पुण्यात नवीन होतो तेंव्हाची गोष्ट. मित्रासोबत कोथरूड डेपोपासून चांदणी चौकात जायचे होते.
एका गृहस्थाला रस्ता विचारला. ते चांदणी चौकाकडे बोट दाखवून म्हणाले," तुम्ही इथून खाली जा."
समोरचा रस्ता बघून मित्राने अतिशय निरागसपणे विचारले, "मामा, रस्ता तर वर चाललाय हो ! खाली कसं जायचं?"
ते गृहस्थ चिडून म्हणाले," मला मामा बनवू नको. जायचं असेल तर जा मुकाट्याने"
आम्हा दोघांनाही कळत नव्हतं की नेमकं काय चुकलं. प्रश्न की नातं ?
काही दिवसांनी आमच्या रूमवर स्वयंपाक करायला येणाऱ्या 'मावशी' जरा उशीरा आल्या. त्यावेळी तोच मित्र त्यांना म्हणाला," बाई, जरा लवकर येत जा."
हे ऐकून त्या तावातावाने म्हणाल्या," मी बाई दिसते होय रे तुला ?"
मित्र परत तितक्याच निरागसतेने म्हणाला," तुम्ही बाईचं तर दिसताय. एव्हढं काय झालं?”
बाईंचा राग काही शांत होईना. त्या म्हणाल्या," मावशी म्हणायचं. उद्यापासून येणार नाही बाई म्हणणार असशील तर!"
मित्र तेंव्हा शांत बसला पण ती घराबाहेर जाताच माझ्यावर उखडला," त्यादिवशी त्या भयकान्याले मामा म्हटलं तं बोंबलला अन इले मावशी काऊन म्हणायचं बे?
प्रश्नाचं उत्तर तसं माझ्याजवळ नव्हतं. पण मी वेळ मारून नेण्यासाठी म्हणालो," अबे पुण्यात बाईले 'बाई' नसते म्हणत. मावशी म्हना लागते. बाईचा अर्थ वेगळा होते इथं!"
त्यानंतर तो जे बोलला ते इथे सांगण्यासारखं नाही !
ही गोष्ट अधूनमधून मला आठवतंच असते. कारण पुण्यात आल्यापासून आमच्या भाषेचा आणि प्रांताचा उद्धार झाल्याशिवाय एकही दिवस जात नाही. पुढच्या लिखाणात "आम्ही" / "आमचं" वैगेरे शब्द जास्त आढळले तर आश्चर्य वाटू देऊ नका. हे दोन शब्द पुण्यात "मी" / माझं" च्या ऐवजी सर्वनाम म्हणून वापरण्यात येतात. इथेच खरी गम्मत आहे. एरवी चहासुद्धा कोणी शेयर करणार नाही पण "आमचं" वैगेरे शब्द हमखास वापरतील. असो. तर या उद्धार वैगेरे प्रकाराला आता आम्ही चांगलेच सरावलो आहोत. समोरच्याचा उद्धार करायला सुद्धा आता आम्ही मागेपुढे पाहत नाही. तसं वाद घालणं आम्हाला फारसं आवडत नाही. पण परप्रांतात गेल्यावर तिथली भाषा, चालीरीती शिकून घेतल्या पाहिजेत असं म्हणतात. या उद्देशाने पुण्यात आल्यावर आम्ही वाद घालणं शिकून घेतलं. आता वाद कोणत्याही विषयावर होऊ शकतो. आता हेच बघा ना, इथल्या लोकांना आमच्या प्रांताची ओळख म्हणजे "शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रांत" अशी आहे. आणि त्यांच्यासाठी तो चेष्टेचा विषय आहे.
"आत्महत्या का करतात रे तुमच्या इथले शेतकरी?", कंपनीतल्या एका बाईंनी( मावशींनी असं वाचा!) मला विचारलं.
