Skip to main content

पुण्यदेवीची विनवणी

लेखक पगला गजोधर यांनी बुधवार, 29/10/2014 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक शतकी उमर गाठली, नावे मजला ठेवू नका। मीच विनविते हात जोडूनी, पुण्यावरती जळू नका।। शिवसूर्यचा दिव्य वारसा शहरवासियो तुम्हा मिळे। उणे कुणाचे दिसता किंचित देत दवंडी फिरू नका।| व्हा ज्ञानाचे जोतीबा इथे तुम्ही, शेणमारा हा करू नका । कलम करी ये तरी सालभर सण शिमग्याचा ताणू नका।| सरस्वतीच्या देवळातले स्तंभ घणाने तोडू नका। इथेच गर्दी, इथेच महागाई, असे शंखच, पोकळ फुंकू नका।| निव्वळ रस्ते मॉल बिल्डिंगा, म्हणजे शहर मानू नका। लाख लाख जन माझ्याअंतरी रमले वसले, हे कदापी विसरू नका।| गावं आपुले करा नामांकित परी, करमणुकीच्या गटारगंगेत मला तुम्ही क्षाळु नका। मजला देवी म्हणुनी भजू नका, पण दासी म्हनोणही पिटू नका ।| प्रकाश पेरा अपुल्या भवती, दिवा दिव्याने पेटतसे। हे ज्याच्या हृदयात ठसे, खरा मिपाकर तोच असे।|
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2579
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

वा

पुणं तिथंच आहे.... कोणी काही करत नाहीये त्याला.... पान पडलं तरी आभाळ कोसळल्यासारखं वाटतं कधीतरी पण तुम्ही नका व्यथित होऊ... क्यारम रमवानू अने जूस पिवानू...मज्जानी लाईफ !