चिखलात होते कमळ, बुडवुनी चिखलात सर्वांग, तोडले तयाने कमळ, कमळाला लागले चिखल. सायकल वर होउनी स्वार, तक्क्षणी पोहचला घरी. सायकलला लागले चिखल. देवावर वाहिले पुष्प, चिखल पोहचला देव्हाऱ्यात. चिखलात बरबटलेले वस्त्र फेकले अस्तव्यस्त, हात आणि घड्याळाला ही लागले होते चिखल. चिखलाने बरबटलेले घर पाहुनी, आठवण झाली बायकोची. करायास घर साफ घेतली हातात झाड़ू, चिखल लागले झाडूला. भिंतीवर उडले शिंतोडे, हत्तीच्या चित्रफलका वर. चिखलाने शोभिवंत झाले घर, कृपा झाली चिखल लक्ष्मीची. इति.
वाचने
2517
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
अतिशय सुमार कथा.
अतिशय सुमार कथा.
काय प्रकार ?
काय प्रकार ?
ही काय नवी भानगड?
ही काय नवी भानगड?
आता `गाळण्याचा' मस्त धागा उडवला आणि हा शाबूत!
की-बोर्डवर नाही का उडाला चिखल?
७४ (+/-) ३ असतील शब्द.
७४ (+/-) ३ असतील शब्द.
असोच.
आता पुढच्या वेळी. १०० शब्द लिहा.
७३ शब्द आहेत. पण ७३ = १००.
In reply to ७४ (+/-) ३ असतील शब्द. by प्यारे१
७३ शब्द आहेत. पण ७३ = १००. सिद्ध करून दाखवतो.
१. सिद्धांत :० = ०
० = ०० (कितीही ०००० लागले तरी उत्तर हेच राहील)
२. ७ + ३ = १०
३. १० = १०० ( ० = ००)
४. १ = १
सिद्ध झाले ७३ = १००
झालं, समाधान.
वावा
धनुष्य बाण आणि इंजिन वाचले वाट्त चिखलापासुन त्यांना का सोडल ?
+१
In reply to वावा by पप्पु अंकल
+१
लक्षात आले नाही. चिखला पासून
In reply to वावा by पप्पु अंकल
लक्षात आले नाही. चिखला पासून कुणीच वाचलेले नाही.
खिक...काहिहि..
:) खिक...काहिहि..
२००८ मध्ये !!
मिपाकरांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद ! मिपावर सुरुवातीला ह्या कथा खपायच्या. आता तुम्हासी उशीर झाला.. =)
अजून काही
अजून काही गोष्टी चिखलात पडलेल्या लिहायच्या राहिल्या ना भौ! धनुष्यबाण, विळाहातोडा, चष्मा, सिंह, विमान, सायकल, बाण, नांगर वगैरे वस्तूंबद्दल लिहा की!