्षात आला म्हणून ते धन्य वाक्य होते. तुम्ही प्रतिसादात दिलेली दोन्ही उदाहरणे आणि तुमचा बसमधला अनुभव यास आपण एकसमान समजता यात का गफलत आहे हे तुम्हास तुमचे तरी कळले का याचा विचार करत आहे. दारुडा/मनोरग्ण्/कुत्रा व विनयभंगाच्या हेतूने वागणारा, एक स्त्री म्हणून तुमचा अपमान करणारा, अंगचटीला येऊ पाहणारा एक इसम हे एकाच पातळीवर आहेत हे वाचून धन्य झालो होतो काल. तोल सुटलेला दारुडा, मनोरुग्ण याविषयी एक थोडीफार सहानुभुती वा त्रयस्थ भाव असतात जनरली. दारूडा शुद्धीत नाही म्हणून त्याने बलात्कार केलेला चालेल का? ही नेमकी मर्यादा कशी सिद्ध करायची? कुठला अपमान हा नेमका 'टीपीकल पुरुषी मनोवृत्तीने' केलेला की बेशुद्ध अवस्थेतल्या दारुड्याने केलेला, कसा ओळखायचा... याचीही काही नॅक असेल आपणाकडे. आम्ही पुरुष आम्हा पामरांस ते ठवूक नाही. लेखामधे आपण टीपिकल पुरुषी मनोवृत्ती हा शब्द वापरून त्या दारुड्यास समस्त पुरुष वर्गाचा प्रतिनिधी केले, मग प्रतिसादात त्याच दारुड्यास 'बिचारा, शुद्ध नै हो त्याला, त्याला काय कळत नै ना' असा हळवेपणाचा आविर्भाव मांडायचा. आपण सूज्ञ, कातडीबचाव मध्यमवर्गीय आहोत असा मोठेपणा सांगून परत पब्लिक मदतीला येत नाही याबद्दल कांगावाही करायचा. इतके द्वंद्व....? आपला धागा आपल्याच प्रतिसादांतून आपण हास्यास्पद केलात, इतर काहींनी त्यास पुरेपूर हातभार लावला. मी या सगळ्या चर्चेचे सार या प्रतिसादात मांडले आहे. तुम्हास ते रुचले नाही हा आपआपल्या बुद्धीक्षेत्रफळाचा प्रश्न. तर... 'स्त्रियांनी बोलू नये वा विचार करू नये' असे मी मांडल्याचे तुम्ही म्हणताय ते तर मला कुठेच माझ्या प्रतिसादात दिसले नाही. माझ्या या प्रतिसादाचा अर्थ होता की स्त्रियांना उपाय नको असतात, त्यांना चर्चा करायला आवडते, तो त्यांचा मूलभूत स्वभाव आहे. कुणीतरी म्हटलंय वरंच.. मेन फ्रॉम मार्स वाचलंय का..? त्यात हेच दिलंय. पुरुषांना समस्या संपवाव्या वाटतात, स्त्रियांना चघळत राहाव्याशा वाटतात. निसर्ग आहे हो. मी काही नविन मांडले नाही. साधी गोष्ट आहे, बघा लक्षात येते का..? (स्त्रियांना कमी लेखण्याचा खाली परिच्छेदाचा अजिबात उद्देश नाही. माझे फक्त निरिक्षण आहे. सरसकटीकरण अजिबात नाही.) किचन अप्लायंसेसचा वापर ९९% स्त्रिया करतात, किती स्त्रियांनी यातले अप्लायंसेसचा शोध लावला आहे? मला नाही खरंच माहिती. पण ऐकीवात नाही की कुणा महिलेने काम सोपे करणारे यंत्र शोधून काढले. (असे नसेल तर खरंच सांगा.) ते पुरुषांनीच केले. जेव्हा त्यांना किचन मधे जावे लागले तेव्हा ज्या अडचणी आल्या, जाणवल्या त्या सोडवल्या. अनंत काळापासून स्त्रिया किचनमधल्या एका साध्या प्रश्नाचं उत्तर शोधतायत अजुन, त्यावर कायम चर्चा करत असतात, "आज काय भाजी करायची, काही सुचत नाही बुवा?" याच ठिकाणी पुरुष असते तर महिन्याचा तक्ता लावुन मोकळे झाले असते वा जे सुचेल ते बनवून तयार केले असते. भारतातलाच एक आठ वर्षाचा मुलगा, आईला विहिरीवरून पाणी आणायला उशिर होऊन जेवायला वेळेवर मिळत नाही म्हणून वैतागला होता. एक दिवस गेला विहिरीवर, बघितलं आइ रहाटाने पाणी ओढत आहे. पारंपरिक रहाट... एका हाताने धरून दुसर्‍या हाताने ओढायचे, हात सुटला तर बादली परत विहिरीत. वेळ, श्रम जास्त लागत होते. मुलाने आईसाठी लॉक होणारे रहाट बनवले अगदी घरगुती साधनांनी. आइचा कितीतरी वेळ वाचला. भारतातल्या करोडो स्त्रिया रहाटाने पाणी काढत होत्या, त्यांनाही ही समस्या समजत होती. त्याबद्दल कुरकुर करत होत्या, पण उपाय एका आठ वर्षाच्या मुलाने काढला. कारण समस्या दिसली की सोडव असंच त्याचा नैसर्गिक स्वभाव आहे. यात कुठलाही पुरुषी मोठेपणा नाहीये. बहुसंख्य स्त्रियांना जे मल्टीटास्किंग जमतं ते बहुसंख्य पुरुषांना अजिबात जमत नाही. प्रत्येकाच्या आपआपल्या मर्यादा-क्षमता आहेत. कुणीही लहान मोठं नाही. असो, सगळ्या प्रतिसादांमधून जाणवलं ते हेच, उपाय नकोय, चर्चा हवी आहे. समाज आपोआप बदलायला हवाय, त्यासाठी तुम्ही काही करा म्हटलं की लाख समस्या पुढे येणार. एक पुरुष म्हणून मला हे नैसर्गिकरित्या झेपलं नाही. म्हणून वरचा किस्सा सांगितला. उपाय सांगून करत नाही म्हटल्यावर माणूस दुर्लक्षच करणार की नाही..? स्त्रियांनी बोलू नये विचारही करू नये हा अर्थ आपण काढलात ह्याबद्दल वैषम्य वाटले इतकेच. म्हणून हा प्रतिसादप्रपंच...

In reply to by तर्राट जोकर

ह्याला कारण कोण आहे? सातत्याने नावे ठेवणारे प्रामुख्याने पुरुष आहेत. हीच भाजी का केली? अशीच का केली? अमुक तमुकने केलेली तशी तुला जमतच नाही? मीठच कमी अन जास्त...इ. तुम्हीही हे ऐकले पाहिले असेलच. पुन्हा एकदा सांगतो कंडिशनिंग मुळे माणसांची नैसर्गिक सहज प्रवृत्ती अमूलाग्र बदलते. बायकांना उपाय नको असतात हा तुम्ही सोयिस्कर काढलेला अर्थ आहे. आपले प्रश्न ऐकून घ्यावेत असे प्रत्येकाला वाटत असते. दरवेळी त्यावर उपाय सुचतोच असे नाही किंवा कुणी सुचवला तरी लगेच अमलात आणला जातोच असेही नाही. अन्यथा पुरुषांच्या अनेक वायफळ चर्चात तावातावाने अनेक गोष्टींवरती टीका करणारे पुरुष सटासट सोल्यूशन्स काढताना दिसले असते की हो? तेव्हा असं काही नसतं. स्त्री-पुरुषातले नैसर्गिक भेद, दृष्टिकोनातला फरक हे असणार आहे परंतु अनेक वर्षे झालेल्या कंडिशनिंगमुळे दोन्ही बाजू एकमेकाकडे बघताना विशिष्ठ चष्मा घालून बघतात आणि त्यातून प्रश्न सुटण्याऐवजी अधिक चिघळत जातात.

