आताच नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याची बातमी जाहीर झाली आहे . नेमाडे यांचा तिरस्कार करणार पब्लिक बख्खळ आहे . एके काळी आम्ही नेमाडे वाचतो हे सांगणे अभिमानाचे लक्षण होते . आता हिंदू एक समृद्ध अडगळ नंतर नेमाडे कसे outdated झाले आहेत हे अह्महिकेनॆ सांगण्याची स्पर्धा चालू आहे . कोसलाशिवाय नेमाडे मला अजून एका गोष्टीमुळे आवडतात . त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होत , " भारतीय समाज हा समजा एक चादर आहे असे आपण गृहीत धरूया . समजा हि चादर आपण झटकली तर यातून काय पडेल ? सगळे मार्क्स , अडम्स, टोल्स्टोय ." भारतासारख्या वैविध्यपूर्ण तेने नटलेल्या खंडप्राय देशात आपण बाहेरच्या देशातल्या कोणत्या तरी माणसाने तयार केलेला 'इझम ' जसा च्या तसा कॉपी पेस्ट करतो आणि कुठल्या तरी बाहेरच्या माणसाचे संदर्भ वापरतो यावर झालेली हि खास नेमाडीय कोटि .साहित्य संमेलनावर त्यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा धुरळा उडाला . काहीही असो नेमाडे कायम बातम्यात असतात हे खर . ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात कायम मराठी लेखकांवर अन्याय होतो अशी ओरड चालू असताना नेमाडे याना हा पुरस्कार घोषित झाल्याने आपण खुश होण्यास हरकत नाही . आयुष्यातल्या निरर्थकतेचे पापुद्रे सोलत जगणारय पांडुरंग सांगवीकर याचे आधुनिक version असणारया एका चाहत्याचा नेमाड्यांना मानाचा मुजरा .
वाचने
25918
प्रतिक्रिया
84
मिसळपाव
प्रतिक्रिया
एका मराठी माणसाला ज्ञानपीठ
'कोसला' जवळपास ३०
कोसला
रश्दि साहेबांनी अत्यंत हीन शब्द वापरले आहेत नेमाड्यांबद्दल
खूपच मस्त
In reply to रश्दि साहेबांनी अत्यंत हीन शब्द वापरले आहेत नेमाड्यांबद्दल by अर्धवटराव
जे पेराल तेच उगवणार ना !
In reply to रश्दि साहेबांनी अत्यंत हीन शब्द वापरले आहेत नेमाड्यांबद्दल by अर्धवटराव
नेमाड्यांनी कधि कुणाला बास्टर्ड म्हटलं ?
In reply to जे पेराल तेच उगवणार ना ! by जयंत कुलकर्णी
रश्दीनी अतिशय अश्लाघ्य आणि
In reply to रश्दि साहेबांनी अत्यंत हीन शब्द वापरले आहेत नेमाड्यांबद्दल by अर्धवटराव
ज्ञानपीठाबद्दल नेमाडेंचे
हो ना
In reply to ज्ञानपीठाबद्दल नेमाडेंचे by पिशी अबोली
तरुणपणी त्याने एकदा, दर्यामधे
क्या बात है
In reply to तरुणपणी त्याने एकदा, दर्यामधे by विटेकर
हे असं पायजे..
In reply to तरुणपणी त्याने एकदा, दर्यामधे by विटेकर
छान चर्चा झाली या