मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मटण

जव्हेरगंज · · जनातलं, मनातलं
सूर्य मावळतीकडं आला होता . ओढ्याच्या बाजूने पलीकडच्या पा॑दीत शिरलो . पाण्याशेजारी बसून घटकाभर डोळे मिटले . तेवढ्यात मागून पक्या आला. पाटलाच्या घरातून मटणाचा वास येतोय म्हणाला . रात्री चांदीच. निघालो दोघे . खमंग वासान डोकं चवताळतय. पाटलाघरचं जेवण संपायची वाट बघतोय. दम निघना. देशमुखांच्या घरी जायची पक्यानं शिफारस केली . मी नाही म्हणालो. परवा शिळ्या भाकरीचा तुकडा नरड्यात अडकला होता . किती खोकलो तरी निघता निघत नव्हता . वाट बघू पण मटणचं खाऊ. आण्या, सुरश्या, विक्या रानात सुशीच्या मागावर होती. नाहीतर सोन्यासारख्या संधीच मातेरं झालं असतं. जीव मुठीत धरून तसंच कितीतरी वेळ बसून राहिलो. झोपायच्या आधी पाटलीनबाईनं ऊकिरड्यावर खरकटं फेकलं. मग आम्हि दोघांनी शेपट्या हलवत मटणाचा यथेच्छ स्वाद चाखला.

वाचने 9665 वाचनखूण प्रतिक्रिया 29

नाव आडनाव 19/08/2015 - 21:16
:)

बॅटमॅन 19/08/2015 - 21:22
हा हा हा, मला वाटलं किमान माहुताने दिलेल्या भात-पेंडीची कथा टाकेल जव्हेरगंज, पण छानच जमलीये कथा.

प्राची अश्विनी 20/08/2015 - 18:27
:):)

डॉ सुहास म्हात्रे 20/08/2015 - 18:35
मस्त जमली आहे कथा... आण्या, सुरश्या, विक्या रानात सुशीच्या मागावर होती. इथे शेवटाचा अंदाज आला !

सत्याचे प्रयोग 22/08/2015 - 20:07
मटण खायला जावे आणि ताटात बेसन यावे असा फिल आलाय

मांत्रिक 22/08/2015 - 20:29
????? एक कथाप्रकार म्हणून वाचा. चांगलीच आहे. प्राणी नायक होऊ शकत नाहीत का एखाद्या कथेचे? त्यात चूक काय? अतिश्श्श्शय वेगळा कथाप्रकार हाताळल्याबद्दल मला तर कौतुक वाटतं लेखकाचं!

In reply to by मांत्रिक

सत्याचे प्रयोग 22/08/2015 - 22:17
मांत्रिक यांच्या दोन प्रतिसादावरून कथा परत वाचली. कथा मंतरलेली वाटायला लागली. कृपया मटणच्या ऐवजी बेसन व बेसनच्या ऐवजी मटण वाचावे.

In reply to by सत्याचे प्रयोग

मांत्रिक 22/08/2015 - 22:24
हायल्ला!!! कथेत बेसनचा उल्लेख कुठेच नाहीये!!! पण मूळ मुद्द्याला बगल देऊ नका! कुत्रा नायक का होऊ शकत नाही एखाद्या कथेचा?