Skip to main content

न वाढलेली बिडी आणि खालेला मार- ४

लेखक Vijay Shankar Mane यांनी शनिवार, 29/11/2014 या दिवशी प्रकाशित केले.
घरी गेलू तवर आय रानात्न आली हुती आन नुकताच बाळीन केलाला च्या पेत बसली हुती . आज्या पारावर गेला हुता ,. मी टोपल्यात्न वाळूक घेतल आन दातान कर्कडत राज्नावर बस्लू हुतु. आय चा चा संपला हुता ती मला म्हणाली इज्या वटयावरचा जळनाचा बिंडा चुलीच्या कोपऱ्यात आणून टाक हळूच! तवर मला आज्या खाकारल्याला ऐकायला आल आन दुपारच्या बिडीच ध्यान आल ! काना मागन थंड गार घाम वगळायला लागला . मी बिंडा हळूच उचलला आणि हळूच चुलीच्या कोपऱ्यात टाकला तवर आमचा इट्टल अंगनात कम्रवर हात ठीउन उभा राहिला . मी गप शाळ्ची पिशवी काढली आन पाटी घिउन खन्दिलाच्या उजेडात पेन्सलीन पाड गिरवत बस्लु पण कान वटया वरचा आवाजाकड लागल हुत . तवर बाळी बी तिची वही घिउन माझ्या शेजारी अभ्यासाला बसली हुती अन आयन कोरड्यास टाकून भाकरी करायला घेतल्या हुत्या . मी हळूच बाळीक्ड बगितल पण काय अंदाज येत न्हवता .तवर आयन बाळीला आवाज दिला जरा शिक्यातली टोपली दे .तीन टोपल दिल आन परत येउन बसली . मी तिला इचारल आजा काय बोलला का ग ! पांडूतात्या आला हुता का घरी तीन न्हाय म्हणून मुंडी हलवली . तवर भायर्ण आवाज आला इज्या काय कर्तुय्रर मला जरा चुलीतला इस्तू आणून दि कि ! मी चुली जवळ गेलू तवर आयन यक चुलीतल लाकूड माझ्या हातात दिल . मी वट्यावर गेलू आज्याला दिल आन त्यचि बिडी पेटवायची वाट बगत थांब्लू . आज्या घरात बगत म्हणतु कसा कार इज्या ! मास्तरन चांगलाच अब्यास दिलाला दिसतुया ........ मी फकस्त मुंडी हलवली आन घरात गेलू . सगळ्यांची जेवण झाली .बाळी आन आय वट्याच्या कडला भांडी .घासायला बसल्या हुत्या दादा पाराकड गेला हुता आन तवर पांडू तात्या काय मारती…. जेवण झालका म्हणत गुड्ग्यावर हात ठीउन आग आय आय करत वट्यावर आला . आन आज्याच्या शेजारी जानावर बसला .तंबाकू मळत मळत आय कड तिरक्या डोळ्यांनी बगत मला म्हणाला कार इज्या तुमची ग्यांग मारुतीच्या देवला माग काय करत हुती र दुपारी ! कुट काय लपा लपि खेळत हुतु . लपा लपि खेळत हुता का सुकाळीच्यानो बिड्या वडत हुता पांडू तात्या पचकला होता . आयन जस आयकल तस तीन मला इचारल काय र तात्या काय म्हणतायत .मी काय बोलायच्या आताच पांडूतात्या तिकडून वराडला लीले ! मी काय खोट बोल्तुय्का आन माज्याकड बगून बोलला सांग कि र बैला ssssss . आय खरकट्या हातानच उठली बाजूच्या वल्या चीपाडाचा दांडा घेतला आन भाड्या म्हणून सना सना पाठीत वाढल्या मी न्हायय म्हणून ठू ठू बोम्बाल्लू आज्या आग आग म्हनुस्तावर १० १५ हातावर पायावर सडा सडा पडल्या हुत्या .आज्यान मला कसातरी वडून काडला आयच्या तोंडाचा पट्टा चालूच हुता .. आमचा सगळा वाडा गोळा झाला हुता . तवर पांडू तात्या म्हणाला लीले sss पोराला आस मार्त्यातिका .मागच्या जन्मीच काय तरी हाय तवा ह्यो भाड्या मला छळतुया आय करवान्द्ली. थोड्या येळण आजा मला म्हणाला कार खरच बिड्या वडल्या का तवा मी बोलायच्या आदीच तात्या बोलला आर समैच इज्ल्याव वढतील कशा .मनातल्या मनात पांडू तात्याला लय शिव्या दिल्या .अंगावर वळ उठल हुत . आयन वाकळा टाकल्या हुत्या मी मुसमुसत बस्लु हुतु . आय म्हणाली चल झोपायला मी तसाच मुर्लु जागेवर. थोड्या येळण निजा नीज झाली .तवा परत आय आली मला दंडाला धरल आन रडवेल्या आवाजात म्हणाली कुटवर छळनार हैस आजून .तीच डोळ पाण्यान भरल हुत मला बी रडायला याला लागल हुत वाकळव न्हिउन बसवलं आन तीन पाठीवर्ण हात फिरवला मी कन्हलू .आय उठली अन हळद आन त्याल घिउन आली तिच्या डोळ्यातल पाणी खळत न्हवत माझी पैरण काढली आन रडत रडत माझ्या पाठीला हळद त्याल लावायला लागली कशाला आशा खोड्या कर्तु म्हणून रडायला लागली मी पण तिला मिठी मारून हुंदक दयाला लाग्लू . आय पण हुंदक देत हुती…………
लेखनविषय:

वाचने 1717
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया