काही दिवसांपूर्वी एका जुन्या मैत्रिणीच्या घरी गेलो होतो. गप्पा चालल्या होत्या. तिच्या जॉब बद्दल विचारलं तेव्हा ती म्हणाली, 'मी जॉब सोडला. आता फक्त शेअर ट्रेडिंग करते घरी बसुन. मागे मी 'रिच डॅड पुअर डॅड' वाचलं आणि माझे डोळे खाड्कन उघडले!'
हा 'डोळे उघडणे' हा मोठा विलक्षण आणि दुर्मिळ प्रकार आहे! ज्याचे डोळे उघडतात त्याचे आयुष्य पार बदलून जाऊ शकते. बदल कसा आणि किती होणार ते डोळे कोणत्या बाबतीत आणि किती उघडले यावर अवलंबून असते. माझ्या या मैत्रिणीचे डोळे पैशाच्या बाबतीत उघडले आणि तिच्या करिअर मध्ये थोडा बदल झाला. पण काही लोकांचे डोळे असे उघडतात कि त्यांचे आयुष्य तर पार बदलून जातेच पण इतर लोकांवर, समाजावर, जगावरही त्याच्या परिणाम होतो. उदा. वाल्याचे डोळे उघडले आणि त्याचा वाल्मिकी झाला! न्यूटन चे डोळे उघडले आणि जगात काय काय बदल झाले! बुद्धाचे डोळे उघडले आणि बौद्ध धर्म अस्तित्वात आला!
कुणाचे डोळे पैशाच्या बाबतीत उघडतात, कुणाचे प्रेमाच्या, कुणाचे प्रकृतीच्या, कुणाचे अध्यात्माच्या, कुणाचे आणखी कशाच्या…
पण कुणाचे डोळे कधी, का आणि कशाबाबतीत उघडतील हे मात्र कुणीही सांगू शकणार नाही. ईट इज अ ग्रेट मिस्टरी! आणि एकदा डोळे उघडले कि मगच कळतं कि अरे! आत्तापर्यंत डोळे बंदच होते कि! :)
डोळे उघडणे - काही विचार
वाचने
4588
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिपाकरांचे डोळे कधी उघडतील
मिपाकरांचे डोळे कधी उघडतील देव जाणे.
-(मिचमिच्या डोळ्याचा) जेपी
+११११११११११११
In reply to मिपाकरांचे डोळे कधी उघडतील by जेपी
अलीकडे तर गणेशमूर्त्यांचे डोळेही बारीक होऊ लागलेत म्हणे!
https://timesofindia.indiatimes.com/india/Chinese-Ganeshas-eyes-narrowe…
खरंय..
सरळसोट आयुष्यात एखादा जोरदार झटका बसला की असे डोळे खाडकन उघडतात, मग कळतं आपण आतापर्यंत ज्याला जगणं म्हणत होतो ते खरं जगणं नव्हतंच,
पण असे डोळे उघडल्यावर माणूस पुढे काय करतो ते जास्त महत्वाचं...
लेखनविषय: मुक्तक हे फार आवडले
लेखनविषय: मुक्तक हे फार आवडले . हल्ली यात मोठी यादी देण्याची टुम निघाली आहे.तुमच्या मैत्रिणिचे भले होवो आणि ती मिपाकर झाल्यास "डोळे उघडल्यावर तीन/सहा वगैरे महिन्यांनी माझी प्रगती" लेख येवो. मग डोळे उघडण्याची एक लाटच येईल.
काका ,..
In reply to लेखनविषय: मुक्तक हे फार आवडले by कंजूस
काका ,..
"डोळे उघडल्यावर तीन /सहा/ नऊ महिण्यांनी माझी प्रगती " असा लेख यायला हवा.
मग डोळे उघडण्याची खरी लाट येईल.=))
'मुक्तक' बरोबर आहे कि नाही?
In reply to लेखनविषय: मुक्तक हे फार आवडले by कंजूस
'मुक्तक' बरोबर आहे कि नाही? मला काही कळत नाही यातलं - साहित्याप्रकारांतलं.
