आपल्या संतसाहीत्यात "नामाचा महीमा" सांगीतला आहे. एखादे नाव सतत घेतले तर त्यात तसे नाम घेणारी व्यक्ती आंतर्बाह्य समरस कशी होऊ शकते याचे हे उदाहरण :-)
---------
सोनियांनी देशासाठी गोळ्या झेलल्या - कोडा
[ Thursday, November 01, 2007 05:44:44 pm]
रांची
मटा ऑनलाइन वृत्त
सोनिया गांधी यांनी आपल्या देहावर गोळ्या झेलून देशासाठी प्राणाची आहुती दिली, त्यामुळे आपण सोनिया गांधी यांनी दाखविलेल्या मार्गावर चालणे गरजेचे आहे, अशी गोंधळलेली आदरांजली झारखंडचे मुख्यमंत्री मधु कोडा यांनी वाहिली.
काँग्रेसजनांना सोनिया गांधीच्या इतके मागे पुढे करण्याची सवय झाली आहे की, त्यांना यत्र-तत्र-सर्वत्र त्यांना मॅडमच दिसतात. त्यातील अनेक महाशयांपैकी कोडा हे एक. म्हणूनच त्यांनी इंदिरा गांधींच्या २३ व्या पुण्यतिथीला काँग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमात चक्क सोनिया गांधी यांचा उल्लेख करून त्यांनाच आदारांजली वाहीली.
मुख्यमंत्र्यांनी अनावधानाने ही चूक केली. त्यांना खरं तर इंदीराजींनाच श्रद्धांजली अर्पण करावयाची होती, असे सांगून युपीएच्या एका नेत्याने कोडा यांना पाठीशी घातले. तर विरोधी पक्ष असलेल्या भाजपला काँग्रेसची खिल्ली उडवण्याचा एक चांगलाच मोका मिळाला. सोनिया गांधी यांच्या आशिर्वादाने कोडा यांना मुख्यमंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे ते दिवस रात्र त्यांचीच माळ जपत असतात, त्यामुळे असे भारतीय जनता पक्षाचे नेते रमेश पुष्कर यांनी कोडा यांची खिल्ली उडवली.
वाचने
7846
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
अगदी
In reply to मस्त by आजानुकर्ण
हा हा हा !
अहो चालायचंच! :)
झारखंड
मस्त !
म्याडम व म्याड
लोकसत्ता
गूड वन!
In reply to लोकसत्ता by नंदन