✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पुणेरी पुणेकरः काही निरिक्षणे

ड
डॉ.प्रसाद दाढे यांनी
Sun, 08/17/2008 - 12:35  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
55506 वाचन

💬 प्रतिसाद (229)

प्रतिक्रिया

पुणे

मनीषा
Wed, 08/20/2008 - 07:01 नवीन
हे महत्वाचे आणि प्रगती करणारे शहर आहे यात वादच नाही म्हणुन तर पुण्यात आयुका आहे, एनडीए आहे... इन्फोसिस आहे... पुण्यातले लोक प्रत्येक क्षेत्रात नेहमीच आघाडीवर आहेत... (आणि हे फक्त पुणेकर म्हणत नाही तर सगळेच म्हणतात /अनुभवतात ) उडदामाजी काळे गोरे हे असणारच... म्हणुन सगळी डाळ वाईट नसते... पुण्यात कोणाला वाईट अनुभव आले असतील तर ते वैयक्तीक आहेत... (तसे इतर शहरांमधे सुद्धा येउ शकतात्/येतात )म्हणुन पुण्याला नावे ठेवायचे कारण नाही.. समस्या सगळीकडेच असतात.. तशा पुण्यात सुद्धा आहेत म्हणजे तो काय पुण्याचा आणि पुणेकरांचा दोष होत नाही.. आता मुंबई मधे किती बकाल झोपडपट्ट्या आहेत... एअरपोर्ट वर विमान लॅन्ड होताना पहिला नजारा त्या झोपड्यांचाच असतो पण तरीही (मी पुणेकर असले तरी) ते बघुन सुद्धा घरी आल्या सारखच वाटतं (देशप्रेम इ. इ. ) मला वाटतं पुणे- आणि पुणेकरां विषयी बोलणे ..टीका करणे याची अ-पुणेकर लोकांना सवय झाली आहे.. पण इतकी नावे ठेउन सुद्धा घर ते पुण्यात घेतात.. मुलांना शिकायला पुण्यात पाठवतात.. नोकरी (आणि छोकरी सुद्धा ) पुण्याचीच करतात.. आणि तरी सुद्धा पुणे वाईट... ???????? ((अ-पुणेकरांच्या ) स्वभावाला औषध नाही हेच खरे..)
  • Log in or register to post comments

अरे अजून

विसोबा खेचर
Wed, 08/20/2008 - 07:30 नवीन
अरे अजून संपली नाही का पुण्याची अन् पुणेकरांची टकळी? :) बरं बुवा, आम्ही हारलो, पुणेकर जिंकले! पुणंच सर्वात गिरेट! मग तर झालं!? :) आपला, (फॉकलंडरोडवरचा मुंबईकर) तात्या.
  • Log in or register to post comments

तात्या!

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/20/2008 - 09:53 नवीन
सर्वात जास्त प्रतिसाद खेचणारा विषय म्हणून "पुण्या"चं जाहीर अभिनंदन नानांनी करावं असं मी सुचवत आहे! ;-) यमी (from the middle of nowhere!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

>>अरे अजून

वेलदोडा
Wed, 08/20/2008 - 11:21 नवीन
>>अरे अजून संपली नाही का पुण्याची अन् पुणेकरांची टकळी? का हो तात्या - पुणेकरांची ती टकळी आणि अ-पुणेकरांचे काय - रसाळ शब्द, अमृताचे बोल, मधुर वाणी...? :/ (ह.घ्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

नमस्कार

अनिल हटेला
Wed, 08/20/2008 - 07:41 नवीन
नमस्कार बोकोपंत !!! आवडत हो नागपूर देखील आम्हाला .... मुंबई आमचीच आणी पुणे , नागपुर सारा महाराष्ट्र माझा .... मेरा भारत महान.......वादच नाही.................. मुद्दा हा आहे की का म्हणुन बेस लेस विधान करून पुण्याला नाव ठेवता, राजे!!!! हजारदा सांगीतल की विषय काय आहे टॉपीकच तो आधी वाचा ... काय -काय प्रतीसाद आलेत ते वाचा आणी मग बोला.... असो... इथुन पुढे विचार करून टाइप कराल असे वाटते.... ( एकेक काळचा नागपुर च्या जगप्रसिद्ध "हल्दीराम्स" चा पुण्यातील सेल्समन ) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

अनिल हटेला....