In reply to by चतुरंग

माझा प्रतिसाद एवढा मनावर घेऊ नका हो. काय खरं काय खोटं सगळ्यांनाच कळतं. कंडीशनिंगच्या मुद्द्याशी सहमत आहेच पण हे एकतर्फी आहे असंही म्हणू नका. 'अन्याय सहन करणारा अन्याय करणार्‍यापेक्षा मोठा गुन्हेगार असतो' हे वाक्य आजकाल कुणी बोलत नाही. स्त्रियाच स्त्रियांच्या शत्रू आहेत हेही काही खोटं नाही. त्यांच्यातल्या अंतर्गत युद्धामुळे पुरुषांचेही कंडीशनींग झाले आहे हे कधी लक्षात घ्यावे? कुणी कोणाचे कंडीशनिंग केले, कशास कोण कारणीभूत आहे, जबाबदार कोण हे मुद्दे अनंतकाळापर्यंत चघळण्यासारखे आहेत. इथे मुद्दा आहे उपाय सुचवण्याचा व अंमलबजावणीचा, त्यास बहुतेक सद्स्यांनी आपआपल्या अनुभव-स्वभावानुसार जे उत्तर दिले. तेच माझ्यासाठी महत्त्वाचे होते. बाकी चालुद्या... भाजीत मिठ घाला नैतर मिठात भाजी. नवरा टिकवायचे कंपल्शन नसेल तर 'गेलास उडत' म्हणायचा ऑप्शन आहेच. वापरायचा की नाही हे सर्वस्वी संबंधित पक्षकारावर आहे. त्यात 'नवरा नसलेल्या बाईस मान नाही हो समाजात' अशी भीती घालणार्‍या बायकाच असतात हेही लक्षात असू द्यावे, त्यांच्या ह्या कंडीशनींगचा फायदा घेऊन एकटी बाई आपलीच मालमत्ता असल्यासारखे वागायला बघतात. जौ दे. आधीच मी बरंच लिहिलंय. परत तेच दळण नको...

In reply to by तर्राट जोकर

नाहीच म्हणूनच मी वरती म्हंटले की 'दोन्ही बाजू चष्मे घालून बघतात आणि प्रश्न चिघळत जातो.' असोमामी देखील आता थांबावे म्हणतो! :)

In reply to by चतुरंग

असे वाचावे. (नाहीतर पुन्हा ही मामी कोण असा इथेच धाग्यावर गहजब सुरु व्हायचा! ;) )

In reply to by तर्राट जोकर

प्रतिसाद आवडला, फक्त इलस्ट्रेटिव्ह उदाहरण गंडले आहे. पहिल्या रिलायबल डिशवॉशरचा शोध एका स्त्रीने लावलेला आहे. https://en.wikipedia.org/wiki/Dishwasher#History

In reply to by बॅटमॅन

ते गंडावेच अशी मनापासून खरोखर इच्छा होती. म्हणून आधीच म्हटलं की बुवा आपल्याला खरंच माहिती नाही, हे सगळं स्वतःच्या (कदाचित बायस्ड) निरिक्षणावर आधारित आहे. सरसकटीकरणाविरोधी तर आपण आहोच. मादाम क्युरीपासून पहिल्या कारची पहिली ट्रायल घेणार्‍या स्त्रीपर्यंत आपल्याला सगळ्यांचे कौतुक आहे.

In reply to by तर्राट जोकर

जोकर, तुमच्या प्रतिसादातील अंडरलाइंग टोनशी बव्हंशी सहमत आहे. सरसकटीकरण नकोच. मात्र 'किती स्त्रियांनी अप्लायंसेसचा शोध लावला?' असा काहीसा प्रश्न तुम्ही विचारलात. त्या अनुषंगाने हे लिहित आहे. आजवर जे काही शोध लागले आहेत, त्यातले ९९.९९% शोध हे काही तरी अडचणींवर मात करण्याकरता किंवा आळशी लोकांना काम सोपं करावंसं वाटलं म्हणून लागले आहेत. सो द लॉजिक डिक्टेट्स दॅट, जी कामे सहसा स्त्रिया करत असतात त्यातील अडचणींवर उपाय काढण्याचे विचार त्यांच्या मनात नक्कीच घोळत असणार. आणि त्यातून काही साधी साधी तंत्रं, उपाय, उपकरणंही विकसित झाली असणार. अर्थात, ती काही तशी फार मोठी अप्लायंसेस वगैरे नसणार त्यामुळे कोणाचं नाव वगैरे व्हायचा प्रश्नच नसणार. दही घुसळलं की लोणी वर येतं आणि खाली राहिलेलं पाणीही चविष्ट असतं, मग ते घुसळणं नीट व्हावं म्हणून रवीसारखं हत्यार बनवणं, किंवा उत्तरेत दिसते तशी दोरीने फिरवायची रवी तयार करणं हे स्त्रियांनी केलंच नसेल असं कशावरून? किंबहुना, मी तर म्हणतो की ते स्त्रियांनीच केलं असावं. शक्यता तर तीच जास्त आहे. दुसरं उदाहरण म्हणजे, आजीबाईचा बटवा. घरगुती वाणसामानाचे औषधी उपाय शोधून काढण्यात स्त्रियांचा सहभाग (रदर, पुढाकार) नसेलच का? पोरगं किरकिर करतंय? अमुक तमुक चाटव त्याला. शी करतंय? हे खाऊ घाल चिमूटभर. दात येताहेत? हे पाज. असले उपाय बायकांनीच शोधून काढले असण्याचा संभव जास्त आहे. अन्यथा, किती पुरूषांना रडक्या, गळक्या, हगर्‍या पोरांचा त्रास होत असेल? शक्यता बघू जाता, बायकांचा पुढाकार, गेला बाजार लक्षणिय सहभाग, जास्त असण्याची शक्यता नाकारता येईल का? पुरूषांकडे शक्ती होती. त्यांचं शरीर जास्त बलदंड होतं. त्या जोरावर त्यांनी समाजावर प्रभुत्व मिळवलं. मग स्त्रियांनी युक्तीचा सहारा घेऊन पुरूषांना कह्यात ठेवायला सुरूवात केली. दीर्घकाळ दबून राहावं लागलेला कोणताही समाजघटक त्यातून मार्ग काढायचा, आयुष्य सुसह्य बनवायचा प्रयत्न करतोच. (अमेरिकेतील काळ्या गुलामांनीही असे अनेक मार्ग शोधून काढले होतेच.) त्यामुळे, स्त्रिया अशा मार्गाने गेल्या असाव्यात हे अगदीच नैसर्गिक आणि लॉजिकल आहे. आधुनिक काळात अप्लायंसेस बनवण्याकरता केवळ अडचणीवर मात करायची इच्छा असणं किंवा काम सोपं करू बघायची वृत्ती असणं हे आणि एवढंच पुरेसं नाही. त्याकरता विज्ञान, तंत्रज्ञान वगैरेंची गरज आहे. सर्वच समाजांमधून फॉर्मल शिक्षणात स्त्रियांचा सहभाग जवजवळ नव्हताच. प्रगत देशातही गेल्या पन्नास साठ वर्षात स्त्रिया उच्चशिक्षण घेऊ लागल्या आहेत. त्यातही परत कितीही शिकलेली स्त्री असो, तिला (पुरूषाला घरापासून जेवढे मोकळे होता येते तेवढे) घरापासून मोकळे होता येत नाही. म्हणजे, त्यात वेळ, श्रम गेलेच. उरलेल्या वेळातून, पुरूषसत्ताक समाजात वावरताना येणार्‍या आव्हानांशी लढण्यात परत वेळ आणि मानसिक बळ वाया जात असेल तो वेगळाच. एवढी सगळी उस्तवार करून परत वर अप्लायंसेस शोधून काढण्याचे उपद्व्याप करा! इजन्ट इट अ टॅड टू मच टू आस्क? त्याउप्परही स्त्रियांनी लावलेले शोध शोधण्यात गूगलबाबाची मदत घेतली तर बरंच काही सापडलं. मी 'appliances invented by women' ही फ्रेज सर्च केली. करून बघा. मला वेळ नाहीये फारसा, पण एक सहज नजर मारली तरी बरंच काही दिसलं. वानगीदाखल दोन दुवे देतो. त्यातही, स्त्रियांना येणार्‍या अडचणींशी किंवा सहसा जी कामे त्या करतात त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी तुम्हाला दिसतील. गूगल सर्च : https://www.google.co.in/search?q=appliances+invented+by+women&ie=utf-8… १. https://in.answers.yahoo.com/question/index?qid=20081010060308AAkFsd2 २. http://mentalfloss.com/article/53164/19-things-you-might-not-know-were-… ______________________________________________________________________________ हा प्रतिसाद, कोणत्याही अडचणींवर जिद्दीने मार्ग काढणार्‍या माझ्या अनेक आज्ज्या आणि त्यांच्या तालमीत तयार झालेल्या माझ्या आईला समर्पित. (घाईघाईत टंकलंय. दिवस सुरू करायचाय. त्यामुळे विस्कळित झालंय हं. सांभाळून घ्या.)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