:)
डोळे बंद असेल तर सुंदर आणि
डोळे बंद असेल तर सुंदर आणि छान स्वप्न दिसतात. दिवसा उजेडी तर तीच ...नेहमीचीच.....
डोळे उघडणे गरजेचे.
आयुष्यात प्रत्येकाचे एकदा का होईना डोळे उघडणे गरजेचे आहे.त्यातुनच माणसाचे व्यक्तिमत्व घडत असते.असं मला वाटतं.:)
कशाला ओ!
झोपू द्या की सुखाने!
'मी जॉब सोडला. आता फक्त शेअर
एखादं पुस्तक वाचून खाडकन डोळे उघडले जाणारे लोक बघितले की मी डोळे मिटून घेणे पसंत करतो.
हाहा
In reply to 'मी जॉब सोडला. आता फक्त शेअर by अन्या दातार
हाहा
अन्ना हजारे सुद्धा स्वामी विवेकानंद चरित्र वाचून अशा प्रकारचं जीवन जगत आहेत म्हणे.
असंच कै नै.
In reply to 'मी जॉब सोडला. आता फक्त शेअर by अन्या दातार
ते राममोहन रॉय का कोण, त्यांनाही एकदा ईशावास्य उपनिषदाचे एक पत्रावळ झालेले पान रस्त्यात दिसले, उडूनच चालले होते. ते उचलून पाहून, त्यातील तत्त्वज्ञान वाचून त्यांचे डोळे उघडले असा इतिहास आहे बॉ.
+१
In reply to असंच कै नै. by बॅटमॅन
अगदी,
सगळेच काही जन्मापासून सर्वज्ञानी नसतात.
काही गोष्टी वाचून अनुभवूनच समजतात, त्यातूनच माणूस घडत जातो.
माझा रोख हा साधारणत:
In reply to असंच कै नै. by बॅटमॅन
माझा रोख हा साधारणत: पुस्तकाने / सेमिनारने प्रभावित होऊन काही जास्त अभ्यास न करता व्यवसायात उडी मारणार्यांकडे होता. त्यासाठीच लेखातील एक प्रसंग उधृत केलाय.
सहमत.
In reply to माझा रोख हा साधारणत: by अन्या दातार
सहमत.
सहमत.
In reply to माझा रोख हा साधारणत: by अन्या दातार
सहमत.
पुस्तकाचा दोष नाय. वाचनारा
In reply to 'मी जॉब सोडला. आता फक्त शेअर by अन्या दातार
पुस्तकाचा दोष नाय. वाचनारा काय चीज हाय ते महत्वाचं हाय.
डोळे उघडलेच पाहिजेत.
माझे पण डोळे उघडलेत, आणि पुन्हा 'माझ्या राजा, अरे माझ्या शोन्या' म्हटले की पुन्हा मिटतात.
गेल्या काही दिवसापासून नुसती डोळ्याची उघड-झाप होऊन होऊन माझे डोळे बारीक व्हायची वेळ आली आहे. :(
कम से कम तारीख दर तारीख मुलाकात तो होगी...
:D
In reply to डोळे उघडलेच पाहिजेत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:D
:-) दंबुक न वापरता बार काढलात
In reply to डोळे उघडलेच पाहिजेत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:-) दंबुक न वापरता बार काढलात सर.
शेर !
In reply to डोळे उघडलेच पाहिजेत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शेर !
फारच मस्त !
शायराला सलाम !
'पथिक'? प्रेरणा वाले का?
'पथिक'? प्रेरणा वाले का?
चान चान लेख
आभार!
In reply to 'पथिक'? प्रेरणा वाले का? by प्यारे१
आभार!
'प्रेरणा वाले'? कळलं नाहि…
दिवसाढवळ्या
दोन्दोन संपादक डोळे बारीक होवुन झोप येत आहे अश्या गोष्टी करत असतील तर सभासदांनी काय घोरायचे काय ? ;)
नैना ठगलेंगे