अत्तर
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
बादशहांच्या दरबारात खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
आमंत्रितां समोर दौलतीची शान मिरविण्यासाठी बादशहा, बीरबल समारंभाच्या तयारीकडे जातीने लक्ष पुरवित होते.
काही नोकर चांदीच्या अत्तरदाण्या घेऊन आले.
बादशहांना पाहून सलाम करत होते.
या गोंधळात एकाच्या हातातील अत्तरदाणी पडून अत्तर उंची गालीचावर सांडले.
न राहवून बादशहाने ते चटकन बोटाने टिपून आपल्या अंगरख्याला लावले.
बीरबलाकडे पाहताच बादशहा खजील झाले. बीरबल मिश्कीलपणे हसत होता.
बादशहाने रागारागाने आपल्या अधिकार्याला हुकूम फर्मावला, की तेथे असलेल्या हौदात पाण्याऐवजी अत्तर भरा.
हौदात अत्तर भरले जात असताना बीरबलाकडे अभिमानाने बघत बादशहांनी विचारले,
“क्यू बीरबल क्या खयाल हैं ?"
क्षणभर थांबून बीरबल उत्तरला,
"शहेनशहा, बुंद से गई, वो हौदसे नहीं आती।"
( शतशब्द कथा )
प्रतिक्रिया
अकबर कोण आणि बिरबल कोण तेही
आता काय सांगणार?
@ शैलेन्द्र....ते
गुड ..अत्तराची चर्चा तर
:)
रणजीतसिंहांची कंजुषी
आओ....ते अत्तराला त्याल
धुरंधर बाबा -- काई कळंना .. ़
लेखनविषय आपण बालकथा लिहिले
चांगली सूचना आहे