कोणत्याही अडचणींवर जिद्दीने मार्ग काढणार्‍या माझ्या अनेक आज्ज्या आणि त्यांच्या तालमीत तयार झालेल्या माझ्या आईला समर्पित. हजारदा सहमत...

In reply to by तर्राट जोकर

तुमच्या प्रतिसादासाठी आणि एकूणच लेखावरील स्पष्टीकरणासाठी हा माझा शेवटचा प्रतिसाद. मी काही कोणी नवतरुणी नाही जी पहिल्यांदाच आलेल्या एका अनुभवाने बावरून, गोंधळून गेली आणि लगेच तिने 'सुंदर, संवेदनशील..' शब्दांत लेख लिहून कौतुक, सहानुभूति मिळवण्यासाठी मिपावर दिला. हा अनुभव इथे देण्यामागे विचारांचे प्रकटीकरण आणि शेअरिंग हे दोनच हेतू होते, आहेत. १. मी लेखक नाही, मला लिहिता येत नाही. या लेखातील चुका शोधा असं सांगितलं तर कदाचित सगळ्यात जास्त मीच शोधून देऊ शकेन. वरील पूर्ण प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर आहे पण ते शब्दांत उतरवणं कदाचित नीट जमलं नाही, लेख फार मोठा झाला होता त्यामुळे बरीच काटछाट केली, त्यात काही महत्वाचे मुद्दे पूर्णच गाळले गेले हे नंतर लक्षात आलं आहे. शब्दरचना, वाक्यरचना यातही चुका असतील, त्यामुळे विचार स्पष्टपणे मांडले गेले नसतील तर ती अर्थातच माझ्या लेखन (अ)सामर्थ्याची मर्यादा आहे. विचारांच्या संभ्रमाबद्दल म्हणायचं तर, डोक्यात अनेक विचार असतात, लिहितांना ते ' लॉस्ट इन ट्रांसलेशन' होऊन कन्फ्यूजन शब्दांमध्ये उतरू शकतं, म्हणजेच विचार स्पष्ट असतात फक्त ते शब्दांत मांडतांना गोंधळ होऊ शकतो. तरी त्या चुकांसकटही काही लोकांपर्यंत लेखामागील भावना पोहोचलेली आहे, त्यातून घ्यायचा तो भाव लक्षात घेऊन त्यांनी त्यानुसार वाजवी प्रतिसादही दिलेत हे लक्षात घ्यावे ही विनंती. २. " तोल सुटलेला दारुडा, मनोरुग्ण याविषयी एक थोडीफार सहानुभुती वा त्रयस्थ भाव असतात जनरली. दारूडा शुद्धीत नाही म्हणून त्याने बलात्कार केलेला चालेल का? ही नेमकी मर्यादा कशी सिद्ध करायची?" - हे असं चालेल का तुम्हीच लॉजिकली विचार करुन सांगा, माझा म्हणण्याचा उद्देश एवढाच होता की तो दारुडा त्याक्षणी हार्मलेस होता, बाकी इथे अजून काहीही लिहिले तरी ते काँट्राडिक्टरी होणार. इथे मी अजून दोन अनुभव सांगेन, अ. एकदा आई आणि मी बसमध्ये बसलो होतो, ती बस नादुरुस्त असल्यामुळे ती कॅन्सल करून दुसर्‍या बसमध्ये बसण्यास सांगितले गेले , सगळे पटापट तिकडे निघाले, बसच्या दारात आई चढत असता एक तरुण तिला धक्का देऊन पुढे घुसला, तिथे आई जवळजवळ पडलीच असती. मी तिथे त्याच्या पाठीत जोरात फटका मारला, (हात साफ केल्यानंतरचा तो आनंद अवर्णनीय होता !) त्याच्यावर काहीच परिणाम नव्हता, तो निर्लज्जासारखा आत जाऊन बसला. ब . १०-१२ वर्षांपूर्वीची घटना, नवीन जॉब असल्यामुळे छान टॉप, ट्राऊझर घालून घरातून निघाले होते. शनिपार चौकाजवळ एका तृतीयपंथियांने माझा हात कोपराजवळ धरला आणि पैसे मागितले, त्याचा हात झिडकारून पुढे जाऊ लागले तर त्याने पकड़ अजून घटट केली आणि कपड्यांवरून एक अतिशय वाईट धमकी दिली. तो एकतर खूपच जवळ उभा होता,त्याचे तांबारलेले डोळे , भडक मेकअप, पानाने रंगलेले लालभडक ओठ पाहून किळस येत होती आणि घाबरलेही होते, त्यात ती धमकी ऐकून मी हादरले. त्याचा एकूण खुनशी आवेश पाहता तो जे म्हणतोय ते भर रस्त्यात ही खरं करू शकेल याबद्दल मला त्याक्षणी अजिबात शंका वाटली नाही. तिथे त्याच्यापासून सुटका हे एकच लक्ष्य समोर होते त्यामुळे मी काही सुट्टे पैसे काढून देऊ लागले तर म्हटला चिल्लर नहीं लेता मैं, मग वीस रुपये काढून त्याला दिले आणि सुटका करुन घेतली. त्याक्षणी त्याला प्रतिकार, फटका, लाथ, पर्स इ.