आपुलकी, प्रेमभाव, माया ममता हे शब्द नुसत्या कानालाही किती गोड वाटतात. शब्दांचा स्पर्शही आकर्षक, मनोवेधक वाटतो. अनुभव तर सोडाच मायेची दोन शब्दासुद्धा दोना जन्मीचे पारणे फेडून जातात. शरीराची कसकस, मनाची धगधग शांत करुन एक मऊ मुलायम पांघरूण घालून जातात. सुखावून जीवाला पुनश्च धड़पडण्याची , जगण्याची जिद्न्यासा देतात.
याउलट तितकारा, तिरस्कार, घृणा , मत्सर हवा हे शब्द उच्चारतानाच जिभेची सुद्धा घालमेलच होते ना. मग प्रत्यक्षातल्या अनुभवांचे काय. एखाद्याचा तिटकारा, तिरस्कार करणे, घृणा वाटणे, मत्सर किंवा हेवा करणे या सर्व भावनिक व्याधींच्या आधीन आपण का व्हावे? हां तर प्रत्यक्षात स्वत:चाच आजार. ज्या व्यक्तीचा आपण तिटकारा करतो, हेवा करतो त्यात त्या व्यक्तीचा दोष किती व स्वत:चा किती त्याचा आपण साधक बाधक विचार केल्यावरच आपण किती टक्के बरोबर आहोत हे लक्षात येईल.तो विचार करताना आपण शंभर टक्के निपक्षपाती आहोत याचेसुद्धा स्वपरीक्षण करूँ घेणे जरुरीचे आहे. हे सर्व झाल्यावर ज्या व्यक्तीशी आपण असे वर्तन करतो ते कितपत योग्य हाही विचार करावा व त्याचा समोरच्या व्यक्तीवर, त्याच्या मानसिक स्थितीवर आपण कितीसा घाला घालतोय अणि ते स्वत:स किती शोभायमान आहे याचा किंचितसा तरी उहापोह करावा असे माझे प्रामाणिक मत आहे. आपल्याला न आवडणारी, न चालणारी , न भावलेली किंवा अपेक्षित नसलेली, नको असलेली गोष्ट अनेक वेला अनेकांच्या हातूनही होत असेल म्हणून त्याचा चांगल्या/योग्य शब्दात ही उलगडा करता येतो न? मग तसे का करू नये ?
अगदी आपल्या कुटुंबातील व्यक्ती व नातीगोती ते शेजारपाजार, समाज आशा सर्वच क्षेत्रात आपला अन्य व्यक्तींबरोबर कधी भावनिक तर कधी व्यावहारिक संबंध येताच असतो.प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी आपण कितीसे समतोल राहू शकतो त्याची परीक्षाच असते म्हणा ना. तेव्हा चोवीस तासातील काही क्षण आपण आत्मपरीक्षणाला देऊ शक्लो तर आताचे हे धावपळीचे वेगवान जीवन कही अंशी तरी सुखकर करण्याचा आपण प्रयत्न करू शकू असे वाटते.
वाचने
3658
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
सासूबाईनी लिहिलेला लेख
मिपावर स्वागत!
चोवीस तासातील काही क्षण आपण आत्मपरीक्षणाला देऊ शक्लो तर आताचे हे धावपळीचे वेगवान जीवन कही अंशी तरी सुखकर करण्याचा आपण प्रयत्न करू शकूहे अनुभवाचे बोल नवं वर्ष सुरू होता होता विचारांना नवीन दिशा देऊ शकतील. आणखी विस्ताराने असं लिखाण वाचायला आवडेल.धन्यवाद. आपल्या
In reply to मिपावर स्वागत! by बहुगुणी
बहुगुणी, आपल्या प्रोत्साहनपर
In reply to मिपावर स्वागत! by बहुगुणी
स्वागत.
नमस्कार व धन्यवाद!व्रत म्हणा
In reply to स्वागत. by प्रभाकर पेठकर
स्वागत
धन्यवाद.लेखावर तुमचे विचारहि
In reply to स्वागत by चाणक्य
विचार आवडले
पोक्त विचार
मुळ स्वभावानुसार नैसर्गिक
In reply to पोक्त विचार by आनंद घारे
अगदी सहमत !