खादाड_बोका
Wed, 08/20/2008 - 08:36 नवीन
त्या राजेन्द्र अग्रवालला (हल्दीराम)ज्या दिवशी ह्या खादाड बोक्याच खरे नाव सांगशील तर तो घरी येईल तुला घ्यायला. बोका काय आहे हे फार कमी लोंकानां माहीत आहे.... तात्या माफ करा... मला तर स्वप्नातही भुक लागते....
  • Log in or register to post comments

धन्यवाद......

अनिल हटेला
Wed, 08/20/2008 - 08:36 नवीन
धन्यवाद...... पण काहीही गरज नाही.... आणी हल्दीराम ला तलाक ,तलाक ,तलाक झालाये........ असो....... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

आता हा

विसोबा खेचर
Wed, 08/20/2008 - 11:52 नवीन
आता हा विषय थांबवण्यात आला आहे. यापुढील प्रतिसाद काढून टाकले जातील याची कृपया नोंद घ्यावी..
  • Log in or register to post comments

नम्र विन॑ती

डॉ.प्रसाद दाढे
Wed, 08/20/2008 - 11:53 नवीन
सर्व मिपामित्रा॑ना आवाहनः ह्या विषयावरील चर्चा आता था॑बविण्यात आली आहे. (अर्थातच तात्या॑शी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे) व ह्यापुढे ह्या दुव्यावर कोणीही नवीन लिहू नये (अन्यथा तो उडविला जाईल) प्रतिसाद देणार्‍या व न देणार्‍याही सर्व मिपाकरा॑चे व वाचका॑चे आभार
  • Log in or register to post comments

.

ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 08/20/2008 - 13:09 नवीन
अणुमोदण आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे

चला बर झाल

सुर
Wed, 08/20/2008 - 13:31 नवीन
चला बर झाल ..... * * * Jai Maharashtra * * * khara ter Marathi tach lihayacha prayatna karat hote pan have te Shabd milat navhate.. Mhanun mag Asach lihila Shevati kay Bhavana mahatavachi..nai ka... Sweet Sonu * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *
  • Log in or register to post comments

स्वयंघोषित मोठेपणा

आम्हाघरीधन
Wed, 08/20/2008 - 19:34 नवीन
विद्येचे माहेघर , सांस्कृतिक राजधानि , चोखंदळ रसिक ईत्यादि. अरे पण हे कोणि ठरवले ? स्वतः च ठरवयाचे , स्वतः च आवर्जुन वारंवार वापरायचे (लिहिताना, बोलताना) आणि असे दाखवायचे कि हे सगळ्याना मान्य आहे . एकदम सत्य, स्वतःच्या तोन्डाने स्तुति करणे कितपत योग्य?
  • Log in or register to post comments

स्तुती

विजुभाऊ
Wed, 08/20/2008 - 19:46 नवीन
आपण आपल्या तोंडाने करतो ती स्तुती नव्हे तर स्वतःबद्दल अनमोल माहीती देण्याचे काम पुणेकर करतात. तेसुद्धा जगाला चांगल्या गोष्टी कळाव्यात म्हणुन करतात. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments

हा सगळ्यात

सखाराम_गटणे™
Tue, 12/30/2008 - 14:42 नवीन
हा सगळ्यात मोठा धागा दिसतोय ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments

पुणेरी लोकं - नाही म्हणाली तरी ...

वाहीदा
Fri, 01/02/2009 - 15:34 नवीन
पुणेरी लोकं थोडी नाही म्हणाली तरी 'SNOB' - 'शिष्ट' असतात . स्पेशली - पेठेतले तर असतातच असो तरी पण पुणे आवड्ते संगळ्यांना :-) ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

शीळी कढी

मराठी_माणूस
Sat, 02/21/2009 - 13:17 नवीन
ह्या शीळ्या कढी ला कोणी उत आणला आहे ;)
  • Log in or register to post comments

मुंबईशी कंपॅरिझन

पुष्कर
Sun, 02/22/2009 - 12:13 नवीन
पुण्यातल्या बायकांना भोंडले पाठ असतात. पुण्यात संगीत संमेलनांना गर्दी असते. सवाईची वेळ बदलल्यावर आख्खं पुणं हळहळलं. वसुबारस, धनत्रयोदशी, तुळशीचं लग्न या दिवशीसुद्धा पुण्यात दिवाळी साजरी करतात. पुण्यात नागपंचमी किंवा नारळीपौर्णिमेच्या दिवशी देवळांमध्ये 'श्रावणी' नामक कार्यक्रम असतो. पुण्यात फक्त 'चहा, भिस्कुट, क्रिमरोल' एवढंच मिळणारी दुकाने आहेत, त्यांना अमृततुल्य म्हणतात.
  • Log in or register to post comments

