✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

दांभिक (hypocrites) लोक ओळखण्याचे सात निकष:

न
निमिष सोनार यांनी
Fri, 11/21/2014 - 11:39  ·  लेख
लेख
दांभिक (hypocrites) लोक ओळखण्याचे सात निकष: १) हे लोक त्याच गोष्टी म्हणतात किंवा करतात ज्या दुसऱ्यांनी करू नये असे यांना वाटते. २) हे लोक त्या गोष्टी आणि नियम कधीच पाळत नाहीत ज्या इतरानी पाळाव्यात असे यांना वाटते. 3) यशस्वी लोकांवर हे नेहेमी टीका करतात आणि त्यांचा द्वेष करतात. ज्या गोष्टी ते प्राप्त करू शकत नाहीत त्याबद्दल ते द्वेष आणि तुच्छता बाळगतात. ४) हे लोक इतरांच्या आयुष्याचे अंधानुकरण करतात. आणि जर इतरांसारखे होकारात्मक परिणाम जाणवले नाहीत तर त्या लोकांच्या आयुष्यांवर टीका करून मोकळे होतात. ५) हे लोक द्वेषापोटी इतरांवर टीका करतात ६) हे लोक व्यक्तिपरत्वे टीका बदलतात. ७) हे लोक खासगीत त्याच गोष्टी करतात ज्या गोष्टींचा ते लोकांमध्ये मिसळले असतांना विरोध करतात.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
8878 वाचन

💬 प्रतिसाद (43)

प्रतिक्रिया

प्रत्येकात काही न काही

मराठी_माणूस
Fri, 11/21/2014 - 11:43 नवीन
प्रत्येकात काही न काही प्रमाणात, परिस्थितीनुसार ह्या गोष्टी आढळतात.
  • Log in or register to post comments

आपण सर्वच जण थोडे फार दांभिक

सुबोध खरे
Fri, 11/21/2014 - 11:44 नवीन
आपण सर्वच जण थोडे फार दांभिक आहोत. कारण यातील एक किंवा अनेक गोष्टी आपण कधीना कधी तरी करीत असतो. फक्त आपल्याला दुसर्याने दांभिक म्हटलेले चालत नाही.
  • Log in or register to post comments

सहमत

माहितगार
Fri, 11/21/2014 - 11:52 नवीन
स्वार्थाच्यादृष्टीने मानवी स्वभाव स्वहिताचे समर्थन करत असतो हे नैसर्गिक वाटते. धागा लेखातील क्रमांक ३ चा मुद्दा काही वेळा बरोबरही असू शकेल पण नेहमीच बरोबर असेल का या बद्दल साशंकता वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

१००*n सहमत

सूड
Fri, 11/21/2014 - 14:49 नवीन
>>आपण सर्वच जण थोडे फार दांभिक आहोत. फक्त आपल्याला दुसर्याने दांभिक म्हटलेले चालत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

डॉक्ट्रांशी

रामदास
Fri, 11/21/2014 - 11:47 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments

ह्या निमित्ताने आमची ही कविता आठवली

प्रसाद गोडबोले
Fri, 11/21/2014 - 12:03 नवीन
ह्या निमित्ताने आमची ही कविता आठवली http://www.misalpav.com/node/28280 पण बरेच दिवस मीच काही दांभिकपणा केलेला नाही ... आता काहीतरी खुसपट काढावे म्हणतो :D
  • Log in or register to post comments

बर मग आता काय करायचे?

स्पा
Fri, 11/21/2014 - 12:09 नवीन
बर मग आता काय करायचे?
  • Log in or register to post comments

डॉकशी सहमत...

मदनबाण
Fri, 11/21/2014 - 12:58 नवीन
डॉकशी सहमत...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Nagin (Full Song) ;) { Bajatey Raho }
  • Log in or register to post comments

कुस्तीचा फड मारूनच हुबे

कंजूस
Fri, 11/21/2014 - 13:09 नवीन
कुस्तीचा फड मारूनच हुबे राहिलाय समोरच्या गड्याला आत तरी येऊ द्या की.
  • Log in or register to post comments

१,२,३,४,५,६,७

प्यारे१
Fri, 11/21/2014 - 14:49 नवीन
१,२,३,४,५,६,७ आयला सगळेच आले की. - पूर्वीपासूनच सर्टिफाईड दांभिक :)
  • Log in or register to post comments

दंभिक म्हणजे काय?

पाषाणभेद
Fri, 11/21/2014 - 15:08 नवीन
दंभिक म्हणजे काय?
  • Log in or register to post comments

ऑनलाईन डिक्शनरीनुसार

पाषाणभेद
Fri, 11/21/2014 - 15:19 नवीन
ऑनलाईन डिक्शनरीनुसार A person who professes beliefs and opinions that he or she does not hold in order to conceal his or her real feelings or motives. म्हणजें एखादे मत किंवा समज, वागणूक वरवरची असेल किंवा त्या व्यक्तीच्या खर्या आयुष्यात तसे आचरण नसणे. थोडक्यात खोटे वर वेगळे अन आतून वेगळे वागणारी व्यक्ती. आपण वर दिलेल्या लक्षणांत तफावत दिसते आहे.
  • Log in or register to post comments

एखादे मत किंवा समज, वागणूक

प्रसाद गोडबोले
Fri, 11/21/2014 - 15:27 नवीन
एखादे मत किंवा समज, वागणूक वरवरची असेल किंवा त्या व्यक्तीच्या खर्या आयुष्यात तसे आचरण नसणे. थोडक्यात खोटे वर वेगळे अन आतून वेगळे वागणारी व्यक्ती.
पाषाणभेद तुम्ही दगडं फोडता का हो ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

आपले मत समजले नाही. कृपया

पाषाणभेद
Fri, 11/21/2014 - 15:33 नवीन
आपले मत समजले नाही. कृपया विस्तार करून सांगा म्हणजे आपल्या दोघांचेही शंकानिरसन होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

अहो तुम्हीच विचारले ना की

प्रसाद गोडबोले
Fri, 11/21/2014 - 15:57 नवीन
अहो तुम्हीच विचारले ना की दांभिक म्हणजे काय म्हणुन मी उत्तर दिले तुम्ही दगड फोडत नाही तरीही पाषाणभेद हे नाव घेता .... ह्यालाच म्हणतात दांभिकता आणि तुम्ही दांभिक :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

तुम्ही नाय का, गिर्जा नसताना

सूड
Fri, 11/21/2014 - 16:34 नवीन
तुम्ही नाय का, गिर्जा नसताना गिर्जा होऊन लिहीत होतात पूर्वाश्रमी ? =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

अरे

प्रसाद गोडबोले
Fri, 11/21/2014 - 16:46 नवीन
अरे डु आयडी काढुन मय्यत्तर्री पाठवणार्‍यांची चेच्ष्टा करणे अन योग्य वेळ आली की डु आयडी जाहीर करणे ह्याला दांभिकता म्हणत नाहीत , ह्याला टवाळगिरी म्हणतात किंवा रिकामटेकडा नाव्ही भिंतीला तुंबड्यालावी असे म्हणतात , आयटी च्या भाषेत बेन्चयोग =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

विझवलीत काडी!!

सूड
Fri, 11/21/2014 - 16:53 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

विझवलीत काडी!!

बॅटमॅन
Fri, 11/21/2014 - 16:55 नवीन
विझवलीत काडी!!
अंमळ गधेगाळीतल्या शेवटच्या वाक्यातील क्रियापदाचा 'वि'शेषेकरून भास जाहला. त्यादृष्टीने पाहता 'काडी' हे नामाभिधान चपखल आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अर्र्र

प्रसाद गोडबोले
Fri, 11/21/2014 - 17:05 नवीन
एकावेळी किती फासे लावुन ठेवाल शिकारी साठी ... जरा सबुरीनं घ्या . एकावेळी एकच काडी लावु द्या रे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

फालतु लेख.

जेपी
Fri, 11/21/2014 - 17:08 नवीन
फालतु लेख.
  • Log in or register to post comments

जी पी

प्रसाद गोडबोले
Fri, 11/21/2014 - 17:15 नवीन
दांभिक (hypocrites) लोक ओळखण्याचे सात निकष:
>>>> जे पी तुम्ही << फालतु (Third class ) लेख ओळखण्याचे सात निकष:>> असा धागा का बरे पाडत नाही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

जे पी तुम्ही फालतु (Third

प्रसाद गोडबोले
Fri, 11/21/2014 - 17:16 नवीन
जे पी तुम्ही फालतु (Third class ) लेख ओळखण्याचे सात निकष: असा धागा का बरे पाडत नाही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

कारण आमच्या बुंदीच्या

जेपी
Fri, 11/21/2014 - 17:28 नवीन
कारण आमच्या बुंदीच्या झार्याने जिलीबी पाडता येत नाय. *blum3* *wink*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Fri, 11/21/2014 - 22:45 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

@ जेपी....

मुक्त विहारि
Fri, 11/21/2014 - 23:46 नवीन
आयला... मराठीतला नविन "वाकप्रचार" "बुंदीच्या झार्‍याने जिलबी पाडणे."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

कुठून ढापलंत हे?

