Lumber Spondylosis .............
नमस्कार मंडळी ..............
दि. 27 आणि 28 डिसेंबर रोजी मित्राच्या मुलीचे कोल्हापूर येथे लग्न होते. त्यानिमित्त अहमदनगरहून कोल्हापूर ला जायचा योग आला होता. कोल्हापूरला जाण्यासाठी लक्झरी बस होती. आम्ही दोघे सकाळीच मित्राच्या घरी पोहोचलो. मित्राच्या घरी गेल्यावर थोडे फार कामे केली. सामान, बॅग उचलणे इ इ कामे केली. बस मध्ये मागील बाकावर बसून, साधारण 8 तास प्रवास करून आम्ही कोल्हापूरला पोहोचलो. संध्याकाळचा सीमंतपूजन कार्यक्रम झाला. जेवणे झालीत आणि आम्ही सर्व जण झोपी गेलो.
दुस-या दिवशी सकाळी उठलो तर काय ... माझी पाठ पूर्णपणे आखडून गेली होती. प्रचंड पाठ दुखत होती. मला तर सरळ असे उभे रहाता येईना. काय करावे काय करू नये सुचत नव्हते. रविवार असल्यामुळे सर्व दवाखाने बंद होती. कसे तरी आवरून बसून राहीलो. दुकाने उघडल्यावर 2-3 वेदनाशामक गोळ्या घेतल्या आणि आराम केला. लग्न लागले, जेवणे झाली. आम्ही सर्व व-हाडी परत 8 तास प्रवास करून नगरला परत आलो.
दुस-या दिवशी M.S. (Orthopedic) यांना दाखवले. त्यांनी X-Ray आणि MRI काढायला सांगितला. MRI काढला. नगरला रूबी हॉस्पिटल, पुणे यांची शाखा आहे. आणि तेथील डॉक्टरांनी म्हणजे पुणे रूबी हॉस्पिटल यांनी रिपोर्ट दिला ............
Conclusion:
Lumber Spondylosis.
Posterior protrusion at L4 - 5 intervertebral disc, causing significant compression of the thecal sac & respective nerve roots.
Mild posterior bulge at L5 – S1 intervertebral disc, causing indentation of the thecal sac & left S1 traversing nerve root.
डॉक्टरांची ओषधे चालू झाली त्यासोबत Physiotherapy डॉक्टरॉंकडून Traction, IFT Treatment चालू झाली. 15 दिवस हे सगळे न चुकता केले. आता थोडे बरे वाटत आहे. उभे रहाता येते. चालता येते. पाठ दुखण्याचे प्रमाण जवळ जवळ 90 % कमी झाले. Physiotherapy डोक्टरांनी परवानगी दिली म्हणून ऑफिसला यायला सुरूवात केली. आता Physiotherapy डोकटरांनी काही व्यायाम सांगितले आहेत ते सकाळ, संध्याकाळ करतो.
या संदर्भात आपल्या मिपा वर असणा-या जाणकार, तज्ञ सदस्यांपैकी कोणाला काही अनुभव असल्यास जरूर सांगावा. असल्यास उपाय सांगावा . कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची, व्यायाम, औषधे इ.इ. माहीत असल्यास योग्य तो सल्ला द्यावा ही विनंती.
धन्यवाद
वर्गीकरण
तुम्हाला फरक पडला हे वाचून बरे वाटले..
त्रास
एकच सांगतो डॉक्टरांनी
सम दुखी
न्युरोसर्जन् चे मत हि घ्या
मला पण डिस्क प्रोट्रयूजन आणी
In reply to मला पण डिस्क प्रोट्रयूजन आणी by सुबोध खरे
य्ये बात.....
In reply to मला पण डिस्क प्रोट्रयूजन आणी by सुबोध खरे
मिपाकरांना फुकट सल्ला.
हा घ्या दुवा,अधिक माहिती करीता व्यनी करा.अथवा प्रत्यक्ष भेटा.
खरे साहेब मलाही सेम त्रास आहे
व्यनी करा, खरे साहेब
"Lumber Spondylosis" बद्दल
In reply to "Lumber Spondylosis" बद्दल by श्रीगुरुजी
५-७ वर्षे बाईक चालवून आता
In reply to "Lumber Spondylosis" बद्दल by श्रीगुरुजी
चार्ट द्यावा ......
In reply to चार्ट द्यावा ...... by नितीन पाठक
इथे आहेत बघा बहुतांश व्यायामः
In reply to इथे आहेत बघा बहुतांश व्यायामः by गवि
खिक्क
In reply to इथे आहेत बघा बहुतांश व्यायामः by गवि
हे "हवाई" व्यायाम
In reply to इथे आहेत बघा बहुतांश व्यायामः by गवि
अगदी गांभिर्याने प्रतिसाद
In reply to इथे आहेत बघा बहुतांश व्यायामः by गवि
हा यायाम ठीक आहे पण
In reply to हा यायाम ठीक आहे पण by माम्लेदारचा पन्खा
आणि उत्साहाच्या भरात
In reply to आणि उत्साहाच्या भरात by टवाळ कार्टा
..इन एनी केस..कमरेला फायदा
In reply to इथे आहेत बघा बहुतांश व्यायामः by गवि
उपयुक्त व्यायाम ...
In reply to उपयुक्त व्यायाम ... by नितीन पाठक
व्हिडिओत दाखवला आहे तोच ड्रेस
In reply to चार्ट द्यावा ...... by नितीन पाठक
उद्या नक्की टाकतो.
आजाराचे management हवे आहे कि complete recovery?
In reply to आजाराचे management हवे आहे कि complete recovery? by आयुर्हित
मला व्यनी करा! इतकेच लिहिले
In reply to मला व्यनी करा! इतकेच लिहिले by टवाळ कार्टा
करा अथवा करू नका, पण
In reply to करा अथवा करू नका, पण by आयुर्हित
अगदी अगदी....थोडी मस्करी केली
कमरेच्या दुखण्यापेक्षाही एकाच
वय वर्ष 13 .अपघात.
अपघात
कंबरदुखीसाठी व्यायाम व सूचना
कंबरदुखीसाठी व्यायाम व सूचना (व्यायामप्रकार करण्यआआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. विशेषतः अल्सर, कोलायटीस सारखे पोटाचे विकार असणार्यांनी डॉक्टरांच्या सूचनेनुसारच व्यायामप्रकार करावेत).
In reply to कंबरदुखीसाठी व्यायाम व सूचना by श्रीगुरुजी
कंबर दुखीचे व्यायाम
मानदुखीसाठी व्यायाम व सूचना
मानदुखीसाठी व्यायाम व सूचना (व्यायामप्रकार करण्यआआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा).
___________________________________________________________________________याच चार्टचे दोन वेगळे तुकडे
_______________________________________________________________________________