पुणेकर

टिम्बु
Sun, 02/22/2009 - 12:48 नवीन
पुणेकर महानगर पालिकेला भरमसाट कर भरतो आणि त्याचा स्वता: करीता न करता नागरी सुविधा आपल्याच वर खर्चानी वापरतो.
  • Log in or register to post comments

नवीन प्रतिसाद

आनंद घारे
Wed, 03/04/2009 - 12:10 नवीन
या धाग्यावरील चर्चा थांबवण्यात आली होती ना? नवीन प्रतिसाद आल्यामुळे या धाग्याचे नाव लिस्टवर आले आणि मी हा लेख पहिल्यांदा वाचला! आधीच इतकं काही लिहिलं गेलं आहे, त्यात मी कसली भर घालणार? आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मजेशीर

अविनाशकुलकर्णी
Wed, 03/04/2009 - 14:47 नवीन
मजेशीर व्याख्या : खास ''पुणेकर'' रानी लिहिलेली १) पेन: दुसरयाकडून घेवून परत न करण्याची वस्तू २) बाग: भेळ शेवपूरी वगॆरे खाऊन कचरा टाकण्याची जागा ३) चवकशीची खिडकी: 'इथला माणूस कोठे भेटेल हो' अशी चवकशी बाजूच्या खिडकीत करावी लागणारी एक चवकोनी जागा. ४)ग्रंथपाल: वाचकाने मागितलेले पुस्तक 'बाहेर गेले आहे' असे तंबाखू चघळत तिराकसपणे सांगण्यासाठी नेमलेला माणूस. ५) विद्यार्थी: आपल्या शिक्शकांना काहीही dnyaan नाही असे मानून आत्मकेंद्रीत राहणारा एक जीव ६) कार्यालय: घरगुती ताणतणावानंतर विश्रांती मिळण्याची हक्काची जागा ७) जांभई: विवाहित पुरुषांना तोंड उघडण्याची एकमेव संधी ८) शब्दकोश: जिथे 'लग्ना'आधी 'घटस्फोट' होतो असे स्थ्ळ ९) प्रेमप्रकरण: क्रिकेट सारखाच एक खेळ. जिथे पाच दिवसांच्या 'कसोटी'पेक्शा झटपट 'सामने' अधिक लोकप्रिय असतात १०) सिगारेट: वाळका पाला भरलेली एक सुर नळी जिच्या एका टोकाला आग दुसरया टोकाला मुर्ख माणूस ११) कपबशी: नवरा बायकोच्या भांडणात बळी जाणारी वस्तू १२) college: शाळा व लग्न यामधील वेळ घालवण्याचे मुलामुलींचे ठिकाण ======================== शब्द पुणेरी, अर्थ पुणेरी.. मराठीतले काही शब्द पुण्यात फारच वेगळ्या अर्थाने उच्चारले जातात. अशा काही शब्दांची ही डिक्शनरी १.यंत्रणा : जाडजूड मुलगी २.दांडीयात्रा : ऑफिसला सलग बुट्ट्या ३.पेटणे : संतापणे ४.हुकलेला : मुद्दाच न कळालेला ५.चैतन्यकांडी : सिगारेट ६.चैतन्यचूर्ण : तंबाखू ७.चेपणे : पोट भरून दाबून जेवणे ८.कल्ला : धम्माल ९.बुंगाट : (वाहनासंदर्भात) अतिशय वेगाने १०.गाडी : टू व्हीलर ११.टांगा पल्टी, घोडे फरार : दारू पिऊन आउट होणे १२.थुक्का लावणे : फसवणे १३.एलएलटीटी : लुकिंग लंडन, टॉकिंग टोकियो (तिरळा) १४.कर्नल थापा : थापाड्या माणूस १५.सत्संग : ओली पार्टी
  • Log in or register to post comments

काही राहीलेले..