सतिश गावडे
Fri, 11/21/2014 - 23:02 नवीन
कुठून ढापलंत हे?
  • Log in or register to post comments

ढापलायच कशाला ,

जेपी
Sat, 11/22/2014 - 05:08 नवीन
ढापलायच कशाला , टिकुन राहायच तर स्वत:चे शोध लावावे लागतात *wink*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

गर्व से कहो हम दांभिक हय|

रेवती
Fri, 11/21/2014 - 23:19 नवीन
गर्व से कहो हम दांभिक हय| ;)
  • Log in or register to post comments

दांभिक लोकांची ७ लक्षणे ...

मनीषा
Sat, 11/22/2014 - 18:21 नवीन
दांभिक लोकांची ७ लक्षणे ... १) देखल्या देवा दंडवत घालणे . २) आयजीच्या जीवावर बायजी ऊदार.. ३) मुखी हरीनाम, अंतरी शिव्याशाप. ४) गर्जेल तो पडेल काय ? ५) लोकांच्या डोळ्यातले कुसळ दिसते, पण स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही. ६) आपला तो बाब्या , लोकाचे ते कार्टे . आणि ७) लोकां सांगे ब्रम्हज्ञान , आपण कोरडे पाषाण.
  • Log in or register to post comments

या म्हणींचे हिंदीकरण करून देऊ

रेवती
Sun, 11/23/2014 - 00:49 नवीन
या म्हणींचे हिंदीकरण करून देऊ का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

??

प्रभाकर पेठकर
Sun, 11/23/2014 - 01:24 नवीन
ह्यालाच दांभिकपणा म्हणतात. हिन्दीकरण करण्याची प्रचंड उत्सुकता आहे पण शाहजोगपणे विचारून घ्यायचं. *smile* हलकेच घे हो, रेवती. (हाही दांभिकपणाच का??)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मी आहेच मुळी दांभिक! वरच्या

रेवती
Sun, 11/23/2014 - 03:25 नवीन
मी आहेच मुळी दांभिक! वरच्या एका प्रतिसादात त्याचा उल्लेख न लपवता केलाय. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

---- त्याचा उल्लेख न लपवता

मनीषा
Sun, 11/23/2014 - 06:15 नवीन
---- त्याचा उल्लेख न लपवता केलाय. म्हणजे तुम्ही खर्‍या खर्‍या दांभिक नाहीच . कारण जे आहे ते नाकारणे आणि नाहीये ते आहेच असे आत्मविश्वासाने सांगणे, हे तर दांभिकपणाचे व्यवच्छेदक लक्षण आहे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

द्या की !!

खटपट्या
Sun, 11/23/2014 - 01:38 नवीन
द्या की !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अहो तेच तर! मला करायचे आहे

रेवती
Sun, 11/23/2014 - 03:26 नवीन
अहो तेच तर! मला करायचे आहे भाषांतर पण ज्यांचा प्रतिसाद आहे त्यांची परवानगी मिळाली तर बरे! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

ते प्रातिधीकार मुक्त हाय,तर

जेपी
Sun, 11/23/2014 - 04:11 नवीन
ते प्रातिधीकार मुक्त हाय,तर होऊन जाऊ द्या.*biggrin*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

जरूर जरूर ... माझा काही

मनीषा
Sun, 11/23/2014 - 05:58 नवीन
जरूर जरूर ... माझा काही कॉपीराईट नाहीये . :) पण का..का..का? टीप : क्रमांक ४ मधील पडेल म्हणजे "रत्नांग्रीचा अण्णू गोगटे" नाही. ते -- गर्जेल तो बरसेल काय? असे वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

पण का का का ?>>>>>

जेपी
Sun, 11/23/2014 - 06:08 नवीन
पण का का का ?>>>>> तुमी 'बबलन का मकबरा ' पाहायला जावा मंजे समजेल .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

ओक्के. धन्यवाद मनीषा!

रेवती
Sun, 11/23/2014 - 08:41 नवीन
ओक्के. धन्यवाद मनीषा! प्रयत्न केला पण फारसे जमले नाही. मूंह में राम बगल में छुरी हे एकच जमले बाकी शरणागती. ;) हे म्हणजे जो गरजेगा वो बरसेगा क्या? टैप झाले.
  • Log in or register to post comments

छान! प्रयत्न चालू राहू दे .

मनीषा
Sun, 11/23/2014 - 09:54 नवीन
छान! प्रयत्न चालू राहू दे . प्रयत्ने वाळूचे कण रगडिता .. तेलही गळे - माहीती आहे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

आत्ताच दांभिक लोक ओळखण्याच्या

प्रसाद गोडबोले
Wed, 12/03/2014 - 18:47 नवीन
आत्ताच दांभिक लोक ओळखण्याच्या अजुन एक निकष निदर्शनास आला आहे !
  • Log in or register to post comments

आज दांभिक लोक ओळखण्यचाा नवा

जेपी
Wed, 12/17/2014 - 16:34 नवीन
आज दांभिक लोक ओळखण्यचाा नवा फंडा समजला.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा