तोच जुना शालू ....(शतशब्दकथा )
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आज माझ्या मनाने, मला आग्रह करकरून, तोच मुलायम शालू नेसायला सांगितला होता. मोतीया रंगाचा आणि सुंदर लालचुटूक फाटलेल्या किनारीचा, तोच जुना शालू. तशी मी पहिल्यापासून हौशी, प्रत्येक गोष्ट कशी, सुंदर, नीटनेटकी आणि पद्धतशीर व्हायला पाहिजे, हा माझा कायमचा आग्रह. आजही माझ्या वयाला साजेसाच रंग होता आणि माहेरचा खानदानी बाज होता, काठ स्वतःच्या हाताने फाडला होता त्याचा मी. भावाची जखम बांधायला, मागेपुढे का पाहावे ?? म्हणूनच……फाटका, तरी अत्यंत प्रिय मला आणि माझ्या हृदयाच्या अगदी जवळ असलेला शालू ……
.......
.....
....
दार उघडलं आणि तो तीरासारखा आत घुसला, पायावर डोकं टेकवून केलेल्या दंडवताने माझी तंद्री भंगली.
त्याने निरोप दिला, 'आपल्याला तातडीने राजदरबारात बोलावले आहे, द्रौपादिदेवीजी ! '
प्रतिक्रिया
काय कनेक्शन!
आवडली नेहमीप्रमाणे !!
कल्पना म्हणून छान आहे पण
हो ना!
रजस्वला होती म्हणूनच,
ओढून ताणून केलेले वाटते.
बरोबर आहे मग…
छोटी दुरुस्ती सुचवतो..
हम… "राजदरबारात" जास्त प्रभावी वाटते. धन्स !
गजोधरभैय्या नुसते सुटलेयंत. :
नोटेड …
भाअरी
काठ स्वतःच्या हाताने फाडला
क्रमशः राहिलां काय ?
म्म्म्म्म्म्म्म बरं . कथा
अप्रतिम कल्पना....
मॉगाम्बो (मी) खुश हुआ :)
द्रौपादिदेवीजी !.....?
ये (मराठी लिखनेवाले) हाथ मुझे दे दे ठाकूर
असं वाचून वाचून येईलच मराठी
चुकुन तोच जुना भालू असे वाचले
कल्पना छान आहे.