मारणे काहीही सुचले नाही, शक्यही नव्हते कारण त्याची शारिरीक ताकद जास्त होती, आणि त्याने कपड्यांना हात लावेपर्यंत मी थांबू शकत नव्हते. इथे पेठकर काकांचा, "प्रत्येक सबल हा दुर्बलावर अन्याय करू शकतो, करतो. मग तो श्रीमंत/गरीब असो, ऑफिसातला बॉस/कर्मचारी असो, पुरुषांमध्येही ताकदवान/दुबळा असूदे. सर्वत्र हे अन्याय होतात," - हा प्रतिसादही प्रातिनिधिक आहे. अनेकदा आपली बाजू बरोबर असतांनाही आपण माघार घेत असतो. उदा. ऑफिसमध्ये सिनियरच्या विरोधात जाऊ नका, घरी अमुक लहान आहे, तमुक मोठा आहे, तुम्ही समजूतदार आहात, वाद घालू नका अनोळखी लोकांबरोबर वाद कशाला घालता, लांब कशाला जायचं, इथे मिपावर अमुक प्रस्थापित आयडी बरोबर वादात पडू नका, मग काय, घ्या माघार. कित्येकदा आपली बाजू बरोबर असतांनाही माघार घ्यावी लागत असते, जिथे योग्य, गरजेचं असतं तिथे आपण माघार घेत असतो, नाही तिथे नाही. सांगण्याचे तात्पर्य एवढेच की समोरील परिस्थितीनुसार माणूस रिएक्ट होत असतो. ३. "आपण सूज्ञ, कातडीबचाव मध्यमवर्गीय आहोत असा मोठेपणा सांगून परत पब्लिक मदतीला येत नाही याबद्दल कांगावाही करायचा." - इतर लोक नेहमीप्रमाणे सोयिस्कररीत्या बघ्याची भूमिका घेऊन गंमत बघत होते, - एवढा वेळ मजा बघणार्‍या पब्लिकनेही आता त्यांना पुढे ढकलून उतरवले, पब्लिकबद्दल ही दोनच वाक्य लिहिलीत, यात मदतीची अपेक्षा, कांगावा माझ्या मते नाहीय. ४. टिपीकल पुरूषी मनोवृत्ती: त्या दारुड्यास समस्त पुरुष वर्गाचा प्रतिनिधी केलेले नाही, लेखातील तो संदर्भ ठराविक लोकांसाठीच होता. कदाचित तिथे फक्त 'मनोवृत्ती' लिहिवयास हवे होते, तरी टिपिकल, पुरुषी या शब्दांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल दिलगीर आहे. " वर्षानुवर्षे ठाकून ठोकून डोक्यात फिट्ट बसवलेली तीच ती मनोवृत्ती जी अशा लोकांमधे स्त्रियांबद्दल पराकोटीचा तिरस्कार उत्पन्न करते. स्त्रीयांना कायम तुच्छ, कमी लेखणारी, त्यांनी विरोध केलेला जराही न खपणारी मानसिकता. त्यांनी कायम घराच्या चार भिंतींआड रहावं, सदा सर्वकाळ कामाला जुंपून घ्यावं, काहीही बोललेलं, मारलेलंही चालवून घ्यावं, पुरूषांसमोर आवाज चढवू नये, बाहेर पडू नये, नौकरी करू नये, परपुरूषांशी बोलू नये, जास्त शिकू नये, जास्त बोलू नये, जास्त विचार सुध्दा करू नये.. एक ना दोन हजार बंधन घालणारी मानसिकता. अर्थात हे सरसकटीकरण नाही" वर दिल्याप्रमाणे वाचावे. ५. " स्त्रियांनी बोलू नये वा विचार करू नये' असे मी मांडल्याचे तुम्ही म्हणताय ते तर मला कुठेच माझ्या प्रतिसादात दिसले नाही." - तुमची बायको बोलत असता तुम्ही 'इग्नोर' मारता असं लिहिलंत त्यासाठी ते म्हटलं होतं. ६. " उपाय नकोय, चर्चा हवी आहे. समाज आपोआप बदलायला हवाय, त्यासाठी तुम्ही काही करा म्हटलं की लाख समस्या पुढे येणार" - उपाय हवेतच, अनेकांनी वर दिलेतही. अर्थात ते उपाय आम्हालाही माहीत असतात, नाही असे नाही, परिस्थिती पाहून ते वापरले जातही असतात. प्रामाणिक, कंस्ट्रक्टिव्ह चर्चा होत असेल तर त्यालाही हरकत नसावी. माझी ९ वर्षीय भाची आहे ती मला सांगते बसने जाशील तेव्हा जेंट्स शेजारी बसू नको, लेडीज जवळ बस. हे तिला कोणी काही सांगितलं, शिकवलं नव्ह्तं पण इतर लोकांचं बोलणं, टीव्ही, आजूबाजूचे ऐकून, पाहून तिलाही या गोष्टींची समज येऊ लागली आहे. अर्थात तिच्यासारख्याच इतरही लहान मुला-मुलींना आम्ही, आपण सगळेच सक्षम होण्याबद्दल शिकवत असतो, घरात चांगले संस्कार देऊन वाढवत असतो जेणेकरून येणारी पिढीही अधिक सजग, समर्थ बनेल. ७." किती स्त्रियांनी यातले अप्लायंसेसचा शोध लावला आहे? " - स्त्रियांनी लावलेले काही शोध, http://mentalfloss.com/article/53164/19-things-you-might-not-know-were-… याशिवायही इतर बरेच आहेत, गुगलवर शोधल्यास सहज सापडतील. हे असे अनुभव वारंवार, जिथे-तिथे येत राहतात, एका पॉइंटनंतर त्याकडे दुर्लक्ष करणं हा मार्ग निवडला जाऊ शकतो हे टीकाकारांनी लक्षात घ्यावं एवढीच अपेक्षा. काही गोष्टी पुरुष समजून घेऊ शकत नाहीत कारण अर्थातच ते त्या जागी नसतात, काही अनुभव त्यांनी कधीच घेतलेले नसतात, त्यासाठी 'जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.' असो. धन्यवाद .

लेख वाचला. प्रतिसादही वाचले. कांही पटले, कांही खटकले. पण असो. पहिली गोष्ट स्त्री आणि पुरुष हे दोन वर्ग आहेत. ज्यात एक दुर्बल आणि दुसरा सबल आहे. ह्याला अपवादही आहेत पण सर्वसाधारणपणे दिसणारे हे सत्यचित्र आहे. प्रत्येक सबल हा दुर्बलावर अन्याय करू शकतो, करतो. मग तो श्रीमंत/गरीब असो, ऑफिसातला बॉस/कर्मचारी असो, पुरुषांमध्येही ताकदवान/दुबळा असूदे. सर्वत्र हे अन्याय होतात. स्त्रियांची अवस्था अत्यंत वाईट असते कारण त्या पुरुष ह्या ताकदवर वर्गाला टाळू शकत नाही. आणि गर्दीचा फायदा घेत अनेक पुरुष(?) आपल्या अतृप्त शारीरीक इच्छा अंशत: तरी पुर्‍या करताना आढळतात. इतर अनेक बघ्याची भूमिका घेतात ह्याला कारण पोलीसांची निष्क्रियता आणि गुंडाराज. रागाच्या तिरिमिरीत एखादा त्या अत्याचारी व्यक्तिशी चार हात करेलही. पण बहुतांश विचार करतात आज मी ह्याला धोपटून काढेन पणप्र उद्या ह्याची माणसं येऊन माझी धुलाई करतील. पुन्हा पोलीस केस आधीच आपल्या जीवनात त्रास, व्याप, चिंता, विफलता कमी नसते त्यात अजून स्वतःहून भर का घाला? अशा माणसांच्या गैरवर्तनाला सुरुवात होते त्याने स्त्रीयांना झटकन राग येतो. कारण त्यांना हे सर्वत्र अनुभवास येत असते. प्रतिकाराची शारीरीक क्षमता नसल्याने आतल्याआत संताप होतो पण असहाय्यता जाणवते. असे प्रसंग पुरुषांवर येत नाहीत त्यामुळे त्यातील दाहकता त्यांना जाणवावी तेव्हढी जाणवत नाही. त्यामुळे ते लगेच अशा प्रसंगात कांही कृती करीत नाहीत (ज्यामुळे अभागी स्त्रीला जास्त संताप येतो.) जसं पुरुषांना अशा प्रसंगांना तोंड द्यावे लागत नसल्याने त्याची दाहकता समजत नाही तसेच मारामारीचे प्रसंग स्त्रीयांवर येत नसल्याने पुरुषांची निष्क्रियता त्यांना अन्यायकारक वाटते. गर्दीत एखाद दुसर्‍या बाईने पुरुषाशी लगट केली (असेही होते) तरी पुरुष सर्व स्त्री जातीला 'चालू' समजत नाही पण एखाद्या पुरुषाच्या गैरवर्तनाने तमाम पुरुष जात बलात्कारी ठरते. ह्याला ही कारण तेच असते, की स्त्रीयांना अशा प्रसंगांना घरातून बाहेर पडल्यापासून घरी परतेपर्यंत ठायी ठायी अनुभव येत असतात. पण जेंव्हा असं सार्वत्रीकरण केलं जातं तेंव्हा असे न वागणारे पुरुष दुखावतात आणि कधी कुठल्या स्त्रीच्या सहाय्याला न जाता 'बघ्याची' भूमिका घेतात. स्त्रीयांना खुप सोसावे लागते हे मान्य असले तरी स्त्रीयांनी सरसकटीकरण सोडून दिल्यास अजून कांही पुरुष त्यांच्या सहाय्याला येतील. पण स्त्रीने पुढाकार घेऊन त्या मवाल्याच्या थोबाडावर चप्पलेने प्रहार केला आणि तिथे उपस्थित सर्व स्त्रिया त्या मवाल्याच्या अंगावर धावून गेल्या तर खुप फरक पडेल. पुरुषही अशा वेळी बघ्याची भूमिका घेणार नाहीत. अशी कांही अट नसली तरी वातावरणातील फरक त्यांच्या वृत्तीत बदल घडवू शकतो. पुरुष नेहमीच गप्प बसत नाहीत. तरूण आणि ताकदवर पुरुष अनेकदा पुढाकार घेतात. ५०+ पुरुषांना ते तितक्या लगेच शक्य होत नाही. पण त्यांनी निदान गर्दीचा फायदा तरी घेऊ नये. पण दुर्दैवाने असे पुरुषही फायदा घेताना दिसतात. प्रचंड लोकसंख्या, सार्वजनिक वाहतुकीची अपुरी साधनं (त्यामुळे गर्दी), पुरुषांची मानसिकता, स्त्रियांची दुर्बलता (शारीरीक आणि मानसिक) आणि पोलीसांची उदासिनता (तेही त्यांची संख्या कमी, गुन्ह्याचे वाढते प्रमाण, राजकिय हस्तक्षेप) वगैरे वगैरेनी जन्माला घातलेल्या ह्या समस्या कधी हद्दपार होतील असे वाटत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

अगदी योग्य, मुद्देसूद आणि समंजस प्रतिसाद, धन्यवाद.

धागा वाचला, प्रतिसादही वाचले. प्रत्येक प्रसंग निराळा, वेळ, मूड, शक्ती, मानसिक अवस्था सगळे निराळे असते. एखाद्यावेळी अचरटपणा करणार्‍या मनुष्यास ठोकून काढणारी महिला पुढीलवेळी तश्याच शारिरिक अवस्थेत असेल असे नाही. मुले लहान असताना रात्रीची जाग्रणे करून दुसरे दिवशीचे आपिस गाठताना कसाबसा आजचा दिवस रेटून रात्री झोप पूर्ण करू हीच आशा असते. मग कोणी बसमध्ये, कामाच्या ठिकाणी असले वर्तन केल्यास राग जसा यायला हवा तसाच येतो पण शक्ती जितकी असेल त्यानुसारच महिलेचे वर्तन असते. एवढ्यात दोन भारतीय हलकटांचा अनुभव घृणास्पद असा आला. सगळ्याच पुरुषांना वाईट म्हणत नाहीये, कारण असे असते तर बाकीच्याही अनेक देशांचे आजूबाजूला रहात असलेले पुरुष असलेच वर्तन करताना दिसले असते. मुलांसाठी हा लांबडा विकांत असल्याने मॉलमध्ये भरपूर गर्दी होती. तेथे काम करणार्‍या एका महिला पोलीसाकडे आपल्या भाषेत दोन भारतीय पंचविशीची मुले ज्याप्रकारे बोलत होती त्यावरून त्यांचे संस्कार दिसत होते. स्त्री हा प्राणी पुरुषांकडून असलेल्या कमेंटा ऐकण्याकरता नक्कीच जन्माला आलेला नाहीये. सगळे भारतीय पुरुष वर्णन केलेल्या प्रकारात मोडत नाहीत पण जास्त टक्केवारी ही असल्यांचीच आहे. त्यातून संस्कारास कमी पडलेले पालक दिसून येतात. शिक्षणात तुम्ही किती हुषार आहात, कोणत्या हुद्द्यावर नोकरी करता याचा आणि चांगल्या, सभ्य वागणुकीचा काडीमात्र संबंध नाही, कारण कित्येक अल्पशिक्षित, अशिक्षित पुरुष सभ्य असतात.

लेख वाचला आणि मुद्दाही पटला. स्त्रियांना सार्वजनिक अवकाशात वावरताना ज्या दिव्यातून रोज जावे लागत असेल (अर्थात पुरुषांमुळे), त्याची कल्पना पुरुषांना येणे कदापि शक्य नाही. जोवर पुरुषी अहंकार थेटपणे दुखवला जात नाही तोवर तेही अशा वेळी थंड बसतात. स्त्री-पुरुष आकर्षण हे पूर्णतः नैसर्गिक आहे. समाजाने या सुंदर भावनेची केलेली मोडतोड, त्यावर लावलेले सत्ताकेंद्रित आर्थिक आणि सांस्कृतिक निर्बंध यांमुळे या आकर्षणाचे विकृतीकरण झालेले आहे. परिणामस्वरूप, अन्यत्र हतबलतेची शिकार असलेला पुरुष सार्वजनिकरीत्या स्त्रीचा संकोच करण्यातून आपले गमावलेले पौरुषत्व पुन्हा मिळवू पहात असतो. सांगणे सोपे, करणे अवघड हे मला माहीत आहे. तरीही सल्ला देतो. १. गावगुंडांना भिऊन जगावरचा हक्क सोडू नका. शहरातला प्रत्येक रस्ता, प्रत्येक गल्ली यावर पुरुषांएवढाच हक्क स्त्रियांचा आहे. तो भांडून मिळवावा लागला तरी बेहत्तर, पण गाजवा. जे मदतीला धावून येतील, ते तुमचे साथी समजा. जे येणार नाहीत ते मुळातच कुचकामी असणार. त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या? २. असे प्रसंग घडले, तरी निराश होऊ नका. मन मोडून घेऊ नका. गलिच्छ भाषा कानावर आली म्हणून बावरून जाऊ नका. मनातला राग गिळू नका. तिथेच पलटवार करा. स्त्रीच्या मनातली अनाम भीती ही पुरुषाच्या पथ्यावर पडते हे विसरू नका. ३. स्वतःला कदापि दोष देऊ नका. स्त्रीत्व हा तुमचा प्रमाद नसून ती एक अनमोल देणगी आहे.

स्त्रीत्व हा तुमचा प्रमाद नसून ती एक अनमोल देणगी आहे. १००% सत्यवचन ! (१० महिन्यांच्या मुलीचा बाबा - आनंदराव )

अरे वा!! "काय उपयोग झाला एवढा वाद घालुन" आणि "आता आवरायलाच हवं" वगैरे झालं तेव्हा वाटलं की संपलं असेल... चालुच आहे की अजुन!

याचाच अर्थ अजूनही ही समस्या धुमसती आहेच किंबहुना तिची व्याप्ती आता वाढली आहे असे दिसते. बहुसंख्य भारतीय पुरुषांची मनोवृत्ती ही स्त्रियांसोबत अत्यंत हीन दर्जाची असते हे मी स्वतः अनेकवेळा अनुभवलेले आहे. ७-८ वर्षांच्या मुलींपासून ते ५० वर्षांच्या महिलेपर्यंत कुणालाही कुठेही टार्गेट करायला काहीही न वाटणारे लोक बघितलेत. केस पिकलेले मध्यवयीन पुरुषही यात मागे नाहीत. उलट कित्येकदा वाढत्या वयाचा गैरफायदाच उठवतील! बर्‍याचवेळा अत्यंत सटल असणार्‍या गोष्टीतून त्रास दिला जातो. चांगल्या दिसणार्‍या महिला कर्माचार्‍याला वारंवार केबिनमध्ये बोलावून घेणे, तिच्या डेस्कजवळ जाऊन सतत बोलणे, तिला काहीतरी फेवर करत राहणे इ. दिवसातल्या दहापैकी सात वेळा असले लोक समोर आले तर सरसकटीकरण होणे स्वाभाविक आहे. मनामध्ये साठत राहिलेला त्रास कधीतरी बाहेर पडणार ना? घरातून पाऊल बाहेर पडताक्षणीच किंवा कित्येकदा घरापासूनच तुम्हाला असल्या मनोवृत्तीचा सामना करावा लागत असल्याने ताकही फुंकून पिणे याला अनुसरुन सगळेच परके तसे आहेत असे मानणे सोयिस्कर पडू लागते कारण सारखी सारखी विषाची परीक्षा कोण घेत बसणार? या सगळ्याला महत्त्वाचे कारण म्हणजे भारतीय समाजात मुलांना वाढवले जाणे हे अतिशय लिंगभेदाधारित पद्धतीने होते. कंडिशनिंगचा भाग खूप मोठा असतो. स्त्रीचं दुय्यम असणं हे अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून सातत्यानं अधोरेखित होत राहतं. मुलं असं बघतंच मोठी झाली की त्यांना ते नैसर्गिक वाटू लागते. बदलत्या काळानुसार फक्त शिक्षण आणि नोकर्‍यांचे स्वरुप बदलेले असले तरी मनोव्रुत्ती बदललेली नाही. शिवाय सेक्सबद्दल असलेला ट्बू आणि त्याचे दमन हा एक वेगळाच आणि गहन कंगोरेदार विषय आहे त्याचाही सहभाग यात आहे. मी अमेरिकेत गेली कित्येक वर्षात कोणत्याही बिगर अशियाई माणसांना अशा कमेंटा पास करताना ऐकलेले नाही ना माझ्या बघण्यात कधी कोणाला धक्के वगैरे मारलेले दिसलेत. अगदी पब्लिक ट्रान्सपोर्टच्या गर्दीच्या वेळीसुद्धा लोक नीट वागतात. गैर वागणूक दिसली तर बायकाच जाब विचारतील ही खात्री, त्याला लोकांचा सपोर्ट आणि पोलिसांचा बर्‍यापैकी असलेला वचक याला कारणीभूत आहेच. याचा अर्थ असे प्रकार होतच नसतील का? तर नाही, होत असतीलच परंतु भारतात जेवढे निर्ढावलेपणाने कुठेही आणि कधीही हे घडू शकते तितके तर नक्कीच नाहीत. तेव्हा बदल घडवायचा असेल तर मुलांमध्ये लहानपणापासून घडवावा लागेत आणि तो नुसता बोलून नाही तर मोठ्यांनी तसे उदाहरण पदोपदी ठेवूनच. शिवाय स्त्रियांचे मानसिक सबलीकरण करणे हेदेखील गरजेचे आहे. अन्यथा हे संपणे जवळपास अशक्य आहे! :(

In reply to by चतुरंग

भारतीय समाजात मुलांना वाढवले जाणे हे अतिशय लिंगभेदाधारित पद्धतीने होते. कंडिशनिंगचा भाग खूप मोठा असतो. स्त्रीचं दुय्यम असणं हे अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून सातत्यानं अधोरेखित होत राहतं. मुलं असं बघतंच मोठी झाली की त्यांना ते नैसर्गिक वाटू लागते.
अगदी बरोबर.

In reply to by चतुरंग

चतुरंग साहेब, भारतात गुंडगिरी ही राजकारण्याच्या पाठिंब्यावर जोपासलेली आहे. एक राजकारणी असतो तो अनुयायाच्या जीवावर/संख्येवर शक्तीप्रदर्शन करून तिकिट मिळविणे, निवडणूका लढविणे, निवडून येणे, त्यात काळापैसा वापरून आपल्या कार्यकर्त्यांना 'पोसणे', 'खाऊ-पिऊ' घालणे आदी करीत असतो. तो निवडून आला की त्याला अधिक अधिकार प्राप्त होतात. अफाट पैसा आणि सत्ता हाती आल्यावर ज्यांच्या जिवावर तो निवडून आलेला असतो आणि पुन्हा पुन्हा निवडून यायचं असतं त्या त्याच्या कार्यकर्त्यांना तो खुश ठेवतो. त्यांनी कांहीही केले तरी, त्यांना पोलीसांचा उपसर्ग होणार नाही ह्याची काळजी तो घेतो. खंडण्या वसूल करणे, आपापल्या एरियात दादागिरी करणे (लोकं आपल्याला घाबरतात ही सुखावह भावना असते), छोटेमोठे गुन्हे करूनही पकडले न जाता (राजकिय नेत्याच्या पाठिंब्यावर) उजळ माथ्याने वावरणे ह्याने त्या कार्यकर्त्याला 'माझ्या एरियात माझीच सत्ता आहे' असा कैफ निर्माण होतो. असे कार्यकर्ते अजून गुंड पाळतात त्यांचा समाजाला भयंकर त्रास होतो. स्त्रीयांना तर अपरिमित त्रास होतो. अशा वेळी कोणी पुरुषही मदतीला पुढे येऊ शकत नाही, कारण बाईवर हात टाकणं अजूनही गंभीर गुन्हा आहे. सरकारला, पोलीसांना जनक्षोभाला सामोरे जावे लागते. पण पुरुषाला भर रस्त्यात लाथाबुक्क्यांनी झोडपणे, प्रसंगी चाकूने भोस़कणे किंवा किमान त्याच्या घरच्या स्त्रीयांना त्रास देणे, त्यांचे जगणे कठीण करणे असे उपाय योजले जातात. त्यातून आवश्यक इतका जनक्षोभ निर्माण होत नाही. पोलीस, सरकार ह्या घटनांकडे दुर्लक्ष करतात. ह्या सर्वाला घाबरून पुरुषही आतुन कितीही उसळला तरी कृती करायला डगमगतो. (कारण ह्या गुंडांना असलेले पोलीसांचे आणि राजकिय कार्यकर्त्याचे पाठबळ). ही असली राजकारण्यांनी पोसलेली दुर्जनांची जमातही तुम्ही तिथे पाहिली नसेल. आपल्याकडेही ह्या राजकारण्यांवर, पोलीसांवर कडक कारवाई झाली तर इथेही चित्र बदलू शकेल. बाकी घरचे संस्कारही महत्वाची भूमिका निभावतात हेही तितकेच खरे.

https://youtu.be/6hoLR4dE2iE द डे आफ्टर एव्हरीडे! अनुराग कश्यपने दिग्दर्शित केलेली शाॅर्टफिल्म आठवली.