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 03/04/2009 - 16:29 नवीन
१६: सामान = छान मुलगी १७:वरती=बुधवार पेठ १८:कान फाडणे=खोटे बोलणे १९:च्या आयला=समस्त सभा॑षणाचा अग्रशब्द २०:तीर्थस्वरूप=बाप २१:मनाचे श्लोक=बड॑ला/थापा २२:चावणे=मस्करी करणे/माप काढणे २३:चघळणे=नुसती बडबड करणे २४:म॑ग(एकदम खवून्)=कसा/कशी आहेस सुहास.. आता "मी"काय करू ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

फार छान लेख!

समीरसूर
Wed, 03/04/2009 - 15:51 नवीन
डॉक्टरसाहेब, खूप छान लेख लिहिलाय. काही-काही वाक्ये खरच खूप खुमासदार आहेत. :-) मजा आली. पुण्याचं मला खरच खूप विशेष कौतुक वाटतं. १७-१८ वर्षांपूर्वी मी जेव्हा पुण्यात रहायला आलो तेव्हा पुणे खूप छान आणि आटोपशीर होतं. माझी पहिली अगदी छोटी पुणे भेट १९८९ ला झाली. त्यावेळी मंगलामध्ये 'धडाकेबाज' पाहिला होता. मुंबईच्या इतकं जवळ असून देखील डान्स बारचा प्रादुर्भाव पुण्यात कधीच झाला नाही. नाही म्हणायला पुण्यातले आणि आस-पासचे हौशी रसिक पनवेल वार्‍या करायचे आपली तहान भागवायला आणि कान्हे फाटा आणि कात्रज जवळ कुठेतरी डान्स बार अनधिकृतरीत्या सुरू असल्याच्या आणि नंतर पोलिसांनी कारवाई करून ते बंद पाडल्याच्या बातम्या ७-८ वर्षापूर्वी वाचल्याचे स्मरते. पण हा एक अपवाद! पुण्यात डान्स बार असावेत असं कदाचित कुणालाच वाटलं नाही ही खरच कौतुकाची गोष्ट आहे. औरंगाबाद, सोलापूर, नागपूर, कोल्हापूर सारख्या शहरांत देखील त्याकाळी अधिकृत/अनधिकृत डान्स बार होते. पण पुण्याच्या संस्कृतीला ते कधीच रुचले नाही. मुंबईसारखी मुक्त बारसंस्कृती देखील इथे कधी रुजली नाही. कुठेही पायी फिरायला खूप छान वाटायचे त्याकाळी. आताचे पुणे हे मुंबईच्या वाटेवर जातेय की काय अशी मला भीती वाटते. तसे झाले तर एक सुंदर आणि छान शहर एका अतिवेगवान, जगडःव्याळ, बाजारू आणि चंगळवादी संस्कृतीचा बळी ठरेल असे मला वाटते. मुंबईचा वेग आणि तिथली संस्कृती भीतीदायक आहे. पुणे अजूनही सुसह्य आहे. पुण्यातले आणखी एक विशेष म्हणजे जर एखाद्या अस्सल पुणेरी घरात जर आपण गेलात तर आधी दारातूनच तुमच्याशी बोललं जातं. मग थोडी ओळख असेल तर आत बोलावलं जातं. अगदीच जास्त ओळख असेल तर 'बसा' म्हटलं जातं. थोडं नातं असेल तर 'पाणी हवय का?' असं आस्थेने विचारलं जातं. अगदी जवळचं नातं असेल तर चक्क 'चहा घेणार का?' असही विचारलं जातं. अगदीच जवळचं नातं असेल, आणि नियमित येणं-जाणं असेल तर 'चहा टाकते' असं विचारलं जाऊन 'नको, नको, आत्ताच घेतला.' अशा उत्तराची अपेक्षा करत काकूं/मावशी तिथेच थांबतात किंवा काका 'अगं, चहा टाक जरा' असं म्हणतात. अगदी फारच घसट असेल आणि सख्ख्यातलं नातं असेल तर 'काही खातोस का/काही खाणार का?' असही विचारलं जातं. प्रत्यक्ष खायला/प्यायला केव्हा मिळतं हे आपण नक्की खायच/प्यायच आहे की नाही यावर ठरत असलं तरी ते बहुतांशी काका-काकूंच्या मूडवर ठरतं. :-) मी एकदा आमच्या एका दुरच्या नातेवाईकांकडे गेलो होतो. त्या काकूंनी मला मोठ्या प्रयत्नांनंतर आत यायला सांगीतलं होतं आणि मी गेल्यावर तिथे आत सगळे शेवयांची खीर ओरपत असल्याचं दृष्य मला दिसलं. मी आत गेल्यावर सगळी 'खाणारी' तोंडं आत पळाली. काकूंनी मग मला अगदी देवाजवळ दूध ठेवतात तसल्या छोट्या वाटीमध्ये खीर दिली होती. मला खूपच हसू आलं होतं पण मह्त्प्रयासाने मी ते दाबलं होतं. अतिशयोक्ती करत नाही पण अगदी एका घोटात मी ती खीर संपवली होती. या काकूंचा जंगली महाराज रस्त्यावर मोठा बंगला होता आणि बंगल्याच्या आवारातच नोकरी करणार्‍या मुलींसाठी त्यांनी एक वसतिगृह बांधले होते. त्या स्वतः एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या व्यवस्थापक होत्या आणि पतिदेव एका मोठ्या कंपनीत जनरल मॅनेजर या पदावर काम करत होते. म्हणजे चहुबाजूंनी पैसा धोधो कोसळत असतांना देखील वृत्ती मात्र कोती होती. नुकतीच माझी एक मावस बहीण त्यांच्या वसतिगृहात राहून गेली पण तिच्याकडूनही (ती त्यांची अधिक जवळची नातेवाईक असूनही) पूर्ण पैसे आगाऊ घेतले आणि शिवाय मोबाईल चार्जिंगचे १०० रुपये प्रतिमहिना जादा घेतले. आता बोला! :-) असा हा अस्सल पुणेरीपणा! --समीर
  • Log in or register to post comments

