Skip to main content

मला आवडलेली पुस्तके: आत्मचरित्र/चरित्र

लेखक पुस्तकमित्र यांनी बुधवार, 15/10/2014 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/28198 http://www.misalpav.com/node/28241 ________________________________________________________ नमस्कार मंडळी. काही अपरिहार्य अडचणींमुळे हा पुढचा भाग टाकायला उशीर झाला आहे, त्यासाठी क्षमस्व. याआधीच्या भागात आपण आपल्याला आवडलेल्या कादंबर्‍यांबद्दल लिहिले होते. या वेळी आपल्या आवडत्या आत्मचरित्रे/चरित्रे याबद्दल थोडक्यात लिहूया! आधीच्या यशस्वी भागांप्रमाणेच तुमच्या उत्स्फूर्त सहभागाची अपेक्षा आहे! चला तर लिहूया आपल्या आवडत्या आत्मचरित्र किंवा चरित्रांबद्दल! आधीच्या भागाप्रमाणेच मला न आवडलेली चरित्रे/आत्मचरित्रे याबद्दल दुसर्‍या एका भागात लिहूया!

वाचने 36571
प्रतिक्रिया 74

प्रतिक्रिया

करुणाष्टक हे व्यंकटेश माडगुळकर लिखित पुस्तकही खुप छान आहे . त्यामध्ये त्यांनी आपल्या आईच्या आठवणी , जुने औन्ध संस्थान , तिथले कर्मचारी , त्यांचे कौटुंबिक जीवन , बदल्या व त्यामुळे होणारी ओढाताण या मनाला हलवुन सोडणारया घटना सांगितल्या आहेत .

'ऑटोबायोग्राफी ऑफ ए योगी' हे श्री श्री परमहंस योगानंदाचे इंग्लिशमधील आत्मचरीत्र मराठीत 'योगीकथामृत' या नावाने भाषांतरीत झालेले आहे. हे आत्मचरीत्र अतिशय आवडले. हे अनेकवेळा वाचलेले आहे. डॉ. हिम्मतराव बावस्करांचं 'बॅरीस्टरचं कार्टं', डॉ. नरेंद्र जाधवांचं 'आमचा बाप आणि आम्ही', रमेश देवांचं 'या सुखांनो या', गोपाळ गोडसेंचं 'गांधीहत्या आणि मी' ही चरित्रे/आत्मचरित्र चांगली आहेत.

अजून 'ही श्रींची इच्छा' (श्रीनिवास ठाणेदार), 'आहे मनोहर तरी' (सुनीता देशपांडे), 'अग्निपंख' (डॉ. अब्दुल कलाम), 'जिहाद' (अस्लम जमादार), 'इन्फिडेल' (या सुदानी लेखिकेचे नाव विसरलो) इराण, इराक, पाकिस्तान, सुदान, सौदी अरेबिया इ. कर्मठ मुस्लिम देशातील महिलांनी लिहिलेली स्वतःची चरित्रे अत्यंत हृदयद्रावक आहेत. या अनेक पुस्तकांचे मराठी अनुवाद उपलब्ध आहेत.

अगदी खरंय.... कितीही वेळा वाचलं तरी कंटाळा येत नाही गम्मत म्हणजे हे पुस्तक म्हणजे अध्यात्माचं प्रवेश द्वार आहे.... अजून थोडी..... माय विकेड विकेड वेज-एरॉन फ्लीन (मराठी ) दिव्य स्पर्श -डॉ भोसले प्रकाशाच्या वाटेवर- श्री.कृष्णानंद सांगत्ये ऐका-हंसा वाडकर एकटा जीव -दादा कोंडके शांतारामा- व्ही शांताराम माझा लढा-हिटलर (मराठी ) पॅपिलॉन-हेन्री शॅरीयर