मला वाटलं त्या गांभीर्याने विचारत असतील. मी म्हणालो," सतत दुष्काळ असतो तिकडे. पीक फारसं येत नाही. पिकलं तर भाव मिळत नाही. कर्जबाजारी होतात बिचारे. दुसरा काही पर्याय दिसत नाही त्यांना. मग करतात आत्महत्या"
यावर त्या म्हणाल्या," पुण्यातही घर घेताना कर्जबाजारी व्हावे लागते. म्हणून काय सगळे आत्महत्या करतात का ? मूर्ख आहात तुम्ही लोकं! कधी बाहेरचं जग बघितलेलं नसते."
उत्तरादाखल मी त्यांच्यासमोर एका कोऱ्या कागदावर महाराष्ट्राचा नकाशा काढला. आणि त्यांना म्हणालो, " तुम्ही खूप जग बघितलेलं दिसतंय. या नकाशावर पुणं सोडून इतर किमान दहा जिल्हे तरी दाखवा !"
थोडा विचार केल्यावर त्यांनी मुंबई दाखवलं. बाकी वाद अजूनही सुरूच आहे. ह्यात त्यांची काहीच चूक नव्हती. कारण पुण्यातल्या लोकांना कधी नकाशा बघण्याची गरजच पडत नाही. त्यांच्या लेखी येरवड्याच्या पलीकडे मराठवाडा आणि हडपसरच्या पलीकडे दक्षिण भारत सुरु होतो ! त्यामुळे नकाशात कशाला पाहायचं? एका सदाशिवपेठी पुणेकराने तर मला सांगितले होते की , अलका चित्रपटगृहाचा चौक, स्वारगेट आणि शनिवारवाडा हे ३ शिरोबिंदू जोडून जो त्रिकोण तयार होतो तेच खरे पुणे. या त्रिकोणाच्या संदर्भात पुण्याच्या सीमारेषा म्हणजे मुठा नदी, लकडी पूल, टिळक रस्ता आणि शिवाजी रस्ता. मी त्यांना म्हटलं," काका ,या हिशोबानी तर पुणे महानगर पालिका भवन सुद्धा पुण्यात येत नाही मग पुण्याला खेडेगाव म्हणून घोषित करून टाका ना!" त्यादिवसापासून ते मला भेटलेच नाहीयेत. आता तुम्ही म्हणाल की पुण्यातले लोकं मुळातच संकुचित विचारांचे आहेत वगैरे वगैरे . पण म्हणतात ना , दिसतं तसं नसतं. संकुचित तर सोडाच पुण्यासारखी खुल्या दिलाची लोकं पृथ्वीच्या पाठीवर कुठेही सापडणार नाहीत. समोरच्याचा अपमान सुद्धा ते खुल्या दिलाने करतात. अपमान करताना मुक्तहस्ताने शब्दांचा वापर करणे तर पुण्यातच शिकावं. आता हेच बघा ना,समजा एखाद्या पुणेकराच्या घरासमोर तुम्ही गाडी पार्क केलीये. तर फक्त चाकातली हवा सोडून तो शांत बसणार नाही. गाडीवर एखादी चिट्ठी लिहून ठेवेल. " पुढल्यावेळी गाडी घरासमोर नव्हे तर समोरील मोकळ्या जागेत पार्क करा अन्यथा चाकातील हवा सोडून जागा मोकळी करण्यात येईल"
पुण्यात आल्यावर आणखी काही गोष्टी शिकायला मिळाल्या. एक म्हणजे, विषय कोणताही असो त्याचा शेवट नेहमी "आम्ही" / "आमचं" असं करून स्वत:च कौतुक करून घेणे! जागतिक विषयसुद्धा हे लोकं वैयत्तीक पातळीवर आणू शकतात. उदा. काश्मीर सीमाप्रश्नावर जर चर्चा सुरु असेल तर शेवटी," म्हणूनच घर भाड्यानी देताना आम्ही लेखी करार करून घेतो. उद्या उठून भाडेकरयाने घरावर हक्क सांगायला नको." असं ऐकू येतं. दुसरी म्हणजे , स्वाभिमान या शब्दाच्या अर्थावर पुणेकरांच एकमत आहे. 'दुसर्याशी भांडताना कामात येतो तो स्वाभिमान'. याविषयी एका पुणेरी मित्राने मला सांगितलं होतं,"आम्हाला अन्याय सहन होत नाही रे. आणि तुम्हाला वाटतं आम्ही भांडतोय. जी गोष्ट आमची आहे त्यावर तुम्ही हक्क सांगू नका". आता ही चर्चा कंपनीत मी त्याच्या खुर्चीवर बसलो होतो यावरून सुरु होती. अन्यायाची इतकी व्यापक परिभाषा टिळकांना पण उमगली नसेल!! पुणेकरांच खाद्यप्रेम तर सर्वश्रुत आहेच. पण त्यातही स्वाभिमान डोकावू शकतो. उदा. आम्ही आणलेला आंबा हाच अस्सल हापूस आहे हे सिद्ध केल्याशिवाय त्यांना हापूस गोड लागतंच नाही. कुछ भी करनेका लेकिन इगो हर्ट नही करनेका हा संवाद पुणेरी पगडीतल्या सुपीक डोक्यातुनच आला असेल.
काहीही असो. पण आमच्या दोन वेळच्या भाजी - भाकरीची सोय केलेल्या या पुण्यनगरी विषयी आम्हाला अतिशय आदर आहे. आता आम्ही राहतो तो भाग पुण्यात येतो की नाही किंवा भाकरी फक्त पुण्यातच कशी चांगली मिळते हे वादाचे विषय होऊ शकतात. पण त्यासाठी पुणेकर आहेतंच. तूर्तास भाकरी गोड मानून घेणे एवढेच आमच्या हातात आहे!
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
36579
प्रतिक्रिया
157
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा ! सुंदर लिखाण.
पुण्यातल्या कारकिर्दीत य वेळा
In reply to व्वा ! सुंदर लिखाण. by विजुभाऊ
त्यादिवशी त्या भयकान्याले
म्या अमरावतीचा आहो राजेहो !
In reply to त्यादिवशी त्या भयकान्याले by कैलासवासी सोन्याबापु
चिनार भाऊ माया लायन्या काकाचे
In reply to म्या अमरावतीचा आहो राजेहो ! by चिनार
"सायचा शेमडात शिजोली का हे
In reply to त्यादिवशी त्या भयकान्याले by कैलासवासी सोन्याबापु
अहो स्पा अन्नाला नावे ठेऊ नये
In reply to "सायचा शेमडात शिजोली का हे by स्पा
हा हा
In reply to अहो स्पा अन्नाला नावे ठेऊ नये by कैलासवासी सोन्याबापु
अहो खायच्या गोष्टी त्या …
In reply to त्यादिवशी त्या भयकान्याले by कैलासवासी सोन्याबापु
अहं ! अहो कहर मालक स्वतः
In reply to अहो खायच्या गोष्टी त्या … by कहर
भयकान्याले मामा म्हटलं
In reply to त्यादिवशी त्या भयकान्याले by कैलासवासी सोन्याबापु
भयकान्या ही मझ्य मित्राची खास
In reply to भयकान्याले मामा म्हटलं by होबासराव
अस्सल पुणेकर लोकांशी संबंध कमीच येत असेल
आणि इथले जागांचे भाव पण
In reply to अस्सल पुणेकर लोकांशी संबंध कमीच येत असेल by सांगलीचा भडंग (verified= न पडताळणी केलेला)
अहो पेठे बाहेर पडायची तयारी
In reply to आणि इथले जागांचे भाव पण by काळा पहाड
कंपन्या आम्हाला ऑफर लेटरे
In reply to अहो पेठे बाहेर पडायची तयारी by कैलासवासी सोन्याबापु
फुकाचे सल्ले देत "ह्या पुढे
In reply to कंपन्या आम्हाला ऑफर लेटरे by काळा पहाड
ह.घ्या. धाप लागेल.
In reply to फुकाचे सल्ले देत "ह्या पुढे by कैलासवासी सोन्याबापु
सोन्याबापू ,
In reply to फुकाचे सल्ले देत "ह्या पुढे by कैलासवासी सोन्याबापु
आपल्या इकळला उन्हाळा अन
In reply to सोन्याबापू , by चिनार
चला काडी टाकायचा परिणाम झाला.
In reply to आपल्या इकळला उन्हाळा अन by कैलासवासी सोन्याबापु
अशी लेकरे स्वताच गाव भाकरी
In reply to अहो पेठे बाहेर पडायची तयारी by कैलासवासी सोन्याबापु
पुण्यात बापाला वडील म्हणतात …
In reply to अहो पेठे बाहेर पडायची तयारी by कैलासवासी सोन्याबापु
आप्पा बळवंतात उसासे सोडणे
In reply to अहो पेठे बाहेर पडायची तयारी by कैलासवासी सोन्याबापु
सहमत
In reply to आणि इथले जागांचे भाव पण by काळा पहाड
अहो त्यांना वेगळं राज्य हवंय.
In reply to सहमत by रवीराज
खरं की काय,,?
In reply to अहो त्यांना वेगळं राज्य हवंय. by काळा पहाड
ओ काय शिस्त वैगरे आहे का नाही
In reply to खरं की काय,,? by रवीराज
आँ? १ ते ४ च्या पुढेही पुणेरी
In reply to ओ काय शिस्त वैगरे आहे का नाही by सूड
हो तर!! ही पुण्याबाहेरनं
In reply to आँ? १ ते ४ च्या पुढेही पुणेरी by बॅटमॅन
म्हणजे तुम्हीही शांत झोपू देत
In reply to हो तर!! ही पुण्याबाहेरनं by सूड
व्यनित बोलू. ;)
In reply to म्हणजे तुम्हीही शांत झोपू देत by बॅटमॅन
खी खी खी ;)
In reply to व्यनित बोलू. ;) by सूड
च्च च्च.. पूर्वीचं पुणं
In reply to अस्सल पुणेकर लोकांशी संबंध कमीच येत असेल by सांगलीचा भडंग (verified= न पडताळणी केलेला)
.
In reply to च्च च्च.. पूर्वीचं पुणं by गवि
मारलात दगड ?
अपमान करताना मुक्तहस्ताने
!!
रोज दोन वेळ शिक्रण, मटार उसळ
In reply to !! by गवि
या यशस्वी टोमण्याबद्दल श्री.
In reply to रोज दोन वेळ शिक्रण, मटार उसळ by मृत्युन्जय
प्रोफेसर मृत्युन्जयांचा
In reply to या यशस्वी टोमण्याबद्दल श्री. by काळा पहाड
आमच्यात श्रीफळ आणि महावस्त्र
In reply to या यशस्वी टोमण्याबद्दल श्री. by काळा पहाड
अरण्येश्वर
In reply to आमच्यात श्रीफळ आणि महावस्त्र by मृत्युन्जय
नवीन बंगलाच बांधलाय.
In reply to अरण्येश्वर by अत्रन्गि पाउस
लेखात थोडा बदल करायचा असल्यास
बदलाचा तपशील "संपादक मंडळ" या
In reply to लेखात थोडा बदल करायचा असल्यास by चिनार
ओ गवि
In reply to बदलाचा तपशील "संपादक मंडळ" या by गवि
म्हणजे अनुस्वार की पूर्णविराम
In reply to ओ गवि by इरसाल
भरोसा नाय
In reply to म्हणजे अनुस्वार की पूर्णविराम by सूड
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Coal scam case: Manmohan Singh, Kumar Mangalam Birla & PC Parakh accused of criminal conspiracyएवढ्यात
In reply to मस्त ! by मदनबाण
आता पुन्हा एखादा पॉपकॉर्नचा
मी कारखानाच लावायचा विचार
In reply to आता पुन्हा एखादा पॉपकॉर्नचा by सूड
कोणाला देणार कारखाना चालवायला
In reply to मी कारखानाच लावायचा विचार by मृत्युन्जय
आमच्याकडे मेक्सिकोवाडीचे टम्म
In reply to कोणाला देणार कारखाना चालवायला by गवि
लावाच!! पाचेक महिन्यातनं एकदा
In reply to मी कारखानाच लावायचा विचार by मृत्युन्जय
पुन्हा एखादा पॉपकॉर्नचा टब
In reply to आता पुन्हा एखादा पॉपकॉर्नचा by सूड
मागच्या वेळचा मागच्या वेळच्या
In reply to पुन्हा एखादा पॉपकॉर्नचा टब by हाडक्या
चिनार भाऊ पुण्यात जर बरीच
आजकाल कोणाविषयी चांगलं बोलवतच
In reply to चिनार भाऊ पुण्यात जर बरीच by कोकणी पुणेकर
अरेरे.. मला वाटलं गावच्या
In reply to आजकाल कोणाविषयी चांगलं बोलवतच by चिनार
थोडक्यात पुणेरी अपमान -
एकजण पुणेतर - काका पत्ता
In reply to थोडक्यात पुणेरी अपमान - by भम्पक
मिळेल तिथे भाकरी कमवणे हे
पाऊस पडल्यावर पाणी पडले
In reply to मिळेल तिथे भाकरी कमवणे हे by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
पाऊस पडल्यावर पाणी पडले विदर्भातच म्हणतात नापाऊस पडला = पाणी आले (नळाला) पाणी आले = नळ आला बरोबर का?पुण्यात बापाला वडील म्हणतात …
In reply to पाऊस पडल्यावर पाणी पडले by मोदक
बरोबर!
In reply to पाऊस पडल्यावर पाणी पडले by मोदक
अगदी बरोबर … त्याचप्रमाणे
In reply to बरोबर! by चिनार
हेच विदर्भातल्या शेतकर्यांना
In reply to मिळेल तिथे भाकरी कमवणे हे by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
शिळ्या
४ तास आणी फक्त ५२ प्रतिसाद. ३
मॅक्सिकोवाडीच्या पॉपकॉर्नची
In reply to ४ तास आणी फक्त ५२ प्रतिसाद. ३ by मृत्युन्जय
हा ना राव ! लैय्यच थंडे लोकं
पुण्याची हवाच आहे हो थंड
In reply to हा ना राव ! लैय्यच थंडे लोकं by चिनार
मस्त लेख
छान छान
छान लिहिलंय. आवडलं.
अरे वा. अजानुकर्ण काकाना बरेच
धेडगुजरी शब्दांचा सोस
+१
In reply to धेडगुजरी शब्दांचा सोस by हुप्प्या
वैविध्य
In reply to +१ by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
हो ना
In reply to वैविध्य by कपिलमुनी
यमकं
In reply to हो ना by आजानुकर्ण
१ नंबर
In reply to वैविध्य by कपिलमुनी
"लकडी पूल" या नावामध्ये नेमकी
In reply to धेडगुजरी शब्दांचा सोस by हुप्प्या
पूल हा इंग्रजी शब्द आहे.
In reply to "लकडी पूल" या नावामध्ये नेमकी by आदूबाळ
आणि लकडी हा अपभ्रंश!!
In reply to पूल हा इंग्रजी शब्द आहे. by मृत्युन्जय
अरे अय!
In reply to आणि लकडी हा अपभ्रंश!! by सूड
खरी गरज
ती विदर्भ /ग्रामिण भागातील
In reply to खरी गरज by सिरुसेरि