पाणी पाहिजे का?

प्रमोद्_पुणे
Wed, 03/04/2009 - 16:22 नवीन
'पाणी हवे आहे का?' 'पुन्हा या केव्हातरी निवान्त जेवायलाच.. (चार तास बसून गेल्यावर!!) पण फोन करून या ..'
  • Log in or register to post comments

छान!

सालोमालो
Wed, 03/04/2009 - 16:34 नवीन
९ आणि ११ अंशत: पटल्या. पण तुमचं निरिक्षण खल्लास! एक नंबर! (जन्माने मुंबईकर पण विचारांनी पुणेकर) सालो
  • Log in or register to post comments

काहि खास

अविनाशकुलकर्णी
Fri, 03/06/2009 - 22:39 नवीन
काहि खास वाक्ये[पुणेकर स्पेशल} केशव - साधा सरळ माणुस, नाका समोर बघून चालणारा. सामान - त्याची प्रेयसी. काटा काकु - चांगली दिसणारी पण वयाने ज्यास्त. खडकी - एकदम टुकार. झक्कास - एकदम चांगले. काशी होणे - गोची होणे. लई वेळा - नक्की, खात्रीने. चल हवा येवू दे - निघून जा.
  • Log in or register to post comments

च्यायला ही

धमाल नावाचा बैल
Sat, 03/07/2009 - 23:43 नवीन
च्यायला ही शिळी कढी अधुम मधुन ढवळून कोण वर आणत असतय रे? :D
  • Log in or register to post comments

पुणे म्हणजेच अजित पवार काय?

चिरोटा
Tue, 03/10/2009 - 09:07 नवीन
हल्लि बेन्गळुरु मधे काही पुणेकर भेटले. मी-पुण्यात हल्लि रस्ते चान्गले झाले आहेत असे ऐकले. पुणेकर्-अजित पवार आहेत ना! मी-पुण्यात आय्.टी. कम्पन्या खुप आहेत असे ऐकले आहे. पुणेकर्-अजित पवार आहेत ना. मी-पुणे आणि अजुबाजुच्या परिसरात जागान्चे भाव खुप आहेत. पुणेकर्-अजित पवार आहेत ना! (त्या 'ना' चा उच्चार असा की त्या उपर तुम्ही काहि विचारणारच नाही!!)
  • Log in or register to post comments

.

सँडी
Tue, 03/10/2009 - 11:11 नवीन
तुम्ही अजित पवारशीच तर नव्ह्ते ना बोलत ? ;) - सँडी अजित पवार सार्खा एक परप्रांतिय पुणेकर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

घरी जावे

मि माझी
Wed, 03/11/2009 - 15:36 नवीन
ज्यानां पुणे आवडत नाही.. त्यांनी आपल्या गावाला जाउन रहावे खुशाल..!!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा