Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by वेल्लाभट on Mon, 12/01/2014 - 12:25
लेखनविषय (Tags)
संगीत
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
अनुभव
Good Evening! This... is the voice of Enigma In the next hour we will take you with us into another world, into the world of music, spirit and meditation Turn off the light, take a deep breath and relax start to move slowly, very slowly Let the rhythm be your guiding light हे शब्द ऐकले... तेंव्हाच्या भाबडेपणामुळे असेल कदाचित, पण मी खरंच डोळे मिटले, आणि लगेच पुढच्या 'सॅडनेस' या गाण्याचा तो युनीक ठेका सुरू झाला. मागे सिन्थेसायझरच्या कॉर्ड्स वाजत होत्या. सर सर सर हातावरचे केस उभे राहिले आणि तत्क्षणापासून 'एनिग्मा' चा मी वेडा झालो. 'ही कॅसेट ऐकून बघ, वेडा होशील' या रोहन च्या वाक्याला शब्दशः खरं करत. तोपर्यंत गाणी म्हणजे बॉलिवूड, आणि तेंव्हा चलती असलेले प्रायव्हेट अल्बम्स. म्हणजे बाबा सेहगल, दलेर मेहेंदी इत्यादी. एवढाच व्यासंग होता. इंग्रजी संगीत चाखलं होतं, ते बार्बी गर्ल, व अ‍ॅक्वा पुरतं. पण एनिग्मा मुळे माझी गाण्यांची 'टेस्ट'च बदलली. पुढे एनिग्मा च्या सगळ्या कॅसेट (डेक घरी येईपर्यंत) / सिडी फर्स्ट डे फर्स्ट शो सारख्या घेण्यात आल्या. व्हिडियोज बघण्यात आले. मायकल क्रीटू ला पत्रही पाठवलं. चक्क त्याचं उत्तर आलं. जाम खूश झालो. आजही ते पोस्टकार्ड जपून ठेवलेलं आहे. मग मायकल क्रीटू चे इतरही सगळे अल्बम जमा केले. अगदी शोधून शोधून. जे भारतात मिळाले नाहीत ते अमेरिकेहून मागवले. सीडी घेतली की आधी त्यातलं इनलेट मन लावून वाचलं जायचं. मग नव्या को-या सीडी ला अलगद प्लेयर मधे टाकून जवळपास फुल्ल व्हॉल्यूम मधे दारं बंद करून गाणी लक्षपूर्वक ऐकण्यात यायची. लीजनेअर, मूनलाईट फ्लॉवर, द इन्व्हिजिबल मॅन, मेटामॉर्फोसिस, कोलॅबोरेशन मधले अल्बम म्हणजे मिथ, ट्रान्स अ‍ॅटलॅन्टिक एअर वेव्हज... हे सगळे सगळे ऐकत गेलो. एनिग्मा वरून पुढे मग वर्ल्ड म्युजिकची ओळख झाली. चटक लागली. ढिकच्चॅक ढिक्चॅक पासून वेगळी, मोजकेच; काहीसे गूढ, तरीही अर्थपूर्ण, विचार करायला लावणारे लिरिक्स असलेली गाणी आवडायला लागली. डीप फॉरेस्ट, एनया, ग्रेगोरियन, असे आर्टिस्ट ऐकत गेलो. नेहमीच असं नाही; पण आजही जेंव्हा गाण्यातून शांतता अपेक्षित असते, तेंव्हा वर्ल्ड म्युझिकचाच फोल्डर उघडला जातो. बाय डिफॉल्ट. आणि एनिग्मा चं 'सॅडनेस' आजही अंगावर काटा आणतं. का कुणास ठाऊक, पण जादू करतं हे गाण. शब्द नाहीत यात तरीही बरंच काही सुचवून जातं. जळमटं साचलेल्या मनाच्या खोलीची खिडकी कर्रर्रर्र करत उघडावी तसं. जळमटं आपली आपणच काढायची असतात पण प्रकाशाच्या त्या तिरिपीचं काम खूप मोठं असतं. ते हे गाणं आजही माझ्यासाठी करतं. परवा अशीच ती खिडकी उघडली गेली, म्हटलं थोडा प्रकाश 'वाटावा'! म्हणून हा धागाप्रपंच. enigma
  • Log in or register to post comments
  • 5314 views

प्रतिक्रिया

Submitted by मारवा on Mon, 12/01/2014 - 17:20

Permalink

सुंदर सुंदर वेल्लाभट माझ्या अतीव आनंदा चा विषय !

जळमटं आपली आपणच काढायची असतात पण प्रकाशाच्या त्या तिरिपीचं काम खूप मोठं असतं. ते हे गाणं आजही माझ्यासाठी करतं.< मी हि तुमच्या वरोबर त्या प्रकाशाच्या तिरीपीत उभा आहे अप्रतिम सुंदर धन्यवाद बंद्यु !
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Mon, 12/01/2014 - 23:13

In reply to सुंदर सुंदर वेल्लाभट माझ्या अतीव आनंदा चा विषय ! by मारवा

Permalink

धन्यवाद शेट !

एक तरी फैन मिळतो का शंका होती मला खरं सांगू तर. तुम्ही भेटलात. छान वाटलंय.
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on Mon, 12/01/2014 - 17:26

Permalink

वेल्लाभट तुम्ही वुडस्टॉक फेस्टीव्ल ची गाणी ऐकली आहेत का ?

तुम्हाला आवडतील कदाचित ! http://ultimateclassicrock.com/woodstock-performances/
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Mon, 12/01/2014 - 23:13

In reply to वेल्लाभट तुम्ही वुडस्टॉक फेस्टीव्ल ची गाणी ऐकली आहेत का ? by मारवा

Permalink

उद्द्द्द्याच चेक करतो

उद्द्द्द्याच चेक करतो
  • Log in or register to post comments

Submitted by वैभव जाधव on Mon, 12/01/2014 - 17:30

Permalink

भारी भारी. इंजिनिअरिंगला

भारी भारी. इंजिनिअरिंगला आसताना खूप क्रेझ होती. सायलेन्स मस्ट बी हर्ड वैगैरे सुधा आयकायचो. गाण्याचे व्हिडिऑ भारी असायचे. ह्याची बालीवूडवाल्यानी उचलाउचली भर्प्पूर केली. क्रिमीनल मधले तुम मिले दिल खिले आयकले की एनिग्मा आठवते.
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Mon, 12/01/2014 - 23:15

In reply to भारी भारी. इंजिनिअरिंगला by वैभव जाधव

Permalink

किती म्हणजे किती चोरलंय

एनिग्मा आणि डीप फॉरेस्ट वरून. भरो मांग मेरी भरो... हे गाणं... जसंच्या तसं 'द रिव्हर्स ऑप्फ बिलीफ' आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on Mon, 12/01/2014 - 17:58

Permalink

वैभव सुंदर आठवणी शेरॉन स्टोन च्या असोत कि मनीषा कोईराला च्या

क्या फर्क पडता है ? एज ऑफ लोनलीनेस म्हणा की Carly's Song" म्हणा यु कॉल रोज बाय एनी नेम क्या फर्क पडता है बाकी मनीषा च्या गालांचा गुलाबी रंग एकदम ओरीजनल आहे. पहाडी गुलाब हि असतो का एखादा ? मजा आली आठवुन आठवुन हे घ्या गाण https://www.youtube.com/watch?v=arfkJsIk3Us
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Mon, 12/01/2014 - 23:15

In reply to वैभव सुंदर आठवणी शेरॉन स्टोन च्या असोत कि मनीषा कोईराला च्या by मारवा

Permalink

हेहे!

हेहे!
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 12/01/2014 - 23:34

Permalink

कॉलिंग प्रास...

"प्रास" पण तुम्हाला ह्या बाबतीत मदत करतील... "आबा" आणि "बॉनी-एम" पाशी आमची इंग्रजी गाणी संपतात...
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Tue, 12/02/2014 - 10:03

In reply to कॉलिंग प्रास... by मुक्त विहारि

Permalink

अगदी अगदी आणि गावस्कर पाशी

अगदी अगदी आणि गावस्कर पाशी क्रिकेट
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Tue, 12/02/2014 - 07:30

Permalink

उत्तम परिचय..

उत्तम परिचय.. ..एनिग्माप्रेमी असाल तर डीप फॉरेस्टप्रेमी असालच..
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Tue, 12/02/2014 - 07:32

In reply to उत्तम परिचय.. by गवि

Permalink

अर्थात

एनिग्मा डीप फोरेस्ट एरा ग्रेगोरियन इत्यादी....
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 12/02/2014 - 07:36

Permalink

रिटर्न टू इनोसन्स... ऐकायला

रिटर्न टू इनोसन्स... ऐकायला जेव्हढं भारी ,तेव्हढाच त्याचा व्हिडिओ पण भारी होता.. सगळं रिवाइंड मोड मधे...
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Tue, 12/02/2014 - 09:13

In reply to रिटर्न टू इनोसन्स... ऐकायला by अत्रुप्त आत्मा

Permalink

एक नं. बोललात.

एक नं. बोललात.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 12/05/2014 - 11:08

Permalink

आज ऐकली ही गाणी...माझ्या

आज ऐकली ही गाणी...माझ्या आवडत्या "गल्लीतल्या बैला"पेक्षा ही जास्त आवडली नाहीत...बहुतेक "गल्लीतला बैल" आवडणारा मी एकटाच असेन इथे :(
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 12/05/2014 - 11:17

In reply to आज ऐकली ही गाणी...माझ्या by टवाळ कार्टा

Permalink

ट का.. रिटर्न टू इनोसन्स ..

ट का.. रिटर्न टू इनोसन्स .. हेडफ़ोन लाउन डोळे मिटुन ऐक.. तूझे मत बदलेल . :)
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 12/05/2014 - 11:29

In reply to ट का.. रिटर्न टू इनोसन्स .. by अत्रुप्त आत्मा

Permalink

ऐकलं आत्ताच...नाय बा...माझ्या

ऐकलं आत्ताच...नाय बा...माझ्या टाईपचे नाहीये :(...हा घ्य घेतला मग दिल खूश ;)
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 12/05/2014 - 11:31

In reply to ऐकलं आत्ताच...नाय बा...माझ्या by टवाळ कार्टा

Permalink

ऐकलं आत्ताच...नाय बा...माझ्या

ऐकलं आत्ताच...नाय बा...माझ्या टाईपचे नाहीये :(...हा घ्य घेतला मग दिल खूश
हे ऐकलं आत्ताच...नाय बा...माझ्या टाईपचे नाहीये :(... haa उतारा घेतला मग दिल खूश ;) असे वाचावे :)
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Fri, 12/05/2014 - 12:13

In reply to ऐकलं आत्ताच...नाय बा...माझ्या by टवाळ कार्टा

Permalink

हरकत नाही

:) गल्लीतला बैलही भारीच Give me everything tonight हे माझं आवडतं गाणं.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 12/05/2014 - 12:49

In reply to हरकत नाही by वेल्लाभट

Permalink

आपण पंखा आहोत....फुल्ल गरगर

आपण पंखा आहोत....फुल्ल गरगर फिरणारा... \m/ पण हे खासच :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Fri, 12/05/2014 - 12:04

Permalink

ह्म्म... मला बॉ शॅगीची भारी

ह्म्म... मला बॉ शॅगीची भारी आठवण आली बॉ... विशेष सुचना :- खालील गाणी आपल्या आपल्या इच्छेनेच उघडावीत ! बाल मनावर विपरीत परिणाम होउ शकतो. ;) SHAGGY - IT WASNT ME Shaggy - Hey Sexy Lady ft. Brian & Tony Gold Shaggy - Boombastic

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आज स्वाक्षरीचा संप आहे. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Fri, 12/05/2014 - 13:02

Permalink

ड्रीम ऑफ डॉल्फिनदेखील उत्तम

ड्रीम ऑफ डॉल्फिनदेखील उत्तम आहे एनिग्माचे..
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Fri, 12/05/2014 - 22:38

In reply to ड्रीम ऑफ डॉल्फिनदेखील उत्तम by गवि

Permalink

अत्तिशय !

अत्त्तिशय आवडतं.... वेग्गळेच गूढ गहन शब्द आहेत एनिग्मा च्या सगळ्याच गाण्यांचे... तीच गोष्ट पहिले स्ट्राईक होते...
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com