मी आधी स्वतःहून मदत करीत असे स्त्रियांस आजकाल पुर्ण बंद केले आहे! काही काही खुप कडु अनुभव घेऊन, कोणी मागितली मदत तरच करतो आजकाल!

In reply to by तर्राट जोकर

थोड़े थेट शब्द लिहितो आहे,माफ़ी असावी विशेषतः अनाहिता भगिनी मंडळ दिल्ली एअरपोर्ट ची आहे घटना (बहुदा मी आधी ही जालावर ही घटना मांडली आहे ती कुठल्या संस्थळावर ते आठवेना म्हणुन परत मांडतो आहे) माझी नुकती इंगेजमेंट झाली होती, अन मी सिक्किम ला परत निघालो होतो तेव्हा मला एअरपोर्ट ला सोडायला माझी वागदत्त वधु सुद्धा होती (माझ्यासोबत सुद्धा एक स्त्री होती) दिल्ली एअरपोर्ट ला ग्राउंड लेवल (डोमेस्टिक टर्मिनल) ला एकठिकाणी टॅक्सी थांबवली आम्ही कारण तिथून लाउन्ज जवळ पडत असे , इथे आमच्या समोर एक 25शी ची स्त्री किंवा मुलगी एका टॅक्सी मधुन उतरली , तिने टॅक्सी वाल्याला पैसे दिले तेव्हा त्याने बहुतेक तिला स्पर्श केला, तर ती घाबरुन ओरडली, माझा स्वाभाव काम अन एकंदरित संस्कार पाहता अन बायको (होणारी) सोबत असल्या कारणे मी तड़क तिथे धावलो, त्या विसिबली घाबरलेल्या स्त्री ला मी म्हणले "मॅम आप प्लीज डरिये नहीं, please if u can stick with us we'll help you to the upper level" ह्यावर त्या सबले ने मला दिलेले उत्तर आजही कान गरम करते she said (exact words) "mind your own business you motherfucker and stop getting into my pants" mentioned here की मी तेव्हा माझ्या यूनिफार्म मधे होतो, (केमोफ्लाज नाही प्रॉपर फॉर्मल यूनिफार्म), माझ्यासोबत माझी बायको ही होती, अश्या परिस्थितीत what was wrong in my offer to escort a visibally distressed lady to a relatively safer environment that Too when I was accompanied with another young woman! तेव्हापासुन ही उमेदवारी मी सोडली, अपल्याकडून जनरलायझेशन होऊ नये म्हणुन स्वतः आजही ओपन आहे मदतीला फ़क्त आता एकच कंडीशन आहे THE LADY HAS TO ASK. कारण फ्रैंकली मी एक साधा माणुस आहेच मला ही माझी इज्जत प्यारी आहे, त्या बाई ने ओरडून वरची दिव्य वाक्ये बोलल्यावर आजुबाजूच्या लोकांच्या नजरा त्या टॅक्सी ड्राईवर चे कुत्सित हसु मी कधीच विसरु शकणार नाही , नशीब माझ्यासोबत बायको होती! नाहीतर काय काय ऐकावे पहावे झेलावे लागले असते ह्याच्या कल्पनेनच कसंतरी होतं राव

In reply to by तर्राट जोकर

सहमत तरी बाप्पू धाग्याचा अभिनिवेश सगळे पुरुष मेले वाईट्टच ( बघे मेले,@@@@,&&&&,$$$$) याच वेळी आपल्या भावाला/वडीलांना/नवर्याला (असला तर्)/मित्राला बाप्पूंच्या प्रसंगातून जावे लागले तर नक्की काय वाटेल ते वाचायला नक्कीच आवडेल. बाप्पूच्या प्रतीसादाचाही पंखा अनुभवी नाखु

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अनुभव वाईटच आहे.. आणि त्यामुळे तुमची ही प्रतिक्रिया समजु शकते. पण असं बोलु शकणारी बाई.. ते ही वर्दी मधल्या माणसाला.. डोक्यावर पडलेली असावी. सिरियसली.. त्याबाईच्या वतीने मी सॉरी म्हणते.. पण अशाही बायका आहेत.. त्यामुळे जेन्युइनली ज्यांना मदत हवी आहे त्यांना ती मिळत नाही..

In reply to by पिलीयन रायडर

अहो तै , तुम्ही कश्याला सॉरी म्हणता आहात, मी बोललो न जनरलायझेशन मी तरी करणार नाही तस्मात् हे असले काही नकोच,माझा मुळ मुद्दा वेगळा आहे थोडा मी हे ही मानेल एकवेळ की ती स्त्री ऑलरेडी कुठल्यातरी एंग्जायटी मधे असेल, होते असे वर्किंग वीमेन सोबत, पुरुषांस प्रॉब्लम हा होतो की (किंवा वैयक्तिक मला म्हणा आजकाल) स्त्री ला मदत करायला जावी तर तिने जेन्युइन ऑफर मधे असले काही शोधता पंचायत व्हायची, शिवाय उमेदवारी करताना टाइम क्रिटिकल असतो कारण शुद्ध हरपलेले बेवड़े किंवा संस्कारहीन लोक इम्पल्स मधे काय करतील ह्याची शाश्वती नसते, अश्यवेळी मला पर्सनली मॉरल डाइलेमा होतो मधे पडावे तर वरती उल्लेखलेले कडु घोट ही मिळू शकतात न पडावे तर सामाजिक सौजन्य नसणे अन नाकर्तेपणा चा शिक्का बसायची भीती! असे काहीसे, ह्यात परत एकदा प्लीज तुम्ही माफ़ी वगैरे नका मागु

In reply to by पिलीयन रायडर

काय बाई आहे म्हणजे होती. !!!! वर्दीवाला माणुस बघितलाच की आधी रिस्पेक्ट्च येतो डोळ्यात त्या माणसासाठी.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

असे नमुने सगळ्याच कॅटेगरीत असतात. आपण कोणाला शक्य असेल आणि विनंती केली तरच मदत करावी हे मलाही पटलेले आहे. बरेच प्रसंग सांगू शकेन. मात्र अनाहिता भगिनीमंडळाची माफी मागायची गरज नाही! आम्ही जे चूक ते चूकच म्हणतो.

In reply to by पैसा

गो ताय, शिवराळ भाषा अन शिव्यारत्नमंडीत प्रतिसाद होता न हा, तो साधारण संकेतास अनुसरुन नाही माझ्यामते म्हणून माफ़ी मागितली!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

भाषा तिने वापरली. इथे सांगायचे तर लिहावे लागणारच ना! पिरा म्हणते तसेच, युनिफॉर्ममधल्या माणसाला असली भाषा लोक वापरू शकतात हे नाहीतर आम्हाला कसे कळणार होते? पण प्रसंग दिल्लीतला. तेव्हा काय बोलावे? सगळ्यात एक्स्ट्रीम नमुने दिल्लीतच भरलेले असावेत.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

खरंच संतापजनक अनुभव. माझाही असाच एक सौम्य अनुभव, अर्थात तुमच्या इतका तिखट/तीक्ष्ण नाही. एकदा सोसायटीच्या लिफ्ट मधून बाहेर पडलो तर एक मुलगी तिचं मोठ्ठं लगेज म्हणजे त्या टिपीकल २३ किलोच्या २ बॅग्ज लिफ्टच्या जवळच्या पायऱ्यांवरून चढवत होती लिफ्ट मधे ठेवण्यासाठी. पण त्या जड बॅग आणि त्यात लिफ्टचं सारखं बंद होणारं दार ह्यामुळे तिची तारांबळ उडत होती, चिडचिड होत होती. ते पाहून मी लगेच तिच्याजवळ जाऊन तिला मदत करावी म्हंटलं. अर्थात मी विचारलंही नाही मदत करु का असं, डायरेक्ट म्हणालो 'वेट अ मिन, आय विल हेल्प यु'.. पण बाईंचा इगो जाम दुखावला. ती लगेच माझ्याकडे संतापाने पाहून मला हातानेच मी आहे तिथेच थांबायचा इशारा देऊन 'आय विल मॅनेज' म्हणाली आणि लगेच पुन्हा तिच्या कामात मग्न झाली. मला तेव्हा इतका राग नव्हता आला पण त्यानंतर ती पुन्हा एक-दोनदा दिसली सोसायटीत तर तिची नजर वॉज लाईक "मवाली कुठला..." ...आय वॉज लाईक....व्हॉट द फक???? त्यामुळे, तुम्ही म्हणता त्याच्याशी सहमत :
तेव्हापासुन ही उमेदवारी मी सोडली, अपल्याकडून जनरलायझेशन होऊ नये म्हणुन स्वतः आजही ओपन आहे मदतीला फ़क्त आता एकच कंडीशन आहे THE LADY HAS TO ASK.
पण निलमोहर ह्यांनी जो अनुभव शेअर केला आहे लेखात, त्या बस मधे मी असतो तर नक्कीच त्यांची किंवा इतर मुलींची परवानगी न घेता, विचार न करता त्या पुरुषांना समज दिली असतीच आणि वेळपडल्यास एक तरी सणसणीत लगावलीच असती. आणि हे सगळं गाडीतल्या स्त्रीयांना त्रास होतोय म्हणून किंवा त्या प्रतिकार क्षमतेवर शंका घेऊन हे नक्कीच केलं नसतं, मला ते पटलं नसतं आणि त्याचा त्रास झाला असता म्हणून मी ते केलं असतं (आणि अन्यायाविरुद्ध अशी हिंसक भूमिका अनेकदा घेतलेलीही आहे).

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सोन्याबापू, अतिशय चीड आणणारा प्रसंग आहे. पिराताईने म्हटल्याप्रमाणे हे असं वागणारी मुलगी डोक्यावर पडलेली असली पाहिजे. असे अनुभव आलेले लोकही स्वतःहून मदत करण्यापूर्वी दहा वेळा विचार करत असतील हे नक्कीच पटलं. ती मुलगी माझ्यासोबत माझी मैत्रिण म्हणून असती तर मला तिच्या वागण्याची प्रचंड शरम वाटली असती आणि तिला तिथल्यातिथे सुनावलंही असतं. अतिशय हीन वृत्ती आहे ही.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

फारच धक्कादायक अनुभव .... वाचून फारच वाईट वाटलं. काय भावनेने आपण काय करायला जातो आणि काय घेऊन परत येतो!! अकल्पित आहे सगळं.... शेअर केल्याबद्दल धन्यवाद. ( मिपावर या असल्या शिव्या वाचून जरा धक्काच बसला. पण मग तुम्ही ते माफी त्याच्याचसाठी मागितल्याचा उल्लेख आला. त्या शिव्या नसत्या तर नक्की किती घाणेरडा प्रकार घडला ते लक्षात आलंच नसतं हे पण खरं.)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

"कोणी मागितली मदत तरच करतो" हे केवळ स्त्रियाच नव्हे तर एकंदर सर्वांकरताच करावे.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

असे अनुभव धक्कादायकच. पण तरीही मदत करताना माझ्याकडून तरी ठरवून केली नाही असं होत नाही. मला वाटल्यास माझ्याकडून ती क्रीया होते. सहज. जसं एक दिवस जेंव्हा एका मुलीची स्कूटर घसरली आणि आजूबाजूने १० गाड्या जाऊनही एकही थांबली नाही तेंव्हा मी आपसुक तिथे गेलो आणि मदत केली. पण असे अनुभव येतच नाहीत असं नाही. साधी गोष्ट; अगदी रस्ता क्रॉस करताना व्यक्ती दिसल्यावर गाडी थांबवून जायला दिलं तरी १० पैकी ७ जण अ‍ॅक्नॉलेज करतात पण ३ जण का कोण जाणे 'कस्सा थांबवला' असे आविर्भाव चेह-यावर आणून बघतात. चालायचंच.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

काही काही खुप कडु अनुभव घेऊन, कोणी मागितली मदत तरच करतो आजकाल!
माझा अणुभव : एकदा पुण्याला चाललो होतो गिरीजा सोबत कात्रजच्या बस मधे प्रचंड गर्दीत ! जवळपास माझ्या आई वडीलांच्या वयाचे एक जोडपे माझ्या शेजारी येवुन उभे राहिले , मी स्त्रीदाक्षिण्य म्हणुन लगेच उठायला लागलो तर शेजारच्या सीटवर बसलेल्या गिरीजाने लगेच ऐकवले , " उठु नकोस , तुझी सीट रीझरव्ह्ड नाही !" मी आश्चर्यचकित झालो पण तरीही स्वतः उठुन त्या काकुंना बसायला जागा दिली. पुढच्या स्टॉपवर त्यांच्या शेजारी बसलेली व्यक्ती उठुन गेली म्हणुन मी परत सीट वर बसावे म्हणुन पुढे सरकलो तर त्या काकु लगेच त्यांच्या नवर्‍याला म्हणाल्या "ओ बसा बसा लगेच बसा , नाही तर कोण तरी बसेल " , काका लगेच पडत्या फळाची आज्ञा घेत सीट वर घुसले ! आणि दोघे काकाकाकु माझ्या कडे पाहुन फिदी फिदी हसत होते ! मी परत एकदा आश्चर्य चकित झालो ! तसेही वडीलांच्या वयाचा माणुस पाहुन मी जागा दीली असतीच की ! पण ज्याने स्वतः उठुन आपल्याला जागा दीली त्याला किमान विचारायची कृतज्ञता ही त्या काकुंनी दाखवली नाही ! स्त्रीदाक्षिण्य वगैरे सगळा भोंदुपणे आहे , अनाहिता काय अन सनावृता काय , शेवटी सगळी माणसेच ! सगळ्यांचे पाय मातीचेच !! असो . गिरीजा माझ्याकडे पहात अन हसत म्हणाली " आय टोल्ड यु , द पीपल , द वर्ल्ड इस अग्लीयर दॅन व्हॉट यु अ‍ॅन्टिसिपेट" !!!

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रगो आणि गिरीजाशी सहमत.
द पीपल , द वर्ल्ड इस अग्लीयर दॅन व्हॉट यु अ‍ॅन्टिसिपेट"
हा अनुभव लैच वेळा आलेला आहे.